साहित्यः
१ वाटी तूरीची डाळ स्वच्छ धुवून २०-२५ मिनिटे भिजवून ठेवणे
१ टोमॅटो बारीक चिरलेला
२ टेस्पून अख्खे शेंगदाणे
२ टेस्पून गुळ (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
५-६ कोकम पाकळ्या
१ टीस्पून बारीक चिरलेले आले
१/२ टीस्पून हळद
१-१/२ लाल तिखट
१-१/२ टीस्पून धणे-जीरेपूड
१/२ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून मेथीदाणे
१/२ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून हींग
१ दालचिनीची काडी तुकडे करुन
३-४ लवंगा
कढीपत्ता
१ लाल सुकी मिरची
मीठ चवीप्रमाणे
चिरलेली कोथींबीर
पाकृ:
कुकरच्या भांड्यात भिजवलेली तूरीची डाळ घ्यावी, त्यात चिरलेला टोमॅटो, आले व शेंगदाणे घालून कुकरला ५-६ शिट्ट्या काढून डाळ मऊसर शिजवून घ्यावी.
शिजवलेली डाळ जरा घोटून घ्यावी व गरजेप्रमाणे पाणी घालून गॅसवर उकळायला ठेवावी.
त्यात आता हळद, लाल तिखट व धणे-जीरेपूड घालून चांगली उकळी काढावी.
उकळ आली की त्यात कोकमं, गुळ व चवीप्रमाणे मीठ घालावे व शिजवावे.
वरुन कोथींबीर घालावी.
बुट्टीत बटर किंवा साजूक तूप गरम करावे व त्यात दालचिनी,लवंगा घालून हलके परतावे.
त्यात मोहरी व मेथीदाणे घालावे.
मोहरी तडतडली की त्यात जीरे, हींग व कढीपत्ता घालून फोडणी करावी.
लाल सुकी मिरची घालून तयार फोडणी शिजवलेल्या डाळीवर ओतावी.
१० मिनिटे डाळ झाकण लावून तशीच ठेवावी म्हणजे फोडणीचा स्वाद त्यात उतरेल.
गरम-गरम आंबट -गोड-तिखट अशी गुजराथी डाळ वाफाळत्या भाताबरोबर किंवा जीरा-राईसबरोबर सर्व्ह करावी.
नोटः
गुजराथी लगन नी डाळ्मध्ये काहीजण सुरण व खारकेचा वापर करतात.
जर तुम्ही ह्याचा वापर करणार असाल तर सुरण व खारीक दोन्ही कुकरला वाफवून घ्या व डाळ उकळत असताना त्यात घालून शिजवा.
वाचने
50810
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाककृती आ व ड ली.
उद्या परवामध्येच ही डाळ करून
हो जैन लोकं
In reply to उद्या परवामध्येच ही डाळ करून by रेवती
कंदमुळे
In reply to उद्या परवामध्येच ही डाळ करून by रेवती
अहाहा!
आवडली पाककृती
मस्तच... आजच करुन बघते ..
बेष्ट !
पाकृ निट वाचली/ बघितलीस का?
In reply to बेष्ट ! by परिकथेतील राजकुमार
छ्या !
In reply to पाकृ निट वाचली/ बघितलीस का? by चिंतामणी
नाही रे!
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
मस्त!
छान दिसतेय...
छान..
मस्तच. अजुन काय प्रतिक्रिया
वा...
मस्त
ए मस्त दिसतेय गं....... नक्की
मस्तच! करून बघायचे ठरवले आहे
आजच करणार
नेहमीप्रमाणे अप्रतिम पाककृती.
मस्त
सानीका-
विडो टाकल्याने एकदम प्रोफेशनल
अतिशय सुंदर
बहु सरस छे.
मस्त दिसतिये डाळ... नक्की
गुजराथी आणि मराठी पाककृती.
व्हिडियो मस्तच्. मी काल
अप्रतीम
आयला!
अप्रतीम.....काल रात्री बनवली ...आणी संपवीली
ल्रर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्स्स्स्स्स्स्स्प्प्प्प्प्प