
साहित्यः-१)बारीक चिरलेला कोबी.
२)बारीक चिरलेला कांदा कोबीच्या अर्धा.
३)बारीक तुकडे केलेली हिरवी मिरची.
४)आलं-लसूण पेस्ट.
५)बेसन्(चण्याचे पीठ)
६)हळद.
७)लाल मिरची पूड.
८)मीठ.
९)तळण्यासाठी तेल.
कृती :-वरील सर्व साहित्य एकत्र करावे.जरुरीपुरते पाणी घालून भिजवून घ्यावे.जास्त पातळ करु नये.
कढईत तेल तापत ठेवावे.चांगले तापले की पिठाची छोटी-छोटी भजी तेलात सोडावी व तळून
काढावी.(तेल चांगले तापले की गॅस मध्यम करावा). सॉस व गरम गरम चहा अथवा कॉफी
बरोबर खायला द्यावी.
प्रतिक्रिया
छान
चांगली आहे पाकृ.. मी
छान दिसतायत भजी!!
छान...
तोंडाला पाणी सूटले
मस्त भजी.
सह्हि....
मस्त पाकृ!
नरजचुकीमुळे हा धागा उघडला नव्हता.