तिच्या राज्ञीपदाच्या आयुष्यातला नेहमीसारखाच आजचाही दिवस.
पण आज सकाळपासूनच जीवात जीव नाही तिच्या. एकच हुरहूर लागून राहिली आहे..
तिच्या नवऱ्याला गोकुळाच्या वाटेचे वेध लागलेत. त्याची गोकुळाच्या आठवणींनी होणारी चलबिचल इतरांच्या नाही तरी तिच्या ध्यानी येते आहे.
आणि ते ध्यानी आल्यानेच ती अस्वस्थ झाली आहे.
हा गेला आणि पुन्हा 'तिचा'च होऊन राहिला तर?
त्याच्या आयुष्याच्या तळापासून भरून असलेला 'तिच्या'साठीचा जिव्हाळा तिला ठाऊक आहे.
पण आता पुन्हा.. इतक्या वर्षांनी..?
कसं रोखावं आता ह्याला? कसं सांगावं, पुन्हा नको त्या वाटांवरून चालूस?
"सुबह-सुबह का ख्याल आज
वापस गोकुल चले मथुरा राज
मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ?"
मग ती त्याला राजपदाची आठवण करून देतेय.
"तू सम्राट आहेस इथला. गोपाळाचा वेष उतरवलास, डोक्यावरचं पागोटं उतरवून राजमुकुट धारण केलायस.. मग आता हातातला राजदंड बाजूला ठेवून आज बासरीवर पुन्हा "ते" सूर का काढावेसे वाटतायत रे तुला?
"राज दंड छोड़ भूमि पर वाज
फिर काहे बाँसुरी बजाओ
मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ?"
"विरही प्रेमिकेला पुन्हा भूल पडलीय जणू? हे राजपद जणू व्यर्थ झालंय आज तुझ्यासाठी.
तू जाणार या विचाराने नगरजन व्याकूळ आहेत.. तुझ्या बेचैनीचं कारण ठाऊक नसूनही केवळ तू अस्वस्थ आहेस म्हणूनच.
त्या तुला जीव लावणार्या नगरजनांसाठी तरी नको जाऊस रे, गेलास तर इथे कुणाला करमायचं नाही.." असं विनवून बघतेय.
"पुर नारी सारी व्याकुल नयन
कुसुम सज्जा लगे कंटक शयन
रात भर माधव जागत बेचैन"
पण छे.. काहीच पटत नाही त्याला, कालच अर्ध्या रात्री सारथ्याला घेऊन कुठेसा गेला होता.. बेचैन आहे कधीचा.
रात्रीच्या शांत घटकेत नदीच्या तीरावर जाऊन गोकुळाची चाहूल घेतोय.. गोकुळाची? का.. का राधेची...
मग सरतेशेवटी ती नाईलाजाने 'तिचा' उल्लेख करते. निकराने म्हणते..
"तुझी राधा आता गृहिणी झालीय, संसार आहे तिला.. तुझ्या विरहाचे अश्रू पुसून टाकलेत तिनं.
का तिचं दुःख पुन्हा जिवंत करायचंय तुला?
का पुन्हा गोकुळात जायचंय तुला?"
"तुम्हरी प्रिया अब पूरी घरवाली..
..बिरहा के आँसू कब के पोंछ डाली
फिर काहे दर्द जगाओ
...मथुरा नगरपति काहे तुम गोकुल जाओ..?"
लोकविलक्षण नवऱ्याची असली तरी पत्नीच ती, आणि राधा झाली तरी शेवटी 'दुसरी'च ती!
त्यामुळे राधेबद्दल सूक्ष्मशी असूयाच आहे खरंतर तिच्या मनी.
पण त्याबरोबरच या पुनर्भेटीने राधेची होईल ती सैरभैर अवस्थाही एक स्त्री म्हणून जाणून आहे ती.
रुक्मिणीने राधेची घातलेली ही आणच अखेर कृष्णाच्या पावलांना थांबवतेय.
या विनवण्या पोचल्या, म्हणून की काय पुन्हा कधी कृष्ण गेला नाही गोकुळात. 'तू तो मीच आहे', हे अवघड गुज जगाला समजावून सांगणार्या कृष्णाला राधेच्या विरहावर, त्या द्वैतावर मात्र रुक्मिणीकडून समजूत घालून घ्यावी लागली.
रुक्मिणीच्या शब्दांतून त्याच्या हे लक्षात येऊन गेलं की, गतकाळातल्या आठवणींना 'आज'च्या क्षणांमध्ये आणून पुन्हा जगता येत नाही. जगूही नये.
राधा! या नावाचा अर्थच बंधनं सोडवणारी, मोकळं करणारी. आज, आत्ताच्या क्षणाला सामोरं करणारी राधा. झाल्यागेल्या गोष्टीतल्या कडू आणि गोड अनुभवातही गुंतवून न ठेवणारी राधा.
आणि तरीही अशा त्या राधेच्याच बंधनात गुरफटलेला कृष्ण.
अन् या दोघांच्या अनवट नात्याला ओळखूनही त्याला द्यायला हवा असलेला पूर्णविराम उलगडून सांगणारी रुक्मिणी.
यांची ही सुरीली कहाणी.
-------------------------------------------------------------------
ॠतुपर्ण घोषच्या 'रेनकोट' सिनेमातलं 'मथुरा नगरपती काहे तुम..' हे गाणं गेले काही दिवस ऐकत आहे. रूढ अर्थाने हे त्या गाण्याचं रसग्रहण वगैरे नाही.
तर शुभा मुद्गलचा स्थिर, स्वच्छ अन् मृदू आवाज, नुसती साथ करण्यापुरतं साधं बॅकग्राउण्ड म्युझिक, आणि त्या शांत सुरावटींनी, आशयघन शब्दांनी अलगद दाखवून दिलेले अर्थ. इतकंच आहे..
-----------------------------------------------
वाचने
6330
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
MP3 कुठे मिळेल?
In reply to सुंदर by मिसळलेला काव्यप्रेमी
सूडशेठ.. MP3 माझ्याकडे आहे.
In reply to MP3 कुठे मिळेल? by सूड
नाही पटत मला अस प्रेम त्याजता
आयला अवघड आहे. बिचार्या
In reply to नाही पटत मला अस प्रेम त्याजता by स्पंदना
अपर्णा, हे प्रेम त्याजणं
In reply to नाही पटत मला अस प्रेम त्याजता by स्पंदना
अप्रतिम लेख ! काय सुंदर आहे.
In reply to अपर्णा, हे प्रेम त्याजणं by इनिगोय
+१
In reply to नाही पटत मला अस प्रेम त्याजता by स्पंदना
हे गाणं मलाही प्रचंड आवडतं!
+१.
In reply to हे गाणं मलाही प्रचंड आवडतं! by नगरीनिरंजन
तुमचं इंटरप्रिटेशनही लिहा..
In reply to हे गाणं मलाही प्रचंड आवडतं! by नगरीनिरंजन
आवडलं
भागवत ऐकताना ऐकले की
खूप छान लिहिलंय.
बाकी त्या जयदेव कवीचं जाम
In reply to खूप छान लिहिलंय. by प्रचेतस
(No subject)
In reply to बाकी त्या जयदेव कवीचं जाम by बॅटमॅन
हरेकाचा चष्मा येगळा
In reply to खूप छान लिहिलंय. by प्रचेतस
>>> राधा! या नावाचा अर्थच
अरे लिहीलेलं कुठं गेलं?
In reply to >>> राधा! या नावाचा अर्थच by प्यारे१
नेहमीप्रमाणेच सुंदर लिखाण!!
सुरेख प्रकटन!
मस्त लिहिलंय
+१
In reply to मस्त लिहिलंय by पैसा
छान लिहिलय
सुड...
धन्यवाद
In reply to सुड... by दिपक.कुवेत
लेखन आवडलं पण गाणं ऐकलेलं
खूप छान
मी सुद्धा गाणे ऐकले नव्हते
आवडले
सापडले
In reply to आवडले by शुचि
शुचि, खोदकामाबद्दल अ.आ.. त्या
In reply to सापडले by शुचि
सुरेख लिहिलं आहे इनि.
किती काव्यात्मक आहे लेखन हे.
का कुणास ठाउक!!
अतिशय सुंदर गाण्यावरचा सुंदर