Skip to main content

आपण मिसळपाव वर कसे आलो ?

लेखक टारझन यांनी मंगळवार, 02/09/2008 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्स मिपाकर्स !!!! आम्ही इथे आलो तेंव्हा मिपाचे जवळजवळ ११०० सभासद होते. पण गेल्या अडिच महिन्यात ही संख्या १९०० वर पोहोचली. (ड्युप्किकेट आय डींचा हातभार फार फार तर ५० चा असेन) . असो ... इथले काही सभासद हे अंतरजालिय ब्लॉगर्स आहेत आणि त्यांचा वावर फार पुर्वीपासून तत्सम साइट्स वर आहे. त्यामुळे ते तात्यांच्या ओळखीमुळे मिपाकर्स झाले असतील ही शक्यता आहे. पण मिसळ पाव गुगल किंवा याहू सारखे नाही. किंवा त्याची जाहिरात आपण कुठल्या चॅनल वर पहात नाही (कमीत कमी मी तरी नव्हती पाहिली). म्हणून दिवसेंदिवस मिपाचा वाढता अवाका पाहून प्रश्न पडले. मी इथे येण्या आधी ब्लॉग्ज बद्दल फक्त ऐकून होतो. जसे की ब्लॉगस्पॉट . पण असल्या संस्थळाबद्दल पुर्ण अंधारात होतो . मला मिसळपाव सापडले ते फार फार चुकून. एक तर इकडे एकटा असल्याने फावल्या वेळात नेट सर्फिंग हा एकच विरंगुळा.. असाच गुगल बाबाला मराठी पीजे म्हणून क्वेरी टाकली .. तर मला प्राजूने सुरू केलेल्या "फालतू पीजे" या पानाची लिंक मिळाली. मग थोडी साइट चाळाचाळ केल्यावर गटण्याच्या वहीणीच्या बांगड्या सापडल्या .... आणि म्हटलं अरेच्च्या अंमळ मजेशीर साइट आहे ही तर. मी पण सभासद झालो................ तो आज पर्यंत जे काही झाले त्याचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात. माझा प्रश्न असा आहे ... तुम्ही मिपा वर कसे आलात ? सोर्स काय ? का आलात ? इथे काय आवडलं .. काय नाही ? कुतूहल आहे ,,, म्हणून हा काथ्याकुट :) ------------------------------------------------------------------------------------- ( आघाऊ टारझन )

वाचने 26510
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

मनोगतावरील "गणपतीला तीन डोळे असतात का?" या माझ्या चर्चेत प्रियालीताईने एक उपक्रमाचा आणि एक मिसळ्पावचा असे दोन दुवे संदर्भासाठी दिले होते (त्यातला एक उडवला गेलाय :) ओळखा पाहू ) ते वाचायला म्हणून मी इथे आलो. तेव्हा तर आणीबाणी नसलेले दिवस होते. मग वातावरण किती स्वतंत्र असेल विचार करा ;) सारं काहि मस्त होतं.. सर्कीटरावांचा "वारी" वरील लेखाला मी दिलेला प्रतिसाद हा इथला पहिला प्रतिसाद.. पुढे काहि दिवस दोन्ही स्थळांवर लिखाण करत होतो. नंतर इतर ठिकाणी ललित लेखन बंद केले .. फक्त मिपा.. आणि आता तर इथे पूर्णपणे रमलो आहे. -(बिल्ला# २७०) ऋषिकेश मु.पो. मिसळपाव

इतिहासाचे ऋण आहेतच हो! इतिहास वाचतो आणि साक्षीपण आहे त्यामुळे कळंतंच राहतं. (आणि थोडासा इतिहास माहित असल्याने अधून मधून आलेल्या 'ऐतिहासिक लाटे' दरम्यान फार कंटाळवाणे होत नाही.. हा त्याचा फायदा.) मनोगत > उपक्रम > मिपा असा प्रवास. (मनोगत आणि उपक्रमामधल्या जागेत ब्लॉग, याहू ग्रुप :) वगैरे !) मिपा चालू होणार हे माहित असल्याने लक्ष ठेउनच होतो पण प्रियालीने व्यनी मधून लक्ष वेधले आणि लगेच रुजू झालो. पिवारचे अनेकांचे लेखन आवडते. लेखन स्वातंत्र्याचा अतिवापर आणि गैरवापर आवडत नाही. तसेच विभक्तीप्रत्यय शब्दाला चिकटुन न लावण्याची अनेक मिपाकरांची सवय आवडत नाही. शुद्धलेखन आणि भाषा या भाषेच्या मह्त्त्वाच्या दोन आयामांवर चर्चा करायची बंदी आवडत नाही. बाकी मिपाकर असण्यात मजा आहे. सध्या साधे बोलताना सुद्धा कुणाचे बोलणे खोडून काढले की 'प्रतिसाद उडवला' असे मनात येते. मनोगत-उपक्रम-मिपा यांवरील वावराने चांगले स्नही मिळाले याबद्दल आभारी आहे. --लिखाळ.

In reply to by लिखाळ

>>तसेच विभक्तीप्रत्यय शब्दाला चिकटुन न लावण्याची अनेक मिपाकरांची सवय आवडत नाही. आमच्या सारख्या ऐर्‍या गैर्‍या नथ्थु खैर्‍यांना समजेल अशी या वरच्या वाक्याची उकल सांगता का लिखाळराव ?

In reply to by आनंदयात्री

अहो ! ऐर्‍य गैर्‍या काय म्हणता ! आणि उकल कसली त्यात ! 'लिखाळाने' मधला ने हा एक प्रत्यय आहे. मिपावर अनेक जण अगदी लेखाच्या शीर्षकातसुद्धा ने, ला इत्यादी प्रत्यय वेगळे लिहितात असे पाहिले आहे. मी पुरावे देत बसणार नाही. मला तरी व्याकरण कुठे समजते ! पण ते समजावे अशी इच्छा आहे. आणि मिपावरच्या अनेकांना व्याकरणाची उत्तम जाण आहे. त्याचा फायदा मिळावा अशी इच्छा आहे. असो. --लिखाळ.

In reply to by लिखाळ

>>अहो ! ऐर्‍य गैर्‍या काय म्हणता ! आहोत म्हणुन ! >>आणि उकल कसली त्यात ! उकलच की .. ते वाक्य आमच्या डोक्यावरनं पार जिओस्टेशनरी ऑरबिटमधनं गेलं होतं, म्हणुन उकल शब्द वापरला. अच्छा म्हणजे 'लिखाळाने' योग्य अन 'लिखाळा ने' हे चुक, असे का ? बर तसे लिहले तर काय फरक पडतो असा ?

In reply to by आनंदयात्री

आपण माझ्या प्रतिसादातील मताला दाखवलेल्या स्वारस्याबद्दल आभार. माझे नीरिक्षण आणि मत मी नोंदवले. मी व्याकरणज्ञ नसल्याने यावर मी अधिक चर्चा करु शकत नाही. याउप्पर काही बोलायचे असल्यास खरडवहित बोलूया का? ..इथे विषयांतर होत आहे असे वाटते. --लिखाळ.

मी फार काहि साहित्य वाचनारा मुळिच नाहि. लिखान करने तर फार दुर. पण काहि चांगल वाचायला मिळाले कि अवडिने वाचतो. माझ्या एक मित्राने मला मि.पा. बदद्ल सांगितले. एकदा मि.पा. वर आलेला परत परत येतच रहातो. मी ही रोज येतोच.

आता कसा आलो, आनि का आलो? म्हंजे त्येचं काय जालं बगा, कुटं काय म्हराटी वाचायला गावतंय का ह्ये हुडकीत जालावर भटकत होतू. तवा एके दिशी ह्या तात्या आभ्यंकराचा बलॉग सापडला... मानूस तर लई इरसाल वाटला. त्याची ती खास देवगडी ओळख वाचून लई मज्जा वाटली म्हनून तेचा बलॉग समदा वाचून काहाडला.... लिखान लई आवडलं म्हनून थितं येत र्‍हायलो, आन एके दिशी त्यानं मिसळपावाचा कट्टा उगडलाय म्हनून म्हायती पडलं की वो.... मंग काय! हितं आलो आन मेंबर झालो..... काय उगीच हितं कायतरी पर्तिक्रिया (म्हराटीत फीडबॅक!) द्येत होतू.... काय नाय, उगीच आपलं, हितं-थितं, काय-बाय! तशी दोसदार पन गावले, इसोबा, डॉन्या, ईन्या, धम्या, आन इजुभावसारके आनि अनेक... मग काय, तवापासून तर उनाडक्यांना ऊतच आलाय की वो..... ;)

मी सात सालच्या डिसेम्बर महीन्यात मिसळपाववर प्रविष्ट झालो. सागरने माझे स्नेही वि.ग.कानिटकर या॑च्या खूप गाजलेल्या नाझी भस्मासूराचा उदयास्त ह्या पुस्तकावर चर्चा चालवली होती. माझा मित्र सतलज भडकमकर (मास्तर) ह्याला माझा दुसर्‍या महायुद्ध विषयातला रस माहीत होता. त्याने ती सर्व चर्चा विरोपावर पाठवून मला मिसळपाववर ओढले. तसाही झणझणीत मिसळ हा माझा अत्य॑त आवडता पदार्थ. त्याचा तो॑डाला पाणी आणणारा फोटो पाहून मी आणखीनच आकृष्ट झालो. अर्थात तात्या॑शी सूर जुळले कारण पुल, स॑गीत आणि साहित्य ही आम्हा दोघा॑ची मर्मब॑धातली ठेव! मिपावरील रामदास, पि.डा, विजूभाऊ, मास्तर या॑च्या लेखनाचा मी जबरदस्त फॅन आहे. मिपा कट्ट्याच्या निमित्ताने पेठकरकाका॑शी ओळख झाली, काय माणूस आहे! पर्सनॅलिटी तर रूबाबदार आहेच पण बोलणे समोरच्याची दा॑डी गुल करणारे आहे. मीतर खलासच झालो. विजूभाऊ हे मिपामुळे बनलेले आणखीन एक मित्र. हेही एक अफलातून रसायन आहे. अफाट वाचन, सुरेख भाषा.. क्या बात है! असली एक से एक अफलातून वल्ली मिपामुळे माहीत झाली. आता मिसळपाव माझ्याही आयुष्याचा एक अविभाज्य भागच बनले आहे (जसे काश्मीर भारताचा..इ.इ.) एखादा दिवस मिपावर नाही येऊ शकलो तर काही तरी चुकल्यासारखे वाटत राहते :)

माज्या यका दोस्तानं मिपा ची साइट दाकवली. "रोशनी" वाचली तात्यांची न मंग वाटला आपन बी लीवून बगू क जमतय क ते पन जल्ला लीवाला येल भेटत नाय. जे भना वांदा नाय आक्कं आयुक्श परलय मदुन मदुन यत रावू भेटत रावू मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला नावानच सगला हाय)

ओर्कुट वर कोणीतरी मला या संस्थळाचा पत्ता दिला . मी सर्वप्रथम "टाळण्याची कला" वाचली आणि त्या नन्तर मिपाला टाळूच शकलो नाही. पिवळा डाम्बीसाची डाम्बीस उत्तरे / कोलबेरकाकांचे बेरकी जबाब आणि धमाल मुलगा , डॉ दाढे यांचा जसजसा परिचय झाला तसतसा मी साईटला ऍडीक्ट झालो. मिपा मुळे मी लिहिता झालो. एका कट्ट्यावर भेटलेले मिपाकर मला एक विलक्षण ठेवा देउन गेले. मला पुन्हा एकदा आमच्या एकत्र कुटुम्बातल्या जुन्या घरात गेल्यासारखे वाटले. जिथे आम्ही सगळे भावंडे मिळुन धमाल उडवायचो. गम्मत रुसवे फुगवे टारगटपणा अगदी सगळे तसेच राखी पौर्णीमेला सकाळी सकाळी आलेला स्वाती राजेश चा फोन हा एक सुखद धक्का होता. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

तात्यांना विचारले, मिसळपाव सुरु झाले का ? ते म्हणाले हो, आणि आम्ही सभासद झाले. :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (बिल्ला क्र. २८)

तात्यांनी त्याच्या आरकुटातल्या दोस्त लोकाना हे संकेत स्थळ सुरु केल्यावर लिन्क धाडुन दिली होती. त्या सुताच्या आधारे हा स्वर्ग गाठला. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

मिसळ चे चित्र कुठे मिळते का. म्हणून 'मिसळपाव' असे गूगलवले. तिथे हि लिंक मिळाली. स्थळ आहे. १-२ लगेच वाचले. आणि मिपाचा शोध सदस्य झालो मिपाचा.