साहित्यः
१. किसलेला कच्चा पपई - १ मध्यम (चित्रात दाखवल्यापेक्षा अजुन बारीक किसता/चीरता आला तर उत्तम)
२. १/२ लिंबाचा रस
३. वरिल लिंबाचीच किसलेली साल - १/२ चमचा
४. सुख्या लाल मिरच्या - २/३ (भरडसर वाटुन) किंवा ओल्या लाल मिरच्या - २ बारिक चीरुन
५. खारे शेंगदाणे मुठभर (सालं काढुन १/२ करुन)
६. चवीनुसार मीठ, साखर किंवा मध
७. कोथिंबीर / पुदिना एच्छिक (बारिक चीरुन)
कॄती:
१. एका बाउल मधे खारे शेंगदाणे सोडुन दिलेलं सर्व साहित्य हलक्या हाताने एकत्र करावे आणि फ्रिज मधे थंड होण्यास ठेवा
२. सर्व करण्याआधी किमान अर्धा-एक तास फ्रिज मधे ठेवा व जेवताना तोंडिलावणे म्हणुन थंडगार आंबट-गोड-तिखट सॅलेड / कोशींबीरीचा आस्वाद घ्या :)
३. आवडत असल्यास ह्यात चेरी टोमॅटो अर्धे करुन घालु शकता
४. खारे शेंगदाणे अगदि आयत्या वेळेस घाला म्हणजे मउ पडणार नाहित
वाचने
6032
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे सॅलड तर चपातीसोबत खाता
सुंदर. आवडेश. दीपक कुवेत फार
+१
In reply to सुंदर. आवडेश. दीपक कुवेत फार by मृत्युन्जय
जबरी
कच्च्या पपईची चटणी
अरे हे काँबिनेशन माहीत नव्हते
In reply to कच्च्या पपईची चटणी by रमेश आठवले
मस्तच!
कच्च्या पपईचं मोहरी चढलेलं लोणचं आठवलं!!
अगदी वेगळी पाकृ. छान.
छान पाकृ
कमी उष्मांक असलेली पाकृ ?
papain
In reply to कमी उष्मांक असलेली पाकृ ? by तर्री
सोपी आणि छान पाकृ. फोटो अगदी
दिपक काका .. दीपक काका ...
अगदी वेगळी,सोपी आणि छान पाकृ.
पूजा आज्जी...
(No subject)
In reply to पूजा आज्जी... by दिपक.कुवेत