✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

राशीमेलन

श
श्रीगुरुजी यांनी
गुरुवार, 02/28/2013 - 15:08  ·  लेख
लेख
या विषयावर पूर्वी कोणी लिहिले आहे की याची मला कल्पना नाही. हा विषय थोड्या खेळकर अंगाने मांडण्याची इच्छा आहे. एकूण राशी १२ - मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ, मीन एकूण ग्रह १२ - चंद्र, रवि, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लूटो (राहू व केतू हे ग्रह नसून छेदबिंदू आहेत किंवा प्लूटोला ग्रह मानले जात नाही या वादात मला पडायचे नाही) स्वतःच्या पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्मरास समजली जाते व पत्रिकेतल्या पहिल्या स्थानात जी रास असते ती आपली लग्नरास असते. प्रत्येक माणसाच्या स्वभावावर बहुतेक जन्मराशीचा व काही प्रमाणात लग्नराशीचा प्रभाव असतो. राशीचा प्रभाव म्हणजे त्या राशीचा जो राशीस्वामी आहे त्या ग्रहाचा प्रभाव. प्रत्येक ग्रहाचे शत्रू व मित्र ठरलेले असतात. प्रत्येक ग्रहाच्या आवडत्या व नावडत्या राशी, उच्च व नीच राशी, मित्र राशी, स्वगृह राशी इ. ठरलेल्या असतात. त्यानुसार प्रत्येकाच्या स्वभावात त्या त्या ग्रहांची वैशिष्ट्ये दिसून येतात. चंद्र - चंद्र हा आल्हाददायक, शीतल असतो. परंतु त्याचा आकार रोज बदलताना दिसतो. चंद्र राशीस्वामी असलेली कर्क राशीची माणसे चंद्राप्रमाणेच शांत, देवभोळी व थोडीशी चंचल्/द्विधा मनस्थिती असलेली असतात. ही माणसे बुद्धीपेक्षा भावनेने निर्णय घेतात. 'गलिबल' किंवा सहज फसविता येईल अशी ही माणसे असतात. रवि - रवि राशीस्वामी असलेली सिंह राशीची माणसे काहीशी रागीट, स्पष्टवक्ती, सत्याची चाड असलेली असतात. मंगळ - हा ग्रह आक्रमक, बेधडक, काहीसा अविचारी समजला जातो. मेष व वृश्चिक राशींचा स्वामी मंगळ आहे. साहजिकच या राशी मंगळाप्रमाणेच असतात. पण वॄश्चिक रास ही आक्रमकतेपेक्षा डूख धरून सूड उगविणे, धारदार बोलणे यासाठी जास्त ओळखली जाते. बुध - बुध राशीस्वामी असलेल्या राशी २, मिथुन व कन्या. माणसाची वाणीवर बुधाची सत्ता आहे. मिथुन राशीची माणसे बुधाप्रमाणेच वादविवाद व चर्चेत अत्यंत पटाईत असतात. यांचा मुख्य दोष म्हणजे यांचे धारदार बोलणे. हे अतिशय जिव्हारी लागेल असे बोलून जातात. कन्या राशीची माणसे बोलण्यात शार्प असतात, पण मनातून भित्री असतात. गुरू - गुरू म्हणजे विद्वत्ता, ज्ञान व अध्यात्म. धनू व मीन राशींचा राशीस्वामी गुरू असतो. गुरूची आध्यात्मिकता मीन राशीत प्रकर्षाने दिसते. मीन राशीची माणसे अतिशय देवभोळी व आध्यात्मिक असतात. मनापासून देवपूजा करणे, जपजाप्य, पोथ्या वाचणे इ. गोष्टी या व्यक्ती मनापासून करतात. या व्यक्ती सरळमार्गी पण घाबरट असतात. धनू राशीची माणसे सत्यप्रिय असतात, पण मीन राशीइतकी देवभोळी नसतात. त्यांच्यात काहीशी आक्रमकता असते. शुक्र - हा रसिकतेचा ग्रह आहे. वृषभ व तूळ राशींचा हा स्वामी आहे. या दोन्ही राशींच्या व्यक्ती अतिशय रसिक व जीवनाचा आस्वाद घेणार्‍या असतात. अनेक कलाकारांची तूळ रास आढळते. भगवान श्रीकृष्णाची वृषभ रास होती. शनी - शनी म्हणजे कर्तव्यकठोरता, कष्ट, भावनांचा अभाव किंवा हृदयापेक्षा बुद्धीने निर्णय घेणे. मकर व कुंभ राशींच्या व्यक्ती शनीच्या अंमलाखाली येतात. कुंभ ही बुद्धीप्रामाण्यवादी, शास्त्रज्ञ, गणिती अशांची रास आहे. मकर ही अत्यंत कष्टाळू लोकांची रास आहे. या राशींची माणसे कधीही भावनेच्या भरात वाहवत जात नाहीत. मकर राशीची माणसे अतिशय ठाम निर्णय घेणारी असतात, पण कुंभ राशीच्या व्यक्ती काहीशा द्विधा मनस्थितीत असतात. याची अजून एक वर्गवारी करता येईल. मीन, कर्क, कन्या - निर्णयक्षमतेचा व नेतृत्वाचा अभाव वृषभ, तूळ, कुंभ, सिंह, धनू - संतुलित निर्णय घेण्याची क्षमता मेष, मिथुन, वृश्चिक, मकर - नेतृत्वगुण व बेधडक निर्णय घेण्याची क्षमता या पार्श्वभूमीवर कोणत्या दोन राशींच्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करावे किंवा करू नये याचा अंदाज घेता येतो. आक्रमक किंवा बेधडक राशींच्या व्यक्तींनी कधीही समान गुण असलेल्या राशींच्या व्यक्तींशी लग्न करू नये. नाहीतर त्या दोघात कायमच संघर्ष सुरू असतो. तसेच सौम्य राशींनी आपापसात लग्न करू नये कारण कठीण प्रसंगी दोघेही गडबडून जातात. दोघातला एकजण बिनधास्त, धाडसी व दुसरा सौम्य असल्यास दोघांचे चांगले जमते. मेष राशीच्या व्यक्तींनी मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक, मकर व कुंभ राशींच्या व्यक्तीशी लग्न करणे टाळावे. नाहीतर घरात बर्‍याचवेळा तलवारींचा खणखणाट व ठिणग्या उडताना दिसतील. मेष राशींच्या आक्रमक व्यक्तींनी विशेषत: कर्क, तूळ, मीन इ. सौम्य व आध्यात्मिक राशींचा जोडीदार निवडावा कारण या राशींचे पुरूष बरेचसे शांत असल्याने त्यांना मेष राशीची खमकी बायको मिळाल्यास त्यांच्या प्रपंचाची नौका भरकटत नाही कारण सुकाणू मेष जोडीदाराच्या हातात असते. वृषभ रास ही काहीशी बेधडक पण स्वभावाने अतिशय रसिक असते. जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घ्यायला यांना आवडते. नवीन ठिकाणे पाहणे, प्रवास, कला, शृंगार इ. यांच्या जिव्हाळ्याचे विषय असतात. यांना सर्वोत्कृष्ट जोडीदार असतो तो तूळ राशीचा. दोन्ही राशी शुक्राच्या आधिपत्याखाली असल्याने जीवनाचा मनमुराद आनंद लुटतात. यांनी मकर, सिंह या त्यांच्या तुलनेत काही प्रमाणात अरसिक असलेल्या राशींशी विवाह टाळावा. मिथुन - ही अतिशय धारदार बोलणारी रास असल्याने यांच्या अरे ला कारे ने उत्तर देणारा जोडीदार असेल तर रोज भांडणे होतील. हे टाळण्यासाठी यांनी सौम्य स्वभावाचा म्हणजे कर्क, तूळ, मीन इ. राशींचा जोडीदार निवडावा. कर्क - हे अतिशय भोळे, गलिबल, सरळमार्गी या प्रकारचे असतात. यांना मेष, धनू, सिंह, वृश्चिक अशा खमक्या राशीचा जोडीदार हवा. यांनी तूळ, मीन अशा सरळमार्गी व आध्यात्मिक राशीच्या जोडीदाराशी लग्न करू नये. कारण दोघेही जोडीदार शांत व भोळे असल्याने संकटात डगमगून जातात. सिंह - हे सरळमार्गी, संतापी, सत्यप्रिय, स्पष्टवक्ते असतात. लबाड्या, छक्केपंजे, फसवणूक यांना जमत नाही. यांनी मेष, वृश्चिक, मकर व कुंभ राशींशी विवाह टाळावा. कन्या - ही गरीब स्वभावाची रास आहे. कायम संशयी स्वभाव हे यांचे वैशिष्ट्य. यांनी कर्क, मीन, तूळ इ. राशींचा जोडीदार निवडू नये. तूळ - ही रास बरीचशी वृषभेप्रमाणेच असते. पण वृषभ ही जास्त बेधडक व कमी आध्यात्मिक असते. यांचे कोणत्याही राशीशी उत्तम जमते. वृश्चिक - आक्रमक व डूख धरून सूड उगविणारी रास. हे अतिशय दीर्घोद्योगीही असतात. यांनी मेष, सिंह, मकर व मेष या आक्रमक राशींच्या व्यक्तींशी विवाह टाळावा. धनू - सत्वगुणी पण काहीशी आक्रमक व समतोल माणसे या राशीत आढळतात. यांनी कोणत्याही राशीही लग्न केले तरी चालेल, पण मेष, वृश्चिक, मकर व कुंभ राशींशी यांचे खटके उडतील. मकर - दीर्घोद्योगी व कष्टाळू लोकांची रास. यांच्यात भावनेला फारसे महत्त्व नसते. काहीशी अरसिक, कर्तव्यकठोर माणसे या राशीत आढळतात. यांनी मेष, वृश्चिक, सिंह व कुंभ राशीशी विवाह टाळावा. कुंभ - बरीचशी मकरेप्रमाणे पण बुद्धिमान लोकांची रास. हे भावनाप्रधान असतात पण नेहमी निर्णय बुद्धीनेच घेतात. या राशीची माणसे अतिशय अहंकारी व तुसडी असतात. स्वतःला जरा जास्त शहाणे समजणार्‍या माणसांची ही रास आणि हा अहंकार बुद्धिमत्तेतून आलेला असतो. यांनी कोणाशीही लग्न केले तरी कायम स्वत:चाच वरचष्मा गाजवायचा प्रयत्न करतात. यांनी सुद्धा यांनी मेष, वृश्चिक, सिंह व कुंभ राशीशी विवाह टाळावा. नाहीतर घरात रोज भांडणे होतील. मीन - अतिशय सौम्य, देवभोळ्या व आध्यात्मिक लोकांची रास. यांच्यात अजिबात आक्रमतता नसते. हे जगाला घाबरूनच असतात. यांना एखाद्या आक्रमक राशीचा खमका जोडीदार पाहिजे. यांनी मीन व कर्क राशींचा जोडीदार कधीही निवडू नये. इतर कोणत्याही राशीचा चालेल. हे अतिशय आनंदाने आपल्या जोडीदाराचा वरचष्मा सहन करतात व स्वखुषीने आपल्या जोडीदाराच्या मुठीत राहतात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
59899 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

बोंबला !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/28/2013 - 15:13 नवीन
मकर - दीर्घोद्योगी व कष्टाळू लोकांची रास. यांच्यात भावनेला फारसे महत्त्व नसते. काहीशी अरसिक, कर्तव्यकठोर माणसे या राशीत आढळतात. यांनी मेष, वृश्चिक, सिंह व कुंभ राशीशी विवाह टाळावा.
आम्ही नियमाला अपवाद.
  • Log in or register to post comments

छान आणी योग्य लिहिले आहे

तुमचा अभिषेक
गुरुवार, 02/28/2013 - 15:15 नवीन
छान आणी योग्य लिहिले आहे मात्र विनोद, विरंगुळा या लेखनप्रकारात का टाकले आहे, तसे काही जाणवले नाही, म्हणजे वाचायच्या आधी तश्या अपेक्षा तयार झाल्याने त्या पातळीवर अपेक्षाभंग होतो. असो, मी स्वता कर्क आहे, बायकोची रास आजच घरी गेल्यावर विचारतो आणि परत इथे येऊन चेक करतो.. :)
  • Log in or register to post comments

अरेरे आम्ही कर्क

स्पा
गुरुवार, 02/28/2013 - 15:15 नवीन
अरेरे आम्ही
कर्क
वाले कसं होणार आमचं
  • Log in or register to post comments

भारत देशाची रास मकर आहे

पिंपातला उंदीर
गुरुवार, 02/28/2013 - 15:19 नवीन
भारत देशाची रास मकर आहे म्हणतात- (तूळ राशीचा अमोल) : )
  • Log in or register to post comments

वरील लेखात खालील परिच्छेदात

श्रीगुरुजी
गुरुवार, 02/28/2013 - 15:19 नवीन
वरील लेखात खालील परिच्छेदात टंकलेखन चूक झाली आहे. "स्वतःच्या पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्मरास समजली जाते व पत्रिकेतल्या पहिल्या स्थानात जी रास असते ती आपली चंद्ररास असते. प्रत्येक माणसाच्या स्वभावावर बहुतेक जन्मराशीचा व काही प्रमाणात चंद्रराशीचा प्रभाव असतो. राशीचा प्रभाव म्हणजे त्या राशीचा जो राशीस्वामी आहे त्या ग्रहाचा प्रभाव." हा परिच्छेद खालीलप्रमाणे वाचावा. "स्वतःच्या पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्मरास समजली जाते व पत्रिकेतल्या पहिल्या स्थानात जी रास असते ती आपली लग्नरास असते. प्रत्येक माणसाच्या स्वभावावर बहुतेक जन्मराशीचा व काही प्रमाणात लग्नराशीचा प्रभाव असतो. राशीचा प्रभाव म्हणजे त्या राशीचा जो राशीस्वामी आहे त्या ग्रहाचा प्रभाव.
  • Log in or register to post comments

हेच टाइप करायचे होते.

राही
गुरुवार, 02/28/2013 - 15:44 नवीन
आणि स्वभाव जास्तकरून जन्मराशीनुसार सांगता येतो. लग्नराशीवरून शरीराची ठेवण वगैरे सांगता येते. काही लोक स्वभाव आणि वृत्ती असा फरक करतात.स्वभाव जन्मराशीनुसार तर वृत्ती लग्नराशीनुसार असतो असे मानतात. कुंभ आणि वृश्चिक ह्या थोड्या कॉम्प्लेक्स राशी मानता येतील. वृश्चिकेमधे पाताळयंत्री, राजकारणी लोक सापडतील तसे हळवे आणि साधुपुरुषसुद्धा सापडतील. या दोन जन्मराशी पहाताना ग्रहयोग आणि महादशा तपशिलाने पहावे, कारण ते बराच प्रभाव पाडतात असे वैयक्तिक मत आहे. कुंभ ही शनीची रास खरी,पण शनीचे चांगले गुण दाखवणारी रास. दीर्घोद्योग,चिकाटी हे मकरेची मानले गेलेले गुणविशेष कुंभेत प्रकर्षाने आढळतात.कुंभ म्हणजे जलाने पूर्ण भरलेला घडा. अधजल गगरी छलकत जाय असे यांचे नसते. परिपक्वता आणि कृतीआधी बडबड न करणे हे यांचे स्थायीभाव.त्यामुळे हे कधीकधी आतल्या गाठीचे किंवा कारस्थानी भासू शकतात पण तो भासच.या व्यक्ती आपल्याविषयीचे गैरसमज दूर करायला जात नाहीत,तसेच इतरांना विश्वासात घ्यायलाही जात नाहीत. स्वतःच्या क्षमतेवर यांचा पूर्ण विश्वास असतो. म्हणून ते तुसडे, घमेंडी भासू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कुंभ राशीचा उत्तम अनुभव.

शुचि
गुरुवार, 02/28/2013 - 19:14 नवीन
कुंभ राशीचा उत्तम अनुभव. निरपेक्ष वृत्ती, अभ्यासूपणा वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

बदल

पैसा
गुरुवार, 02/28/2013 - 17:50 नवीन
बदल केला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

श्रीगुरुजी

स्पा
गुरुवार, 02/28/2013 - 15:21 नवीन
आता आम्ही काय करायचं असली देवभोळी रास पदरात पडली आहे , न कुठली निर्णयक्षमता
  • Log in or register to post comments

कॉलिंग शुची मामी

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 02/28/2013 - 15:25 नवीन
कॉलिंग शुची मामी :) ओ तो कर्ण धनु राशीचा होता हे खरय का हो?
  • Log in or register to post comments

अजून एक लघु शंका

स्पा
गुरुवार, 02/28/2013 - 15:27 नवीन
कन्या - ही गरीब स्वभावाची रास आहे. कायम संशयी स्वभाव हे यांचे वैशिष्ट्य.
एकच वेळी गरीब आणि संशयी स्वभाव हे कसे काय ब्वा ??
  • Log in or register to post comments

आरे बाबा राशीच नाव बघ की.

Dhananjay Borgaonkar
गुरुवार, 02/28/2013 - 15:33 नवीन
आरे बाबा राशीच नाव बघ की..कन्या रास आहे ती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

संशयी नव्हे...

ई-पूर्वाई
गुरुवार, 02/28/2013 - 17:56 नवीन
संशयी पेक्षा वैचारिक गोंधळ (कन्फ्युजन) झाल्यामुळे धरसोड वृत्ती (कशाबद्दलही - अगदी एखाद्याबद्दल चे मत निर्माण होतेवेळी सुद्धा) - हे वर्णन जास्त योग्य आहे असे मला वाटते :) (सोर्स - ह्या राशी च्या लोकांबद्दल चे स्वानुभव; आणि माझी स्वतः ची रास पण कन्याच आहे :) खी: खी: खी:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ज्यांची 'टाळण्या'च्या

प्यारे१
गुरुवार, 02/28/2013 - 15:37 नवीन
ज्यांची 'टाळण्या'च्या कॅटॅगिरीतल्या राशींतल्या व्यक्तींशी लग्न झाली आहेत त्यांनी काय करावं? :) कोई उपाव बताओ गुर्जी! ;)
  • Log in or register to post comments

+१

शिद
गुरुवार, 02/28/2013 - 16:46 नवीन
माझी आणि बायको, दोघांची रास कुंभ :( काही उपाय? त्यातल्यात्यात, वडील व मुलाची रास देखिल कुंभ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

नारायण नागबली,कालसर्पयोग

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 02/28/2013 - 16:52 नवीन
नारायण नागबली,कालसर्पयोग शांती,ग्रहदोष पिडानाश,सत्यनारायण महापुजा. सर्व करुन घ्या,सर्व काही ठिक होइल(नाहीतर नाव बदलवुन घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

नारायण नागबली,कालसर्पयोग..... सर्व काही ठिक होइल

संजय क्षीरसागर
Sun, 03/03/2013 - 02:01 नवीन
नाही तर डेट तीच ठेवून वेळ हवीतशी बदलून घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

आहो हा लै जबरड्स्ट योग आहे

jaypal
गुरुवार, 02/28/2013 - 22:37 नवीन
तुम्च्या घरात कायम म्हणजे १२ महीने महाकुंभ मेळा असेल आहात कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

तुम्च्या घरात कायम म्हणजे १२ महीने महाकुंभ मेळा असेल आहात कुठे?

संजय क्षीरसागर
Sun, 03/03/2013 - 02:03 नवीन
म्हंजे हे काय नागा साधू होणार का आता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

बसा बोंबलत आता म्हणून

शुचि
गुरुवार, 02/28/2013 - 19:16 नवीन
=)) =)) बसा बोंबलत आता =)) म्हणून लग्नाआश्त्स्स्रीगुरुजींचा सल्ला घेतला असता तर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मी तुळ राशीची आहे गुर्जी माझ

पियुशा
गुरुवार, 02/28/2013 - 15:44 नवीन
मी तुळ राशीची आहे गुर्जी माझ भविष्य सांगा ना ;)
  • Log in or register to post comments

घ्या

इरसाल
गुरुवार, 02/28/2013 - 15:50 नवीन
मी वृश्चिक राशीचा व पत्नी सिंह राशीची आहे.
  • Log in or register to post comments

श्रीगुरुजी

नि३सोलपुरकर
गुरुवार, 02/28/2013 - 15:50 नवीन
दिलेली राशी वैशिष्ट्ये ही पुन्हा एकदा नजरे खालुन घाला ना... विशेष काही नाही हो माझी ही अवस्था प.रा.सारखी झाली आहे.
  • Log in or register to post comments

मीन राशीची माणसे अतिशय

नानबा
गुरुवार, 02/28/2013 - 15:51 नवीन
मीन राशीची माणसे अतिशय देवभोळी व आध्यात्मिक असतात. मनापासून देवपूजा करणे, जपजाप्य, पोथ्या वाचणे इ. गोष्टी या व्यक्ती मनापासून करतात.
आम्ही अपवाद... :)
  • Log in or register to post comments

सगळ्यांनीच मेष, सिंह आणि

कवितानागेश
गुरुवार, 02/28/2013 - 16:03 नवीन
सगळ्यांनीच मेष, सिंह आणि व्रुश्चिकेच्या लोकांशी विवाह टाळले तर कसं काय व्हायचं? ;) -भांडखोर, बुद्धीमान आणि देवभोळी माउ :P
  • Log in or register to post comments

त्यांनी आपापसात करावेत ना ,

शैलेन्द्र
गुरुवार, 02/28/2013 - 17:01 नवीन
त्यांनी आपापसात करावेत ना :), बाकीच्या राशीवाल्यांना काही मनोरंजन नको?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मेष राशीशी कर्क, कन्या, तूळ,

श्रीगुरुजी
Sat, 03/02/2013 - 22:14 नवीन
मेष राशीशी कर्क, कन्या, तूळ, धनू व मीन राशींनीच लग्न करावे. या राशी सौम्य असल्याने मेषसारखा आक्रमक जोडीदार त्यांना हवा. सिंह राशीवाल्यांनी मेष, मिथुन, वृश्चिक, मकर व कुंभ वाल्यांनी लग्न टाळावे. वृश्चिकवाल्यांनी मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक, मकर व कुंभ राशीचा जोडीदार टाळावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ओक्के !!

सूड
Sun, 03/03/2013 - 19:26 नवीन
>>सिंह राशीवाल्यांनी मेष, मिथुन, वृश्चिक, मकर व कुंभ वाल्यांनी लग्न टाळावे. म्हणजे सिंह वाल्याला सिंहीण चालू शकते असं म्हणायचं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>>> म्हणजे सिंह वाल्याला

श्रीगुरुजी
Sun, 03/03/2013 - 20:14 नवीन
>>> म्हणजे सिंह वाल्याला सिंहीण चालू शकते असं म्हणायचं का? नक्कीच. आणि सिंहवालीला सिंह चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अजुन एक वादाची ठिणगी, -

५० फक्त
Mon, 03/04/2013 - 08:25 नवीन
अजुन एक वादाची ठिणगी, - बायकांच्या राशींची नावं बायकी का नसतात - म्हणजे सिंहीण,वृषभिण वगैरे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कारण "कन्यीण" असं म्हटलं की

आदूबाळ
Mon, 03/04/2013 - 11:53 नवीन
कारण "कन्यीण" असं म्हटलं की द्विरुक्ती होते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

शरद उपाध्याय यांचं एक पुस्तक

प्रियाकूल
गुरुवार, 02/28/2013 - 16:53 नवीन
शरद उपाध्याय यांचं एक पुस्तक वाचलं होतं. त्यात कन्या रास म्हणजे संशय कल्लोळ असचं होतं. पण बाकीचे काही गुण त्यात स्पष्ट नव्हते केले. एखाद्या राशीचे गुण आणि दोष दोन्ही सांगायला हवेत ना.
  • Log in or register to post comments

उपाध्याय ??

सूड
Sun, 03/03/2013 - 19:27 नवीन
'उपाध्ये' म्हणायचंय का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाकूल

का हो उगा राशीला लागताय

बॅटमॅन
गुरुवार, 02/28/2013 - 16:55 नवीन
का हो उगा राशीला लागताय लोकांच्या, मुळात ज्योतिष हे शास्त्र तर आहे की नै काय माहिती.
  • Log in or register to post comments

या ज्योतिषाच काय करायच हे

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/28/2013 - 19:24 नवीन
या ज्योतिषाच काय करायच हे ठरवले मग सोप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बरं ठीक आहे..

बाळ सप्रे
गुरुवार, 02/28/2013 - 17:02 नवीन
बरं ठीक आहे.. विषय थोड्या खेळकर अंगाने मांडलाय.. पण हे "काथ्याकूट"मध्ये का टाकलय?? चर्चा कशावर अपेक्षित आहे??
  • Log in or register to post comments

भविष्य

NiluMP
गुरुवार, 02/28/2013 - 17:07 नवीन
शाळा काॅलेजातील ग्रह-तारांचे शिक्षण आता मला व्यर्थ वाटू लागले जेव्हा कळले आकाशातील ग्रह-तारे भुतलावरील मानवाचे भविष्य ठरवू लागले
  • Log in or register to post comments

अरे वा... मस्तच...

Mrunalini
गुरुवार, 02/28/2013 - 17:16 नवीन
अरे वा... मस्तच... आमच्या दोघांची ही रास मीन आहे... पण आमचे अगदी छान चालु आहे. touchwood. कधीकधी ह्या मीनच्या स्वभावाचा खुप तोटा होतो.. पण आता त्याला काही उपाय नाही.
  • Log in or register to post comments

मनोरंजक

पैसा
गुरुवार, 02/28/2013 - 17:51 नवीन
मनोरंजक. या अंजाजाप्रमाणे काही जोड्यांची उदाहरणे दिलीत तर अजून मजा येईल.
  • Log in or register to post comments

असं करुयात...

मन१
गुरुवार, 02/28/2013 - 18:27 नवीन
मिपावरचे काही (कु?)प्रसिद्ध आयडी घेउन त्यांची रास ओळखता/ अंदाज करता येइल का?
  • Log in or register to post comments

गंमतीशीर धागा.

नाना चेंगट
गुरुवार, 02/28/2013 - 18:27 नवीन
गंमतीशीर धागा.
  • Log in or register to post comments

आयला नानाला सिग्नेचर दिसली,

भिकापाटील
गुरुवार, 02/28/2013 - 23:02 नवीन
आयला नानाला सिग्नेचर दिसली, मला एन्टीक्युटी कवा दिसायची अवान्तरः धागा रोचक आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

मेष राशीने आधीच धनुवाला गटवलाय..

अनन्न्या
गुरुवार, 02/28/2013 - 18:57 नवीन
आता काय उपाय?
  • Log in or register to post comments

चंद्र - चंद्र हा आल्हाददायक,

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 02/28/2013 - 19:03 नवीन
चंद्र - चंद्र हा आल्हाददायक, शीतल असतो. परंतु त्याचा आकार रोज बदलताना दिसतो. चंद्र राशीस्वामी असलेली कर्क राशीची माणसे चंद्राप्रमाणेच शांत, देवभोळी व थोडीशी चंचल्/द्विधा मनस्थिती असलेली असतात. ही माणसे बुद्धीपेक्षा भावनेने निर्णय घेतात. 'गलिबल' किंवा सहज फसविता येईल अशी ही माणसे असतात.
प्रभु रामचंद्रांची रास कर्क होती ...आता बोला ..
.देवभोळी व थोडीशी चंचल्/द्विधा मनस्थिती....बुद्धीपेक्षा भावनेने निर्णय...सहज फसविता येईल
ह्यातलं काय लागु पडंत त्यांना ? अवांतर : ब्यॅट्या , एकदा करुयाच मॉडेल हे ज्योतिषशास्त्र ....झालच तर ज्योतिषशास्त्रीं ही म्हणवुन घेता येईल ...कसें ;)
  • Log in or register to post comments

लोकांनी आलरेडी केलंय हो मॉडेल

बॅटमॅन
गुरुवार, 02/28/2013 - 19:07 नवीन
लोकांनी आलरेडी केलंय हो मॉडेल ते ;) अन तोंडघशी पडलेत. ५% ची "आत्मविश्वास मर्यादा" ठेवूनसुद्धा काही झाले नाही, बाकी कशाला मग बाता, हो की नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ह्म्म

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 02/28/2013 - 19:14 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मी मिथुन आणी भाग्याने लाभलेला

kanchanbari
गुरुवार, 02/28/2013 - 19:07 नवीन
मी मिथुन आणी भाग्याने लाभलेला स्पष्टवक्ता नवरा सिंह राशीचा. लेख छान आहे
  • Log in or register to post comments

मी कर्क अन नवरा तूळ. पण

शुचि
गुरुवार, 02/28/2013 - 19:20 नवीन
मी कर्क अन नवरा तूळ. पण चांगलं जमतं की. हे तूळ वाले ना भयंकर म्हणजे अतिरेकी संतुलित असतात कसं जमतं ब्वा इतकं संतुलित रहायला? अगदी मत्सर वाटतो. ( आय एन्व्ही चे भाषांतर)
  • Log in or register to post comments

मत्सराऐवजी हेवा जास्त योग्य

बॅटमॅन
गुरुवार, 02/28/2013 - 19:24 नवीन
मत्सराऐवजी हेवा जास्त योग्य ठरेल इथे असे वाट्टे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

+१

शुचि
गुरुवार, 02/28/2013 - 19:26 नवीन
अगदी अगदी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा