Skip to main content

प्रेम - भक्ती

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 10/03/2013 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम आणि भक्ती या दोन गोष्टीत नेहमीच गल्लत केली जाते. या दोन गोष्टी नेहमीच भिन्न मानल्या गेल्या आहेत. पण गोष्टी भिन्न असल्या म्हणजे त्यांमध्ये नातं, संदर्भ यांचा अभाव असतो असं नाही. प्रेम आणि भक्ती या अशाच गोष्टी आहेत, की ज्या भिन्न असूनही संबंधित आहेत. संतांनी केलेली भक्ती ही आदर्श भक्ती मानली जाते. याचं कारण की ती भक्तीच्या हद्दीबाहेरची भक्ती होती. परम भक्ती होती. ती भक्ती प्रेमरूप भक्ती होती. मीरेने केलेलं प्रेम हे आदर्श प्रेम मानलं जातं. मीरेचं प्रेम हे अत्युच्च प्रतीचं प्रेम होतं. निर्मळतेचा कळस गाठलेलं प्रेम होतं. मीरेचं प्रेम हे भक्तीरूप प्रेम होतं. नेमका हाच प्रेम आणि भक्ती या गोष्टींमधला दुवा आहे. दोन गोष्टींचा एकमेकांशी दृढ संबंध आहे. जणु एकाच डोंगराची दोन शिखरं आहेत, प्रेम आणि भक्ती. धाग्याचं एक टोक जर भक्ती असेल तर त्याच धाग्याचं दुसरं टोक प्रेम आहे. आणि तो धागा म्हणजे सात्विकता. pb ‘सात्विक प्रेम म्हणजे भक्ती होय; आणि सात्विक भक्ती म्हणजे प्रेम.’ - अ. ज. ओक सदर लेखन माझ्या ब्लॉगवरचे असून मी ते इथे पोस्ट करत आहे. ब्लॉगचा पत्ता http://ajstates.blogspot.in/
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3384
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सुमारे १५५ - १६० शब्दांच्या धाग्यात आख्खं प्रेम भक्ती वगैरे मावलय.

In reply to by धन्या

"ढाई अक्षर प्रेम के" भैय्या. प्रेम अडीच शब्दांत होतं म्हणे; प्रेम्-भक्ती ही जोडी १६०मध्ये जाते.

In reply to by धन्या

आजून पाचपन्नास शब्द उडवले असते, तर धागा यात सामावला असता. बाकी चालूद्या!!

>>>जणु एकाच डोंगराची दोन शिखरं आहेत नुकत्याच शिंगं फुटू लागलेल्या खोंडासारखी डोक्यावर दोन टोकं आली असं(माझं मलाच) वाटली. इतरही अभिव्यक्ती असू शकतात... ;) कल्पनेचं वारु कसंही धावू शकतंच.

In reply to by प्यारे१

वर आभाळ खाली धरती , दिस आल्याय माथ्या वरती अल्याड डोंगर पल्याड डोंगर , मधीच ख्योल ख्योल दरी जरा जपून चालगं पोरी गेली सांगून ज्ञानेश्वरीन , माणसापरास मेंढरं बरी दादा कोंडकेंच्या एका चित्रपटातील गीताचे बोल. चित्रपट बहुतेक 'आंधळा मारतोय डोळा' किंवा 'एकटा जीव सदाशीव' हा असावा. नक्की आठवत नाही.

In reply to by धन्या

@प्रेम आणि भक्ती याच्यामध्ये काटेरी बांबू असतो का?>>> =)) __/\__/\__/\__ @वर आभाळ खाली धरती , दिस आल्याय माथ्या वरती अल्याड डोंगर पल्याड डोंगर , मधीच ख्योल ख्योल दरी जरा जपून चालगं पोरी गेली सांगून ज्ञानेश्वरीन , माणसापरास मेंढरं बरी>>> http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example/smiley-shocked018.gif