नमस्कार मंडळि,
आता लवकरच भारतात आंब्याचा सीजन चालु होईल तेव्हा खालील बर्फि हि तमाम आंबा आणि पनीर प्रेमींसाठि.
साहित्यः
१. आंब्याचा पल्प / ताजा रस - १.५ वाटि (ताजा असेल तर मिक्सर मधे एकदा फिरवुन घेणे जेणेकरुन गुठळ्या राहणार नाहित)
२. ताजं पनीर / क्युब्स - १ वाटि (क्रश करुन/किसुन)
३. खवा - १ वाटि
४. साखर किंवा नेस्ले स्वीट कंन्डेस्ड मिल्क - आवडिप्रमाणे कमी / जास्त (आंबा कितपत गोड आहे त्या प्रमाणात)
५. तुप - १.५ पळि
६. वेलची पुड - १/२ चमचा
७. सजावटिसाठि बदाम, पिस्ता पुड किंवा तुमच्या आवडिचे ड्राय फ्रुटस
कॄती:
१. मध्यम आचेवर एका नॉनस्टिक कढईत / पातेल्यात तुप तापले कि त्यात खवा आणि किसलेल पनीर घालुन परतावे
२. खवा / पनीर चांगल परतल कि त्यात आंबा पल्प घालुन मिश्रण एकजीव करावे
३. सतत परतावे नाहितर पल्प, खव्यामुळे मिश्रण खाली चिकटण्याची शक्यता आहे
४. एक ८-१० मि. परतलं कि त्यात आवडिप्रमाणे साखर/कंन्डेस्ड मिल्क घालाव व परतत रहावे
५. एक ५-६ मिनटानी साखर विरघळली कि मिश्रणाचा गोळा होईल
६. आता त्यात वेलची पुड, आवडिचे ड्राय फ्रुटस घालुन एक ४-५ मि. गॅस बंद करावा
७. गरम मिश्रण तुप लावलेल्या थाळित काढावे व सगळिकडे एकसारखे पसरुन घ्यावे
८. पुर्ण गार झाल्यावर वडया ह्व्या त्या आकारात कापुन आंबामिश्रित पनीर बर्फिचा लुफ्त घ्या; इतरांना द्या :)

वाचने
8660
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच.
वा!!
आयायायायाया!
ही जाहीर मागणी मी दिपक
In reply to आयायायायाया! by पैसा
आंबे यायला लागले की ..
वा... छान.... तुम्हाला पनीर
सुंदर आणि नाजुक वडी पाहुनच
मस्त!!
फार जीवघेणा फटू!!!
आहाहा !!
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
आवडता
धन्यवाद
अहाहा...............अतिशय
झक्कास
मस्तंच! फोटू लय भारीय राव.
मस्त फोटो! बर्फी उचलून खावीशी