लहानपणी शिकवणीला प्रथम शब्द शिकवतात तो “श्री” म्हणून म्हटलं प्रथम लेख लिहावा तो “श्री” चे नाव घेऊनच.
आपले म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पा. पूर्वी देवपूजा शास्त्रोक्त पद्धतीने केली जायची परंतु आता मात्र देवदर्शनाचे किंबहुना देवाचेच मार्केटिंग सुरु झाले आहे.
गेल्याच आठवड्यात सासू-सासरे मुंबईस आले तेव्हा म्हटलं मुंबई दर्शनाची सुरुवात “श्री” चे नाव घेउनच करू.
१२ वा. सुमारास सिद्धिविनायक, दादर येथे पोहोचलो. गाडीतून पाय काढला तोच दुकानाचे मार्केटिंग अधिकारी मागे लागले त्यांचा ससेमिरा चुकवत नेहमीच्याच दुकानात गेलो. बाप्पांसाठी प्रसाद घेतल्यानंतर मंदिराच्या गेट पाशी आलो. तिथे उभ्या असलेल्या security guard नी सो called formality म्हणून checking केली. आत गेलो तर आणखी मार्केटिंग अधिकारी, पण हातात अगोदरच घेतलेले ताट पाहून परत गेले. वाटल कशासाठी हि जबरदस्ती . . .आणि नाही घेतल्यावर दाखवलेला राग.
सिंदूर लेपन चालू असल्याने अर्धा तास थांबाव लागणार होत. यजमान आपल्या आई-वडिलांना मंदिराबद्दल, खास प्रसंगी होणाऱ्या गर्दीबद्दल माहिती देत होते. ऊन अगदी कडक पडले होते जणू काही बापांच्या दर्शनासाठी परीक्षाच होती ती . . .
रांगेत अनेक कॉलेज ग्रूप आढळून आले, हातामध्ये महागडे फोन ज्याच आकारमान कानापासून खांद्यापर्यंत होत. काही जण जप करत होते तर काही गप्पा. एवढ्यात रांग पुढे सरकायला लागली. एका बाजूला ५० रू. देउन पासधारकांची रांग होती.
१०-१५ मी. आम्हाला आत सोडले तेव्हा माणसांचा एक लोंढाच पुढे ढकलला गेला. माझे सासू-सासरे तर बुचकळ्यात पडले होते. त्यांना घेउन आम्ही पुढे सरकत होतो. एवढ्यात समोरून पासधारकांना सुद्धा सोडण्यात आले. दोन्ही रांगा एकत्र मिळाल्या.....देव जाणे तो पास कशासाठी ?
गणपती बाप्पा नीटसे दिसत सुद्धा नव्हते आत पायरीवरून खाली उतरलो तोच नेमण्यात आलेले प्रतिनिधी “पुढे सरका , बाहेर जा, हो गया क्या आपका” घोषणा देत होते. कस बस गर्दीला जुमानत आत प्रवेश केला बघितल न बघितल तोच आम्ही बाहेर ढकलले गेलो. २-३ मी. साठी आम्ही कुंभ मेळ्यात हरवतात तसे वेगळे झालो आणि मग शोधाशोध करून भेटलो एकदाचे. समोरच्या जागेत बसून प्रार्थना करावी तर आधीच housefull. एका रिकाम्या जागी बसावं तर आधीच बसलेला लहान मुलगा म्हनाला “मेरी mummy आ रही है” झालं …… इथे सुद्धा reservation. नंतर मिळाला एकदाचा एक कोपरा बसलो २ मी. देवाचे नाव घेतले आणि उठलो आणि बघत होते तो लोकांचा लोंढा त्यांना नुसते बाहेर ढकलले जात होते. त्यांनी तिथे उभे राहू नये म्हणून तिथे उभे असलेले कर्मचारी त्यांना baricade सरकवून पुढे ढकलत होते. मनाचा संताप होत होता पण नुसताच . . .
मारुती रायाचे दर्शन घेतले आणि मूषक मामचे दर्शन करावयास गेलो तर तिथे सुद्धा रांग प्रत्येकजण उंदीर मामाच्या कानात आपली इच्छा सांगत होता , वेळेचे काही बंधन नाही आम्ही आपले हात जोडले आणि नारळ exchange करण्याच्या रांगेत उभे राहिलो अख्खा नारळ देऊन अर्धा घेतला. एका भिंतीवर चौकोनी आकारात संगमरवर बसवले होते तिथे प्रत्येक जण आपल्या बोटाने जाऊन काहीतरी लिहीत होता. मला पाहून आश्चर्य वाटले की कितीतरी लोक ते पाहून तेच करत होते कसलीही शहनिशा न करता.
हे एवढ लिहिण्याच कारण कि एवढी प्रतीक्षा करून, धक्का बुक्का खाऊन आपल्याला आपल्या बाप्पाला एक क्षणसुद्धा बघता न याव. मग हे जे नट – नटी येतात त्यांना का एवढा प्राधान्य द्याव. काल कोण म्हणे तर अमिताभ बच्चन आलेला आपल्या प्रिय सुनेसोबत काकड आरतीला (त्यांच्या ह्या सासरा – सून प्रेमाबद्दल एक वेगळाच लेख लिहावा लागेल ), आज कोण तर चक्क सनी लिओनी.
संताप करतच बाहेर पडले आणि पतीने कारण विचारले असता सांगितले तेव्हा तो म्हणाला तू किती लाखांचे डोनेशन देतेस कि त्यांनी तुला vip treatment व बाप्पांचे मनमुराद दर्शन घेण्याची मोकळीक द्यावी. ह्यावरच उत्तर कळलेच नाही....मनात म्हटलं मला माझ्या बाप्पांना डोळे भरून बघण्यासाठी मनी श्रद्धा असावी कि मी धनी . . . .
इतक्यात driver आला त्याला प्रसाद दिला आणि निघालो पुढे मुंबई दर्शनाला ....”बाप्पांची धावती भेट घेऊन”
वाचने
14513
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
घरातला गणपती आणि सिद्धिविनायक यात फरक आहे
+१
In reply to घरातला गणपती आणि सिद्धिविनायक यात फरक आहे by संजय क्षीरसागर
+११११११११११११११११
In reply to +१ by स्पा
+५००
In reply to घरातला गणपती आणि सिद्धिविनायक यात फरक आहे by संजय क्षीरसागर
हो, पण..
In reply to घरातला गणपती आणि सिद्धिविनायक यात फरक आहे by संजय क्षीरसागर
दादा, विषयांतर होतंय
In reply to हो, पण.. by दादा कोंडके
गणपती नाहीच्चे! पुढे????
In reply to दादा, विषयांतर होतंय by संजय क्षीरसागर
अस्कक्साय?
In reply to दादा, विषयांतर होतंय by संजय क्षीरसागर
जिकडे तिकडे शोधीत का रे,
In reply to अस्कक्साय? by दादा कोंडके
@अर्थात देव आहे असं मानत असाल
In reply to जिकडे तिकडे शोधीत का रे, by धन्या
उद्या त्यांनी घरात (तुळजा)भवानी नाही म्हणून
In reply to अस्कक्साय? by दादा कोंडके
अगदी अगदी.....
In reply to घरातला गणपती आणि सिद्धिविनायक यात फरक आहे by संजय क्षीरसागर
सिद्धिविनायक अंगारकीच्या
देव देवारयात नाही.. या
गर्दीचं दर्शन जीव गुदमरायला येतो....
क्रिकेट वर्ल्ड कप अंतिम सामन्याच्या वेळेस बोलून गेलो
In reply to गर्दीचं दर्शन जीव गुदमरायला येतो.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुनमजी अवांतराबद्दल क्षमा करा..
In reply to क्रिकेट वर्ल्ड कप अंतिम सामन्याच्या वेळेस बोलून गेलो by संजय क्षीरसागर
देवाकडे, सर्व गोष्टींचा अनुक्रमांक ठरलेला असतो
In reply to पुनमजी अवांतराबद्दल क्षमा करा.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संक्षी.. खर्र खर्र सांगा...
In reply to देवाकडे, सर्व गोष्टींचा अनुक्रमांक ठरलेला असतो by संजय क्षीरसागर
संजय क्षीरसागर आणि प्रा.डॉ
त्यांचा संपूर्ण प्रतिसाद न वाचता या बाबतीत
In reply to संजय क्षीरसागर आणि प्रा.डॉ by श्रिया
बरं.....
In reply to त्यांचा संपूर्ण प्रतिसाद न वाचता या बाबतीत by संजय क्षीरसागर
बसायचं तर केंव्हापण पुण्याला या हो!
In reply to बरं..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्स.
In reply to बसायचं तर केंव्हापण पुण्याला या हो! by संजय क्षीरसागर
हे असले प्रसंग आता प्रत्येक
सामान्य माणसाचा नाईलाज असतो
In reply to हे असले प्रसंग आता प्रत्येक by शिद
देवाला कसला आला आहे वाटा???
In reply to सामान्य माणसाचा नाईलाज असतो by धन्या
:(
In reply to देवाला कसला आला आहे वाटा??? by शिद
देवाला कसला आला आहे वाटा???
In reply to :( by शिद
प्रॉ डॉ.
सोमवारी देवीला... मंगळवारी
मग जायचेच कशाला.
In reply to सोमवारी देवीला... मंगळवारी by एम.जी.
+१
In reply to मग जायचेच कशाला. by धन्या
किंवा मग रस्त्यावरून लोळत का
In reply to +१ by दादा कोंडके
अच्छा!
In reply to किंवा मग रस्त्यावरून लोळत का by ५० फक्त
अगदी असाच प्रकार (मोठ्या
मला तर अशा वेळी देवाचाच राग
In reply to अगदी असाच प्रकार (मोठ्या by रेवती
अग तिरुपतीचा एक किस्सा सांगते
In reply to अगदी असाच प्रकार (मोठ्या by रेवती
मुंबईला नोकरीला होतो तेव्हा
१. उत्तमा सहजावस्था, मध्यमा
१. उत्तमा सहजावस्था, मध्यमा
In reply to १. उत्तमा सहजावस्था, मध्यमा by प्यारे१
उत्तमा सहजावस्था, मध्यमा
In reply to १. उत्तमा सहजावस्था, मध्यमा by प्यारे१
च्यायला खरंच की...
In reply to उत्तमा सहजावस्था, मध्यमा by विश्वनाथ मेहेंदळे
मा. श्री. प्यारे , मा.श्री.
In reply to च्यायला खरंच की... by धन्या
त्या मा टिंब श्री टिंब चा
In reply to मा. श्री. प्यारे , मा.श्री. by ५० फक्त
विमे ला नाटक दिग्दर्शनाची आवड
In reply to त्या मा टिंब श्री टिंब चा by प्यारे१
मा. श्री. प्यारे , मा.श्री.
In reply to मा. श्री. प्यारे , मा.श्री. by ५० फक्त
@ विमे,
In reply to च्यायला खरंच की... by धन्या
मी केवळ निमित्तमात्र आहे हो.
In reply to @ विमे, by प्यारे१
हं..
हे सगळं वाचलं की संदिपची
In reply to हं.. by उपास
होय..
In reply to हे सगळं वाचलं की संदिपची by धन्या
दर्शन घ्यायचय सोप्पा उपाय....
बाजार झाला आहे.
निवडणुकीत हारला तर संस्थान चा
In reply to बाजार झाला आहे. by निमिष ध.
खरा प्रकार आहे
In reply to निवडणुकीत हारला तर संस्थान चा by रेवती
त्या देवाच्या चेहऱ्यावरचा भाव
In reply to बाजार झाला आहे. by निमिष ध.
तसं तर जिवंत वाघाच्या
In reply to त्या देवाच्या चेहऱ्यावरचा भाव by अग्निकोल्हा
किती वर्षे राहिले मुंबईत. पण
खीक्क !
देवाच्या दारी आपण ऐकटे नसतो हजारो लाखो लोक आलेले असतात
श्या:, मला एकदा तरी आयुष्यात
हू आर यू?
In reply to श्या:, मला एकदा तरी आयुष्यात by कवितानागेश
देवाच्या दारी आपण ऐकटे नसतो हजारो लाखो लोक आलेले असतात