Skip to main content

माहेरचा अव्हेर!

लेखक आजानुकर्ण यांनी मंगळवार, 12/03/2013 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्‍या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच. काही दिवसांपूर्वी इटलीच्या दोन सैनिकांना निरपराध भारतीय कोळ्यांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार या सैनिकांना चार आठवड्यांसाठी मायदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सुटी संपल्यानंतर त्यांनी खटल्याचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी परतणे अपेक्षित होते. मात्र आता इटालियन सरकारने हे सैनिक भारतात येणार नाहीत हे जाहीर केले आहे. नेहमीच्या नेभळट परंपरेनुसार इथेही आपल्या इज्जतीचे मुस्काट फुटले आहे. मात्र महाराणींच्या माहेरचा घोटाळा असल्याने प्रश्न प्रतिष्ठेचा बनू शकतो. त्यामुळे शक्य तितके प्रयत्न करून भारत सरकार काखा वर करणार असे दिसते आहे. क्वात्रोचीजींचे आणि हेलिकॉप्टर घोटाळ्याचे उदाहरण ताजे आहे. मागेही तंत्रज्ञानक्रांतीसूर्य राजीवजींच्या कारकीर्दीत ह्याच देशाने निकृष्ट हेलिकॉप्टरे भारताच्या गळ्यात मारली आणि नंतर ती नगण्य भावात विकली गेली. पण ते प्रकरणही दडपले गेले असावे. जय सोनियाजी! http://www.thehindubusinessline.com/news/italian-marines-wont-return-to… -हुय्या

वाचने 45770
प्रतिक्रिया 203

प्रतिक्रिया

In reply to by बंडा मामा

विमान हायजॅक केल्याचे समजल्यानंतर पुढच्या केवळ तासाभरात घडलेल्या या घटना आहेत. इतक्या कमी वेळात कोणत्याही सुसूत्र व योजनाबद्ध कारवाईची योजना बनविणे व ती कार्यवाहीत आणणे अत्यंत अवघड असते. नक्की काय करावे, कसे करावे, कोणी करावे, त्यात कोणते धोके आहेत इ. विचार करायला या प्रकरणात फारच कमी वेळ मिळाला. अमृतसरला नक्की काय घडले याविषयी खूप गोंधळ आहे. अनेक वृत्तपत्रातून वेगवेगळ्या कहाण्या छापून आलेल्या आहेत. त्यामुळे तिथे नक्की काय घडले हे सांगता येणे अवघड आहे. मी असेही वाचले होते की त्या ऑईल टँकरमधून कर्मचार्‍यांच्या वेषातले सैनिक पाठविले होते व त्यांना विमानाच्या जवळ पोचल्यावर विमानाच्या टायरवर गोळ्या घालून टायर फोडण्यास सांगितले होते. पण जसा तो टँकर जवळ येऊ लागला, चाच्यांना संशय आल्याने त्यांनी वैमानिकाला तातडीने उड्डाण करावयास सांगितले व विमान भारतीय हद्दीतून बाहेर पडले. अमृतसरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलर, पंजाबचे पोलिस, टँकरचे कर्मचारी, दिल्लीचे अधिकारी व मंत्री इ. मध्ये इतक्या कमी वेळात समन्वय आणणे व सुसूत्रता आणणे खूप अवघड होते.

In reply to by बंडा मामा

हे वाचा
याचा संपूर्ण संदर्भ देता का बंडामामा? संदर्भ सोडून दिलेले वाक्य कुठलेही असू शकते. त्यामुळे यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ठरविण्यासाठी त्याचा आगापिछा कळला तर बरं होईल..अन्य कुठे दिलेला असेल आधीच तर माफ करा.अजून सगळी चर्चा वाचतेय.

In reply to by श्रीगुरुजी

या विमानात शस्त्रे, बॉम्ब व कमांडो आहेत हे लक्षात आल्यावर इतर कोणताही देश अशा सशस्त्र विमानाला आपल्या हवाई हद्दीतून जाऊन देणार नाही. अशा परिस्थितीत तिथे पोचणार कसे?
अहो श्रीगुरुजी अशा वेळेस विमानात काय आहे ह्याची पाटी बाहेर लावुन ते चालवायचे नसते. अमेरिकेने ओसामाला मारायला कमांडो पाठवले ते काही पाकिस्तानची हवाइ हद्दीत उडण्याची परवानगी घेऊन नाही. मुत्सद्देगिरी ह्यालाच म्हणतात जे करण्यात आपले सरकार कमी पडले.

In reply to by बंडा मामा

अमेरिकेने ओसामाला मारायला कमांडो पाठवले ते काही पाकिस्तानची हवाइ हद्दीत उडण्याची परवानगी घेऊन नाही.
ह्हांगाशी.. पाकिस्तानची टाप आहे का हो, अमेरीकेला नाही म्हणायची? "बेगर्स आर नॉट चुजर्स" असं काहीतरी म्हण्तात बघा.. आणि विमान हवाई क्षेत्रातून जात असतांना त्या त्या देशाला ते कशाकरीता जात आहे, ह्याची माहिती द्यावी लागत असेल, असे वाटते.. आणि अंतरराष्ट्रीय संबंधांत "खोटे बोलणे" योग्य मानले जात नसावे, असा एक समज आहे ब्वॉ माझा..

In reply to by चिगो

पाकिस्तानची टाप आहे का हो, अमेरीकेला नाही म्हणायची? अहो पण तरीही ते हो म्हणतात की नाही हे विचारयच्या भानगडीतच पडले नाहीत.

In reply to by बंडा मामा

"अशा वेळेस विमानात काय आहे ह्याची पाटी बाहेर लावुन ते चालवायचे नसते. अमेरिकेने ओसामाला मारायला कमांडो पाठवले ते काही पाकिस्तानची हवाइ हद्दीत उडण्याची परवानगी घेऊन नाही. मुत्सद्देगिरी ह्यालाच म्हणतात जे करण्यात आपले सरकार कमी पडले. " कोणतेही प्रवासी विमान ज्या देशाच्या हवाई हद्दीतून जात असते, त्या देशाच्या संपर्क यंत्रणेबरोबर त्या विमानाचा सतत संपर्क असतो व देशाच्या हद्दीत प्रवेश करताना विमानाने आपली ओळख पटवून द्यायची असते. विमाने रडारवर दिसत असतात व एखाद्या विमानाने आपली ओळख दिली नाही तर संशय येऊन तो देश ते विमान क्षेपणास्त्र डागून पाडू शकतो. हेच जर लष्करी विमान असेल तर इतर कोणताही देश आपल्या हवाई हद्दीतून दुसर्‍या देशाचे लष्करी विमान जाउ देत नाही. प्रवासी विमानाची व लष्करी विमानाची ओळख वेगवेगळी असल्याने एखाद्या लष्करी विमानाने दुसर्‍या देशाच्या हवाई हद्दीतून जाताना आपण प्रवासी विमान असण्याची बतावणी केली तरी ते जमिनीवरील संपर्क यंत्रणेला लगेच लक्षात येते व अशा परिस्थितीत तो देश त्या विमानावर क्षेपणास्त्र डागू शकतो. तुमच्या म्हणण्यानुसार भारताने एखाद्या प्रवासी विमानातून कमांडो व शस्त्र पाठवायची होती किंवा एखादे लष्करी विमान हे प्रवासी विमान असल्याची बतावणी करून त्यातून कमांडो व शस्त्र पाठवायची होती. मी वर लिहिल्याप्रमाणे जमिनीवरील संपर्क यंत्रणेला अशी बतावणी करून फसविणे अशक्य आहे. आणि समजा तसे विमान व कमांडो पाठविले असते, तरी ते कंदाहार मध्ये उतरणार कोठे? कंदाहार विमानतळावर पळविलेले भारताचे विमान तालिबानच्या सैनिकांनी व रणगाड्यांनी वेढलेले होते. विमानतळावर विमानवेधी तोफा आणून ठेवलेल्या होत्या व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तालिबानी सैनिकांनी तिथे कोणतेही विमान उतरू नये यासाठी धावपट्टीवर अडथळे आणून ठेवलेले होते. त्यामुळे बाहेरील कोणतेही विमान तिथे उतरणे अशक्य होते. किंबहुना विमान विमानतळाच्या जवळ आल्यावर त्याला तोफांचा सामना करावा लागला असता व विमान उतरवताच आले नसते. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची कमांडो कारवाई करणे भारताला अशक्य होते. पाकिस्तानमधली परिस्थिती वेगळी होती. अमेरिकेने ओसामाला पकडताना पाकिस्तानची परवानगी मागण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ओसामाला पाकिस्ताननेच गुपचूप लपवून ठेवले आहे याची अमेरिकेने खात्री करून घेतलेली होती व आपण ओसामाला पकडणार याची बातमी पाकिस्तानला लागली तर काही वेळातच पाकिस्तान त्याला दुसरीकडे हलवेल याची अमेरिकेला खात्री होती. ही मुत्सद्देगिरी नसून अत्यंत सावध व गुप्त लष्करी डावपेच होता. अमेरिकेने ओसामाला पकडण्यासाठी "स्टील्थ" प्रकारची हेलिकॉप्टर्स वापरली होती. ही हेलिकॉप्टर्स रडारवर सहजासहजी दिसत नाहीत व त्यांचा आवाजही खूप कमी असतो. त्यामुळे पाकिस्तानी रडारयंत्रणेला ही हेलिकॉप्टर्स आपल्या हद्दीत घुसल्याचे समजले नाही. ही हेलिकॉप्टर्स अमेरिकेने अफगाणिस्तानमधून अबोटाबादमध्ये (जिथे ओसामाला लपविले होते) पाठविली होती. त्यामुळे पाकिस्तान वगळता इतर कोणत्याही देशाच्या हवाईहद्दीतून जाण्याचा प्रश्नच नव्हता. या हेलिकॉप्टरविषयी अधिक माहिती खालील ठिकाणी मिळेल. http://www.nytimes.com/2011/05/06/world/asia/06helicopter.html?_r=0 "मुत्सद्देगिरी ह्यालाच म्हणतात जे करण्यात आपले सरकार कमी पडले. " या वाक्याशी मी पूर्णपणे सहमत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

भारताला आपले विमान पाकिस्तानच्या हद्दीतून न्यायची काय गरज आहे अफगाण ला लागून तालिबान चा कट्टर शत्रू व भारताचा परम मित्र रशिया मध्ये विमान नेता आले असते , व सुन्नी तालिबानचे विरोधक व भारताचे मित्र इराण हा सुद्धा अजून एक उत्तम पर्याय होता , पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण हे लष्कराच्या हातात आहे , हे एखादा शेंबडा पोरगा देखील सांगेन वाजपेयी शरीफ ह्यांना मैत्रीची भेट द्यायला आले ,तेव्हा मुशर्रफ त्यांना सलामी द्यायला आला नाही , ह्यावरून लष्कराची भूमिका स्पष्ट झाली होती , तरी सुद्धा बेसावध पणे मैत्रीचे तुणतुणे गात बसले. वाजपेयी सरकारची दुसरी मोठी घोडचूक म्हणजे ९८ ला अण्वस्त्र चाचणी करणे , ह्या चाचणी मुळे आपली हायड्रोजन बॉंब बनविण्याची शमता सिद्ध झाली , जी झाली नसती तरीही काहीही बिघडले नसते. नरसिंह राव ह्यांनी आपल्या काळात ही चाचणी होऊ दिली नाही , कारण भारताने एकजरी चाचणी केली तर पाकिस्तान सुद्धा करेल व पाकिस्तान कडे ही शमत १९८५ साली आली होती. भारताला हि चाचणी करून काही विशेष उपयोग झाला नाही , चीन ने तर अजिबात आपले धोरण बदलले नाही , मात्र पाकिस्तानने लहेच हि चाचणी केली , हा बॉंब इस्लामिक बॉंब घोषित करून जगातील पहिले व एकुलते एक अण्वस्त्र धारी राष्ट्र घ्षित केले , ह्यामुळे जिहादी कारवायांच्या साठी त्यांना निधी मोठ्या प्रमाणात मिळाला , त्यांच्या अण्वस्त्र शमतेवर अधिकृत मोहर लागली , व भारताचा पारंपारिक युद्धाचा मार्ग कायमचा बंद झाला , व ह्यापुढे काहीही झाले तरी भारत पाकिस्तानात सैन्य आणू शकत नाही. कारण अण्वस्त्र युद्धाचा बागुल बुआ प्रगत राष्ट्रांच्या पुढे आला असता. ह्या एकमेव निकषावर मुशरफ ने कारगील घडवले , त्याचे भारतीय प्रतिकार शामातेचे अंदाज चुकले मात्र भारतीय सैन्य पाकिस्तानची वेस पार करणार नाही हे मत मात्र खरे ठरले , व आजतागायत त्या ९८ च्या चाचणीमुळे आपले पारंपारिक सैन्य आता लोणच्यासारखे मुरत ठेवायला लागत आहे जो पक्ष चाणक्यांच्या हुशारीचा वारसा सांगतो त्यांनी एकामागोमाग घोडचुका कराव्यात हे पटले नाही , मी कोणत्याही पक्षाची भाटगिरी करत नाही , मोदी पंतप्रधान व्हावे असे जरूर वाटते , म्हणून काही त्यांच्या पक्षांचे मंगळसूत्र गळ्यात बांधल्यासारखे त्यांच्या प्रत्येक कृतीचे वृथा समर्थन सुद्धा करत नाही ,

In reply to by निनाद मुक्काम …

"भारताला आपले विमान पाकिस्तानच्या हद्दीतून न्यायची काय गरज आहे अफगाण ला लागून तालिबान चा कट्टर शत्रू व भारताचा परम मित्र रशिया मध्ये विमान नेता आले असते , व सुन्नी तालिबानचे विरोधक व भारताचे मित्र इराण हा सुद्धा अजून एक उत्तम पर्याय होता ," बापरे! आता मात्र हद्द झाली. तुम्ही हे जे वर लिहिले आहे ते पर्याय भारताने विचारात घेतले नसतील का? का ते फक्त तुम्हालाच सुचलेत व तत्कालीन सरकारला सुचलेच नसणार? आणि पार अगदी कोठूनही विमान नेऊन कमांडो पाठविले तरी ते विमान कंदाहारमध्ये उतरणार कोठे? कंदाहारची धावपट्टी तर बंद होती व विमानतळावर तालिबानी सैनिक होते. मग तिथे कमांडो पोचणार कसे? "पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण हे लष्कराच्या हातात आहे , हे एखादा शेंबडा पोरगा देखील सांगेन" हे काय वाजपेयींना माहित नव्हते का? "वाजपेयी शरीफ ह्यांना मैत्रीची भेट द्यायला आले ,तेव्हा मुशर्रफ त्यांना सलामी द्यायला आला नाही , ह्यावरून लष्कराची भूमिका स्पष्ट झाली होती ," हे सुद्धा वाजपेयींना माहित नव्हते का? "तरी सुद्धा बेसावध पणे मैत्रीचे तुणतुणे गात बसले." मुशर्रफला २००१ मध्ये आग्र्याला बोलाविणे ही चूकच होती. "वाजपेयी सरकारची दुसरी मोठी घोडचूक म्हणजे ९८ ला अण्वस्त्र चाचणी करणे , ह्या चाचणी मुळे आपली हायड्रोजन बॉंब बनविण्याची शमता सिद्ध झाली ,जी झाली नसती तरीही काहीही बिघडले नसते." अण्वस्त्र चाचणी करण्याची मागणी शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून करत होते. प्रगत देश अधूनमधून चाचणी करून नव्याने डाटा गोळा करत असतात. फ्रान्स, चीन इ. देशांनी एका चाचणीवर समाधान न मानता अनेकवेळा चाचणी केली आहे. "नरसिंह राव ह्यांनी आपल्या काळात ही चाचणी होऊ दिली नाही ,कारण भारताने एकजरी चाचणी केली तर पाकिस्तान सुद्धा करेल व पाकिस्तान कडे ही शमत १९८५ साली आली होती." नरसिंहरावांनी जानेवारी १९९६ मध्ये चाचणीची पूर्वतयारी केली होती. पण ऐनवेळी अमेरिकेच्या उपग्रहांमुळे अमेरिकेला सुगावा लागला व त्यामुळे अमेरिकेने दबाव आणून चाचणी रद्द करायला लावली होती. "भारताला हि चाचणी करून काही विशेष उपयोग झाला नाही , चीन ने तर अजिबात आपले धोरण बदलले नाही , मात्र पाकिस्तानने लहेच हि चाचणी केली , हा बॉंब इस्लामिक बॉंब घोषित करून जगातील पहिले व एकुलते एक अण्वस्त्र धारी राष्ट्र घ्षित केले , ह्यामुळे जिहादी कारवायांच्या साठी त्यांना निधी मोठ्या प्रमाणात मिळाला , त्यांच्या अण्वस्त्र शमतेवर अधिकृत मोहर लागली , व भारताचा पारंपारिक युद्धाचा मार्ग कायमचा बंद झाला ," ही अत्यंत अतर्क्य वाक्ये आहेत. पाकिस्तानला जिहादी कारवायांचा निधी अणुचाचणीपूर्वीही मिळत होता. कारगिल युद्ध हे अणुचाचणीनंतरच झाले व त्यात कोणतीही अण्वस्त्रे न वापरता ते पारंपारिक पद्धतीनेच झाले हे आपण विसरलेले दिसता. "व ह्यापुढे काहीही झाले तरी भारत पाकिस्तानात सैन्य आणू शकत नाही. कारण अण्वस्त्र युद्धाचा बागुल बुआ प्रगत राष्ट्रांच्या पुढे आला असता." भारत स्वतःहून कधीच दुसर्‍या देशात सैन्य पाठवित नाही. १९४८ असो वा १९६५ वा १९९९ भारत फक्त स्वत:च्या सीमांचे रक्षण करतो पण दुसर्‍या देशात सैन्य पाठवित नाही. "ह्या एकमेव निकषावर मुशरफ ने कारगील घडवले , त्याचे भारतीय प्रतिकार शामातेचे अंदाज चुकले मात्रभारतीय सैन्य पाकिस्तानची वेस पार करणार नाही हे मत मात्र खरे ठरले , व आजतागायत त्या ९८ च्या चाचणीमुळे आपले पारंपारिक सैन्य आता लोणच्यासारखे मुरत ठेवायला लागत आहे" तुमची नक्की काय अपेक्षा आहे? अजून १-२ युद्धे व्हावीत असे तुम्हाला वाटते का? तुमच्या या वाक्यांचा अर्थच समजत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी तुम्ही जे पर्याय मी दिले ते सरकारला नक्कीच माहिती होते , पण तुम्ही ह्या सर्व प्रकरणातील मूळ मुद्दा समजून घेत नाही आहेत. जो मोदक ह्यांनी रशियाचे उदाहरण देऊन मोजक्या शब्दात समर्पक मांडला आहे अश्या प्रकारच्या अपहरण नाट्यात परिस्थिती बिकट असते , व त्यासाठी कमांडो ह्यांना खास प्रशिक्षण दिले असते. मूळ मुद्दा असा होता की जगभर अश्या अपहरण कृत्यांत जेव्हा लष्करी कारवाई होते , तेव्हा एकतर ती पूर्ण फसते व ओलिस धरलेले मारले जातात ,उदा म्युनिक ऑलिम्पिक, तर काही प्रकरणात काही ओलिस धरलेले मारले जातात पण सारे अपहरणकर्ते मारले जातात ,प्रकरण त्वरीत निकालात निघते, उदा रशिया येथे पुतीन ह्यांनी केलेली कारवाई ,पण कधी कधी कधी कधी सर्व ओलिस ठेवलेले बंधक सुरक्षित ठेवले जाऊन दहशतवादी मारले जातात. 24–25 April 1993: NSG Commandos storm a hijacked Indian Airlines Boeing 737 with 141 passengers on board at Amritsar airport during Operation Ashwamedh. Two hijackers, including their leader, Mohammed Yousuf Shah, are killed and one is disarmed before. No hostages are harmed. ह्या घटनेवरून स्पष्ट कळून येते आपले कमांडो काय ताकदीचे आहेत , जगात ते चौथ्या क्रमांकात येतात , पण कंधार प्रकरणात सरकारचा ढिसाळपणा नडला हे अनेकांनी येथे सांगितले आहे , व पुरावे सुद्धा दिले आहेत , त्यात ही एक भर December 1999: Terrorists hijacked Indian Airlines flight IC814 from Nepal, and landed in Amritsar, Punjab. Within minutes of landing, the Crisis Management Group (CMG), which authorised the use of the NSG, was informed. But the CMG wasted precious hours and by the time the go-ahead was issued, it is too late. On the other hand, the NSG team on alert was elsewhere and no other team was raised during the delay. The hijacked plane took off before the NSG reached Amritsar Airport. The plane landed in Kandahar, Afghanistan where one hostage was killed. Finally, the Indian Government agrees to the terrorists' demands to release three jailed terrorists. The hostages are released and the terrorists escaped to Pakistan. आणि आता मोदक ह्यांनी मांडलेला मुद्दा परत मांडतो , सरकार पुढे लष्करी कारवाई करावी का हा मोठा प्रश्न होता , कशी करावी हा नव्हता. पुतीन ह्यांनी केलेल्या कारवाईत किंवा म्युनिक मधील कारवाईत निरपराध नागरिक मारल्या गेले म्हणून जनता त्यांच्या विरोधात गेली नाही , देशाची इज्जत व जगभरात ह्या संबंधी ह्या देशातून संदेश गेला. भारतात आपल्या तत्त्वासाठी कम्युनिस्ट पक्षाने नुकतेच सरकारच्या मंत्रीमंडळातून राजीनामे दिले , सत्तेसाठी चिटकून बसले नाही ,वाजपेयी ह्याना संघात देश मोठा मग व्यक्ती नाही हि शिकवण दिली होती. ह्यांचा त्यांना विसर पडला असावा. बाबरी मशीद च्यावेळी त्यांचा जो अजेंडा होता तो पूर्ण होण्यासाठी होणार्‍या संभाव्य परिणामाची पर्वा न करता कृती केली गेली ,रथयात्रा निघाल्या , मात्र सत्ता मिळताच मूळ अजेंडा बासनात बांधून आहे ती सत्ता टिकवण्यासाठी केविलवाणी धडपड केली. ह्यापुढे गुरुजी तुम्हाला वाजपेयी सरकारचे काहीच चुकीचे दिसत नसेल तर अश्या आंधळे समर्थनार्थ शायनिंग इंडिया चे पितळ उघडे पडले हे खेदाने म्हणावे लागेल , विरोधी बाके बडवून कविता करून ,थोडक्यात नुसती टीका करून देश किंवा राज्य चालवता येत नाही , त्यासाठी मोदी सारखे कर्तुत्व लागते , ज्या प्रगत देशांनी त्याच्यावर बंदी घातली अश्या आमच्या देशाला झकत मोदींना युरोपियन युनियन मध्ये आमंत्रण द्यावे लागले , तेव्हा मोदी म्हणाले , देर आये , दुरुस्त आये , खरे तर त्यांनी म्हणायला हवे होते , मुझ मे हे दम , मे हु सिंघम

In reply to by निनाद मुक्काम …

"पण कंधार प्रकरणात सरकारचा ढिसाळपणा नडला हे अनेकांनी येथे सांगितले आहे , व पुरावे सुद्धा दिले आहेत ," कंदाहार प्रकरणात हुकुमाचे सर्व पत्ते अतिरेक्यांच्या हातात होते. कंदाहार येथे कारवाईसाठी कमांडो पाठविणे अशक्य होते. अशा वेळी १६० प्रवाशांचे प्राण वाचविण्याचा योग्य तोच निर्णय सरकारने घेतला होता.

In reply to by श्रीगुरुजी

अहो एरवी हिंदुत्ववादी इस्राएल आणि त्यांच्या ऑपरेशन एटांबी चे गोडवे गात असतात. मग स्वताहाआची सत्ता आल्यावर मात्र धिसाळ धोरण अवलांबायची तर सत्ता का पाहिजे मग?

In reply to by पिंपातला उंदीर

इतक्या वेळा सविस्तर लिहूनसुद्धा यांचा हा प्रतिसाद वाचल्यानंतर मराठीतली, गीता व गोंधळ यांचा संदर्भ असलेली, एक म्हण आठवली.

In reply to by श्रीगुरुजी

माझे पण तुमच्या प्रतिसादाबद्दल हेच मत आहे. बाकी २००४ ला लोकानि सत्ते बाहेर हाकलून कौल दिलाच. २००९ तर अजुन्च दुरगती zआलि

In reply to by पिंपातला उंदीर

ओ उद्गिरकर साहेब.. याबद्दल आपले (आणि इथे वाद घालणार्‍या सर्वांचे) मत काय..? December 20, 1978: Devendra Nath Pandey and Bhola Nath Pandey hijacked Indian Airlines flight IC-410. They demanded the immediate release of Indian National Congress party leader Indira Gandhi who was imprisoned at that time on the charges of fraud and misconduct. Later, they were awarded with party tickets for this act by the Indira Gandhi government in 1980 such that Devendra Nath Pandey rose to become a minister in the government of most populous state of India, Uttar Pradesh. This case was also mentioned by Jarnail Singh Bhindrawale to justify his claim regarding the hypocrisy of the Indian government

In reply to by मोदक

हे आणखी एक उदाहरण... On Jan 22, 1993, a Patna-Lucknow-Delhi Indian Airlines Flight IC-810 was hijacked by Satish Chandra Pandey shortly after take-off. Pandey demanded immediate construction of Ayodhya Ram Temple, lifting ban on RSS, the Bajrang Dal, and undertaking that the BJP would not be derecognized. He later surrendered at the insistence of senior BJP leader Atal Bihari Vajpayee.

In reply to by श्रीगुरुजी

अहो गुरुजी ह्या आधी १९९३ साली अमृतसर येथे एका विमान अपहरण सफलतेने मोडून काढल्याचे इंग्रजी वृत्त मी दिले होते ते तुम्ही वाचलेले दिसत नाही , तुमची रेकोर्ड अजूनही कंधार मध्ये अडकली आहे , तुमच्यापुढे हात टेकले. ह्यापुढे ह्या विषयावर बंडूमामा ह्यांनी व इतरांनी फारसे लिहू नये अशी मी त्यांना विनंती करतो. विरोधी बाकावर बसून सभात्याग करणे एवढेच तत्परतेने व सुनियोजित रित्या ह्यांना जमते ,

In reply to by श्रीगुरुजी

आजच्या वर्तमानपत्रातली बातमी वाचून मला माझी भुमिका बदलायला हवी का असे वाटले. ;) 'भारताचा पाकवर लष्करी, राजनैतिक विजय' आधी वाटले असे अडवाणीजी अथवा स्वराजबाई म्हणत असतील. पण वाचले तर काय, भलतेच! "लष्करी आणि राजनैतिक अशा दोन्ही पातळ्यांवर भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळविला आहे , असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी केले आहे. " असो.

In reply to by श्रीगुरुजी

दुसर्‍या देशाच्या हवाई हद्दीतून जाताना आपण प्रवासी विमान असण्याची बतावणी केली तरी ते जमिनीवरील संपर्क यंत्रणेला लगेच लक्षात येते व अशा परिस्थितीत तो देश त्या विमानावर क्षेपणास्त्र डागू शकतो.
प्रवासी विमानाच्या आत काय आहे हे संपर्क यंत्रणेला कसे काय कळू शकते?
आणि समजा तसे विमान व कमांडो पाठविले असते, तरी ते कंदाहार मध्ये उतरणार कोठे? कंदाहार विमानतळावर पळविलेले भारताचे विमान तालिबानच्या सैनिकांनी व रणगाड्यांनी वेढलेले होते.
तसे असेल तर विमान नेण्याचा मुद्दा चर्चेत येण्याचेच कारण नाही.

In reply to by बंडा मामा

कंदाहर मधे कारवाई करायला विमान न्यायला हवे होते असे माझे म्हणणे नाही. (वर लिहिल्याप्रमाणे हे आपल्या हद्दीतच करणे शक्य होते) पण असे न्यायचेच असते तर हवाई हद्द क्रॉस करणे हे कारण मामुली आहे. कमांडो भरलेले एयर इंडीयाचे एखादे नियमीत प्रवासी विमान कुठल्याही हद्दीतुन नेणे शक्य होते. युरोपला जाणारी सर्व विमाने पाकिस्तान वरुन जातात. हा खूप कॉमन रुट आहे. भारताने त्याकाळात हवाई वाहतुन बंद केल्याचे ऐकिवात नाही.

In reply to by बंडा मामा

गुरुजी व त्यांच्या विचारांशी सहमत असणार्या लोकांना एकच प्रश्न विचारतो समजा ताज मधील अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार न करता सुसूत्र व नियोजन बध्दरीत्या जर किमान २०० लोकांना हॉटेल च्या एका मोठ्या हॉल मध्ये बंदी बनवले असते , व आझाद काश्मीर साठी हे अपहरण रचले असून आम्हाला आता पकडलेला आमचा साथीदार कसाब, येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कराची मधून त्यांना बाहेर घडणाऱ्या घडामोडींची कल्पना होती , व अफजल गुरु व तिसरा अजून एक साथीदार सोडून द्या व आम्हाला हि जाऊ द्या अशी मागणी केली असती ,तर २०० निर्दोष लोकांसाठी आपल्या सरकारने तसे करावे का आणि समजा तसे केले तर ह्या लोकांनी नुकतेच बाहेर मारलेल्या निर्दोष लोकांचे काय असा प्रश्न उपस्थित होणार नाही का ती निर्भया स्वतःची इज्जत वाचविण्यासाठी प्राणपणाने झुंज देत वेळप्रसंगी मृत्यूला कवटाळते, आणि आम्ही हीच इज्जत अफगाण मध्ये सोडून येतो.

In reply to by निनाद मुक्काम …

"तर २०० निर्दोष लोकांसाठी आपल्या सरकारने तसे करावे का" हा हायपोथेटिकल प्रश्न आहे. तरी माझ्या अल्पमतीनुसार याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. वरील काल्पनिक प्रसंगात अतिरेकी हे भारतातच आहेत. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध कोणतीही कारवाई करायला भारताला पूर्ण मुभा आहे. भारत आपल्या कोणत्याही कानाकोपर्‍यातून कितीही कमांडो मुम्बईला आणू शकतो, पाहिजे ती शस्त्रे आणू शकतो व सुटकेची कोणतीही योजना आखायला भारताकडे भरपूर वेळ आहे, साधने आहेत, मनुष्यबळ आहे व स्वातंत्र्य पण आहे. त्यामुळे भारत प्रथम कारवाईचीच योजना आखणार. त्यात कमीतकमी त्रुटी राहण्याच्या दृष्टीने व कमीतकमी मनुष्यहानी होण्याच्या दृष्टीने योजना आखणार. वरील प्रसंगात भारत असेच करेल. कोणताही देश अतिरेक्यांच्या अटी केव्हा मान्य करतो, जेव्हा नागरिकांना सोडविण्याची शक्यता पूर्णपणे नष्ट झाली असेल तेव्हाच. नागरिकांना सोडविण्याची थोडीफार शक्यता असेल तर कोणताही देश सर्वात आधी त्या सर्व शक्यता पडताळून पाहतो. जेव्हा नागरिकांना सोडविण्याच्या इतर सर्व शक्यता संपतात तेव्हा कोणत्याही देशापुढे दोनच पर्याय शिल्लक राहतात - नागरिकांच्या प्राणांची पर्वा न करता अतिरेक्यांच्या मागण्या मान्य न करणे किंवा अतिरेक्यांच्या कमीतकमी मागण्या मान्य करून नागरिकांचे प्राण सोडविणे. कोणताही देश नागरिकांचे प्राण वाचविण्याला अधिक प्राधान्य देतो व भारताने तेच केले. सुरवातीला अतिरेक्यांनी भारतीय तुरूंगातील ४० अतिरेक्यांना सोडण्याची व २० कोटी डॉलर्स इतक्या खंडणीची मागणी केली होती. बर्‍याच वाटाघाटीनंतर शेवटी भारताने ३ अतिरेकी सोडले व त्या बदल्यात १६० नागरिकांचे प्राण वाचविले. मागील वर्षी ओरिसातल्या एका जिल्हाधिकार्‍याचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्यावर ओरिसा सरकारने त्याच्या सुटकेच्या बदल्यात नक्षलवाद्यांना तुरूंगातून सोडले होते हे लक्षात घेतले पाहिजे.

In reply to by निनाद मुक्काम …

श्रीगुरुजी / क्लिंटन यांच्या शांत प्रतिसादांचे कौतुक वाटते आहे.. निर्भया आणि कंदाहार याचा काय संबंध.. तुलना करण्यासाठी पण नाही.. "इज्जत वाचविण्यासाठी प्राणपणाने झुंज देत वेळप्रसंगी मृत्यूला कवटाळते," हाही एक बळंच मुद्दा.. शायनिंग इंडिया हाही असंबंद्ध मुद्दा.. कविता / विरोधी पक्षाची बाके बडवणे.. काहिच्या काही विधाने.. मागे एक धागा होता.. भारताचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान कोण .. त्यात अतिशय उत्तम मुद्देसूद चर्चा झाली होती आणि मिपावरच्या धुरंधरानी अप्रतिम माहीती मांडली होती.. शिवाय मागे क्लिंटन व इतर काहींनी २००४ च्या पराभवाची उत्तम मीमांसा केली होती.. ती पहावी.. कंदाहार या मुद्द्यावर राहून चर्चा व्हावी.. मुळात त्याचा या धाग्याशी थेट संबंध नव्हताच.. पण असो.. १६० जणांचा जीव वाचवणे हे सर्वात महत्त्वाचे.. रुपेन कट्याल याला अतिरेक्यांनी ठार मारले.. त्या जागी तुमची जवळची व्यक्ती किंवा स्वत: असा विचार करा.. समजा कमांडो कारवाई फसली असती आणि बहुसंख्य प्रवासी मारले गेले असते.. किंवा अतिरेक्यांनी कमांडो कारवाई होते आहे लक्षात येताच कंदाहारमध्ये आय सी ८१४ बाँबने उडवून दिले असते तरी बोलणार्‍यांनी वाजपेयी सरकारलाच बोल लावला असता.. राजकारणात समोरच्याला चूक ठरवायचे असले की हवा फिरेल तसा मुद्दा मांडता येतो... जसवंतसिंग कंदाहारला जाण्यापूर्वी प्रमुख पक्षांशी बोलले होते असं अंधुकसं आठवतंय.. चूक असल्यास सांगावे.. हे असले मुत्सद्दीपणाचे तारे तोडलेले पाहिले की नेहमी त्या काश्मीरच्या मंत्र्याच्या मुलीसाठी सोडलेले अतिरेकी आठवतात.. तिथे ती एक मुलगी होती.. http://en.wikipedia.org/wiki/1989_kidnapping_of_Rubaiya_Sayeed आजवर हे कधीच चूक समजले गेले नाही ? आय सी ८१४ तर पूर्ण विमान आणि १६० प्रवासी होते... त्या ४५ मिनिटात निर्णय झाला नाही किंवा टँकर मधून हल्ला करण्याचा प्रयत्न फसल्यावर काय योग्य उपाय होता -- सर्व वाटाघाटी बंद करून विमान उडवून द्या आणि आमची सर्व माणसे मारा असा निरोप द्यायचा? unclassified जेवढी माहिती मीडियातून येते त्याच्या आधारावर इतक्या वर्षांनी आपण एखाद्या critical situation ला इतकं काळ्यापांढर्‍या स्वरुपात कसं पाहू शकतो.. इथे तर फक्त करड्याच्याच छटा दिसत असताना.. वाजपेयी / बीजेपी वादी किंवा विरोधी हे चष्मे बाजुला ठेवल्याशिवाय मधल्या छटा मनातही येणार नाहीत.. गेल्या काहि दिवसातले निनाद जर्मनी यांचे प्रतिसाद पाहून आयडी हायजॅक झाल्यासारखे वाटते आहे..

In reply to by मैत्र

श्रीगुरुजी / क्लिंटन यांच्या शांत प्रतिसादांचे कौतुक वाटते आहे.. बाकी लोकाणी काय अशांत प्रतिसाद दिले ते कळले तर फार बरे होईल. का ते तुम्हाला रुचातील असे प्रतिसाद देत आहेत म्हणून असे म्हणट आहात? मागे एक धागा होता.. भारताचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान कोण .. त्यात अतिशय उत्तम मुद्देसूद चर्चा झाली होती आणि मिपावरच्या धुरंधरानी अप्रतिम माहीती मांडली होती.. शिवाय मागे क्लिंटन व इतर काहींनी २००४ च्या पराभवाची उत्तम मीमांसा केली होती.. ती पहावी.. यावर वेगवेगळी मत असु शकतात. काही लोकाणा चंद्रशेखर हे खूप चांगले पंतप्रधान वाटतात. आता बोला. कंदाहार या मुद्द्यावर राहून चर्चा व्हावी.. मुळात त्याचा या धाग्याशी थेट संबंध नव्हताच.. पण असो.. तो मुद्दा तुम्ही ज्याना शानतीपूर्ण प्रतिसादाचे प्रमाणपत्र दिले त्यानी सुरू केला आहे. नीट धागा वाचले तर कळेल. समजा कमांडो कारवाई फसली असती आणि बहुसंख्य प्रवासी मारले गेले असते.. किंवा अतिरेक्यांनी कमांडो कारवाई होते आहे लक्षात येताच कंदाहारमध्ये आय सी ८१४ बाँबने उडवून दिले असते तरी बोलणार्‍यांनी वाजपेयी सरकारलाच बोल लावला असता.. राजकारणात समोरच्याला चूक ठरवायचे असले की हवा फिरेल तसा मुद्दा मांडता येतो... जसवंतसिंग कंदाहारला जाण्यापूर्वी प्रमुख पक्षांशी बोलले होते असं अंधुकसं आठवतंय.. चूक असल्यास सांगावे.. हे असले मुत्सद्दीपणाचे तारे तोडलेले पाहिले की नेहमी त्या काश्मीरच्या मंत्र्याच्या मुलीसाठी सोडलेले अतिरेकी आठवतात.. तिथे ती एक मुलगी होती.. हत्तप://एन.विकिपेडिया.ऑर्ग/विकी/1989_किडनॅपिंग_ऑफ_रुबैईया_सेयिड आजवर हे कधीच चूक समजले गेले नाही ? आय सी ८१४ तर पूर्ण विमान आणि १६० प्रवासी होते... त्या ४५ मिनिटात निर्णय झाला नाही किंवा टँकर मधून हल्ला करण्याचा प्रयत्न फसल्यावर काय योग्य उपाय होता -- सर्व वाटाघाटी बंद करून विमान उडवून द्या आणि आमची सर्व माणसे मारा असा निरोप द्यायचा? हे असले घाबरत विचार कट्टर राष्ट्रवादी पक्ष करणार असतील तर मग कॉंग्रेस ला नेभलत पणा वरुन का शिव्या घाळयच्या गेल्या काहि दिवसातले निनाद जर्मनी यांचे प्रतिसाद पाहून आयडी हायजॅक झाल्यासारखे वाटते आहे.. पुन्हा तेच. तुम्हाला असे का वाटत आहे? तुम्हाला आवडतात ते मत ते मांडत नाही आहेत म्हणून.

In reply to by पिंपातला उंदीर

तुमच्या एकावर वैयक्तिक रोख नव्हता.. पण माझ्या एकाही वाक्याचे उत्तर न देता ज्या उद्धटपणे लिहिले आहे त्यातच सर्व आले.. "मला असं वाटतं किंवा माझं हे मत आहे" - इतक्या बिनबुडाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नसते.. जरा सभ्यपणे आणि मुद्द्याला उत्तर द्या.. प्रत्येक ओळीवर असंबद्ध प्रतिसाद देऊन ते भाजप वगैरेवर ढकलू नका.. थोडे संयमित आणि तर्कशुद्ध प्रतिसाद अपेक्षित आहेत.. बळंचे केलेले बालिश आरोप आणि संदर्भहीन वाक्ये नाहीत..

In reply to by श्रीगुरुजी

""मुत्सद्देगिरी ह्यालाच म्हणतात जे करण्यात आपले सरकार कमी पडले. " या वाक्याशी मी पूर्णपणे सहमत आहे." मी वरील वाक्य एक सर्वसाधारण मत म्हणून समजलो होतो. बंडा मामांनी ते फक्त कंदाहार प्रकरणासंबंधात लिहिले होते हे माझ्या लक्षात आले नव्हते. हे लक्षात न आल्यामुळेच मी सहमत झालो होतो. भारत सरकार सर्वसाधारणपणे मुत्सद्देगिरीत नेहमीच कमी पडते. १९४७ पासून २०१३ पर्यंत हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मी सहमत झालो होतो. भारताचे विमान पळविणे ही चक्क गुंडगिरी होती व या प्रकरणात सर्व हुकुमाचे पत्ते हे अतिरेक्यांच्या हातात होते. त्यामुळे कंदाहार प्रकरणात मुत्सद्देगिरीला वावच नव्हता व मुत्सद्देगिरीत भारत कमी पडण्याची शक्यताच उद्भवत नव्हती.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या प्रतिसादात ते वाक्य माझे सर्वसाधारण मत म्हणून दिले असे म्हणण्यास काहीही जागा नाही. मी ते कंदाहार प्रकरणाच्या संदर्भात लिहिले होते हे स्पष्ट आहे. पण ते असो. एकदा का विमान पळवले की हुकमाचे पत्ते अतिरेक्यांकडेच असतात पण म्हणून आपण काय खेळ सोडूनच द्यायचा नसतो. अमृतसरला ४० मिनिटे विमान होते तो वेळ विमान इममोबिलाइज करण्यास पुरेसा होता असे तिथल्याच सुरक्षा रक्षकांनी म्हंटले आहे. एकदा का विमान जॅम केले कमांडो वगैरे आणायला चिक्कर वेळ मिळाला असता. पण आपण तेवढेही करू शकलो नाहीत ही नामुष्की आहे. तुम्हाला पटो न पटो.

In reply to by पिंपातला उंदीर

१६० भारतीयांची जर एव्हडी काळजी होती तर १६० खासदारांना कंदहार ला पाठवुन विमानप्रवाश्यांऐवजी ओलिस ठेवायचे. तालीबान्यांनी इतक्या नीच आणि भ्रष्ट खासदारांना ओलिस म्हणुन ठेवुन घेतले नसते ही गोष्ट वेगळी.

>>> प्रखर राष्ट्रवादाचा पुकारा करणार्‍या एका पक्षाच्या सत्ता काळात पण कमी अधिक फरकाने हे प्रकार घडल्याचे स्मरते या सर्व घटना २००५ ते २०१३ या कालावधीत घडलेल्या आहेत.

पण आता सर्वश्री मनमोहनसिंगांनी इटलीला खडसावले आहे ना! एकदम सज्जड दम !! आता काय बी टेन्शान नाय !!

In reply to by वेताळ

आता राजरोज गुन्हे करून भरपाई देऊन सुटणे हळूहळू समाजमान्य होते आहे तर !!! हेच विधान दिल्लीच्या पिडीतेला लावले तर चालेल का तुम्हाला ? भारताच्या हद्दीत दोन कोळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले गेले. गैरसमजातून हल्ला केले हे मान्य केले तरी पूर्ण शिक्षा माफ तर होताच कामा नये. सौम्य करावी एकवेळ पण आर्थिक मोबदला घेऊन सोडणे म्हणजे न्यायाचा बाजार मांडणे आहे असे मला तरी वाटते.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

भारताच्या हद्दीत दोन कोळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले गेले. गैरसमजातून हल्ला केले हे मान्य केले तरी पूर्ण शिक्षा माफ तर होताच कामा नये. सौम्य करावी एकवेळ पण आर्थिक मोबदला घेऊन सोडणे म्हणजे न्यायाचा बाजार मांडणे आहे असे मला तरी वाटते. अगदी सहमत ! आता एक प्रश्न मला विचारावासा वाटतो... इटलीच्या हद्दीत २ कोळ्यांवर हल्ला करुन,त्यांना ठार मारल्यावर हिंदुस्थानच्या नौसैनिकांना इटलीने अशाच पद्धतीने हिंदुस्थानात परत जाउ दिले असते का ? (या प्रश्नावर विचार करा आणि बघा काय उत्तर तुमच्या मनात येते.)

In reply to by मदनबाण

केरळ मधील मृत मच्छीमार जे ह्या सैनिकांच्या हल्ल्यात मरण पावले ते काही सधन घरातील नव्हते. त्याच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबियाची होणारी परवड त्या इटलीच्या सैनिकाना शिक्षा झालेवर कमी होणार असेल तर ठिक आहे. परंतु न्याय मिळाला तरी त्याचा काहीएक फायदा त्यांना होईल असे वाटत नाही. मागील महिन्यात १० पंजाबी युवकानी दुबई मध्ये एका पाकिस्तानी युवकाची हत्या केली. तेथिल प्रचलित कायद्या प्रमाणे त्याना मृत्युदंडाची शिक्षा झाली. परंतु शरियत कायद्यानुसार त्याच्या वतीने एका पंजाबी उद्योगपतीने काही करोड रुपये ब्लडमनी मोजुन त्याना भारतात परत आणले.त्या युवकानी जाणिवपुर्वक त्याची हत्या केली होती. इथे जाणिवपुर्वक हत्या केली असे म्हणता येणार नाही. मग त्या कुटुंबियाचा फायदा कशात आहे तो निर्णय घेतला तर काय हरकत आहे?

In reply to by वेताळ

मग उद्या ईटलीतले बाकी चे नागरीक जे की इथे टुरीष्ट व्हिसा घेउन आलेत त्यांनी बंदुका घेउन वाट्टेल तितके मुडदे पाडावे मग ईटलीने पैश्याने भरपाइ करावी ,कशी मस्त आयडीया आहे ना गरीब घरातल्या मानसांनी ह्याचा लाभ घ्यावा ही विनंती.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

बंदुक घेवुन आपण कोण कोणत्या देशात प्रवेश करु शकतो ह्याची माहिती दिलीत तर बरे होईल.

In reply to by वेताळ

भारतात बंदुक सहज उपलब्ध होतात म्हणुन म्हटले वेताळ राव्,तुम्ही का मानगुटीवर बसताय

In reply to by श्री गावसेना प्रमुख

मुळात हि घटना घडली आहे ते ठिकाण भर समुद्रात आहे.त्यामुळे तिथे भारताची हद्द होती का ? कि ती हद्दी बाहेर झाली ह्याचा निकाल लागला नाही आहे.त्यामुळे तिथे कोणते नियम लागु होतात हे आपण सर्वसामान्य लोक सांगु शकत नाही.आयुष्यात सगळेच निर्णय भावनेच्या भरात घेवुन चालत नाहीत. थोडा व्यावहारिक विचार केला तर बरे असते.

In reply to by वेताळ

वेताळ राव ते ठिकाण भारतीय हद्दीत येतय हे भारत सरकारने ठामपणे सांगीतलय.तरीही तुम्हाला शंका असल्यास आपण प्रत्यक्ष घटनास्थळावर जाउन येउ

In reply to by श्री गावसेना प्रमुख

येताना मला पण एक बंदुक पाहिजे ती पण आणु. तसे आपण दाऊद पाकिस्तानात असल्याचे ठाम पणे सांगत असतोच कि......

In reply to by श्री गावसेना प्रमुख

येताना मला पण एक बंदुक पाहिजे ती पण तुमच्या ओळखीने आणु. तसे आपण दाऊद पाकिस्तानात असल्याचे ठाम पणे सांगत असतोच कि......

इटलीऐवजी फ्रान्स्,जर्मनी असते तर एवढा गोंधळ झाला नसता एवढे नक्की. घटना घडल्यापासून केरळ काँग्रेसनेते,केंद्रातील काँग्रेस नेत्यांत "आम्ही त्यातले नाही आहोत' दाखवण्याची स्पर्धा चालु आहे.तोंड बंद ठेवले तर विरोधी पक्ष/जनता ह्या घटनेचा सोनिया-इटली असा संबंध लावणार. हे टाळण्यासाठी स्पर्धेत मनमोहनही उतरले आहेत्.सैनिक परतले नाहीत तर 'गंभीर परिणाम' होतील असेही ते म्हणाले आहेत.आपलल्या राजदूतांना बॅगा भरायचे संकेत दोन्ही देशांनी दिले आहेत.सैनिक परतण्याची शक्यता अतिशय कमी वाटते. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचा नेहमी विदूषक का होतो हे कोडे नेहमीच पड्त आलेय.

अमोल उद्गिरकरना पंतप्रधानपदासाठी माझा संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो. त्यांच्या प्रतिसादावरुन त्यांना सर्वच्या सर्व गोष्टीतली जाण आहे असे माझे मत बनले आहे.

In reply to by अन्या दातार

अमोल उद्गिरकरना पंतप्रधानपदासाठी माझा संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो.
दे टाळी.अगदी मनातले बोललास बघ.

In reply to by क्लिंटन

आजपर्यंत "सोनियापादत्राणतलवसुंधराविहारधन्य" असे सुमार संपादक महिती होते ... हे अमोलरत्न बहुतेक त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता स्वतःच्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करत असावे ... कारण आता युवराजांचे आणि त्यांच्या पुढील पिढीचे गोडवे गाण्यासाठी सुमार संपादकांची लेखणी पुरेशी नसणार ... सकलतरतमविचारकर्त्यांचा बुद्धिभेद करायला आता ताज्या दमाचा गडी हवा ना ....

In reply to by क्लिंटन

अमोल उद्गिरकर पंतप्रधान होत असल्यास श्रीगुरुजींना किमान नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष किंवा पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी (ब्रजेश मिश्र यांच्याप्रमाणे) करण्यास माझा पाठिंबा आहे. - लिंकन

In reply to by क्लिंटन

अगदी अगदी.... चर्चा वाचून मनसोक्त करमणूक झालेली आहे.. विशेषत: विमान अपहरणाच्या वेळेला काय रणनीती ठरवायला पाहिजे होती आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये काय करायला पाहिजे तो भाग. खासकरून कोणत विमान कसा न्यायला पाहिजे, आत काय ठेवायला पाहिजे, बाहेर काय सांगायला पाहिजे... हसून हसून पुरेवाट झाली...शाळेत असतानाच्या चर्चा आठवल्या....... बाकी श्रीगुरुजींना +1

कंदाहार प्रकरणी तत्कालीन सरकारने जो निर्णय घेतला तो ग्राउंड रिअ‍ॅलिटी* पाहून सर्व शक्यता विचारात घेऊन मगच घेतला असावा. तो त्या परिस्थितीत योग्यच असणार. तसेच संसद हल्ल्यानंतर आर या पार लडाईची घोषणा करून नंतर ती केली नाही हा ही सूज्ञपणाचाच निर्णय होता. *ग्राउंड रिअ‍ॅलिटी तशी आहे असे उघडपणे आजवरच्या कुठल्याही राजकीय नेतृत्वाने सांगितले नाही. त्या ऐवजी बोटचेपेपणाचा/कणाहीनतेचा आरोप स्वतःवर घेतला ही कौतुकास्पद गोष्ट आहे.

ऑगस्टा प्रकरण दाबण्यासाठी काही नेते मंडळींनी खेळलेली ही कुटील निती आहे,अशी कॉन्स्पिरसी थेअरी आहे. (कुटिन पत्ते)

ह्या इटली प्रकरणाचे नक्की पुढे काय होते आहे? सुरूवातीपासूनच भारताबाहेरील माध्यमांनी ह्या प्रकरणाची अजिबात दखल घेतली गेलेली नाही. भारतीय नेतृत्वाच्या 'कणखरपणा'ची जगात काय किंमत आहे, हे ह्यावरून सूचित व्हावे! आणि आतातर भारतीय माध्यमेही ह्याबद्दल काही लिहीतांना दिसत नाहीत. मी फक्त एकदोन इंडिश आणि दोन- तीन मराठी वर्तमानपत्रांच्या संस्थळांपुरते बोलतो, आणि हेही इथे नमूद करतो की हीच वर्तमानपत्रे 'मनमोहनांनी ठणकावले आहे' वगैरे थाटाच्या बातम्या गेल्या आठवड्यातच देत होती. अर्थातच भारतात आता दर बारा तासांना नवे स्कँडल मिळत असल्याने, ह्या प्रकरणाच्या तीव्रतेची धार माध्यमात, व बहुधा जनसामान्यांतही कमी झाली असावी.

In reply to by प्रदीप

कधीकाळी काश्मीर युनोत नेले आता हे इटालीयन नौसैनिक पण तसेच आंतर्राष्ट्रीय लवादात जाणार... Our decision based on your court ruling: Rome

कुठल्याच राजकारण्याला आपल्या देशाच्या इभ्रतीची पर्वा नाहीये आणि इथे देशप्रेमी सदस्यांची वादावादी चालू आहे हे पाहून आश्चर्य वाटले. या प्रकरणाचे पुढे काहीही होणार नाही. त्याचे आणखी एक 'भिजत घोंगडे' होईल. जनताही विसरुन जाईल. फक्त निवडणुकीच्या काळात ही 'कढी' परत गॅसवर चढवली जाईल. आता आख्खा युरोपियन महासंघ इटलीच्या सहाय्याला धावून आलाय. तुमच्याशी व्यापार बंद करतो असे सांगण्याची धमक आहे का सत्ताधार्‍यांमधे?

In reply to by तिमा

आंतरराष्ट्रीय जगतात भारताचे राजदूत्,दुतावासातले अधिकारी हा चेष्टेचा विषय असतो असे वाचले होते.मंत्रीगण बाजुला ठेवा, ते येतात,जातात्.वर्षानुवर्षे नोकरी करूनसुद्धा ह्या अधिकार्‍यांचा अनेक प्रकरणांत पोपट होतो.ह्या लोकांची वक्तव्ये म्हणजे ambiguity चा उत्तम नमुना असतो.

In reply to by तिमा

तुमच्याशी व्यापार बंद करतो असे सांगण्याची धमक आहे का सत्ताधार्‍यांमधे?
आधिच इटलीत भारतीय इल्लीगल एमिग्रंट्स अगणित आहेत. या प्रकरणानंतर इटलीवर सूड घ्यायचा म्हणून आपले मुत्सद्दी राजकारणी इथल्या परिस्थितीमुळे अजुन जास्त लोकांना तिकडे घुसायला उद्युक्त करतील. ;)

In reply to by तिमा

>>> आता आख्खा युरोपियन महासंघ इटलीच्या सहाय्याला धावून आलाय. तुमच्याशी व्यापार बंद करतो असे सांगण्याची धमक आहे का सत्ताधार्‍यांमधे? हे अजून वाचलेले नाही. पण आख्खा युरोपियन महासंघ भारताशी व्यापार बंद करणे शक्य नाही. भारतावर केवळ शाब्दिक दबाव आणण्यासाठी असे केले असावे. शेवटी देशाचे व्यावसायिक व आर्थिक हितसंबंध हे कोणत्याही नीतिमत्ता किंवा तत्वापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. भारतासारखे प्रचंड लोकसंख्या असणारे वाढते मार्केट कोणताही शहाणा देश दूर ठेवणार नाही. त्यामुळे या फुसक्या धमकीत काहीही अर्थ नाही.

संऱक्षण क्षेत्रातील काही तज्ञांनी भारताला इटलीशी संबंध तोडणे परवडणारे नाही असा सूर लावला आहे.भारताला संरक्षण सामग्री पुरवण्यात इटली आघाडीवर आहे. DRDO,HAL,NAL,भारतिय नौदल अशा अनेक संस्थांना इटालियन कंपन्या संऱक्षण सामुग्री पुरवतात्.संबंध तोडले तर भारतापेक्षा इटलीचे आर्थिक नुकसान जास्त आहे असे वाटते.म्हणूनच चर्चा करून 'common solution' काढण्यासाठी इटली,युरोप संघ भारताला विनंती करतोय.

भारताच्या नव्या मदर तेरेसा वेळ आल्यास झाशीची राणी बनू शकतात हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले. भारताच्या अनभिषिक्त, साध्वी सम्राज्ञीने इटलीवर कडाडून टीका केली आहे. इतकी कडक टीका की तमाम इटलीवासी लोकांना दिवसा तारे दिसू लागले म्हणे! ह्या महात्यागी, पराक्रमी, परमबुद्धीवान पुरंध्रीने माहेरचे आहेत म्हणून इटलीची गय केलेली नाही त्यामुळे राजघराण्यावर दात विचकणार्‍यांचे दात घशात गेल्याची चर्चा देशभर सुरु आहे म्हणे! हे वाचा आणि रोमांकित व्हा! असा नेता आपल्या सर्वोच्चपदावर आहे त्याकरता सर्वशक्तिमान परमेश्वराचे आभार माना! http://www.loksatta.com/desh-videsh-news/italian-marines-row-sonia-gand…

In reply to by इरसाल

काय त्रास आहे रा॑व? सोनिया गांधींनी हे इटलीमध्ये जावून सांगायचे की काय ? आम्ही वाट बघतोय कोणीतरी 'पेटून' उठेल- पिझा खावू नका म्हणून सांगेल,फियाट कंपनीत जावून राडा करायची भाषा करेल.

In reply to by चिरोटा

मी तर सचिन तेंडुलकरची फेरारीच जाळावी म्हणतो.

"थोरल्या आऊसाहेब कडाडल्या!", "मनमोहन सिंगांनी पाकला ठणकावून सांगितले" . . . अशी वाक्ये वाचली हसू आवरत नाही. असे म्हणणे म्हणजे "मांजरीने डरकाळी फोडली" किंवा "सशाने फुत्कार टाकले" असे वाचण्यासारखे आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सहमत आहे. म्हणून अखिल भारतीय संतप्त तरुण संघटनेच्या वतीने श्रीगुरुजी यांना त्या खलाशांना घेऊन येण्यासाठी इटलीस पाठवण्याचे ठरले आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. सर्व संतप्त तरुणांनी वर्गणी म्हणून एक एक सुतळी बॉम्ब श्रीगुरुजी यांच्याकडे जमा करावा. (त्या बॉम्बवर जय श्रीगुरुजी असे लिहिलेले असावे). धन्यवाद.

In reply to by नितिन थत्ते

चचाजान, कम से कम अपनी उमर का तो लिहाज़ किया होता। आपजैसे बुजु़र्ग से ये उम्मीद़ ना थी। इसतरह की बात करना तो निहायत ही बेहयां और नामकुल इन्सानों की फि़तरत होती है जो कब से देखी भी गये है। जनाब-ए-आला आप कब से इस नियत पे उतर आये? -(शरमिंदा) मिर्झा धमालुद्दिन बेग

च्यामारी ज्या ज्या घटनांच्या मध्ये इटली चा सम्बंध येतो तिथे सरकार माती का तेच काळात नाही. माझे असे स्पष्ट मत आहे कि भारताने इटली ला १५ दिवसाची मुदत दिली पाहिजे आणि जर १५ दिवसत ते दोघे परत आले नाहीत तर भारतीय सागरी हद्द इटलीच्या सगळ्या जहाजांना ( सैनिकी किव्हा गैर सैनिकी) निषिद्ध म्हणून घोषित करु असा दम द्यावा आणि तरी पण कोणते जहाज आलेच तर ते देशाला धोका समजून बुडवू असा दम द्यावा. तेव्हडा फुकाचा दम तर देवून बघू शकतोच.

In reply to by खबो जाप

>>च्यामारी ज्या ज्या घटनांच्या मध्ये इटली चा सम्बंध येतो तिथे सरकार माती का तेच काळात नाही. च्यामारी आम्ही तर ऐकलं की पाकिस्तानचा संबंध येतो तिथे पण सरकार माती खातं. श्रीलंकेचा संबंध येतो तिथे पण सरकार माती खातं.....................................

In reply to by नितिन थत्ते

+१. सगळीकडे माती खाणार्‍या सरकारला योग्य ती जीवनसत्वे मिळत नसल्याचेच हे लक्षण आहे.