(मी कॉपी केली नाही, मी पेस्टही केले नाही)
खुप दिवसांनी काही ओळी सुचल्या आणि ते ही कॉपी पेस्ट न करता . अस्सल स्वतःच्या . बघा आवडतात का
अल्बम - कॉपीपेस्ट वर बोलू काही
मी कॉपी केली नाही, मी पेस्टही केले नाही
मी राईट क्लिक साठी ,कधी माऊस घेतला नाही.....
भवताली सतत चाले, ते इंटरनेट बघताना
कुणी धाग्यातून चिडताना, कुणी एकट्याने लढताना
मी सदस्य होउनी बसलो, फेसबूकवरती जेंव्हा
ते पहायला देखील, मग कुणी राहिले नाही.....
एकच ब्लॉग मी पाहे, मूळ लेखन जिथल्या तेथे
काढूनी प्रिंटही त्याची वेळीच टॅगली पाने
पण झोपेतून एकदम, जागच आली नाही
कुणी लाईकही केले नाही, कुणी लाईटली घेतले नाही......
काढलेला एकच धागा, चाहत्यांची उलटी मुंडी
जालावर अजुनी दिसती, डिलीट पोस्टच्या नोंदी
मी सोम्यालाही भ्यालो, मी गोम्यालाही भ्यालो
मी मनाशी सुध्दा माझ्या,कधी पंगा घेतला नाही
मज जन्म स्थळाचा मिळता, मी ‘याहू’ झालो असतो
वाढवायची असती यादी तर ‘हॉटमेल झालो असतो
मज डिलीट करता कोणी रडलो वा हसलो नाही
मी फॉलो केले नाही अन करुन घेतले नाही
अमोल केळकर
मला इथे भेटा
छान आहे
मी राईट क्लिक साठी ,कधी माऊस
मी राईट क्लिक साठी ,कधी माऊस
:)
मी भरपूर केली कॉपी,मी भरपुर
हा हा हा मस्तच
छान!
मस्त!!
मी सोम्यालाही भ्यालो, मी
मस्तच...
मस्तच
-
हया कवितेस " जालीय " संदर्भ आहे से वाटते !
-
मी कॉपी केली नाही, मी पेस्टही
एकदम भारी.
मस्त!
मी काहिच पहिले नाहि .. मी
आवडले
मी सोम्यालाही भ्यालो, मी
फेसबुकाचा चेहरा
:-)
-