नमस्कार, मिपा वर माझे हे पहिले लेखन आहे, तरी तुमच्या प्रतिक्रिया, सुचना चे स्वागत.
साभार : गारवा
आज काम जरा जास्त आहे असे रोज ऑफिसात गेल्यावर वाटते, लंच टाईम पर्यंत खपून सुद्धा टेबलावर एवढे काम साठते ,
तरी बोटे चालतात, डोके मात्र चालत नाही, back ground मध्ये घरच्या कामाशिव्या काही चालत नाही,
तितक्यात नवऱ्या चा फोन येतो, संध्याकाळी बिर्याणी कर म्हणून हुकुम सोडून जातो, रागाचा माझ्या हि तिथेच असाच पारा चढतो ,
मन हे नुसते घडाळ्याच्या का ट्या वर सैरा वैरा पळत सुटते, ५.११ च्या लोकाल साठी मी हि जीव घेऊन धावत सुटते ,
लोकल पकडून शुरू होतो कामाच्या आखणीचा खेळ, विचार करता करता घरी पोहचून मी वाजवते घराची बेल,
दरवाजा उघडता पिल्लू येते धावत, पायाला मिठी मारून करते गोड माझे स्वागत, घेता त्याला मिठीत सर्व शीण जातो निघून,
पापे त्याचे घेऊन सज्ज होते मी कामाला, कारण असा कामाचा मोबदला फक्त मलाच मिळणार असतो.
भावनाकल्लोळ
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन.
आता जमलं. 'भावनाकल्लोळ' हा शब्द लिहायला. :)
नाही हो मला मिपा वर मराठी
In reply to अभिनंदन. by इनिगोय
नाही हो मला मिपा वर मराठी मध्ये टंकताच येत नाही हे मी gmail वर टाइप करून इथे टाइप करून इथे टाकले आहे
हा धागा बघा त्यासाठी. आणि थेट
In reply to नाही हो मला मिपा वर मराठी by भावना कल्लोळ
हा धागा बघा त्यासाठी. आणि थेट लेख टाकण्याआधी सराव म्ह्णून काही काळ इतरत्र प्रतिसाद देऊन बघा. नक्की जमेल.
लिंक राहून गेली.
In reply to हा धागा बघा त्यासाठी. आणि थेट by इनिगोय
लिंक राहून गेली.
(कृपया स्वसंपादनाच्या सुविधेचं मनावर घ्या हो..)
मी gmail वर टाइप करून इथे
In reply to नाही हो मला मिपा वर मराठी by भावना कल्लोळ
इथे टाइप करायचं होतं तर मग जीमेलवर टाइप का केलं होतं? 'इथे ताइप करून इथे' म्हणजे परत कुठे टाइप केलं होतं?
अजून एक
In reply to मी gmail वर टाइप करून इथे by दादा कोंडके
कुणाचा जिव घेता तुम्ही?
कठीण आहे हो!
नोकरी सोडा किंवा नवर्याला बिर्याणी सोडायला सांगा.
हे
साभारःगारवा काय आहे?
गारवा कसा आणावा ते साभारला विचारून झालंय
In reply to हे by पैसा
आता : तुमच्या प्रतिक्रिया, सुचना चे स्वागत.
अरे, ये गारवा नही जानती |
In reply to हे by पैसा
अरे, ये गारवा नही जानती | :D
गारवा हा मराठी पाउस गाण्यांचा
In reply to हे by पैसा
गारवा हा मराठी पाउस गाण्यांचा अल्बम
त्याचच विडंबन वाटतय
उन जरा जास्त आहे दर वर्षी वाटत, भर उन्हात पाउस घेउन आभाळ मनात दाटत.
Thanks
@ संजय,आजच्या नौकरी करणाऱ्या स्त्रीयाच्या बाबतीतला एक छोटासा अनुभव व्यक्त केला आहे, मध्यमवर्गीय कुटुंबाना दोघांनी नौकरी करणे गरजेचे झाले आहे, तरी पण आभार तुमच्या सल्ल्यासाठी.
@ ज्योती, मी कदाचित चुकीची असेन पण मला हे गारवाच्या कवितेवरून सुचले म्हणून साभार असे लिहिले आहे, मी पूर्ण नवीन आहे या आंतरजालीय विश्वात म्हणून काही चुका झाल्यास माफी असावी.
असं होय?
In reply to Thanks by भावना कल्लोळ
मला वाटलं तुमचाच प्रश्न आहे.... मग टाइपिंगची प्रॅक्टीस घरच्याघरी बराह पॅडमधे करता येते.
अप्रतिम
अप्रतिम मांडणी झाली आहे विचारांची. त्यातील राग, तळमळ, आनंद समजता येणारा आहे.
पोस्ट आवडली !
छान लिहिलयस गं
छान लिहिलयस गं :)
होइल सवय हळुहळु मराठिची :)... डोन्ट वरी .... आम्हि आहोत ना ;)
डोन्ट वरी
In reply to छान लिहिलयस गं by जेनी...
=)) =)) =)) =))=))=))
डोन्ट वरी .... आम्हि आहोत ना
In reply to डोन्ट वरी by अभ्या..
उचलायला.
"मला पण खुप खायची आहे
"मला पण खुप खायची आहे बिर्याणी, मला आज उशीर होणार आहे तर तूच करुन ठेव" असे नवर्याला सांगावे. आणि खरच उशीरा जावे. जर त्यानी करुन ठेवली असेल तर पुढल्या वेळेला तुम्ही करा, नाहीतर फाट्यावर मारा असले हुकुम.
बाप रे !
In reply to "मला पण खुप खायची आहे by प्रसाद१९७१
बाप रे ! :(
असं एकदम बोलुन टाकल्यावर नवरा रागवणार नै का ओ काका ?? :(
रागवणारा असेल तर बदलुन टाका
रागवणारा असेल तर बदलुन टाका नवरा. :-)
नायतर मारा फवारा!
In reply to रागवणारा असेल तर बदलुन टाका by प्रसाद१९७१
आहे त्या नवर्यावर.
असं हो काय काका
In reply to रागवणारा असेल तर बदलुन टाका by प्रसाद१९७१
असं हो काय काका :(
शी बै ... असले कसले सल्ले देताय तुम्हि :(
मला त बै कै सुचेचना :-/
अगं त्यांचा स्वतःचा प्रश्न नाहीये
In reply to असं हो काय काका by जेनी...
त्या इथे टायपिंगची प्रॅक्टीस करतायत
मस्त लिहीलय... अजून अजून
मस्त लिहीलय... अजून अजून लिहीत राहा... मराठी टंकलेखनासाठी बराहा पॅड वापरा... खूप मस्त टंकता येतं मराठीत...
पुन्हा कवितेबद्दल - भावना मस्त आल्यात. (मुंबईकर स्त्रीची काम आणि घरकाम मधील दगदग उत्तमरीत्या जाणवली.) :)
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.. :)
धन्यवाद
धन्यवाद