साहित्य गाजर रस्समः
१/२ वाटी तूरीची डाळ स्वच्छ धुवून २०-२५ मिनिटे भिजवलेली
१ टोमॅटो बारीक चिरून घेतलेला
१ मोठं गाजर किंवा २ छोटी गाजरं किसून
दीड टेस्पून रस्सम मसाला ( तुम्ही रेडीमेड आणू शकता किंवा मी घरी बनवलेल्या रस्सम मसाल्याची पाकृ खाली दिली आहे)
१-१/२ टीस्पून चिंचेचा कोळ
१/२ टीस्पून हळद
१/४ टीस्पून साखर (ऐच्छिक)
१/४ टीस्पून हींग
१ टीस्पून मोहरी
५-६ कढीपत्ता
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
रस्सम मसाला: १ -१/२ टेस्पून अख्खे धणे, २ टेस्पून तूरीची डाळ, २ टेस्पून चण्याची डाळ, १ टीस्पून अख्खी काळी मिरी, १ टीस्पून जीरे, ४-५ लाल सुक्या मिरच्या, १/२ टीस्पून मेथीदाणे. सर्व साहित्य एक एक करुन तव्यावर कोरडेच भाजून घ्यायचे. पुर्ण गार झाले की मिक्सरमध्ये एकत्र वाटून बारीक पूड करुन घ्यावी. साधारण अर्धी वाटी रस्सम मसाला तयार होतो.
पाकृ:
भिजवलेली तूरीची डाळ, टोमॅटो, हळद व थोडे हींग एकत्र करुन घ्यावे. त्यात नेहमीपेक्षा जास्त पाणी घालून कुकरला डाळ शिजवून घ्यावी.
शिजवलेली डाळ-टोमॅटो चांगले घोटून घ्यावे व गाळणीतून गाळून डाळीचे पाणी काढून घ्यावे.
डाळीचे पाणी एका पातेल्या उकळायला ठेवावे.
त्यात किसलेले गाजर, साखर व रस्सम मसाला घालून उकळावे.
आता त्यात चिंचेचा कोळ व चवीप्रमाणे मीठ घालून, झाकून उकळू द्यावे.
वरुन कोथींबीर घालावी व गॅस बंद करावा.
बुट्टीत तेल गरम करुन मोहरी, हींग व कढीपत्त्याची फोडणी करावी.
ही फोडणी तयार रस्समवर ओतावी व झाकून १० मिनिटे तसेच ठेवावे.
साहित्य इडियाप्पमः
२ वाट्या तांदळाची पीठी
२ वाट्या पाणी
१ टेस्पून तेल
चिमूटभर मीठ
पाकृ:
पातेल्यात पाणी, मीठ व तेल एकत्र करुन उकळी आणावी.
उकळी आली की त्यात तांदळाची पीठी घालून चांगले ढवळावे.
गॅस बंद करुन , झाकून तसेच १५ मिनिटे ठेवावे.
उकड हलकी गरम असतानाच ताटात किंवा परातीत काढावी व तेल-पाण्याच्या हाताने चांगली मळून घ्यावी.
चांगली मळून त्याचे उंडे तयार करुन घ्यावे.
इडलीपात्राला व सोर्याला (चकलीचा साचा) तेलाचा हात फिरवून घ्यावा.
सोर्यात बारीक भोकांची जाळी लावून घ्यावी.
तयार उंडा त्यात घालून, इडलीपात्राच्या प्रत्येक गोलात, गोलाकार शेवया पाडून घ्याव्या.
इडली स्टँड इडलीच्या कुकरमध्ये किंवा प्रेशर कुकरमध्ये ठेवून १५-२० मिनिटे वाफवून घ्या. (प्रेशर कुकर वापरणार असाल तर शिट्टी लावायची नाही)
वाफवलेले इडियाप्पम ५ मिनिटे गार होऊ द्या,
हलक्या हाताने सर्व्हींग प्लेट्मध्ये काढून घ्या व गाजर रस्समबरोबर सर्व्ह करा.
नोटः
इडीयाप्पम तुम्ही सांबार, नारळाची चटणी, एग करी किंवा व्हेज स्ट्यु बरोबर ही सर्व्ह करु शकता.
आवडत असल्यास इडलीपात्राच्या प्रत्येक गोलात थोडा ओला नारळ घाला व त्यावर शेवया पाडून घ्या.
अशा पद्धतीने तुम्ही नाचणीच्या पिठाचे ही इडीयाप्पम बनवू शकता.
आता त्यात चिंचेचा कोळ व चवीप्रमाणे मीठ घालून, झाकून उकळू द्यावे.
वरुन कोथींबीर घालावी व गॅस बंद करावा.
बुट्टीत तेल गरम करुन मोहरी, हींग व कढीपत्त्याची फोडणी करावी.
ही फोडणी तयार रस्समवर ओतावी व झाकून १० मिनिटे तसेच ठेवावे.
साहित्य इडियाप्पमः
२ वाट्या तांदळाची पीठी
२ वाट्या पाणी
१ टेस्पून तेल
चिमूटभर मीठ
इडली स्टँड इडलीच्या कुकरमध्ये किंवा प्रेशर कुकरमध्ये ठेवून १५-२० मिनिटे वाफवून घ्या. (प्रेशर कुकर वापरणार असाल तर शिट्टी लावायची नाही)
वाफवलेले इडियाप्पम ५ मिनिटे गार होऊ द्या,
हलक्या हाताने सर्व्हींग प्लेट्मध्ये काढून घ्या व गाजर रस्समबरोबर सर्व्ह करा.
वाचने
10869
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे नारळाच्या दुधात अगदीच झकास
मस्त!
मायला, सानिकातैंच्या
+१
In reply to मायला, सानिकातैंच्या by बॅटमॅन
मी तिला नेहमीच म्हणत असतो.
In reply to मायला, सानिकातैंच्या by बॅटमॅन
बॅटमॅन तुम्च्याशी
In reply to मायला, सानिकातैंच्या by बॅटमॅन
देव्हार्यात जशी अन्नपूर्णा
वाह वा.
In reply to देव्हार्यात जशी अन्नपूर्णा by रेवती
मी....
मस्त!! पा.कॄ.
निषेध.
In reply to मस्त!! पा.कॄ. by किलमाऊस्की
हो पण...
In reply to मस्त!! पा.कॄ. by किलमाऊस्की
शिरवाळी करताना उकडीचे मुटके उकळत्या पाण्यात सोडतात
In reply to हो पण... by सूड
वरच्या प्रतिसादात छोटीशी सुधारणा
In reply to शिरवाळी करताना उकडीचे मुटके उकळत्या पाण्यात सोडतात by सानिकास्वप्निल
हो , आम्ही पण असंच करतो.
In reply to वरच्या प्रतिसादात छोटीशी सुधारणा by सानिकास्वप्निल
तरी म्हट्लं सानिका पाक्रु. एवढ्या चांगल्या कशा काय करते?
In reply to शिरवाळी करताना उकडीचे मुटके उकळत्या पाण्यात सोडतात by सानिकास्वप्निल
सूड चे खरेच कौतुक वाटते, तो
In reply to हो पण... by सूड
कामालीचीच कमाल.
लाजवाब
फर्माईश
सानिकाला तुरुंगात टाका!
कसल्या अफलातून रेसिपी देतेस
जबर्यादस्त !
लै भारी !
असेच म्हणते
In reply to लै भारी ! by सस्नेह
झक्कास.
मस्त
खास पाकृ आणि फोटो!
तुझी स्तुती करायला शब्द तोकडे
You r sooooo दूश्ट!!!!!
एव्हढ्या छान छान पाकृ देणा-या त्या गरीब बिचा-या
In reply to You r sooooo दूश्ट!!!!! by स्मिता शितूत
मस्त पाकृ... आवडेश.
छान दिसते आहे करुन बघते
हे चायनीज राईस नूडल्स
सेलोफेन वापरुन कसे लागेल माहित
In reply to हे चायनीज राईस नूडल्स by सेरेपी
गुपित फुटल सानिका!
अलिबाबाचा दिवा
In reply to गुपित फुटल सानिका! by स्पंदना
मस्तच सानिकाताई..
कसली जबरी पाककृती आहे. सध्या
सानिकाजी पाकृ बरोबर एक धागा
निगुतीने म्हणजे कसा?
In reply to सानिकाजी पाकृ बरोबर एक धागा by त्रिवेणी
डाएट्चे तीन तेरा ......
वॉव !!!
एकदम झक्कास !!