मैत्रिनिनो, थोड पाककृतीच्या नावाबद्दल सांगावस वाटत. मनोरमा हा पदार्थ एकदम साधा पण चविष्ट पाककृती मध्ये मोडतो. मला माझ्या मामा मुळे महाराष्ट्रातील अधिवासी पट्ट्याचा (धडगाव, अक्कलकुवा, तोरणमाळ ई.) सहवास लाभला. त्या भागात मनोरमा न्याहारी/ नाश्त्यात बनतो. माझ्या आजीच्या एका मैत्रीणीने मोठ्या कौतुकाने (कौतुकाने ते या साठी कि मी पहिल्यांदाच त्यांच्या पाड्यावर जाणार होती व त्याच वर्षी मी दहावी बोर्डात वर्गात पहिला क्रमांक मिळवला होता:) ) मला मनोरमा व माझ्यासमोरच काढलेल्या बकरीच्या दुधाचा गुळ घालून बनवलेला पातळसा (खर सांगायचं म्हणजे बकरीच्या दुधाचा चहा पातळच बनतो. पण हे मला त्यावेळी माहित नव्हत. त्यामुळे तेव्हा तो मला जरा जास्तीच पातळ वाटला होता) चहा बनवून खायला/प्यायला घातला होता.
मनोरमा नाव वाचूनच खूप भूक लागते मला...... :)
साहित्य - ४ दोन वेळ शिळ्या चपाती, १ मोठा कांदा, ३ हिरवी मिरची, १ मध्यम बटाटा, १ मो.च. शेंगदाणे, १ मो.च. फ्रोजन मटार, १२ पाने करिपत्ता, ४ पाकळी लसुन, १ वाटी धुवून चिरलेली कोथांबीर, १ छो.च. मोहरी, १ छो.च.जीरा, १ छो.च.हळद, ५ मेथीदाणे, २ छो.च. लाल मिरची पावडर, १छो.च.गरम मसाला, १ चिमुट हिंग, २ मो.च.तेल, चवीप्रमाणे मीठ.
कृती - प्रथम चपाती हाताने कुस्करून घ्या व नंतर चपाती मिक्सरमध्ये पोह्या इतकी जाड दळून घ्या. कांदा, मिरची व लसुन बारीक चिरून घ्या. बटाटा साल काढून धुवून चिरून घ्या. कढ़ईत तेलावर बारीक आचेवर मेथीदाणे खमंग परता. त्यानंतर आच मोठी करून कांदा, लसुन, मिरची, बटाट्याच्या फोडी, करिपत्ता, शेंगदाणा व मटार टाकून जरा जास्तीच च परता. नंतर आच कमी करून त्यात हिंग, मिरची पावडर, हळद, गरम मसाला घालून थोड परतून मसाला जळू न देता दळलेली चपाती घाला. २ मिनिट परतून चवीप्रमाणे मीठ घाला व शेवटी कोथांबीर घालून व्यवस्थित मिक्स करून मंद ५ मिनिट आचेवर दम घ्या. गरम गरम मनोरमा तयार.... :)
वाचने
6628
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज आठवणीने फोटू काढलाय... पण
आपण शिळ्या चपांतीचा चिवडा
मनोहर
आम्ही याला फोडणीची फोळी
मनोहर....
आम्ही पातळ पोहे घालून
मनोरमा चे परत एक नवीन नाव
आमच्या घरी याला "शाही टुकडा"
शाही टुकडा
In reply to आमच्या घरी याला "शाही टुकडा" by आदूबाळ
काला
पोळ्यांचा काला, शाही तुकडा...
याला फो.चि.पो असेही म्हणतात
फोडणीची पोळी अशी खायला जबराच
अविनाश कु.... आता माझी शाळा
फोटू तर यावेळी काढलाच होता.
फोडंणीची पोळी आणि हिरव्या
मनोहरा
अरे चा हे तर पोई चा कुच्करा
हाउ ते
फोडणीची पोळी व मेतकूट असे
आमच्या भाषेत..