साहित्यः
कांदे - ७-८ मध्यम आकाराचे
लसुण - ३ पाकळ्या
बेसिल - १ छोटा चमचा
तेजपान - २
काळि मिरी पावडर - १ चमचा
फ्रेंच बगेट - १
रेड/व्हाईट वाईन - ४ चमचे
चिकन स्टॉक - ४ कप
ऑलिव्ह ऑईल - १ चमचा
बटर - १ चमचा
चीज - १ वाटी (२-३ वेगवेगळे चीज. मी या रेसिपी साठी ३ वेगवेगळ्या प्रकाराचे nonsalty स्विस व डच चीज वापरले आहे)
मिठ चवीनुसार
Ovenproof २ बाऊल / मग
कृती:
१. कांदे लांब कापुन घ्यावेत. लसुण बारीक चिरुन घ्यावा.
२. कढईत ऑलिव्ह ऑईल व बटर गरम करावे. त्यात तेजपत्ता व लसुण टाकुन १ मिनिट परतावे.
३. त्यात लांब चिरलेला कांदा, बेसिल, काळि मिरी पावडर व थोडे मिठ टाकुन, कांदा ब्राउन रंगाचा होई पर्यंत परतावे.
४. कांदा परतल्यावर त्यात रेड वाईन व चिकन स्टॉ़क टाकुन १५-२० मिनिटे मंद गॅसवर उकळु द्यावे.
५. तो पर्यंत ओव्हन मधे ९० degree celcius वर फ्रेंच बगेटचे तुकडे करुन, टोस्ट करुन घ्यावेत.
६. सुप साठी जे Ovenproof बाऊल किंवा मग घेतले आहेत, त्याच्या तळाशी २ टोस्ट ठेवुन त्यावर थोडे चीज पसरावे.
७. त्यावर तयार झालेल्या सुपामधील १ कप सुप त्यात ओतावे. वरतुन परत २ टोस्ट ठेवुन, वरुन चीज पसरावे.
८. Oven १८० temp ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा. त्यात हे सुप भरलेले कप १०-१५ मिनिटे किंवा वरील चीज melt होई पर्यंत ठेवावेत.
९. १०-१५ मिनिटांनी कप बाहेर काढावेत. ५ मिनिटे तसेच ठेवुन द्यावेत.
१०. ५ मिनिटांनी गरमा-गरम फ्रेंच आनियन सुप पिण्यासाठी तयार आहे.

वाचने
5966
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
आज बर्फाचे वादळ असताना ही
धन्स...
In reply to आज बर्फाचे वादळ असताना ही by रेवती
क्लास!!
अगदी अगदी असंच!
In reply to क्लास!! by सानिकास्वप्निल
मलापण चपाती भाजीचा हल्ली
खुप छान,
रोचक रेसिपी आहे. व्हेज
भारीचे पदार्थ.
अच्छा!
वाव!सो यम्मी!
कांद्याचं कोणतं तरी हॉरीबल
सगळ्यांचे धन्यवाद!!!
पाककृती आणि फोटो खासच आले
मस्तच आहे. नक्की करुन बघेन.
मस्त! मस्त!
चविष्ट आणि आकर्षक.
जबरदस्त !!!