५० राव हे आईसक्रिम नी त्यांनी भरलेले मोठे बाउल खास तुमच्याकरिता :)
साहित्यः
१. क्रिम - २५० मिली.
२. डाळिंबाचे दाणे - २ कप
३. साखर किंवा मध - डाळिंब/गुलकंदाच्या गोडानुसार कमी / जास्त
४. गुलकंद - २ मोठे चमचे
५. सजावटिकरिता आपापल्या आवडिचे ड्राय फ्रुट्स/डाळिंबाचे दाणे/थोडा गुल़कंद ई.
कॄती:
१. डाळिंबाचे दाणे काढुन मिक्सर मधे थोडं पाणी घालुन बारिक वाटुन घ्या. आता गाळण्यातुन हा रस गाळुन घ्या.
२. क्रिम मधे आवडिप्रमाणे साखर/मध घालुन सॉफ्ट पीक्स फॉर्म होईस्त व्हिप्ड करा किंवा हल्ली रेडिमेड व्हिप्ड क्रिम सुध्धा मिळतं
३. आता त्यात डाळिंबाचा रस, गुलकंद घालुन व्यवस्थित मिक्स करा
४. वरिल मिश्रण हवाबंद डब्यात ओतुन डिप फ्रिजर मधे ठेवा
५. आईसक्रिम पुर्ण सेट झालं कि आपापल्या आवडिचे ड्राय फ्रुट्स/डाळिंबाचे दाणे किंवा थोडा गुल़कंद घालुन सर्व करा. खास छोट्यांसाठि वरुन चॉकलेट सॉस घालुन सर्व करा.
टिपा:
१. क्रिम व्हिप करणं म्हणजे एका ठरावीक वेळेपर्यत पातळ क्रिम सॉफ्ट पिक्स फॉर्म होईस्त ढवळणं/बीट करण/घुसळणं. सॉफ्ट पिक्स म्हणजे क्रिम घट्ट झाल्यावर ते बोटांवर थांबल पाहिजे...खाली ओघळता कामा नये. पण ह्यात फार वेळ आणि शक्ति खर्च होते म्हणुन क्रिम डायरेक्ट ब्लेंडर मधे सुध्धा घुसळु/फिरवु शकता. पण फक्त वरिल घनता येईस्त फिरवा. जास्त वेळ फिरवल तर त्यातुन क्रिम वेगळं होईल.
२. भारतात गुलकंद छान मिळत. ईकडे जे मिळत ते सेंटेड असत म्हणुन कुठलाहि ईसेन्स घालण्याआधी बघा आणि मग घाला
३. डाळिंबाचा छान गुलाबी रंगाचा रस तयार होतो पण क्रिम मधे मिसळल्यावर तो अगदि फिकट होतो म्हणुन जर गुलाबी रंग मिळाला तर अगदि एक ते दोने थेंब घाला म्हणजे आईसक्रिम दिसायला आणि खायला मोहक / आकर्शक दिसेल.
वाचने
8332
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम
छान दिसते आहे आईस्क्रिम !!
व्हेरी इनोव्हेटिव्ह!!
क्या बात है!
सलाम तुंम्हाला....
धन्यवाद आत्म्या....(एकेरी चालेल ना?)
(No subject)
In reply to धन्यवाद आत्म्या....(एकेरी चालेल ना?) by दिपक.कुवेत
मस्त!
चायला! तोंपासु!
कसले भारी दिसतेय हे आईस्क्रीम
वाव दीपू काका आईसक्रीम भारीच
भारीच..
अहाहा
वा... छानच दिसते आहे आईसक्रिम
अहाहा..
लई लै धन्यवाद, आज पुन्हा
मस्त!
मस्त!
फॅन्तॅकताक्...
अरे काय रे.......तुझा उन्हाळा
फोटू व आईस्क्रिम जबरदस्त.आता
जबऱ्या...... !!!
सुरेख! पण आमच्या इथे कालपासुन
धन्यवाद लोक्स
मस्त..
फोटो फार छान आहेत. नुसत्या
चला उन्हाळा सुरु झाला आहे.
नविनच !
आई ग्गं!
मस्तच... तोपासू... नक्की करुन
फारच छान पाकृ दिलीत. दोन
हेच बोल्तो....