Phantom Pain म्हणतात. या वेदना मूलत: मानसिक असतात. रेकी व अन्य उपचारांनी तिने यावर मात केली.
यादरम्यान डॅनिएलाच्या वडिलांनी कृत्रीम अवयव बसवण्यासाठी व त्या प्रकारच्या पुढच्या उपचारांबाबत शोधाशोध सुरू केली. अनेक ठिकाणी संपर्क साधून, माहिती मिळवून शेवटी त्यांनी प्रख्यात Moss Rehabilitation Institute मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. जखमा बर्या झाल्यानंतर लगेचच फेब्रुवारी महिन्यात डॅनिएला तिथे पोहोचली. आपल्या नव्या अवयवांची ओळख करून घेण्यासाठी, त्यांची सवय करून घेण्यासाठी तिथे सहा आठवडे रहाणार होती.
यादरम्यान तिचे गुरू बनले डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झी. Moss Rehabilitation Institute मधले एक तज्ञ डॉक्टर. यांनी आपला उजवा हात प्रयोगशाळेमधील एका स्फोटामध्ये गमावला होता, परंतु हाताच्या अभावाचा कोणताही फरक पडू न देता ते सर्व कामे हाताच्या जागी जोडलेल्या हूकच्या सहाय्याने लीलया पार पाडत असत.
डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झी.
"Your life is what you do with it." डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झींचे आश्वासक शब्द कानी पडले आणि डॅनिएला सज्ज झाली, एका नवीन आव्हानाला तोंड देण्यासाठी. कृत्रीम अवयवांचा वापर कसा करायचा ते शिकण्यासाठी. रोज सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत वेगवेगळ्या तज्ञांच्या गराड्यामध्ये व्यायाम करणे, आधाराच्या सहाय्याने चालणे, शरिराला जोडलेल्या अवयवांचा वापर करण्यास शिकणे, त्यांची सवय करून घेणे या गोष्टी ती शिकत होती व प्रचंड वेगाने आत्मसात करून घेत होती. अनेकदा तिला शिकवणारे प्रशिक्षक, डॉक्टर व तज्ञ लोक बुचकळ्यात पडत असत कारण बरेचसे लोक एखाद्या अवयवाच्या अभावामुळेही मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेले असतात व त्यांना नवीन काही शिकवणे ही अशक्यप्राय बाब असते मात्र डॅनिएला या सगळ्याला ढळढळीत अपवाद होती. तिने लवकरच नवीन अवयवांना आपलेसे करून घेतले व सर्व दैनंदिन कामे लीलया पार पाडू लागली.
कृत्रीम हात आणि पायांसह हसतमुख डॅनिएला.
डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झीं आणि सर्व कर्मचारी मात्र काळजीत पडले होते. खूप आत्मविश्वासाने कृत्रीम अवयवांच्या सहाय्याने जरी सर्व कामे करता येत असली तरी हे अवयव मानवी हाताला आणि हाताच्या कार्यक्षमतेला पर्याय ठरत नाही याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. एखादे काम कृत्रीम अवयवांच्या सहाय्याने जमले नाही तर तिचा आत्मविश्वास डळमळू नये म्ह्णून डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झींनी डॅनिएलाला स्पष्ट जाणीव करून दिली.
"तुला तुझ्या हातांची उणीव कायम भासेल, कोणतीही गोष्ट तुझे हातांइतकी कार्यक्षम असणार नाही. नियतीला दोष देवून तू परावलंबी आयुष्य जगू शकतेस किंवा परिस्थितीशी झगडून जे मिळाले आहे त्यातून सर्वोत्तम साकारू शकतेस. तुला यातली एकच गोष्ट निवडावी लागणार आहे."
डॉक्टर अल्बर्ट एस्क्वेन्झींचा आदर्श मानत डॅनिएलाने मानसिक बळ गोळा केले व पुनश्चः कॉलेजमध्ये परतून आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय केला. कॉलेजमध्ये परतून शिक्षण पूर्ण करतानाही ते कृत्रीम अवयवांसदर्भातच असेल असेही ठरवले.
कॉलेजमध्ये परतून तिने कोणत्याही विशेष सवलती न घेता शिक्षण पूर्ण केले. "first quadrilateral
amputee physician in the world" असाही मान मिळवला. रिहॅब डॉक्टर म्हणून तिने स्वत:ला कामात बुडवून घेतले.
नोव्हेंबर २००३ मध्ये एका संध्याकाळी घरी बसून Telethon fundraising marathon event टीव्हीवर पाहताना तिच्या मनात अचानक एक विचार आला व अचानकपणे तिने त्या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रम संपत आला असताना तिच्या आगमनाने कार्यक्रमाला हजर असणारे व संपूर्ण देशाभरातून टीव्हीद्वारे पाहणारे प्रेक्षक अवाक् झाले.
तिच्या अपघाताला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती, रेल्वे खात्यानेही डॅनिएलाला अविश्वसनीय नुकसानभरपाई दिली होती. सर्वांना या गोष्टींचे कुतूहल असतानाच अचानक कार्यक्रमाला हजेरी लावून व त्यांच्या देणगीमध्ये भरभक्कम भर घालून डॅनिएला सर्वांच्या गळ्यातील ताईत बनली. घडलेल्या अपघाताला सामोरे जावून परिस्थितीवर मात करून आयुष्याला नवे वळण देणार्या डॅनिएलाचे सगळीकडून कौतुक होवू लागले. चिली सरकारनेही तिला "वूमन ऑफ द इयर" सारख्या सन्मानाने सलग दोनदा गौरवले.
आयुष्य हादरवून टाकणार्या घटनेनंतरही तोच अदम्य उत्साह.. जिवंतपणीच दंतकथा बनलेली डॅनिएला.
आज डॅनिएला कृत्रीम हातांच्या सहाय्याने खास तिच्यासाठी बनवलेली गाडी वापरते, स्वतः वेगवेगळे पदार्थ बनवते. एक सामान्य मनुष्य जी कामे करतो ती सर्व कामे आपल्या कृत्रीम हाताच्या सहाय्याने करण्याचा प्रयत्न करते.
अपघाताच्या क्षणापासून बदललेले आपले आयुष्य तिने शब्दबद्ध केले आहे.
डॅनिएला चे आत्मचरित्र - “I choose to Live”
तिच्याकडे पाहून सहानुभुती दाखवणार्यांना, अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करणार्यांना ती सांगते.. "It's a Happy Story"
आयुष्याला कलाटणी देणार्या दुर्दैवी घटना घडूनही नियतीच्या आव्हानाला समर्थपणे तोंड देणार्या डॅनिएलाचा थक्क करणारा प्रवास पाहिला की नकळत तिचेच शब्द उमटतात.. "It's a Happy Story"
********************************************************
सर्व माहिती व प्रकाशचित्रे अंतर्जालावरून साभार.
********************************************************
वाचने
30132
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
याआधीही डॅनिएलाची कहाणी
छान
In reply to याआधीही डॅनिएलाची कहाणी by धन्या
मानवी मन हे अजब रसायन आहे.
जबरदस्त...
आयुष्याकडे बघण्याचा डॅनिएलाचा सकारत्मक दृष्टीकोण
जबरदस्त !!!!!
एका दु:खद प्रसंगाची आनंदी कथा
असेच म्हणते
In reply to एका दु:खद प्रसंगाची आनंदी कथा by रेवती
डॅनिएला ला भरभक्काम आर्थिक आधार हा मिळालाच.
In reply to असेच म्हणते by स्मिता.
भावस्पर्शी कथा वाचून मीसुद्धा भारवून गेले पण नंतर थोडा विचार करतांना मनात आलं की डॅनिएलाच्या या राखेतून घेतलेल्या भरारीकरता जेवढा तिचा आशावाद महत्त्वाचा होता तेवढाच तिला मिळालेला आर्थिक आधारही महत्त्वाचा असावा.डॅनिएला ला भरभक्काम आर्थिक आधार हा मिळालाच. दुर्मिळातला दुर्मिळ अपघात, तोही रेल्वेप्रशासनाच्या हलगर्जीपणाने झालेला त्यामुळे तिच्या कुटूंबाने गुदरलेला खटला रेल्वे प्रशासनाने बिनशर्त कोर्टाबाहेर मिटवला + तिथल्या नागरिकांना शासनाने पुरवलेल्या सोयी + कार्यक्षम इन्श्यूरन्स कंपन्या या सर्वांचा तिला प्रचंड सपोर्ट मिळाला.(फायदा हा शब्द मुद्दाम वापरत नाहीये, कारण तिने जे गमावले ते नफानुकसानीच्या पलीकडचे होते!)@ स्मिता, पैशांबद्दल लिहिलं
In reply to डॅनिएला ला भरभक्काम आर्थिक आधार हा मिळालाच. by मोदक
डॅनिअॅलाच्या आयुष्याचा
मस्त रे माहित नव्हतं या बद्दल
__/\__
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
उत्तम मांडलंय सगळं.
मोदकसाहेब, लेख आवडला!
अचाट जिद्दीची कथा
हॅट्स ऑफ टू डॅनिएला..
दुर्दम्य आशा
असामान्य, अतीव आदरणीय आणि
+११११११
In reply to असामान्य, अतीव आदरणीय आणि by मृत्युन्जय
...
__/\____/\____/\__
प्रेरणादायी !!
कमाल आहे! इच्छाशक्तीच. दुसरे काय?
आपल्या आयुष्यात येण्यार्या
In reply to कमाल आहे! इच्छाशक्तीच. दुसरे काय? by कापूसकोन्ड्या
काहीच म्हणता येत नाहीये हे
जगण्याचे बळ देणारी गाथा
असामान्य !!!!
मोदकराव
डॅनिएलाच्या दुर्दम्य
पाब्लो एस्कोबार..?
In reply to डॅनिएलाच्या दुर्दम्य by मालोजीराव
जग पादाक्रांत करण्याच्या
In reply to पाब्लो एस्कोबार..? by मोदक
+१
In reply to जग पादाक्रांत करण्याच्या by ५० फक्त
मस्त रे..
In reply to पाब्लो एस्कोबार..? by मोदक
+१
In reply to डॅनिएलाच्या दुर्दम्य by मालोजीराव
निव्वळ नि:शब्द..ताळ्यावर आलो
बॅटमनच्या
In reply to निव्वळ नि:शब्द..ताळ्यावर आलो by बॅटमॅन
प्रेरणादायी
सहमत..
In reply to प्रेरणादायी by सुधीर
व्यक्ती बाजूला ठेऊन नुसती प्रेरणाच तेवढी घ्यावी असं वाटतं.सहमत..जबरदस्त मोदुकाका. खूप
लिहित रहा....
डोस्क सुन्न...छोटया छोटया
लेख आवडला रे.
बापरे
प्रेरणादायी माहितीबद्दल
हॅट्स ऑफ टू हर
+१
In reply to हॅट्स ऑफ टू हर by धनुअमिता
रोचक अन स्फूर्तिदायक कहाणी !
असहमत इतकेच म्हणू इच्छितो.
In reply to रोचक अन स्फूर्तिदायक कहाणी ! by सस्नेह
+१
In reply to असहमत इतकेच म्हणू इच्छितो. by मोदक
इतके सिनिकल असू नये माणसाने.
In reply to रोचक अन स्फूर्तिदायक कहाणी ! by सस्नेह
खूप छान लेख!
_/\_ _/\_ _/\_
झकास लिहिलय
__/\__ दंडवत डॅनिएलाला.
मस्त लिहीलंय !!
डॅनिएला च्या जगण्याच्या
डॅनिएलाला सेल्युट. अप्रतिम
लेख छान आहे आहे ....
सॉलिड लेख आहे. अप्रतिम. शेवट
मांडीची शीर आखडून' पळता आलं
शेवटच्या फोटोतले तिच्या
धन्यवाद या लेखाबद्दल. अप्रतिम
सलाम!
+१ टु क्रान्ति
छान लिहिलेय
मोदकशेठ
अफाट!
सलाम!