Skip to main content

मतदान पध्दत

लेखक NiluMP यांनी मंगळवार, 26/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
देशाचे प्रतिनिधित्व राजकारनी करतात हे मान्य पण मतदान करून नेता निवडून देणे ही पध्दत चुक की बरोबर. माझया मते चुक आहे कारण १ मतदान पध्दतीमुळे व्होटबॅंक ही समस्या निर्माण झाली २ व्होटबॅंकमुळे शहरे बकाल झाली आणि अनैतिक धंदे वाढले ३ अनअधिकृत बांधकामे वाढून भ्रष्टाचार वाढला ४ राजकीय घराणेशाही जोर धरू लागली ५ कायदा आणि सुव्यवस्था हतबल झाली तसेच, टिव्हीवरील रिअल्टी शो आणि मतदान यातील फरक टिव्हीवरील रिअल्टी शोमध्ये आपण प्रथम परर्फामन्स पाहतो आणि मग मतदान करतो आणि मतदान प्रक्रियेत आपण प्रथम मतदान करतो जेथे परर्फामन्सची काहीच गॅंरंटी नसते तुम्हाला काय वाटते?

वाचने 7585
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

In reply to by नानबा

मित्रा, राजकरण हा माझा प्रांत नाही आहे रे. आणि मी कोण पामर सुधारणा सुचवणारा. तरीही. http://mr.upakram.org/node/3906 कदाचित तु हे वाचलं असशील. मिपावर बरेच जाणकार आणि अभ्यासू सभासद आहेत त्यांनी यावर आपले मत नोदवावे. (च्यायला मतदानाला विरोध करतो आणि येथे मीच मत मागतो आहे)

In reply to by बॅटमॅन

नको रे हुकुमशाही नको बाटया. पण त्याचावर Accountability असावी एवढी साधी अपेक्षा आहे. आपल्याला कस कामात चुक केली की Demotion अशी काहीना काही सजा मिळते आणि हे घोटाळे करून नवा घोटाळा करयाला मोकळे.

In reply to by बॅटमॅन

आणि हो हुकुमशाही आली तर असे लेख लिहिणा-यावर आणि त्यावर असे प्रतिसाद देणा-यावर गुन्हा नोदवून त्यांना उलटा टांगून मिर्चाची धुरी देतील ना. तुझ ठिक आहे तु बॅटमन आहेस तुला उलटा लटकण्याची सवय आहे रे पण आम्हाला नाही ना (हवघे)

In reply to by बॅटमॅन

आणि हो हुकुमशाही आली तर असे लेख लिहिणा-यावर आणि त्यावर असे प्रतिसाद देणा-यावर गुन्हा नोदवून त्यांना उलटा टांगून मिर्चाची धुरी देतील ना. तुझ ठिक आहे तु बॅटमॅन आहेस तुला उलटा लटकण्याची सवय आहे रे पण आम्हाला नाही ना (हवघे)

In reply to by NiluMP

कार्टूनचा अभ्यास वाढव की रे. वटवाघूळ हा प्राणी उलटा लटकतो पण सुपरहीरोमध्ये मात्र स्पायडरमॅन उलटा लटकतो, बॅटमॅनकडे स्वतःचे डोके वगळता अन्य सुपरपॉवर नाही. :)

जर तुम्हाला तुमचा नेत निवडता येत नसेल तर स्वतः निवडाणूकीला उभे राहणे किंवा मतदान न करणे असे दोन्ही पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. बहुमताची निवड चुकल्यास दर पाच वर्षांनी तुम्ही त्या व्यक्तीला परत बोलवु शकताच... मग प्रॉब्लेम काय आहे?

In reply to by ऋषिकेश

प्रॉब्लेम वर दिलेत की राव, अस काय करता. राहील निवडणूक लढवण्याबददल आणि मतदानाबददल तर तिकडे कोण का निवडूण येउदा माझया आयुष्यावर त्याचा प्रत्यक्ष काहीच फरक पडत नाही मी दोन टाईम मस्त खावून 'पिउन' राहतो पण अप्रत्यक्षरित्या बरेच फरक पडतात कारण पाॅलिसीच (L. I. C नव्हे) हेच लोक बनवतात.

In reply to by NiluMP

कोण का निवडूण येउदा माझया आयुष्यावर त्याचा प्रत्यक्ष काहीच फरक पडत नाही
अप्रत्यक्षरित्या बरेच फरक पडतात
राव तुमचा पार बेंबट्या झाला आहे. ;)
मी दोन टाईम मस्त खावून 'पिउन' राहतो
हांगआश्शी.. येवढे सुखात असताना कश्याला वांझोट्या चर्चांवर वेळ दवडताय. मस्त २ टाईम खा-प्या. लोकांले बी सुखान राहुंद्या. :)

In reply to by गणपा

तुमची मुलगी जस बालसुलभ प्रश्न विचारून तुम्हाला अडचणीत टाकते ना तस माझ बालसुलभ मन मला काही प्रश्न विचारत म्हणून हा खटाटोप.

का? मतदान करायच्या वेळी पक्ष कार्यकर्ते दादा/अण्णा/भाउंनी केलेल्या कामाची यादी वाचून दाखवतात की घसा फोडून तुम्हाला आणि ताई,माई,अक्कांना.

In reply to by चिरोटा

हो सांगतात ना, पण त्यांचा भुतकाळातील कामाबददल आणि त्यांनी भुतकाळात काय दिवे लावलेत ते पाहून आम्ही नवीन उमेदवाराला निवडून आणू म्हणतो पण तो काय दिवे लावणार याची शाश्वती नसते ना

सहमत आहे. संकेतस्थळाला जसा मालक असतो आणि तो संपादक अथवा सल्लागारांची नेमणूक करतो तसा देशाचा एक मालक बनवावा आणि त्याच्यावर निवडीची प्रकिया सोपवून द्यावी. हाकानाका

In reply to by यसवायजी

हा मालक कसा बनवायचा? (निवडायचा?)
चार पाच अनिवासी ह्या देशाचा मालक बनण्याचे प्रयत्न करत आहेत अशी अफवा उठवून द्यायची. मग ज्यांच्या शब्दाला मान आहे, ज्यांना 'जेष्ठ' वैग्रे म्हणवले जाते अशी मंडळी हस्तक्षेप करून कोणा एकाला मालक बनवून टाकतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हा हा हा अनिवाशांना तसेही जमिनी घेऊन प्लॉट पाडून विकण्यात लै विंट्रेस्ट असतोच... अनेकांनी तिकडून प्लॉट मिळवून देत असे सांगून लै पैसे गोळा करुन ठेंगा दिल्याची बातमी आहे आतल्या गोटातली ;)