ऑफिस म्हणजे काम. काम म्हणजे कंटाळा. कंटाळा म्हणजे विरंगुळ्याचा शोध. सर्वात सोपा विरंगुळा म्हणजे चहा/कॉफी. सर्वसाधारणपणे प्रत्येक ऑफिसमध्ये चहा कॉफीची सोय असते. आमच्याही आहे. साधं मशीन होतं आधी; आता आमचे लाड म्हणून ‘सीसीडी’ चं बसवलंय. त्याचं स्वागतही झालं बसवल्यावर. आहे; छान आहे.
पण सध्या एक नवीन डिस्कव्हरी झालीय मला. एक चहा कॉफी वाला आहे आमच्या ऑफिसखाली. तसा शक्यतो मी चहा कॉफी च्या वाट्याला जात नाही. ‘कधीच’ हा शब्द मी वापरत नाही, कारण अनेक कारणांमुळे अधे मधे माझं कॉफी/चहा पान होतं आजकाल. हां, तर तो चहा कॉफीवाला. त्याची थोडक्यात स्टोरी अशी आहे की तो एम८० ने आमच्या बिल्डिंग खाली येतो. एम८० बेसमेंट मधे पार्क करतो. तिथून घोडा सायकल घेउन बाहेर येतो. ही घोडा सायकल म्हणजे त्याचं दुकान. कॅरियर ला कॉफी चा ड्रम लावलेला, एका बाजूला एक पिशवी, त्यात डिस्पोजेबल ग्लास. हॅंडल ला एक पिशवी त्यात १ थर्मास, ज्यात चहा असतो. आणि रिझर्व ग्लास चा स्टॉक. इतकंच नव्हे, डोसा, उत्तप्पा, इडली, अशा साउथ इंडियन पदार्थांची मेजवानीही हॅंडल ला लटकवलेल्या पिशवीत असते.
पहिल्यांदा त्याच्याकडे गेलो तेंव्हाच लई खूश झालो. ५ रुपये द्यावेत, एक कॉफी असं सांगावं. एका झटक्यात बरोब्बर एक डिस्पोजेबल ग्लास तो काढतो, लयबद्ध असा ३ वेळा कॅरियर वर आपटतो. आपटता आपटता विचारणार, "सादा, कडक?". तुम्ही सांगावं, "कडक", की तो त्या ग्लासात एक छोटा चमचा अस्सल फिल्टर कॉफी घालणार, आणि ड्रम मधून ग्लासभर फिल्टर कॉफीचा ‘जाम’ भरणार. या सगळ्याच्या जोडीला मोबाईल वर लावलेली साउथ इंडियन गाणी जो रंग आणतात ना, तो और आहे. त्याचा चहासुधा जबरदस्त असतो बरं का, आलं आणि वेलची वाला. पण लिमिटेड एडिशन. एक थर्मास भर; बस.
तो मला खरोखर भावला त्या दिवशी मी खाली उतरलो आणि पाऊस आला. कडेकडेने मी त्याच्याइथवर गेलो. त्याने खुणेने मला समोरच्या दुकानाच्या शेडखालीच थांबायला सांगितलं. मी थांबलो. तो तिथवर त्याची छत्री घेऊन आला. मी आणि बाजूची २ माणसं, आमच्या ऑर्डर घेतल्या. मला विचारताना स्वत:च म्हणाला, "कडक ना?" मी होय म्हटलं. ५ रुपये देऊ केले, तर म्हणाला बादमें देना. गेला; कॉफ्या घेऊन आला. आम्हाला कॉफ्या दिल्या. आम्ही त्याचा आस्वाद घेतला. नंतर मी ग्लास त्याच्या इथल्या कचरापेटीत टाकायला जाऊ लागलो तर पुन्हा खुणेने मला थांबवलंन. माझ्याइथे आला, म्हणाला, "आप मत भीगो सर". माझ्याकडून ग्लास आणि १० ची नोट घेऊन गेला, ५ परत आणून दिले. इतकी सर्व्हिस ! कौतुक वाटलं मला ! धंदा म्हणून असेल तरीही इतकी सर्व्हिस कुणी देत असेल तर केवढं बरं वाटतं ! आणि तो मनापासून देतो ही सर्व्हिस.
या माणसाची वेळही ‘स्विस टाईम’ इतकी काटेकोर आहे. पहिल्याच दिवशी मी विचारलं तेंव्हा मला म्हणाला, "सुबह ८ से ११:२० और दोपहर ३ से ६ रहता हूं" एक दिवस ११:२१ झाले होते उतरायला तर मी या माणसाला पाठमोरं बघितलं. इतकं काटेकोर. एकंदरीत खूप वेगळा ‘अण्णा’ आहे तो. लई भारी.

वाचने
10592
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
रतीब
+१
In reply to रतीब by अभ्या..
फिल्टर पायजे
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरं नै.
In reply to फिल्टर पायजे by अभ्या..
तुम्हीच लावा फिल्टर
In reply to अरं नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंजाबी !!
In reply to अरं नै. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कॉफी खास आवडीची नाही माझ्या..
दिलीप, अभ्या:
थंड घ्या, भटांनो! आणि मनावर
In reply to दिलीप, अभ्या: by वेल्लाभट
मालक रागावू नका.
In reply to दिलीप, अभ्या: by वेल्लाभट
कुठल्या आक्षेपाकडे लक्ष
In reply to दिलीप, अभ्या: by वेल्लाभट
काय राव लगेच चिडता तुम्ही पण.
@ किसनजी शिंदे की जे संपादकसो
त्याचं काय आहे की आमचं
In reply to @ किसनजी शिंदे की जे संपादकसो by ५० फक्त
व्हॉट अॅन आयडीया सरजी
In reply to त्याचं काय आहे की आमचं by किसन शिंदे
हम्म्म
सहमत
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
कोडी कशाला घालताय राव?
In reply to सहमत by अभ्या..
कशाला
In reply to कोडी कशाला घालताय राव? by पैसा
+१
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
फोटो सुंदर आहे. तुम्ही
फोटो त्यांनी काढलेला नसावा, ...
In reply to फोटो सुंदर आहे. तुम्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या काही शंका आहेत. जमले
१+
In reply to माझ्या काही शंका आहेत. जमले by विश्वनाथ मेहेंदळे
पांथस्थ...तुमच्यासाठी.
In reply to १+ by पांथस्थ
देवाशपथ !
In reply to पांथस्थ...तुमच्यासाठी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा.
In reply to देवाशपथ ! by परिकथेतील राजकुमार
परा, हा वरती बघ रे तो
In reply to हाहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(उगीचच केलेले किडे...)
In reply to पांथस्थ...तुमच्यासाठी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला !
In reply to (उगीचच केलेले किडे...) by मोदक
श्या.. काय राव परा..
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
नको नको !
In reply to श्या.. काय राव परा.. by मोदक
आता पुढच्या गप्पा सवडीने खवत मारू..
In reply to नको नको ! by परिकथेतील राजकुमार
झक्कास आयडिया
In reply to १+ by पांथस्थ
एक प्रश्न परत विचारतो. आक्षेप
In reply to झक्कास आयडिया by सुहास..
नेमके उत्तर
In reply to एक प्रश्न परत विचारतो. आक्षेप by विश्वनाथ मेहेंदळे
नेमके उत्तर बिरुटे सरांनी
In reply to नेमके उत्तर by पैसा
समजा झाले तसे तर काय मज्जा
In reply to झक्कास आयडिया by सुहास..
गुड आयड्या!
In reply to समजा झाले तसे तर काय मज्जा by विश्वनाथ मेहेंदळे
च्यायला !
In reply to समजा झाले तसे तर काय मज्जा by विश्वनाथ मेहेंदळे
पराने माझा प्रतिसाद चोरला
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
आमचे आणि विमे ह्यांचे विचार
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
फक्त त्या २० दिवसात मिपा वर
In reply to समजा झाले तसे तर काय मज्जा by विश्वनाथ मेहेंदळे
धंदा म्हणून असेल तरीही इतकी
:(
+१११
In reply to :( by सोत्रि
मस्त लिहिलंय, आवडलं. फिल्टर
सॉरी ! तो मी 'काढलेला' नाही.
In reply to मस्त लिहिलंय, आवडलं. फिल्टर by यशोधरा
छान लिहिलय हो...
लेख आवडला. ड्रम मधून ग्लासभर