पॅनकेकसाठी साहित्यः
मैदा - १ कप
पिठीसाखर - ४ चमचे
अंडी - २
दुध - १/२ कप
बेकिंग पावडर - १ टि-स्पुन
बटर - २ चमचे (पातळ करुन)
व्हॅनिला इसेन्स - १/२ चमचा
मिठ - १/२ छोटा चमचा
क्रिम आईसिंगसाठी साहित्यः
फ्रेश क्रिम - १ कप
कोको पावडर - १/२ कप
पिठीसाखर - १/२ कप
व्हॅनिला इसेन्स - १/२ चमचा
सजावटीसाठी:
चॉकलेट फ्लेक्स - १ कप
चॉकलेट ट्रफल्स - ४-५
पिठीसाखर - १ चमचा
कृती:
१. पॅनकेक साठी सर्वात आधी बटर वितळवुन घ्यावे.
२. एका बाउल मधे मैदा, पिठीसाखर, मिठ व बेकिंग पावडर मिक्स करावे. दुसर्या बाउल मधे अंडी, बटर, दुध व व्हॅनिला इसेन्स मिक्स करुन घ्यावे.
३. आता मैदा व अंड्याचे मिश्रण एकत्र करुन १ तास बाजुला ठेवावे.
४. १ तासाने, तयार मिश्रणाचे पॅनमधे थोडे बटर लावुन १५-२० पॅनकेक करुन घ्यावेत.
५. हे सर्व पॅनकेक गार करण्यासाठी ठेवुन द्यावे.
१. आता चॉकलेट क्रिम साठी एक मोठे पातेले घेउन त्यात १०-१२ बर्फाचे क्युब्स टाकावेत. त्याच्यावर एका बाउल मधे फ्रेश क्रिम, साखर, कोको पावडर व व्हॅनिला इसेन्स टाकुन egg beater ने २-३ मिनिटे beat करावे.
२. आइसिंग साठी क्रिम तयार आहे.
३. केक करण्यासाठी, सर्व पॅनकेक एखाद्या बशी किंवा वाटीने सारख्या आकारात गोल कापुन घ्यावेत.
४. डिश मधे एक पॅनकेक ठेवावा. त्यावर चॉकलेट क्रिम लावुन, वरती दुसरा पॅनकेक ठेवावा.
५. अशाप्रकारे सर्व पॅनकेक व क्रिमचे लेयर लावुन घ्यावेत. सगळ्यात शेवटी, उरलेले क्रिम, केकला सर्व बाजुंनी लावुन घ्यावे.
६. केकला बाजुने हलक्या हाताने चॉकलेट फ्लेक्स लावुन घ्यावेत. वरतुन चॉकलेट ट्रफल्स व पिठीसाखरेने सजवावे.
७. केक फ्रिज मधे ३-४ तास गार करण्यासाठी ठेवुन द्यावा.
८. व्हॅलेंटाईन स्पेशल चॉकलेट केक खाण्यासाठी तयार आहे.
टिपः
१. बॅटर जास्त thick झाल्यास, तुम्ही दुधाचे प्रमाण वाढवु शकता.
२. तुम्ही ज्या डिश मधे केक present करणार असाल, त्याच डिश मधे पॅनकेक्सचे लेयर लावावेत. एकदा लेयर लावुन झाल्यावर केक उचलुन, दुसर्या प्लेट मधे ठेवायला खुप अवघड आहे.. त्यामुळे त्याच डिश मधे लेयर लावुन, सगळ्यात शेवटी टिश्यु पेपरने बाजुने साफ करावे.
३. आवडत असल्यास तुम्ही लेयरच्या मधे स्ट्रॉबेरी किंबा राजबेरी देखिल वापरु शकता.
तुमच्या व्हॅलेंटाईन सोबत केक enjoy करा. ;)

वाचने
10784
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऊ लालाला ...
खल्लास !!
एक्झॅक्ट्ली .. ते लेयर बघुनच
In reply to खल्लास !! by सूड
ग्राफीक केक
In reply to एक्झॅक्ट्ली .. ते लेयर बघुनच by जेनी...
हा हा हा!! धन्यवाद... केक
In reply to ग्राफीक केक by अभ्या..
वा!
कसला क्लास केक आहे.
खल्लास!!!!
मां कसम... मी कधी असल्या
फोटो तर काय दिसत नैय्येत, पण
(No subject)
भन्नाट स्मायलीये गुर्जि ....
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
खरच... कुठुन कुठुन शोधुन
In reply to भन्नाट स्मायलीये गुर्जि .... by जेनी...
ते यज्ञ करतात यासाठी, ट्रेड
In reply to खरच... कुठुन कुठुन शोधुन by Mrunalini
स्मायली प्रेमींन्नो
In reply to भन्नाट स्मायलीये गुर्जि .... by जेनी...
काय स्मायली आहे
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
अरे देवा! केकचा हा प्रकारही
वा मस्त आहे केक. कौतुक आहे.
विचार
मस्त!
मस्त...!!!
काय भीषण पाकृ दहशवतवाद आहे हा
अरेच्या कोणतेही 'बेकिंग' न
च्यामारी ! भलताच जबरदस्त केक
ऑस्स्म!!
शॉल्लिड
जबरदस्त !
ऑस्सम!!
आई गं.......कसला कातिल आहे गं
बाबो
केकचा वेगळा प्रकार. छानच :)
मिसळपाव हे पाकृ दहशतवादाचं
+१
In reply to मिसळपाव हे पाकृ दहशतवादाचं by प्यारे१
वॉव!!! मस्तच!
खुप छान
एकदम सोप्पा पर्याय म्हणजे...
In reply to खुप छान by दिपक.कुवेत
हम्म....
सुरेख प्रेझेंटेशन ! नक्की
वेगळा!
खल्लास.........
अंडयाचा पर्याय..
In reply to खल्लास......... by स्मिता शितूत
थांक्यू!!!!!!!!!
आयल्ला! लई म्हणजे लईच्च भारी!