जॉर्ज फेरीसचा १५० वा स्मृतीदिन.
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
अख्ख्या जगात १४ फेब्रुवारी हा वॅलेंटाईन दिवस म्हणून साजरा केला जात असला तरी आजच्या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस फेरीस व्हीलचा प्रणेता जॉर्ज वॉशिंग्टन गेल फेरीस जुनियर याचा जन्म दिवस आहे.
जॉर्जचा जन्म १४ फेब्रुवारी, १८५९ रोजी गेल्स्बर्ग, इलिनॉईस येथे जॉर्ज वॉशिंग्टन गेल फेरीस सिनियर आणि मार्था एडगर्टन हाईड यांच्या पोटी झाला. जॉर्ज ६ वर्षांचा असताना त्यांनी गेल्स्बर्ग सोडलं आणि ते नेव्हाडात स्थायिक झाले.
१८८१ साली जॉर्ज ट्रॉय, न्यूयॉर्क इथल्या रेन्सलियर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मधून सिव्हिल इंजिनियर बनून बाहेर पडला. त्याला पूलबांधणीत फार रस होता, आणि त्यासाठी त्याने पिट्सबर्गमध्ये G.W.G. Ferris & Co. या कंपनीची स्थापना केली.
१८९३ मध्ये होणार्या World's Columbian Exposition साठी जॉर्ज शिकागोला आला. तिकडे World's Columbian Exposition च्या आयोजकांनी अमेरिकन इंजिनियर्सना आयफेल टॉवरपेक्षा उंच आणि भव्य काहीतरी बांधण्याचं आव्हान दिलं. त्यातूनच जॉर्जच्या डोक्यात फेरीस व्हीलची कल्पना आली. त्याने पाळणे असलेलं, आणि ज्यात बसून लोकं आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेऊ शकतील अशा फेरीस व्हीलची कल्पना मांडली. पण जमिनीच्या इतक्या वर फिरणारं व्हील तोलणं अशक्य आहे असं सांगून आयोजकांनी ते नाकारलं.
पण इथेच हार न मानता अनेक इतर इंजिनियर्सशी सल्लामसलत करून जॉर्जने ही संकल्पना प्रत्यक्षात येणं शक्य आहे हे आयोजकांना पटवून दिलं आणि अखेरीस त्या काळी $४००,००० गुंतवून जगातलं पहिलं फेरीस व्हील आकाराला आलं. या व्हीलला प्रत्ये़की ६० जण बसू शकतील असे ३६ पाळणे होते. म्हणजेच एका खेपेस हे व्हील सुमारे २१६० जणांना सामावून घेऊ शकत असे. World's Columbian Exposition संपेपर्यंत या व्हीलने जवळपास २.५ करोड लोकांना सैर घडवली होती.
हे जॉर्जचं जगातील पहिलंवहिलं फेरीस व्हील
पण World's Columbian Exposition च्या आयोजकांनी जॉर्जचे पैसे चुकते न केल्यामुळे तो प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला, आणि त्याच मानसिक तणावाखाली वयाच्या केवळ ३७ व्या वर्षी २२ नोव्हेंबर, १८९६ रोजी मरण पावला.
तर या वर्षीपासून १४ फेब्रुवारीला आपल्या प्रेमाबरोबरच क्षणभर या इंजिनियरचीसुद्धा आठवण ठेऊयात.

प्रतिक्रिया
गुगल बघा आज चे
रोचक आठवण!! फेरीस व्हीलच्या
मस्त रे प्रथम.
लहानपणापासून ह्याला आकाश
छान
पॅलेस नव्हे किल्ला
चांगली माहिती
मस्त माहिती दिलित.. कायम
अतिशय रोचक घटनाक्रम.
म्हंजे काम झालं की पैशाला
टांग देणे संस्कृती अनादि अनंत
घारे काका, चूक सुधारणेबद्दल
आयोजकांनी पैसे चुकते न केल्यामुळे जॉर्जचे काय झाले असेल
(No subject)