Skip to main content

कच्च्या केळ्याचे थालीपीठ व टिक्की

लेखक neeta यांनी मंगळवार, 19/02/2013 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
कच्च्या केळ्याच्या दोन रेसीपी देत आहे. उपासाला ही चालतील आणि मुलांना डब्यात ही देता येतील. भाजी केली तर कोणी खात नाही पण ह्या रेसीपी केल्या तर सर्व जण खातात. पहिली रेसीपी आहे कच्च्या केळ्याची टिक्की आणि दुसरी आहे कच्च्या केळयाचे थालीपीठ. टिक्कीसाठी साहित्य : दोन कच्ची केळी कुकरमध्ये सालासकट उकडून घेणे ( दोन शीट्या करणे), एक उकडलेला बटाटा, आले मिरची पेस्ट एक चमचा, दाण्याचा कूट एक मोठा चमचा, साबूदाणा पीठ लागेल तसे घट्ट होण्यासाठी, जीरे पावडर एक चमचा, मीठ उकडलेली केळी साल काढून कुस्करून घ्यावीत, बटाटा पण कुस्करून घ्यावा व त्यात वरील साहित्य घालावे व आपल्याला हव्या त्या आकाराच्या टिक्क्या कराव्यात. व साबूदाण्याच्या पीठात घोळवून तळाव्यात. २) कच्च्या केळ्याचे थालीपीठ साहित्यः तीन कच्ची केळी, दोन चमचे दाण्याचा कूट, आल मिरची पेस्ट, मीठ, जीरे तीन कच्ची केळी साल काढून किसून घ्यावीत, त्यात मीठ, दोन चमचे दाण्याचा कूट, एक चमचा आल मिरची पेस्ट घालावे. थोडे जीरे घालावे. व मळून थालीपीठे लावावीत .(फोटो संलग्न करीत आहे)

वाचने 7644
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

भाजलेल्या किंवा उकडलेल्या कच्च्या केळ्याचा चीक नाही लागत. कच्च्या केळ्याची भाजी तर छान लागतेच पण नुसते तव्यावर खरपूस भाजून घेतलेलेही छान लागतात. कच्च्या केळ्याच्या सालींवर सुरीने उभ्या चिरा मारून ते तव्यावर झाकून मंद आचेवर खरपूस भाजावे. त्यात तयार झालेल्या वाफेमुळे साल अलगद सुटते.

हे पदार्थ वाचनालयात ठेवल्यास गर्दी देखील वाढेल.