याआधी आपण २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात काय प्रस्तावित होते, काय झाले याचे वार्तांकन इथे वाचले. काल, २१ फेब्रुवारी २०१३ पासून बजेट सत्र सुरू झाले आहे.
अर्थातच या सत्रात वित्तविषयक घडामोडींना प्राधान्य दिले जाते असा पायंडा आहे. यातील काही ठळक प्रस्तावित विधेयके अशी आहेतः
१. रेल्वे बजेट २०१३-१४
२. सर्वसाधारण बजेट २०१३-१४
३. इन्शुरन्स आणि पेन्शन मध्ये थेट परकीय गुंतवणुकीच्या योजनेत बदल करणारी विधेयके
४. अन्न सुरक्षा बिल
५. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट (सुधारणा) विधेयक आणि द कंपनीज् बिल
जी.एस.टी. (गुड्स आणि सर्विस टॅक्स) लागू करण्यासाठीचे विधेयक या सत्रात मांडल्या जाणार्या विधेयकांच्या यादीत नाही.
हे सत्र एकूण ३४ दिवस चालेल व ते दोन भागांत विभागलेले असेल. दोन विभागांमध्ये महिनाभराचे मध्यंतर असेल. पहिल्या भागात २१ बैठका होतील (२१ दिवस) तर दुसर्या सत्रात १३ वेळा संसदेची बैठक होईल. या दरम्यान ३५ विधेयकांवर संसदेत चर्चा होऊन त्यावर मतदान/मंजुरी घेण्याची प्रस्तावित योजना आहे तर २० बिले केवळ विचारार्थ पटलावर मांडली जातील.
या सत्रासंबंधीच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी, एकूणच संबंधीत राजकारणावर चर्चा करण्यासाठी, मांडलेल्या बिलांवर ऐसीच्या सदस्यांची मते समजून घेऊन त्यावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी हा धागा सुरू करत आहे. यात शक्य तितके दररोज 'काल' काय झाले आणि 'आज' संसदेपुढे कोणता कार्यक्रम प्रस्तावित आहे, याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहेच. शिवाय या धाग्यावर या सत्राशी निगडित राजकारणावरही चर्चा व्हावी असे वाटते. मात्र त्याव्यतिरिक्त जेव्हा विधेयके सादर होतील तेव्हा त्यावर आपापली मते इथेच द्यावीत अशी विनंतीही करतो
रोजची माहिती त्याच दिवशी देणे, दररोज शक्य होईलच असे नाही मात्र प्रयत्न जरूर करणार आहे. शिवाय काही महत्त्वाच्या विधेयकांवर यापूर्वी माहिती दिली नसेल तर तीही प्रतिसादांत देण्याचा प्रयत्न करेनच.
या व्यतिरिक्त काहींनी व्यनींतून सूचना केल्याप्रमाणे मिपाच्या संपादकांच्या मदतीने पुढील तक्ता अद्ययावत ठेवण्याचाही प्रयत्न केला जाईल:
आज काय झाले? आज काही झाले का?
| दिनांक | पहिले सत्र (जेवणाच्या सुट्टीपूर्व) | कायदेविषयक सत्र (जेवणाच्या सुट्टीनंतर) | आज प्रस्तावित विधेयके | आज मंजूर विधेयके |
| गुरू २१ फेब्रु | आज संसदेच्या या सत्राचा पहिला दिवस राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू झाला. त्या भाषणानंतर अर्ध्या तासाने त्याची प्रत दोन्ही सभागृहात पटलावर मांडण्यात आली. माजी दिवंगत खासदारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कार्यालयीन कामकाजाने पेपर्स, काही रीपोर्टस पटलावर ठेवले गेले. | कामकाज नाही | ० | ० |
| शुक्र २२ फेब्रु | राज्यसभेत गदारोळ. लोकसभेत १२ वाजल्यानंतर हैद्राबाद स्फोटांवर विस्ताराने चर्चा, राष्ट्रव्यापी संप आणि चंद्रपूर मधील बलात्काराच्या घटनेचे विशेष उल्लेख | राज्यसभेत हैद्राबाद स्फोटांवर विस्ताराने चर्चा, १ प्रायवेट मेम्बर विल नामंजूर | राज्यसभा:१२ प्रायवेट मेम्बर बिले सादर + ६ प्रायवेट मेम्बर बिले चर्चा व मतदानार्थ लोकसभा: १ सर्वसाधारण बिल चर्चा व मतदानार्थ + २७ प्रायवेट मेम्बर बिले सादर + ९ प्रायवेट मेम्बर बिले चर्चा व मतदानार्थ | राज्यसभेत १ बिल सादर, २ बिलांवर चर्चा, १ नामंजूर लोकसभेत १६ बिले सादर, २ वर चर्चा, १ विड्रॉ |
| सोम २५ फेब्रु | सुट्टी | सुट्टी | सुट्टी | सुट्टी |
| मंगळ २६ फेब्रु | राज्यसभा: प्रश्नोत्तरे, पेपर्स आणि शुन्य प्रहर लोकसभा: प्रश्नोत्तरे, पेपर्स आणि रेल्वे बजेट | राज्यसभा: रेल्वे बजेट, झारखंड मधील राष्ट्रपती राजवटीचे रिझोल्युशन आणि एक विधेयक मंजूर लोकसभा: देशभरातील दुष्काळावर विस्ताराने चर्चा सुरू, शुन्य प्रहर | राज्यसभा:१ विचारार्थ + ३ चर्चा व मंजूरीसाठी लोकसभा ३ विधेयके चर्चा व मंजूरीसाठी | राज्यसभा १ विचारार्थ + १ मंजूर लोकसभा: ० |
| बुध २७ फेब्रु | राज्यसभा: ११ वाजता प्रश्नोत्तरे. १०० नेत्यांच्या फोन टॅपिंगवरून सरकारला स्टेटमेन्ट् देण्यास कबूल करण्यास विरोधकांनी भाग पाडले. कार्यालयीन रिपोर्ट्स, पेपर्स पटलावर मांडण्यात आले. "श्रीलंकेतील तमिळ नागरिकांचे प्रश्न" मांडणार्या लक्षवेधी सूचनेवर चर्चा, DMK, AIADMK चा सभात्याग. लोकसभा ११ वाजता प्रश्नोत्तरे. इकोनॉमिक सर्वेसह अन्य रिपोर्ट्स आनि पेपर्स सादर. जेवणाची सुट्टी न घेता कामकाज पुढे नेण्यास खासदारांची परवानगी. | राज्यसभा: ऑगस्टा वेस्ट लँड कडून VVIP हेलिकॉप्टर्स च्या खरेदीसंबंधित Short Duration Discussion मंत्र्याच्या उत्तराने विरोधक नाखुश, भाजपसह अन्यांचा सभात्याग. शून्य प्रहर लोकसभा जेवणाची सुट्टी न घेता सदनाने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रकट करणार्या प्रस्तावावर चर्चा. प्रस्तावित वेळेपेक्षा अधिक वेळ थांबून शून्य प्रहर | राज्यसभा:१ चर्चा व मंजूरीसाठी लोकसभा ० | ० |
| गुरू २८ फेब्रु | लोकसभा: ठिक ११ वाजता अर्थमंत्र्यानी वित्तवर्ष २०१३-१४ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर फिस्कल स्टेटमेन्ट्स आणि Finanace Bill, 2013 सादर केले. | राज्यसभा: १:३० वाजता अर्थमंत्र्यानी वित्तवर्ष २०१३-१४ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प पटलावर मांडला. त्यानंतर फिस्कल स्टेटमेन्ट्स पटलावर मांडले. | राज्यसभा:०लोकसभा १ विचारार्थ | राज्यसभा:०लोकसभा १ विचारार्थ |
| शुक्र ०१ मार्च | राज्यसभा: ११ वाजता शिक्षण मंत्रालय आणि कृषी मंत्रालयाशी संबंधीत प्रश्नोत्तरे झाली. कार्यालयीन रिपोर्ट्स, पेपर्स पटलावर मांडण्यात आले. फोन टॅपिंग तसेच भंडारा अल्पवयीन बलात्कारावर गृहमंत्र्यांचे स्टेटमेन्ट व त्यावर खडाजंगी चर्चा लोकसभा: गुजरात मधील विद्यमान खासदार श्री मुकेश गढवी यांच्या निधनामुळे कामकाज सोमवार पर्यंत तहकूब | राज्यसभा: श्री राजीव यांच्या प्रायवेट मेम्बर रिझोल्युशनवर श्री सिब्बल यांचे उत्तर व त्यावर रावीव व श्री सिब्बल यांची प्रश्नोत्तरे. श्री सिब्बल यांनी अपेक्षित आश्वासन सदनासमोर दिल्यानंतर श्री राजीव यांनी रिझोल्युशन मागे घेतले त्यानंतर श्री प्रकाश जावडेकर यांचे असंघटित क्षेत्रातील कामगार व मजुंरांच्या विषयावरील रिझोल्युशनवरील चर्चेला सुरवात. चर्चा अपूर्ण. नियोजीत वेळेपेक्षा अधिक वेळ कामकाज चालले. स्पेशल मेन्शन्स सरकार समोर ठेवली लोकसभा: कामकाज सोमवार पर्यंत तहकूब | राज्यसभा: १ रिझोल्युशन्स मागे घेतले, १ वर चर्चा चालु | |
| सोम ०४ मार्च | राज्यसभा: तेल भाववाढीवरून गोंधळ, काजकाज नाही. कार्यालयीन रिपोर्ट्स, पेपर्स पटलावर मांडण्यात आले. लोकसभा: तेल भाववाढीवरून गोंधळ, काजकाज नाही. कार्यालयीन रिपोर्ट्स, पेपर्स पटलावर मांडण्यात आले. शिवाय NATIONAL INSTITUTES OF TECHNOLOGY, SCIENCE EDUCATION AND RESEARCH (AMENDMENT) BILL विचारार्थ सादर केले गेले. | राज्यसभा: तेल भाववाढीवरून गोंधळ, काजकाज नाही लोकसभा: कलम ३७७ खालील सुचना पटलावर मांडल्या गेल्या तेल भाववाढीवरून गोंधळ, काजकाज नाही | राज्यसभा: ० लोकसभा: सादर १ | |
| मंगळ ०५ मार्च | रिपोर्ट्स पटलावर सादर. अन्य कामकाज होऊ शकले नाही | कामकाज होऊ शकले नाही | लोकसभा: ० राज्यसभा: ० | ० |
| बुध ०६ मार्च | राज्यसभा प्रश्नोत्तरे, रिपोर्ट्स आणि शुन्य प्रहर. सदस्यांनी जेवणाची सुट्टी रद्द करून कामकाज चालुच ठेवले लोकसभा प्रश्नोत्तरांचा तास गोंधळात स्थगित रिपोर्ट्स आणि शुन्य प्रहर. सदस्यांनी जेवणाची सुट्टी रद्द करून कामकाज चालुच ठेवले | राज्यसभा: राष्ट्रपतींचे अभिभाषणाबद्दल आभार मानणारे मोशन सादर, सेकंडेड, चर्चा चालु लोकसभा चेर्चेअंती राष्ट्रपतींचे अभिभाषणाबद्दल आभार मानणारे मोशन संमत केले. शुन्य प्रहर दोन्ही सभागृहे कामकाजाच्या वेळेपेक्षा अधिक वेळ कार्यरत होती | राज्यसभा: अभिभाषण लोकसभा: अभिभाषण, रेल्वेबजेट | लोकसभा: अभिभाषण प्रस्ताव मंजूर |
| गुरू ०७ मार्च | राज्यसभा: अभिभाषण, रेल्वे बजेट लोकसभा: रेल्वेबजेट |
वाचने
4287
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म... थोडक्यात
२२ फेब्रुवारी २०१२ चा प्रस्तावित कार्यक्रम
२२ फेब्रुवारी २०१२ चा प्रस्तावित कार्यक्रम
राज्यसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सुचना पटलावर ठेवले जातील ========= शुक्रवार हा प्रायवेट मेम्बर बिलांसाठी राखीव असतो. विचारार्थ सादर बिले: आज विविध विषयांवरील १२ विधेयके राज्यसभेसमोर मांडली जातील. त्यापैकी श्री सुब्बरामी रेड्डी यांचे The Youth (Development and Welfare) Bill, 2012, श्री. प्रकाश जावडेकर यांचे The Code of Criminal Procedure (Amendment) Bill, 2012 (amendment of section 309), श्री पुरुषोत्तम रुपाला यांचे The Compulsory Registration of Callers Using Public Telephone Booths Bill, 2013 ही काही निवडक रोचक बिले आहेतच. विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर बिले: आज ६ प्रायवेट मेम्बर बिलांवर चर्चा आणि मतदान करणे प्रस्तावित आहे. चर्चेची सुरवात The Payment of Bonus (Amendment) Bill, 2012 ने होईल. या व्यतिरिक्त श्री भारतकुमार राऊत यांनी माडलेल्या The Constitution (Amendment) Bill, 2012 (amendment of article 72) वर चर्चा चौथ्या क्रमांकावर प्रस्तावित आहे.लोकसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सुचना पटलावर ठेवले जातील. त्यानंतर गेल्या सत्रात मंजूरी दिलेल्या ७ बिलांना राष्ट्रपतींनी मंजूरी दिल्याचे सभागृहाला सांगितले जाईल ===== विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर बिले: Constitution (Scheduled Castes) Order (Amendment) Bill, 2012. गेल्या सत्रात चर्चा व मतदान पूर्ण होऊ न शकलेले हे सुधारणा विधेयक कुमारी शैलजा मांडतील व मतदानासाठी ठेवतील. बिलाचा मसुदा इथे वाचता येईल. त्यानंतर दुपारच्या सत्रात प्रायवेट मेम्बर बिले विचारार्थ घेतली जातील ===== विचारार्थ सादर बिले: आज २७ प्रायवेट मेम्बर बिले केवळ विचारार्थ लोकसभेपुढे सादर होतील. त्यावर आज चर्चा व मतदान होणार नाही. विचारार्थ आणि मंजूरीसाठी सादर बिले: ९ प्रायवेट मेम्बर बिलांवर आज चर्चा व मतदान प्रस्तावित आहे. गेल्या सत्रात चर्चा पूर्ण न होऊ शकलेल्या Provision of Social Security to Senior Citizens Bill, 2010. ने या चर्चेची सुरवात होईल.प्रत्यक्ष कामकाजः राज्यसभा
In reply to २२ फेब्रुवारी २०१२ चा प्रस्तावित कार्यक्रम by ऋषिकेश
प्रत्यक्ष कामकाजः लोकसभा
In reply to २२ फेब्रुवारी २०१२ चा प्रस्तावित कार्यक्रम by ऋषिकेश
येक लंबर धागा!
२६ फेब्रुवारी २०१३: प्रस्तावित कामकाज
२६ फेब्रुवारी २०१२ चा प्रस्तावित कार्यक्रम
राज्यसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल. रेल्वे बजेट २०१३-१४ रेल्वे मंत्री श्री पवन कुमार बन्सल २०१३-१४ मध्ये रेल्वेचा प्रस्तावित खर्च व जमा यांचा ताळेबंद सदनासमोर मांडतील ========= त्यानंतर श्री सुशील कुमार शिंदे पुढील 'रिझोल्यूशन' सदनापुढे मांडतील That this House approves the Proclamation issued by the President on the 18th January, 2013 under article 356 (1) of the Constitution in relation to the State of Jharkhand ======== त्यानंतर श्री चिदंबरम Securities and Exchange Board of India (Amendment) Ordinance या ऑर्डिनन्सची गरज विशद करणारे स्टेटमेंट सादर करतील ========= दुपारच्या सत्रातः विचारार्थ सादर बिले: सकाळच्या सत्रात उल्लेख केलेल्या 'ऑर्डिनन्स' ला पूरक The Securities and Exchange Board of India (Amendment) Bill, 2013 हे बिल श्री पी. चिदंबरम सदना पुढे सादर करतील. === त्यानंतर श्री अश्विनी कुमार Readjustment of Representation of Scheduled Castes and Scheduled Tribes in Parliamentary and Assembly Constituencies Ordinance, 2013 या ऑर्डिनन्स मागची निकड सदनापुढे मांडतील. ======= विचारार्थ आणि मंजुरीसाठी सादर बिले: वर उल्लेखलेल्या ऑर्डिनन्सशी संबंधित बिल The Readjustment of Representation of Scheduled Castes and Scheduled Tribes in Parliamentary and Assembly Constituencies Bill, 2013 या नावाचे बिल श्री अश्विनी कुमार संसदेपुढे सादर करतील आणि त्यावर चर्चा आणि मंजुरीसाठी मतदान होईल. The Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redressal) Bill, 2012 श्रीमती कृष्णा तीरथ सादर करतील. सदर बिल लोकसभेने मंजूर केले आहे. अधिक माहिती आणि विधेयकाचा मसुदा लवकरच शोधून इथे देतो. The Companies Bill, 2012, श्री सचिन पायलट सदर बिल सदनापुढे चर्चा आणि मंजुरीसाठी मांडतील. The Companies Bill, 2011 या आधी लोकसभेत चर्चिले गेले होते. त्यात बदल करून हे बिल सादर केले जाईल.लोकसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल रेल्वे बजेट २०१३-१४ रेल्वे मंत्री श्री पवन कुमार बन्सल २०१३-१४ मध्ये रेल्वेचा प्रस्तावित खर्च व जमा यांचा ताळेबंद सदनासमोर मांडतील ===== विचारार्थ आणि मंजुरीसाठी सादर बिले: गेल्या सत्रात चर्चा व मतदान पूर्ण होऊ न शकलेले हे सुधारणा विधेयक कुमारी शैलजा मांडतील व मतदानासाठी ठेवतील. बिलाचा मसुदा इथे वाचता येईल. Motor Vehicles (Amendment) Bill, 2012. राज्यसभेने मंजूर केलेले हे सुधारणा बिल डॉ. सी.पी.जोशी आज लोकसभेपुढे मंजुरीसाठी मांडतील. मूळ राज्यसभेत मंजूर झालेले बिल इथे वाचता येईल. National Accreditation Regulatory Authority for Higher Educational Institutions Bill, 2010. श्री कपिल सिब्बल यांनी सादर केलेले हे बिल श्री पल्लम राजु आज लोकसभेपुढे मंजुरीसाठी मांडतील. सदर बिल इथे वाचता येईल. ========== नियम १९३ नुसार चर्चा (सदर नियमाखालील चर्चेस 'Shirt Duration Discussion' असे म्हटले जाते. यात कोणताही खासदार चर्चेची नोटिस देऊ शकतो. सभापतींना योग्य वाटेल त्या वेळी सदर चर्चा होते. चर्चेच्या शेवटी मतदान होत नाही. सदर चर्चेत कोणतेही 'विधान'/आदेश (मोशन) विचारार्थ नसते. मात्र चर्चेत सरकारतर्फे मंत्र्यांचे उत्तर बंधनकारक असते) श्री शैलेंद्र कुमार आणि श्री गोपीनाथ मुंडे भारतात विविध ठिकाणच्या दुष्काळी परिस्थितीबद्दल चर्चाप्रस्ताव मांडतीललोकसभेत पहिल्या सत्रात रेल्वे
In reply to २६ फेब्रुवारी २०१३: प्रस्तावित कामकाज by ऋषिकेश
कामजाच्या स्थळी स्त्रियांची अवहेलना प्रतिबंधन बिल
In reply to लोकसभेत पहिल्या सत्रात रेल्वे by ऋषिकेश
प्रत्यक्ष कामकाजः राज्यसभा
In reply to २६ फेब्रुवारी २०१३: प्रस्तावित कामकाज by ऋषिकेश
प्रत्यक्ष कामकाजः लोकसभा
In reply to २६ फेब्रुवारी २०१३: प्रस्तावित कामकाज by ऋषिकेश
२७ फेब्रुवारी २०१२ चा प्रस्तावित कार्यक्रम
राज्यसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सुचना पटलावर ठेवले जातील ======= लक्षवेधी सुचना त्यानंतर डॉ. व्ही. मैत्रेयन, श्री. डी. राजा, श्री, तिरुचि सिवा, श्री. वैकय्या नायडू, श्री. संजय राऊत हे खासदार मिळून परराष्ट्र मंत्रालयाकडे "श्रीलंकेतील तमिळ नागरिकांचे प्रश्न" माडणारी लक्षवेधी सुचना मांडतील व त्यावर चर्चा होईल ======== लघु चर्चा ऑगस्टा वेस्ट लँड कडून VVIP हेलिकॉप्टर्स च्या खरेदीसंबंधीत Short Duration Discussion अर्थात लघु चर्चा श्री. प्रकाश जावडेकर, श्री भुपेन्दर यादव, श्री. भगत सिंग कोश्यारी, श्री तरुण यादव, डॉ. नजमा हेप्तुल्ला, डॉ. भारतकुमार राऊत, श्री. नरेश अग्रवाल, श्री अरविंद सिंग, श्री किरणमय नंदा, श्री टी. रंगराजन, श्री पी. राजीव, डॉ. टी.एन्.सीमा मिळून मांडतील. चर्चेच्या शेवटी मंत्र्यांना उत्तर देणे बंधनकारक असेल. ========= दुपारच्या सत्रातः विचारार्थ सादर बिले: -- === विचारार्थ आणि मंजुरीसाठी सादर बिले: National Accreditation Regulatory Authority for Higher Educational Institutions Bill, 2010. काल लोकसभेत सादर केलेले हे बिल श्री सी.पी.जोशी आज राज्यसभेपुढे मंजुरीसाठी मांडतील. सदर बिल इथे वाचता येईल.लोकसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सुचना पटलावर ठेवले जातील ===== त्यानंतर कलम ३७७ खाली प्रश्न विचारले जातील किंवा पटलावर मांडले जातील कलम ३७७ खाली विचारले जाणारे प्रश्न (शुन्य प्रहर वेगळा). या नियमाखाली विचारल्या जाणार्या प्रश्नांना मंत्र्यांवर तिथल्या तिथे उत्तर द्यायचे कायदेशीर बंधन नसते ===== श्री. पी.सी. चाको राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवादाचा प्रस्ताव मांडतील आणि डॉ. गिरिजा व्यास त्याला अनुमोदन करतील. त्यानंतर या प्रस्तावावर चर्चा व गरज पडल्यास मतदानही होऊ शकते. सदर प्रस्ताव मंजुर न झाल्यास सरकारला राजीनामा द्यावा लागतो. (अर्थात तशी वेळ अजून कधी आलेली नाही)प्रत्यक्ष कामकाजः राज्यसभा
In reply to २७ फेब्रुवारी २०१२ चा प्रस्तावित कार्यक्रम by ऋषिकेश
प्रत्यक्ष कामकाजः लोकसभा
In reply to २७ फेब्रुवारी २०१२ चा प्रस्तावित कार्यक्रम by ऋषिकेश
२८ फेब्रुवारी २०१३
२८ फेब्रुवारी २०१३ चा प्रस्तावित कार्यक्रम
लोकसभा
सकाळी ठिक ११:०० वाजता, भारताचे विद्यमान अर्थमंत्री श्री. पी.चिदंबरम् वित्त-वर्ष २०१३-१४ ची मिळकत आणि खर्च यांचे अंदाजपत्र -अर्थात सर्वसाधारण बजेट- सादर करतील. त्यानंतर अर्थमंत्री पुढील फिस्कल स्टेटमेन्ट्स पटलावर ठेवतीलः (i) Macro-Economic Framework Statement; (ii) Medium-Term Fiscal Policy Statement; and (iii) Fiscal Policy Strategy Statement. ======== त्यानंतर विचारार्थ सादर बिले: अर्थमंत्री श्री पी. चिदंबरम Finance Bill, 2013 लोकसभेत विचारार्थ सादर करतील. आज त्यावर चर्चा व मतदान होणार नाही.राज्यसभा
सर्वसाधारण बजेट लोकसभेत सादर होणार असल्याने आज राज्यसभेचे कामकाज दुपारी १:३० वाजता सुरू होतील दुपारी, अर्थमंत्री श्री. पी. चिदंबरम् वित्त-वर्ष २०१३-१४ ची मिळकत आणि खर्च यांचे अंदाजपत्र -अर्थात सर्वसाधारण बजेट- पटलावर ठेवतील. त्याच बरोबर लोकसभेत सादर केलेली तीन "फिस्कल पॉलिसी स्टेटमेट्न्स" पटलावर मांडतील आणि सत्र दिवसभरासाठी तहकूब होईल.०५ मार्च २०१३
०५ मार्च २०१३ चा प्रस्तावित कार्यक्रम
राज्यसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सूचना पटलावर ठेवले जातील ========= श्रीमती रेणूका चौधरी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवादाचा प्रस्ताव मांडतील आणि श्री. प्रवीण राष्ट्रपाल त्याला अनुमोदन करतील. त्यानंतर या प्रस्तावावर चर्चा व गरज पडल्यास मतदानही होऊ शकते. सदर प्रस्ताव मंजुर न झाल्यास सरकारला राजीनामा द्यावा लागतो. (अर्थात तशी वेळ अजून कधी आलेली नाही)लोकसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल. शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सूचना पटलावर ठेवले जातील. ===== त्यानंतर गृहमंत्री सुशील कुमार शिंदे भंडार्यातील बलात्काराच्या प्रश्नावर स्टेटमेंट सादर करतील. शिवाय श्री जयराम रमेश 'मनरेगा' अंतर्गत नव्या दरांची (कामगारांच्या रोजगारीचे दर) घोषणा करतील ===== त्यानंतर कलम ३७७ खाली प्रश्न विचारले जातील किंवा पटलावर मांडले जातील कलम ३७७ खाली विचारले जाणारे प्रश्न (शुन्य प्रहर वेगळा). या नियमाखाली विचारल्या जाणार्या प्रश्नांना मंत्र्यांवर तिथल्या तिथे उत्तर द्यायचे कायदेशीर बंधन नसते ==== श्री पी.सी.चाको यांनी मांडलेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवादाचा प्रस्तावावरील चर्चा पुढे चालेल व त्यावर मतदान होईल. === शेवटी रेल्वे बजेट २०१३-१४ वर चर्चा होईल व चर्चेच्या नंतर मतदान प्रस्तावित आहे.पंजाबमध्ये एका स्त्री वर
In reply to ०५ मार्च २०१३ by ऋषिकेश
०६ मार्जः प्रत्यक्ष कामकाजः लोकसभा
राज्यसभा: प्रत्यक्ष कामकाज
In reply to ०६ मार्जः प्रत्यक्ष कामकाजः लोकसभा by ऋषिकेश