आमसुलाचे सार नारळ घालून किवा नारळा शिवायही करतात.
साहित्य- ५/७ आमसुले किवा अर्धी वाटी कोकमाचं आगळ, एका नारळाचे दूध किवा साधारण २ वाट्या नारळाचे दूध,
१/२ हिरव्या मिरच्या,अर्धा चमचा साजूक तूप, थोडे जिरे, मीठ व साखर चवीनुसार, थोडी कोथिंबिर, पाणी
कृती- आमसुले गरम पाण्यात ३५-४० मिनिटे भिजत घाला, नंतर त्यातील पाणी काढून घ्या व उकळा.
कोकमाचा आगळ असेल तर त्यात २-३ वाट्या पाणी घालून उकळत ठेवा. उकळल्यावर गॅस बंद करुन त्यात नारळाचे दूध घाला.(नारळाचे दूध घालून उकळले तर एखादेवेळी फाटते म्हणून कोकमाचे पाणी चांगले उकळून घ्या व नंतर त्यात नारळाचे दूध घाला.)
पळीत तूप जिर्याची फोडणी करुन तीत हिरव्या मिरच्या घाला व ही फोडणी सारावर घाला.
मीठ व साखर घाला. कोकमाचा आगळ आंबट असेल तर साखर जास्त लागेल.
वरुन चिरलेली कोथिंबिर घाला.
आमसुलाचे सार (प्रकार-२)
साहित्य- ५-६ आमसुले किवा अर्धी वाटी कोकमाचं आगळ, १-२ हिरव्या मिरच्या, तूप,जिरे फोडणीसाठी, मीठ व साखर चवीनुसार,पाणी
कृती- आमसुले गरम पाण्यात ३५-४० मिनिटे भिजत घाला.
तूप,जिर्याची फोडणी करुन त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
त्यात आमसुलाचे पाणी किवा कोकमाचे आगळ+पाणी घाला, चवीनुसार मीठ ,साखर घाला व चांगले उकळू द्या.
वरुन कोथिंबिर घाला.

वाचने
41612
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त पाकृ स्वाती ताई... पण हे
आजी
गरमागरम आमसुलाचं सार छान,
सहमत.
In reply to गरमागरम आमसुलाचं सार छान, by रेवती
काय दिसतय. व्वा मस्त.
छान आहे सार
दुस-या प्रकरारच्या साराची चव फारच भन्नाट असते.
In reply to छान आहे सार by सानिकास्वप्निल
:)
In reply to दुस-या प्रकरारच्या साराची चव फारच भन्नाट असते. by चिंतामणी
मस्त!
छान
सही रे सही..
मस्तच........
धन्यवाद
सोलकढी
मस्त.
छान आहे सार!
मस्त
सोल-कढी
अश्याच प्रकारे कोकम सार
लालन सारंगांच्या मासेमारी
In reply to अश्याच प्रकारे कोकम सार by ज्योति प्रकाश
आहाहा...
सोलकढी आणि फुटीकढी.
वाह
मी म्हणते 'उत्तम'पाकक्रुति.
दुस-या प्रकारे सार केले होते
मस्त पाकृ.