मराठी भाषा दिनानिमीत्त आणि या प्रतिसादासाठीन्माझी काही टिपणे गविच्या चरणी अर्पण पैसाआजी, आय डिसअग्री बरं का.. अधुनमधून केले यूज इंग्लिश वर्ड्स तर काय इश्यू आहे. मराठी भाषेनेच नव्हे तर कोणत्याही लँग्वेजने नेहमी अडाप्टेबल राहिलं पाहिजे, तरच सर्व्हायवल आहे. इंग्लिश वर्ड्स रोजच्या भाषेत मिंगल झाले आहेतच तेव्हा प्रत्येकवेळी डिक्शनरी घेऊन त्याचं ट्रान्स्लेशन करावं असं मी नाही इन्सिस्ट करणार बुवा.
हे माझे रीसेंट थॉट्स आहेत. माझी रीक्वेस्ट सगळ्यांनी व्होल्हार्टेडली काँट्रीब्युट करावे मी मराठीतून ईम्ङ्रजी शिकतो आहे ते अप्रीशिएट करावेमराठी भाषा दिवसाच्या निमीताने थोडा आढावा घ्यावा म्हणतो आपल्या आयुष्याचा भाषेच्या माध्यमातून. भाषेचे रुप दर पिढीगणीक बदलते हा अस्वस्थतेचा मुद्दा नाही. भाषा नदीसारखी वाहती असते. नविन शब्द येतात -वाहून जातात किंवा तळाशी जातात. नवनवे अविष्कार चाकोरीपलीकडे जातात आणि भाषा समृध्द करतात पण काळजी वाटते ती सध्याच्या वापरात असलेल्या मराठीतून व्यक्त होणार्या समाज जीवनाची. भाषा असते संवादासाठी. संवादासाठी वेगवेगळी माध्यमे उपलब्ध होउनही संवाद त्रोटक झाले आहेत. लघुरुप वापरण्याची - त्यातल्या त्यात इंग्रजी लघुरुपांचा वापर-पध्दत मराठी संभाषणात वाढत जात आहे.पूर्वि तार पाठवण्यासाठी किंवा छोट्या जाहीराती लिहीताना जो शब्दांचा आटोपशीर वापर होत होता तो रोजच्या वापरात आला आहे. जे आधी हास्यास्पद होतं ते आता लोल झालं आहे.एकीकडे संवादाच्या अभावानी माणसे दूर होताना दिसत आहेत त्याच वेळी संवादाची शक्यता लघुरुप् वापरून कमी होताना दिसते आहे.असे परस्पर विरोधी चित्र एकाच वेळी दिसते आहे तेव्हा बरेच प्रश्न मनात उभे राहतात.कदाचीत ह्या अभावाने भाषेचा वापर कमी होऊन काही दिवसांनी व्यक्त होण्यासाठी फक्त स्मायलींचाच वापर तर होणार नाही ना ? आणखी एक अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे साध्यासोपे मराठी शब्द हळूहळू हद्दपार होताना दिसत आहेत. उदाहरणार्थ पतली गली हा शब्द आला आणि बोळ हा शब्द दिसेनासा झाला. ग्लास टेबलावर आले ,त्याची गिलासं झाली आणि फुलपात्र हा शब्द अडगळीत किंवा मोडीत गेला. अॅलर्जी आली आणिइ वावडं गेलं.पूर्वी मी कामासाठी शिपायाला पाठवत होतो आता तेच काम बंदा किंवा बंदी करते आहे. सुयोग्य शब्दांचा वापर आता लोकांना अनावश्यक वाटयला लागला आही की काय असे वाटायला लागले आहे. त्या त्या क्षेत्राची जर्गन आता राजमान्य भाषा झाली आहे.काही बदल संगणकाच्या भाषेनी आणले आहेत तर काही नवीन विक्रीकलेनी आणले आहेत. एखाद्या कार्यक्रमाची घडण मराठीत सांगीतली तर समोरून उत्तर येते की प्लीज हा अल्गोरीदम समजत नाही. केवळ शब्दांच्या रुपाने मराठी बदलते आहे असे नाही तर व्यक्त होण्यासाठी वापरली जाणारी ढब आणि उदगाराचे स्वरुप पण बदलते आहे. लैंगीक क्रिया किंवा लैगीक छटा असणारे वाकप्रचार किंवा शब्दांची नवनविन रुपे अतिशय स्पष्ट शब्दात येते आहे. परवा बोलता बोलता एक मुलगी म्हणाली ते सर तर वर्गात सगळ्यांवर चढायलाच येतात. त्याच संभाषणात पुढे ती म्हणाली प्रेसेंटेशन देताना माझी तर फाटलीच होती. चढणे म्हणजे माउंटींग फॉर कॉप्युलेशन किंवा फाटणे ह्या शब्दाचा उगम ** फाटणे हा संदर्भ न समजता जेव्हा संभाषणाचा वापर होताना दिसतो तेव्हा या पिढीला आम्ही सांस्कृतीक वारसा म्हणून काय दिले असा प्रश्न पडून मन उद्वीग्न होते.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
36465
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम.
हम्म...
In reply to अप्रतिम. by तर्री
अजागळ वगैरे
In reply to हम्म... by दादा कोंडके
खरे
स्वाक्षरी
In reply to खरे by मिसळलेला काव्यप्रेमी
मलाही आपल्या कट्ट्याच्या वेळी
In reply to खरे by मिसळलेला काव्यप्रेमी
इच्चार करायला लावणारा
सहमत
कस्ले आउटडेटेड थॉट्स तुमचे हो!
समयोचित लेख!
फक्त आणि फक्त कुत्र्याच्या
In reply to समयोचित लेख! by प्यारे१
मेक अप करता येत नाही याची लाज
In reply to फक्त आणि फक्त कुत्र्याच्या by शुचि
भाषा फार नंतर येते, आधी माणूस सुधारायला हवाय.
In reply to समयोचित लेख! by प्यारे१
प्यारेकाका,
In reply to समयोचित लेख! by प्यारे१
लेख आवडले. आणखी लिहायला हवे
थोडेसे आत्मपरीक्षण
माफ करा
In reply to थोडेसे आत्मपरीक्षण by आजानुकर्ण
खेद आहेच
In reply to थोडेसे आत्मपरीक्षण by आजानुकर्ण
लैंगीक छटा असलेले शब्द
In reply to खेद आहेच by रामदास
>>>सुयोग्य शब्दांचा वापर आता
अगदी अगदी
In reply to >>>सुयोग्य शब्दांचा वापर आता by नाना चेंगट
सहमत
In reply to >>>सुयोग्य शब्दांचा वापर आता by नाना चेंगट
आज मराठी दिन असताना ; मराठी "दीन" झालेली आहे.
ग्रेट
अॅक्चुअली
भावना समजु शकतात. पण असं
सहमत आहे
बदलू दे की मूळ ढांचा.(ढांचा
In reply to सहमत आहे by रामपुरी
सांस्कृतिक वारसा
मराठी किती वाईट तर्हेने बोललं जाऊ शकतं
आंशिक
+१
जगण्याची पध्दत
In reply to +१ by पिवळा डांबिस
एक अनुभव
भाषा बदलत असते हे खरे आहे.
वर प्रतिसादांत बांबू लागला,
मराठी भाषेची लागलीये?
गलथान हा सुद्धा असाच शब्द आहे
In reply to मराठी भाषेची लागलीये? by नगरीनिरंजन
हो. जुगाड हा शब्दही सगळे
In reply to गलथान हा सुद्धा असाच शब्द आहे by नितिन थत्ते
मुठीचं काही आम्ही विचारलं
In reply to हो. जुगाड हा शब्दही सगळे by नगरीनिरंजन
अजागळ, धसास लावणे, कूच करणे .
In reply to मराठी भाषेची लागलीये? by नगरीनिरंजन
बदल तर स्वीकारावेच लागतील.
समयोचित विचारमंथन..
बाकी सहमत मात्र..
काही शब्द आहेत
In reply to बाकी सहमत मात्र.. by ऋषिकेश
>>बाउल याला कुंड्या
In reply to काही शब्द आहेत by पैसा
पेला! बरोबर.. पण कुंड्या?
In reply to काही शब्द आहेत by पैसा
पेला....
In reply to पेला! बरोबर.. पण कुंड्या? by ऋषिकेश
इंग्रजीचे हिंदी मूळ....
सहमत
In reply to इंग्रजीचे हिंदी मूळ.... by नितिन थत्ते
संपुर्ण मराठी माध्यमातुन
.
मराठी शब्द..
हम्म , छान चर्चा !
लाईफ सपोर्टवर ठेवले आहे.. असं
In reply to हम्म , छान चर्चा ! by सुहास..
ओळखीचे शब्द
आपल्यासाठी भाषा आहे.
भाषेच्या प्रवाहीपणाबद्दल
In reply to आपल्यासाठी भाषा आहे. by गवि
बाकी भाषांचं माहीत नाही, पण
In reply to भाषेच्या प्रवाहीपणाबद्दल by बॅटमॅन
गविशेठ, मी आधीच म्हणालो होतो
In reply to बाकी भाषांचं माहीत नाही, पण by गवि
मराठी लावणी बाय म वा धोंड -
In reply to गविशेठ, मी आधीच म्हणालो होतो by बॅटमॅन
नशीब चांगले तुमचे मला लैवेळा
In reply to मराठी लावणी बाय म वा धोंड - by यशोधरा
अगदीच हवे असल्यास कधी दिसले
In reply to नशीब चांगले तुमचे मला लैवेळा by बॅटमॅन
धन्यवाद पण मीही तसा फिरत असतो
In reply to अगदीच हवे असल्यास कधी दिसले by यशोधरा
तेंडुलकर
In reply to आपल्यासाठी भाषा आहे. by गवि
कमी शब्दांत आणि थेट
In reply to तेंडुलकर by मन१
कसला डोस्क्याचा भाषेचा अभिमान वगैरे...
In reply to आपल्यासाठी भाषा आहे. by गवि
नॉर्थ कडे
उद्विग्नतेत सहभागी आहे .
कॉन्शसनेस - जाणीवपूर्वकता ??
In reply to उद्विग्नतेत सहभागी आहे . by सस्नेह