Skip to main content

दुधी-मोतिया खीर

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 10/03/2013 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी साल व बीया काढून किसलेला दुधी १ लिटर दुध २-३ टेस्पून भिजवलेला साबुदाणा ३/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १ टीस्पून बदामाचे काप १ टीस्पून पिस्त्याचे काप १/४ टीस्पून केशर १/२ टीस्पून वेलचीपूड १ टेस्पून साजुक तूप . पाकृ: एका पॅनमध्ये साजुक तूप घालून दुधीचा कीस १-२ मिनिटे परतून घ्या. त्यात दुध घालून उकळी आणा, आच मध्यम असावी. दुधीचा कीस दुधात शिजला की त्यात भिजवलेला साबुदाणा घाला व तो पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्या. आता केशर,साखर व वेलचीपूड घाला. साखर विरघळली की गॅस बंद करून, वरून बदाम-पिस्त्याचे काप घाला व खीर थंड होऊ द्या. . ही खीर गार जास्तं छान लागते. दुध खूप आटवायचे नाही, साबुदाण्यामुळे दाटपणा येतो खीरीला. .

वाचने 7695
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

ताईं चे धागे मी आवर्जुन बघत असतो.. धाग्याची मांडणी व फोटो सुबक असतात.. आणी अर्थात पाककृति पण रुचकर असणारच.. लाईकेश

In reply to by अविनाशकुलकर्णी

काकु टाकून पसार होणार्‍या अकुंना प्रतिसाद टाकायला लावणार्‍या सानिकातै ह्या आमच्यासाठी उ त्तुं ग झालेल्या आहेत आहेत....! सानिकातै आप ऐसेच बनाते रहो... पाकृ! :) साबुदाणाखीर आवडत नाही. पण चालेल. :)

पाकृ चे फोटू पाहूनच पोट भरल सानिका..... एकदम रंगीबेरंगी पाकृ :) मीपण नक्की बनवून बघेल...तेपण आजच.

मिपा वर कोना सई ला बेरी ( लोणी कढवून शेवटी शिल्लक राहत तो पदार्थ) चा एखादी पाक्रु येते का? कोन एका कडून बेरी ची मिठाई बनते अस ऐकिवात आहे....पण आजतायत ती कशी बनते ह्याची कृती काय मिळाली नाही ती नाहीच...:(

पाकॄ आणि फोटो नेहमीप्रमाणेच छान. साबुदाणा खिरित एवढा आवडत नाहि पण दुधीबरोबर ट्राय केला पाहिजे. शेवटच्या फोटोत ते सांडलेले पिस्ते आहेत का?

भारी आहे प्रकार. याआधी असे साबुदाणे घालून शेवयांची खीर खाल्ली होती. ज्यांना पूर्णपणे उपास करायचा नाहीये त्यांची सोय होणार या खिरीनं! ;)

आता येणार्‍या उन्हाळ्यासाठी आणखी नव्या थंडगार पेयाची माहीती. सानिका नाँद करुन ठेवली आहे.