Skip to main content

बलात्कार ... स्त्री ची कमजोरता की पुरुषाची लैगिकता

लेखक सप्पुभाई यांनी रविवार, 10/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवस विचार करत होतो, या विषयावर लिहावे की..नको... पण आजच्या वर्तमान पत्रात पुन्हा एकदा बातम्या वाचल्या... "जुहू मध्ये एका ३वर्षाच्या मुलीवर शाळेच्या बस मध्ये बलात्कार" "नागपुर मध्ये दरडेखोरांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार"... आणि स्वताला रोखूच नाही शकलो.. रोज नुसते बलात्कार बलात्कार आणि बलात्कारच.... या वासनान्ध राक्षसांपासुन आपला शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र देखील वाचू शकला नाही.... नुकताच दिल्लीतिल त्या काळ्या घटनेला एक महिना पूर्ण झाला... मेणबत्ती मोर्चा काढून किती आणि काय परिणाम होतो माला नाही माहीत... पण दिल्लीकरांची एकी यातून देशासमोर आली. काही महाभागांनी यावर उपाय देखील सुचवले... ......मिरचीची पावडर आणि चाकू... ......देवाचा धावा..... काहींनी तर याला मुलींना जबाबदार धरले..."मुलींचे तोकडे कपडे..."..... असो.. "सुंदर मुलगी रस्त्यावरून नग्न देखील जात असेल तरी...इतरांना तिच्यावर बलात्कार करण्याचा काय अधिकार...?"   अनेकांनी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या...असा हट्ट धरला... पण खरेच या पाच जणांना फाशी देऊन हा प्रश्न सुटणार आहे.... अर्थात मी देखील या नराधमाना फाशीच व्हावी याच बाजूचा... पण प्रश्न हा आहे...की यांना किंवा इतर बलात्कार्‍यांना फाशी देवून असे गुन्हे थांबवता येतील? यासाठी कारणीभूत दोनच गोष्टी एक म्हणजे स्त्रियांचा कमजोरपणा आणि पुरुषांची लैगिकता किंवा वासना... बलात्कार टाळण्यासाठी स्त्रियांना अधिक सक्षम होण्याची गरज आहे.. कोणत्याही हत्यारा शिवाय.... कारण हत्यार कोणतेही असो... मिरचीची पूड, चाकू किंवा बंदूक... ती योग्यवेळी वापरण्याची हिम्मत मनगटात असावी लागते... पुरुषांची लैगिकता किंवा वासना.... यावर खूप कमी जण बोलताना दिसतात... अश्या गुन्हयांसाठी सगळ्यात जास्त प्रमाणात जबाबदार असते ती म्हणजे पुरुषांची लैगिकता किंवा वासना... वासना म्हणजे एक प्रकारची भुकच आहे... जशी अन्नाची...तशी ही वासनेची... स्त्रियांना जसे सक्षम करण्याची गरज आहे ..तशीच पुरुषांची ही वसानेची भूक देखील कमी होणे गरजेचे आहे... ही भूक जेव्हा अनावर होते आणि समोर एखादी कमजोर स्त्री आढळते....तेव्हा हा वासनान्ध पुरुष काय करून बसतो हे त्याचे त्यालाच कळत नाही.... अश्यातच जर अश्या वासनान्ध पुरुषांची टोळीच असेल तर.... ही भूक अगदी रस्त्यावर असणार्‍या रोड रोमिओ पासून ते कॉर्पोरेट पर्यन्त सगळ्यांमधेच असते... स्वताला विचारून बघा.... तुमच्याच मित्रपरिवारात अस भुकेला आणि डोळ्यांनी बलात्कार करणारा एखादा असतोच... ही वृत्ती बदलण्याची गरज आहे... स्त्रियांना पुन्हा एकदा झाशीची रानी बनण्याची गरज आहे... त्रास देणारा कोणीही असेल रोड रोमिओ किंवा तुमचा बॉस त्याच्या या कृतीला कधीच नजर अंदाज करू नका... वेळीच त्यांच्यातील अश्या भावना संपवून टाका...नाहीतर त्या भावना वाढतच राहतात... अश्या गुन्हेगारापासून तुम्ही स्वताच स्वताचे रक्षण करू शकता.... http://marathiboli.in/rape/
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13539
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

भाई, समस्या काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तरीही तुम्ही एव्हढया ओळी लिहिल्याच होत्या तर त्या समस्येवर निदान एक दोन उपाय तरी सुचवायचे होते.
तशीच पुरुषांची ही वसानेची भूक देखील कमी होणे गरजेचे आहे...
हे कसं करायचं याबद्दल धागा काढताना तुम्हीही काहीतरी विचार केला असेलच. आम्हालाही सांगा.
स्वताला विचारून बघा.... तुमच्याच मित्रपरिवारात अस भुकेला आणि डोळ्यांनी बलात्कार करणारा एखादा असतोच... ही वृत्ती बदलण्याची गरज आहे...
समजा माझ्या मित्रपरीवारात असा कुणी असेल तर कशी बदलायची मी त्याची ही वृत्ती?
स्त्रियांना पुन्हा एकदा झाशीची रानी बनण्याची गरज आहे... त्रास देणारा कोणीही असेल रोड रोमिओ किंवा तुमचा बॉस त्याच्या या कृतीला कधीच नजर अंदाज करू नका...
नजर अंदाज करायचे नाही म्हणजे नेमके काय करायचे नाही?
अश्या गुन्हेगारापासून तुम्ही स्वताच स्वताचे रक्षण करू शकता....
कसे? कदाचित या सार्‍या प्रश्नांची उत्तरे तुमच्या ब्लॉगवजा संकेतस्थळावर मिळतील म्हणून तिकडे गेलो. तिथेही फक्त या धाग्यातीलच ओळी आहेत. तुमचा त्रागा समजण्यासारखा आहे. परंतू इतक्या गंभीर आणि संवेदनशील विषयावर लिहिताना लिहिणार्‍यानेही जरा गांभिर्यानेच लिहायला हवे नाही का?

In reply to by धन्या

आब्बा.......पलभर लग्या तुमरा आयडी हॅक तो नै हुवा ना धन्याभाय =)) बाकी हम शमत हौ तुमरे साथ ये वेगला सांगना नै पडता जी.

In reply to by धन्या

धन्याभाई प्रतीक्रीयेपद्धल आभार खरे तर या विषयावर लिहिण्या एवढा मी काही मोठा नाहि… पण जे खरच मनात आले ते तोडक्य मोडक्या भाषेत लिहिले… यात मला पडलेले प्रश्न आहेत… अश्या गुन्ह्यानंतर चर्चा होते ती फक्त शिक्षेची नाहीतर महिलांना सबळ करण्याचि. पण असे गुन्हे का होतात या वर कोणीच बोलत नाहि… या गुन्यांचे प्रमाण का वाढले आहे? प्रश्न अनेक आहेत हो धन्याभाई …. पण उत्तरे देण्यास मी सध्यातरी असमर्थ आहे… आत्ता पुरुषांची लैगिक भूक वेळीच भागवली जावी ? या प्रश्नांचे उत्तर देण्यास गेलो तर ते वादाचे ठरेल… पण तसेही देशात वेश्या व्यवसाय चालतोच… मग तो काही युरोपीय देशांप्रमाणे कायदेशीर का करू नये… असो… मी अजून लहान आहे…त्यामुळे नुसते प्रश्नच विचारू शकतो… आपणही माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता …

In reply to by सप्पुभाई

धन्याभाई प्रतीक्रीयेपद्धल आभार.
मी भाई नाही हो. कुणीही यावं आणि टपली मारुन जावं इतका गरिब बिचारा वगैरे आहे मी.
पण असे गुन्हे का होतात या वर कोणीच बोलत नाहि… या गुन्यांचे प्रमाण का वाढले आहे? प्रश्न अनेक आहेत हो धन्याभाई …. पण उत्तरे देण्यास मी सध्यातरी असमर्थ आहे… आत्ता पुरुषांची लैगिक भूक वेळीच भागवली जावी ? या प्रश्नांचे उत्तर देण्यास गेलो तर ते वादाचे ठरेल… पण तसेही देशात वेश्या व्यवसाय चालतोच… मग तो काही युरोपीय देशांप्रमाणे कायदेशीर का करू नये… असो… मी अजून लहान आहे…त्यामुळे नुसते प्रश्नच विचारू शकतो… आपणही माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता …
वेश्या व्यवसाय कायदेशीर करणे हा उपाय नसावा. वेश्या व्यवसाय कायदेशीर असलेल्या देशांमध्ये बलात्काराच्या घटना होत नाहीत का? या विषयावर साधारण महिनाभरापूर्वी लोकसत्ताच्या शनिवारच्या चतुरंग पुरवणीत सलग दोन शनिवार मंगला गोडबोलेंचा एक विस्तृत लेख आला होता. शोधून वाचा. तुमच्या सार्‍या प्रश्नांची उत्तरे त्या लेखात मिळतील.

In reply to by दादा कोंडके

शारीरिक आणि बौद्धिक दोन्हि… शारीरिक - कारण वयाने तसा मी अजून लहानच आहे अश्या विषयावर भाष्य करायला … बौद्धिक :- मी आहे संगणक अभियान्त्रिक, आणि मिपा चा नवीन सदस्य … आपल्या बरोबर बोलून बोलून शिकीन बरेच काहि… पण जे मनाला वाटेल ते खरे खुरे लिहितो… अलंकारिक भाषा किंवा व्यवस्तीत एखद्या विषयावर लिहिण्याची सवय नहि। पण होईल मिपा वरील लेख वाचून । आपण पण मदत करालच … :)

आणि आता सप्पुभाई डॉ. धना अस्थाना यांना जादूकी झप्पी याचे महत्व समजावून सांगतील. ;) आम्ही अर्थात रॉकस्टेडी धनाजीरावांनाच सहमत

In reply to by अभ्या..

आणि आता सप्पुभाई डॉ. धना अस्थाना यांना जादूकी झप्पी याचे महत्व समजावून सांगतील.
या ओळींनी खरं तर हसू यायला हवं होतं, नाही आलं. जादूकी झप्पी किरकोळ वाटेल असा जालिम उपाय एका महात्म्याने सांगितला होता असं वाचनात आलं आहे.

समजून घेवुणच रिप्लय द्यवा म्हन्तो. माज्या शन्कांचं निसरन कराच गड्या..
आणि स्वताला रोखूच नाही शकलो.. रोज नुसते बलात्कार बलात्कार आणि बलात्कारच...
. कानफुजड ! प्लीज येक्सप्लेंण !
"सुंदर मुलगी रस्त्यावरून नग्न देखील जात असेल तरी...इतरांना तिच्यावर बलात्कार करण्याचा काय अधिकार...?"
इतरान्ना म्हनजे ? पयल्या या दोण शेंका निस्तरु मंगच पुडचं बगू.

In reply to by खटासि खट

नमस्कार खाटासी खट, "आणि स्वताला रोखूच नाही शकलो.. रोज नुसते बलात्कार बलात्कार आणि बलात्कारच... " या ओळींचा अर्थ, या विषयावर मला खरेच लिहायचे नव्हते …पण रोज रोज टीव्ही, वर्तमानपत्र सगळीकडेच याच बातम्या…(आज पण बघा १ नाही २ -३ बातम्या असतील) म्हणून मनात जे आले ते फक्त लिहिले। "सुंदर मुलगी रस्त्यावरून नग्न देखील जात असेल तरी...इतरांना तिच्यावर बलात्कार करण्याचा काय अधिकार...?" हे वाक्य त्या लोकांसाठी आहे जे मुलीना दोषी मानतात, आणि बोलतात मुलींचे कमी कपडे किंवा वेस्टर्न संस्कृती याला कारणीभूत आहे। मला एवढेच सांगायचे आहे… स्वताच्या वासनेला लपवत त्यावर मुलींच्या वागण्याचे किंवा कमी कपड्याचे कारण नको।

In reply to by विनोद१८

विनोद या विषयाचा झालेला नाही, तर जसे लिहीले आहे त्याचा आणि कुठेतरी स्वतःच्या ब्लॉगची वगैरे जाहीरात करण्याचा झालेला दिसतो.

In reply to by विकास

नमस्कार विकास, लेखाच्या खाली ब्लोग ची लिंक देवून जाहिरात केली हे नक्की पण तो मुळ उद्देश नव्हता … आणि मी मिपा वरील इतर लेखांच्या खाली पण अशी लिंक बघितली म्हणून टाकलि। पण पुढच्या कोणत्याही लेखात लिंक नसेल। आणि लिहिण्या पढल बोलाल … सुरुवात आहे राव … आता कुठे काहीतरी लिहितोय… लगेच शैली चांगली नाही होणार। पण पुढील प्र्यत्येक लेखात सुधारणा करण्याचा नक्की प्रयत्न करीन । पुन्हा एकदा … लेखाचा विषय हा जाहिरात मुळीच नव्हता … आणि नसेल।

In reply to by विनोद१८

असहमत . सरसकट पूरुषाच्या ?? सगळेच पूरुष असे ?? नाहि पटलं मला वाटतं अश्याना लैंगिकतेनं पछाडलेले पूरुष अशी नेमप्लेट द्याला हवी ...

सोहेला अब्दुलाली नामक मुलीवर ३२ वर्षांपूर्वी बलात्कार झाला. तेव्हाच्या तिच्या भावना, खरंतर विचारच तिने लिहीले होते. दिल्लीच्या केसमुळे ही पोस्ट व्हायरल झाली. हे समजल्यानंतर तिने पुन्हा एक लेख लिहीला आहे. भाग १, भाग २ त्यातली मला आवडलेली काही अवतरणं: I am exultant at being alive. Being raped was terrible beyond words, but I think being alive is more important. When a woman is denied the right to feel this, there is something very wrong in our value system. ... [R]rape is not inevitable, like the weather. We need to shelve all the gibberish about honor and virtue and did-she-lead-him-on and could-he-help-himself. We need to put responsibility where it lies: on men who violate women, and on all of us who let them get away with it while we point accusing fingers at their victims. ---- तुम्ही विचार करता आहात ही चांगली गोष्ट आहे. लिहून प्रकाशित करण्यापूर्वी या विषयावर इतर लोकांनी काय विचार केलेला आहे ते ही लक्षात घेतल्यास या विचार करण्याचा काही फायदा होऊ शकेल.

स्त्रियांना पुन्हा एकदा झाशीची रानी बनण्याची गरज आहे
स्त्रियांनी सक्षम बनण्याची गरज आहे, झाशीची राणी बनण्याची गरज आहे हे बरोबरच आहे. पण अगदी दोन तीन वर्षांच्या मुलीही बळी पडल्याचे ऐकले जाते, त्यांचे काय? त्या कशा करणार स्वताला सक्षम?

बलात्कार हा सर्व देशात सर्व काळात आणि सर्व युगात होत आला आहे.याचे कारण मूळ लैंगिकतेत आहे. पुरुष हा अब्जावधी शुक्राणू तयार करीत असतो त्यामध्ये फक्त एक शुक्राणू मिलन करण्यात यशस्वी होतो आणि इतर सर्व शुक्राणू फुकट जातात.त्याशिवाय जितक्या वेळा संभोग केला जातो त्यातून जीव निर्मिती होईलच याची खात्री नसते. त्याविरुद्ध एका महिन्यात एकच स्त्रीबीज निर्मिती होते आणि या काळात संबंध आल्यास गर्भ धारणा होते. हसंबंध एक किंवा अनेक नरांशी झाला तरी होणारे अर्भक हे त्या स्त्रीचेच असते. परंतु त्या नराला अशी कोणतीच खात्री नसते कि त्याने संबंध केल्यावर होणारी संतती हि त्याचीच असेल. याचा अर्थ एकच असतो कि जेंव्हा जमेल तेंव्हा आणि जमेल तेथे आणि जमेल तितक्या वेळा संभोग करणे हि पुरुषाची मनोवृत्ती असते.(Paternity is suspect, maternity is guaranteed) आता हि परिस्थिती असल्यामुळे नर हा आपला वंश पुढे चालविण्यासाठी जमेल तितक्या माद्यांशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो. या उलट स्त्री(मादी)सर्वात बलिष्ठ( गुणाने) अशा नराशी संबंध ठेवून सर्वोत्तम संतती निर्माण करण्याचा प्रयत्न करते.यामुळे स्त्री हि प्रवृत्तीने एकपतीत्व वादी असते आणि पुरुष हा बहुपत्नीवादी असतो. या नैसर्गिक प्रवृत्तीमुळे पुरुष हा सदा सर्व काळ मादीच्या शोधात असतो आणि त्याचा प्रजननाचा काळ हा स्त्री सारखा( वय १५ ते ४५) सीमित नसतो. याची फलनिष्पत्ती म्हणून कोणताही पुरुष सहज्प्रवृत्तीने आजूबाजूच्या प्रत्येक स्त्री कडे पाहत असतो( बायको बरोबर असेल तरीही).म्हणूनच जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा पुरुष संबंधास उत्सुक असतो.(याचा परिणाम म्हणून तो बलात्कार करण्यास षूईड्डःआ होतो. कोणत्याही देशात बलात्कार हा होतोच अखाती देशात जेथे कायदे मध्य युगीन आहेत आणी बलात्कारासाठी हात किंवा पाय तोडले जातात तेथेही बलात्कार होतातच. जसे खुनाला फाशीची शिक्षा असली तरीही खून हे होतातच.त्यामुळे बलात्कार हे होणारच पण जेंव्हा समाजाची त्याकडे पाहण्याची वृत्ती जेंव्हा बदलेल तेंव्हाच त्यात फरक होईल. एखादी मुलगी एखाद्या मुलाशी शरीर संबंध ठेवतेआणी नंतर त्यांचे लग्न होत नाही तेंव्हा ती त्याच्या वर बलात्काराचा आरोप करते तेंव्हा तिला स्वतःला तो इतका भयानक गुन्हा वाट नाही तर ती फसवणूक वाटते. मूळ क्रिया तीच असली तरीही त्यात स्त्रीची संमती गृहीत धरलेली असते.समाजाच्या दृष्टीने ती आता "तशी पवित्र " ( यौनशुचीता) राहिली नसली तरीही समाज तिच्याकडे तेवढ्या घृणास्पद नजरेने पाहत नाही. माझ्या मते पावित्र्य किंवा शुद्धी( virginity)हा एक अतिशयोक्ती केलेला विचार आहे.एखादी मुलगी जर स्वतःच्या इच्छेने संबंध ठेवते तर ते वाईट नाही पण तीच गोष्ट तिच्यावर लादली गेली तर तिची चूक नसताना तिच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का मारला जातो.एखाद्या स्त्री वर बलात्कार झाल्यास ती आयुष्यातून उठली असे समाजाचे वर्तन असते. परंतु एखादा माणूस व्यवहारात नागविला गेला आणी कफल्लक झाला तर त्याला अशी गुन्हेगार म्हणून समाज वागणूक देत नाही.(आयुष्यभराची मिळकत घरासाठी पैसे दिल्यानंतर बिल्डर कडून नागविली गेली आहेत आणी अन्नान्न दशेला लागली आहेत अशी अनेक माणसे आपण पाहतो.आपले पाकीट मारले गेल्याचा किंवा चोरी झाल्याचा/ लुबाडले गेल्याचा ज्यांना अनुभव आहे त्यांना किती तीव्र संताप येतो त्याची जाणीव पुनः होईल पण आपण त्यांना सहानुभूती देतो. त्या तुलनेत बलात्कारित स्त्रीला समाज अत्यंत वाईट वागवितो.जोवर या दांभिकपणाचे समाजातून समूळ उच्चाटन होत नाही तोवर स्त्रीला खरा न्याय मिळणार नाही. दुर्दैवाने स्त्रिया सुद्धा अशा स्त्रीशी अत्यंत वाईट तर्हेने वागत असतात.केवळ बलात्काराला फाशी द्या या घोषणाबाजीने काहीही निष्पन्न होणार नाही. उलट फाशीची शिक्षा दिली तर गुन्हेगार पुरावा नष्ट करण्यासाठी स्त्री ला ठार मारण्यास मागे पुढे पाहणार नाही( दोन्हीची जास्तीत जास्त शिक्षा फाशीच असल्याने ती दुर्दैवी स्त्री प्राणाला मुकेल. जसे समाजातून चोरी दरोडेखोरी खून अनैतिक वर्तन याचे उच्चाटन होणार नाही तसेच बलात्काराचे आहे.जसे कोणीही माणूस १००% खात्रीने सांगू शकत नाही कि त्याच्या घरात चोरी होणारच नाही.तसेच कोणतीही स्त्री हे सांगू शकणार नाही कि तिच्यावर बलात्कार होणारच नाही.वस्तुतः १००% स्त्रिया या आयुष्यभर हि गोष्ट मनात बाळगून असतात.याला समाजाची मनोवृत्ती बदलणे आवश्यक आहे.समाजातील दांभिकपणा नाहीसा झाला तर या गुन्ह्याची तीव्रता कमी होईल.पुरुषांची लैंगिक भूक कमी करणे शक्य नाही. स्त्रीने स्वतःला शक्तिमान करणे हे गरजेचे आहे तरीही बलात्कार पूर्ण थांबणार नाहीत. जसे कितीही सुरक्षेची साधने ठेवा चोर्या होणारच हे माहित असले तरी पण आपण जास्तीत जास्त काळजी घेतो.तसेच स्त्री जितकी जास्त शक्तिमान होईल आणी जितकी जास्त काळजी घेईल तितकी बलात्काराची शक्यता कमी होईल.मुलींचे तोकडे कपडे किंवा अवेळी बाहेर जाण्यामुळे बलात्काराच्या संख्येत फार तर अल्प अशी वाढ होते. पण रानात आदिवासी मुलीवर किंवा स्कूलबस मध्ये अजाण मुलीवर होणारा अत्याचार कशामुळे होतो? आपण अशी फालतू करणे शोधून विषयाला फाटा फोडण्यात पटाईत आहोत. जोवर बलात्कार झालेल्या स्त्रीला आपण गुन्हेगार न समजता एक अपघात समजला तर तिचे जिणे जास्त सुकर होईल

In reply to by सुबोध खरे

एक लक्षात घेतलं पाहीजे की आपण समाजात राहतो तेव्हा "जमेल तिथे जमेल तितक्या वेळा " करण्यापेक्षा वेगळ्या सोयी आहेत जसे की लग्न ते नको असेल तर वेश्या. त्यामुळे बलात्कार ही मनोविकृतीच आहे. भारतात स्त्रीला मान वगैरे फक्त पुस्तकातच असतो अगदी प्राचीन काळापासुन. त्यामुळेच असे गुन्हेगार आरामात सुटतात. अरुणा शानभाग आयुष्यभर कोमात खितपत पडते तर बलात्कारी मजेत बायको मुलांबरोबर नॉर्मल आयुष्य घालवतो.

In reply to by सुबोध खरे

मुळातच कोणत्याही एका व्यक्तीला दुसर्‍या व्यक्तीच्या परिघात (त्या व्यक्तीची) मान्यता नसताना न जाणे हे शिकवले गेले पाहिजे असे वाटते. तुमचा प्रतिसाद थोडा पटला, थोडा नाही. बलात्कार हा अगदी क्रूर शेवट आहे. त्यात स्त्रीला वाईट म्हणणे/ न म्हणणे यापेक्षा त्या व्यक्तीला नको असताना त्याच्या/ तिच्या हक्काच्या मर्यादेत घुसखोरी! त्या स्त्रीला कोणीही वाईट म्हणणारे नसले तरी पाकिट मारले जाणे, व्यवहारात फसवणूक होण्यापेक्षाही तिच्या नैसर्गिक वैयक्तिक कक्षेत जबदरस्तीने येणे हे जास्त क्लेशकारक आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्या घरात नको असणारे पाहुणे आल्यावर आपलीही चिडचिड होते. हा खूऽऽऽपच सौम्य प्रकार झाला. या लोकांना आपण जाण्यास सांगणे हे सामाजिक नियमात बसणारे नसते (खरंतर असायला हवे की नको हा वेगळा मुद्दा) व ते मात्र घरात येऊन पाहुणचार झोडून जातात. आपली चूक नसताना त्यांच्यासाठी व्यवहार पाळत बसायचे आणि हे मात्र मजेत! इथे मिपावरही कितीदा सदस्यांना त्यांच्या प्रतिसादांबद्दल नाराजी दर्शवली, संवाद टाळला तरी "तुम्ही जालावर आहात, हे होणारच." या एका कोणीही न देऊ केलेल्या हक्कासाठी पुढे येऊन दुसर्‍याच्या मर्यादेत शिरणे होतेच! तसेच समजायचे का? तुम्ही समाजात राहता, हे होणारच! त्याच समाजात राहणारी पुरुष जात ही बरेचदा (व्यावहारीक फसवणूक सोडून) बळी पडत नाही आणि स्त्री मात्र चिंध्या झाल्याशिवाय सरणावर चढत नाही.

चूक कोणाची आहे, हे सगळ्यांनाच माहित आहे....... शिक्षा अशी व्हायला हवी त्या नराधमांना कि दुसरा कोणी स्वप्नातही 'तस' काही करायचा विचार करणार नाही. पण आपल्या सरकार बद्दल काय बोलायचे? बलात्कार झाल्याचा गुन्हा मुलीच्या आईन पोलीस स्टेशन मध्ये दाखल केला नाही म्हणून तिला अटक करताना कोणत्याही पुराव्यांची गरज नाही पडत नाही पोलिसांना...... पण बलात्काराचा गुन्हा नोंदवला तरी ज्ञायालयात दाद मिळणार नसेल तर कोणी का जावं पोलिसांकडे? आणि त्या बलात्कारी जनावरांना मात्र हात सुद्धा नाही लावत पोलीस..... मग यावर काही उपाय आहे का, मुलींची काळजी घेण्यापलीकडे ? मुलांना वळण लावण, संस्कार करण हे मुलांच्या आई-वडलांच कर्तव्य नाही का? मुलींना वळण लावता....मग मुलांना का नाही लावत 'सातच्या आत घरात' चा नियम?????

अश्या गुन्हयांसाठी सगळ्यात जास्त प्रमाणात जबाबदार असते ती म्हणजे पुरुषांची लैगिकता किंवा वासना... गैरसमजावर आधारलेला धागा व काही प्रतिसादही. बलात्कारासंबंधी गैरसमज आणि तथ्ये या धाग्यावर वाचता येतील