✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सावध रहा!!

अ
अनन्न्या यांनी
Sat, 02/16/2013 - 19:09  ·  लेख
लेख
आजच्या लोकसत्तामध्ये फेबु वर चॅट करून फसवलेल्या एका तरूणाची बातमी वाचली. मुंबई व्रुत्तांत मध्ये त्यावर सविस्तर बातमी आहे. एका मुलग्याने मुलगी असल्याचे भासवून मैत्रीचे जाळे टाकले आणि एक सुंदर मुलगी आपल्याला फ्रेन्ड रीक्वेस्ट टाकते हे पाहताच तो बरोब्बर जाळ्यात अडकला. अशी एक टोळीही कार्यरत असल्याचे वाचले ज्यामध्ये एक मुलगी सुध्दा सामिल होती. श्रीमंत तरूण पाहून त्याच्याशी मैत्री वाढ्वायची, आणि एक दिवस घरी एकटीच आहे असे सांगून भेटायला बोलवायचे. तो तरूण मुलगी एकटी आहे, अशी स्वप्ने रंगवत तिच्या घरी पोहोचतो तर तिचे साथिदार त्याला बदडून, लुटून पलायन करतात. सुदैवाने ही टोळी पकड्ली गेली पण अजून असे किती सापळे आंतरजालावर असतील कोण जाणे!! आणखी कोणाला काही माहिती असेल तर जरूर शेअर करा. चांगल्या गोष्टींबरोबर वाईटही येतेच!! सावध रहा!! सर्व मिपाकर आंतरजालावर सराईतपणे वावरणारे आहेत, तरीही काळजी घ्या!!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5230 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

आंजावर

कपिलमुनी
Sat, 02/16/2013 - 19:14 नवीन
अनेक टोळ्या आहेत ..त्यांना आम्ही कंपू म्हणतो ..ते सुद्धा एकटा दुकटा आय डी बघून, बदडून, लुटून पलायन करतात.
  • Log in or register to post comments

द्या टाळी

श्री गावसेना प्रमुख
Sat, 02/16/2013 - 19:17 नवीन
द्या टाळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

द्या टाळी नव्हे द्या टोळी!

कानडाऊ योगेशु
Sat, 02/16/2013 - 19:32 नवीन
द्या टाळी नव्हे द्या टोळी! (कंपुप्रवेशोत्सुक)योगेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

हा हा.. या टोळ्यांचा अनुभव घेतलाय!!

अनन्न्या
Sat, 02/16/2013 - 19:56 नवीन
पण त्या वर काथ्यात उल्लेखलेल्या टोळ्यांशी संबंधीत नाहीत!! जरा टोळीवाल्याना विचारा!! नाहीतर टोळधाड पडायची तुमच्यावर!! अर्थात तुम्ही त्याचे मेंबर असलात तर चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

+१

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 02/16/2013 - 19:58 नवीन
नुकताच अनुभव घेतलाय इथे त्याचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

गँग्ज ऑफ मिसळपाव असा चित्रपट

आदूबाळ
Sat, 02/16/2013 - 20:28 नवीन
गँग्ज ऑफ मिसळपाव असा चित्रपट बनेल त्यातून :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

पलायन कुठे?

आनंद घारे
Sun, 02/17/2013 - 10:22 नवीन
ते सुद्धा एकटा दुकटा आय डी बघून, बदडून, लुटून इथपर्यंत ठीक आहे, म्हणजे मला तसा अनुभव आला नाही, इतरांना आला असेल. पण पळून जाणार कुठे आणि कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आपलाच मोह फसवतो!

संजय क्षीरसागर
Sat, 02/16/2013 - 19:59 नवीन
आणि आपण मग दुसर्‍याला दोष देतो.
  • Log in or register to post comments

फेस बुकच काय घेउन बसलात इथे

पक पक पक
Sat, 02/16/2013 - 20:08 नवीन
फेस बुकच काय घेउन बसलात इथे काही कमी नाहीत.. ;)
  • Log in or register to post comments

एखादं उदाहरण ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/16/2013 - 20:44 नवीन
एखादं उदाहरण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

व्यनी करतो..

पक पक पक
Sat, 02/16/2013 - 21:49 नवीन
व्यनी करतो.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला पण

प्रचेतस
Sat, 02/16/2013 - 22:17 नवीन
मला पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

च्यायला ! ह्याला चावट्पणा

पक पक पक
Sat, 02/16/2013 - 23:10 नवीन
च्यायला ! ह्याला चावट्पणा म्हणावा काय आम्ही... ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कुतुहल म्हणायचं हो.

प्रचेतस
Sat, 02/16/2013 - 23:15 नवीन
कुतुहल म्हणायचं हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

कुतुहल म्हणजे

अभ्या..
Sat, 02/16/2013 - 23:21 नवीन
कुतुहल म्हणजे ते बालसुलभ वगैरेपैकी काय? ;) ए कुतु हल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

निरागसपणातले कुतुहल

प्रचेतस
Sat, 02/16/2013 - 23:24 नवीन
=)) निरागसपणातले कुतुहल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

खरच रे.

अभ्या..
Sat, 02/16/2013 - 23:33 नवीन
वल्ली दादा मीपण खराच निरागस आहे रे. हे असले फसवणे वगैरे भयानकच आहे. आता सावधच राहायला पाहिजे ह्या अस्ल्या प्रवृत्तीपासून. यापुढे मी असल्या मुलींच्या नावांच्या आयडींच्या बिल्कुल नादी लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वल्ली दादा मीपण खराच निरागस

पक पक पक
Sun, 02/17/2013 - 08:15 नवीन
वल्ली दादा मीपण खराच निरागस आहे रे. अरे अभ्या पण वल्ली दादा निरागस नाही रे राहीला आता.... ;) यापुढे मी असल्या मुलींच्या नावांच्या आयडींच्या बिल्कुल नादी लागणार नाही. अन एवढापण निरागसपणा चांगला नाही... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अजून काय व्य.नि...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/17/2013 - 08:30 नवीन
>>>> व्यनी करतो.. अजून काय व्य.नि. आला नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

सांगायच्या बाता दुसरे काय

श्री गावसेना प्रमुख
Sun, 02/17/2013 - 08:32 नवीन
सांगायच्या बाता दुसरे काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्य. नि. कशाला?

संजय क्षीरसागर
Sun, 02/17/2013 - 14:38 नवीन
हे घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तपीठावरचे ब्रम्हे आठवले!

मराठे
Sat, 02/16/2013 - 21:59 नवीन
मुक्तपीठावरचे ब्रम्हे आठवले!
  • Log in or register to post comments

ब्रह्मे काका इझ माय फेवरेट

जेनी...
Sat, 02/16/2013 - 22:06 नवीन
=)) ब्रह्मे काका इझ माय फेवरेट काका ... लोकं सीरिअस झालि कि ब्रह्मे काका अवतरतात .. मज्जा येते मग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

प्राचीन काळापासून एकट्या

खटासि खट
Sun, 02/17/2013 - 11:16 नवीन
प्राचीन काळापासून एकट्या दुकट्या तरूणांना सुंदर तरुणींकडून फसवण्याचे प्रकार घडत असल्याचे ब्रह्मेसंहितेवरून सिद्ध झालेले आहे. तरीही बाप्येमुलगे आजही फसतात याला काय म्हणावे ? बांड तरूणांनी चाटमसाल्यावर शक्यतो अनोळखी मुलींना आपला फोन नंबर देऊ नये, मुलींना भेटायला जाताना एकट्या दुकट्याने जाऊ नये, तशीच वेळ आली तर सार्वजनिक ठिकाणी भेटण्यास बोलावे. सिनेमाला जाऊ नये, तिथे काळोख असतो. हे सर्व गेली अनेक वर्षं सांगूनही मुलं फसतात यात फेसबुकाचा काय दोष म्हणा !! या प्रकरणात वाइट इतकंच वाटलं कि दोस्ताना बदनाम हुआ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

एवढ्या काळजीने सावध

अधिराज
Sat, 02/16/2013 - 23:36 नवीन
एवढ्या काळजीने सावध केल्याबद्दल शतशः धन्यवाद!
  • Log in or register to post comments

होय ही बातमी वाचल्यापासुनच मन विषण्ण झालयं!

अग्निकोल्हा
Sat, 02/16/2013 - 23:49 नवीन
स्त्रियांना उपभोग्य वस्तु मानणार्‍यांचा धिक्कार असो...
  • Log in or register to post comments

अहो

कपिलमुनी
Tue, 02/19/2013 - 02:00 नवीन
पुरुष ही येडा बनवून उपभोगायची गोष्ट झाली आहे .. हव तर ब्रम्हे काकांना विचारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

कैच्याकै

अग्निकोल्हा
Tue, 02/19/2013 - 03:33 नवीन
उपभोगायची गोष्ट झालि आहे काय ? अहो पुरुष ही उपभोगायची गोष्ट म्हणुन अगदी फार सुरुवातिपासुनच गणली गेली आहे. आणि ही गोश्ट इतकी मुळ धरली गेली आहे की मुळात पुरुषांच शोषण होतय ही भावनाच त्याच्यामधे रुजु न देण्यापासुन पिढ्यान पिढ्या पध्दतशीर त्याचं ब्रेन वॉशिंग झालेलं आहे... स्त्रियांच्या बाबतीत मात्र हिच सिमारेखा अतिशय थंड डोक्याने व विचारपुर्वक केवळ शारीरीक पातळीपर्यंतच आणुन रोखुन धरली गेली आहे जेणे करुन त्या उपभोग्य वस्तु शोषित वगैरे वगैरे आहेत याचे विझिबल भांडवल करता यावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अबे तुम्ही दोघे एकाच

बॅटमॅन
Tue, 02/19/2013 - 12:08 नवीन
अबे तुम्ही दोघे एकाच निष्कर्षाप्रति आलेले आहात :) आणि तुझा निष्कर्ष पटला हेवेसांनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

स्त्रियांना उपभोग्य वस्तु

पक पक पक
Sun, 02/17/2013 - 08:18 नवीन
स्त्रियांना उपभोग्य वस्तु मानणार्‍यांचा धिक्कार असो... अस म्हण्ल्याने नक्की काय होत... :bigsmile:
  • Log in or register to post comments

चला.....यापासुन आम्हाला तरी

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 02/17/2013 - 09:05 नवीन
चला.....यापासुन आम्हाला तरी काही धोका नाही आम्ही तरुण नाही, श्रीमंतही नाही आणि आमचे चे.पु.वर खातेही नाही एकदम मस्त वाटतय त्यामुळे. नाहीतर हल्ली त्या मंगळसुत्र चोरीच्या बातम्या वाचुन रस्त्यावरुन चालायची सुध्दा भिती वाटते. तसे काही या बातमी मुळे होणार नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

??

श्रीरंग_जोशी
Sun, 02/17/2013 - 10:19 नवीन
मंगळसुत्र चोरीच्या बातम्या वाचुन रस्त्यावरुन चालायची सुध्दा भिती वाटते
पैजारबुवा, गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून फिरता की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

सोन्याच्या साखळ्या

पक पक पक
Sun, 02/17/2013 - 10:44 नवीन
सोन्याच्या साखळ्या ते मंगळ्सुत्रा बद्द्ल बोलत होते.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

क्रूपया गैरसमज नसावा

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 02/17/2013 - 12:24 नवीन
जोशी सर, आहो बायकोच्या मंगळसुत्रा बद्दल बोलत होतो आम्ही. तिच्या गळ्यातले ओढले तरी खिसा आमचाच फाटणारना? त्या मुळे ती बाहेर गेली तरी आम्ही घरात घाबरेघुबरे होतो. आम्हाला सोसायटीची विलेक्षन जिंकता येत नाही. नगरशेव्हक कसे बनणार. आणि गळ्यात चैनी घालायचा हक्क / मान नगरशेव्हकाचाच असतो. सध्या आम्हाला फक्त जानवेच परवडते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

आम्ही तरुण नाही, श्रीमंतही

सुहास..
Sun, 02/17/2013 - 10:16 नवीन
आम्ही तरुण नाही, श्रीमंतही नाही आणि आमचे चे.पु.वर खातेही नाही >>> हा हा हा हा , पैजारबुवा , + मिड लाईफ क्रायसिस पण नाही असे ही लिहायला हवे होते ;)
  • Log in or register to post comments

विचारवंत पण नाही हे सुद्धा

नाना चेंगट
Sun, 02/17/2013 - 11:55 नवीन
विचारवंत पण नाही हे सुद्धा लिहीत जावे अधून मधून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

अजबच आहे !

परिकथेतील राजकुमार
Sun, 02/17/2013 - 12:00 नवीन
तो तरूण मुलगी एकटी आहे, अशी स्वप्ने रंगवत तिच्या घरी पोहोचतो तर तिचे साथिदार त्याला बदडून, लुटून पलायन करतात.
घर पण सोडून पलायन करतात ? कसे परवडत असेल ? बाकी असे लूटमार करणारे नाहीत, पण मुलगा असून, मुलगी असल्याचे भासवत मिपावरील स्त्री सदस्यांशी गबोल्यावर गुलुगुलु गप्पा मारणारे काही आयडी मिपावरती देखील होते म्हणे. ;)
  • Log in or register to post comments

हो ना राव. खिशातल्या थोड्या

मृत्युन्जय
Tue, 02/19/2013 - 12:31 नवीन
हो ना राव. खिशातल्या थोड्या दिडक्यांसाठी आख्खे घर सोडायचे म्हणजे अवघडच आहे. सगळेच काही ब्रह्मे काकांसारखे ४००० रुपये (२० वर्षांपुर्वीचे) खिशात घेउन हिंडण्याएवढे श्रीमंत नसतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

दॉन तिन

इरसाल
Tue, 02/19/2013 - 10:00 नवीन
दीवसापुरवी कुथे तरि वाचल्ले होते की मुलगि असल्याचे बासवुन एकाला वेबक्यामेर्यावर कपडे काडायला लावुन फेसबुकावर फटु टाकायची धमकी देवून पैशे उकलले होते म्हने. मीपन आजकाल सुद्द लिहिन्याचा सराव कर्त आहे.(काही आयदी परमाने)
  • Log in or register to post comments

त्याच बातमीच्या संदर्भात मी हे लिहीले.

अनन्न्या
Tue, 02/19/2013 - 11:07 नवीन
इथे पाहते तर....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा