मेणबत्या पेटवणार्यांनो तुम्ही
हातात मशाल कधी धरणार ?
चिमुरड्यांवर होणारे बलात्कार
अजुन किती काळ पाहणार ?
स्फोटात लोक हल्ली रोजच मरतात,ती ब्रेकिंग न्युज असते
आपण त्यात तसे मेलो नाही,यातच का आपण धन्यता मानणार ?
भ्रष्टाचाराने संपुर्ण देश आपला गांजला असा
राजकारण्यांच्या पंगतीत आता धुतला तांदुळ शोधणार कसा ?
देशाच्या सिमेवर जवानांची क्रुरपणे मुंडकी छाटली जातात
तरी सुद्धा आपण त्यांना फक्त इशारेच देत राहणार ?
मंगळावर यान पाठवायचे म्हणुन मिशन आखणार
पण गरिबाला घास देण्यासाठी प्रयत्न कधी करणार ?
कोट्यावधींच्या देशात आता माणसाला नाही किंमत
चार जण जसे जगातात तसे तुम्हीपण का जगणार ?
जगतली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणे आपल्या देशात नांदते
मग मुठभर लोक मेंढ्यांना हाकत आहेत, असे मला का वाटते ?
मदनबाण.....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1224
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No Comment)
....
प्रतिसाद देऊनही या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीयेत ........!!!
.पण बरेच जण आपल्यातले office
In reply to प्रतिसाद देऊनही या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीयेत ........!!! by फिझा
एक्झॅक्ट्ली
@फिझा
कविता फारच भाबडी वाटली.