( हे अजुन एक खूप जुनं ललित (सप्टे २००८) ! आजकाल बॉल्गवरचा कचरा आवरायला लागले आहे तेव्हा असं काही जुनं पुराणं सापडतं ... ह्या वर्षी कधी नव्हे ते मुंबापुरीत थंडी पडली आहे.. थंडी म्हणजे चांगलीच थंडी ...बा.भ. बोरकरांची "माघामधली प्रभात सुंदर " ही कविता आठवावी इतकी थंडी .... त्या निमित्ताने हे आठवले )
||काकड आरती ||
आज्जी पहाटे पहाटे उठायची.
कार्तिक स्नान महापुण्यवान अस काही तरी म्हणायची .
आम्ही साखरझोपेत असताना, ती थंडगार पाण्याने अंघोळ करायाची .....
अजुन ही आठवत आहेत ते अस्पष्ट से मन्त्र. अजुन ही आठवत आहे ती आजीची गड़बड़....
मग झोपेतून डोळे पुसत पुसत उठलेली आम्ही तिघ-चौघ नातवंड .....ती आज्जीच्या हातातली फुलांची परडी ,त्यातल्या २-४ उदबत्या अन् पारिजातकाच्या फुलाचा तो मंद मंद सुगंध ......
मग
काल्या रामाच्या मदिरातल्या त्या तीन मूर्ती.... दही दूध तुपाने माखलेल्या ......टाळ मृदुन्गाचे स्वर.... एक सुंदरशी काकड़ आरती .......आणि इतर ५-६ आजज्या ... भाव मग्न होउन ,तल्लीन होवून गानारया
" काकड आरती परमात्मया रघुपती , राजाराम रघुपति
जीवी जीवा प्रकाशली कैची निजात्मज्योती |
त्रिगुण काकडा द्वैत घृते तिंबिला ,द्वैत घृते तिंबिला,|
उजळली निजात्मज्योती तेणें जळोनिया गेला |
काजळी ना मैस नाही जळमळ डळमळ ना जळमळ डळमळ |
अवनि ना अंबर , प्रकाश निघोट निश्चळ |
उदयो ना अस्तु तया बोध प्रातःकाळी , तया बोध प्रातःकाळी |
रामी रामदास सहजी सहज ओवाळीं || "
"ए आज्जी ,
दही दूध खायचं सोडून वाया का घालवत आहेत???
रामाचं अंग दहि दुधान चिकट होत असेल ना? त्याला आवडत का तसं??
इथला राम काला? ..अन् तिथला गोरा अस का??
राम नक्की काला की गोरा ???
सांग ना"
असले हे आमचे बालिश प्रश्न ......
अन् सगळ्याना पुरून उरणार तिचं साध सोप्पसं उत्तर
....
...
...
'एक स्मित हास्य '....
....
....
एक समाधानाचा
धन्यतेचा भाव
उभे राहिलेले रोमांच ....आज्जीच्या डोळ्यात तरळणारे ते दोन अश्रुंचे मोती
मग
॥ कल्याण करी रामराया कल्याण करी देवराया ॥
॥ जनहित विवरी ,कल्याण करी राम राया ॥
.................................ते स्मित हास्य तेव्हा काही उलगडलं नाही आम्ही तिन चार भावंड शुन्यात हरवलेली एकामेकाकडं " तुला तरी कळालं का रे" ह्या नजरेने पाहणारी..............
...
...
आत्ता आज्जी नाही...त्या ५-६ आज्या ही नाहीत
पण
तो कार्तिक तसाच...त्यातलं ते थंड पाणी तसच ...
आजी म्हणायची तेच मन्त्र
आमचा जागेवर मात्र दुसरं कोणी तरी साखरझोपेत...
ती काकड़ आरती ........ते स्वर ..........तो पारिजातकाचा सुगंध मात्र तसाच... अगदी तसाच्या तसा !
काला राम ही तसाच ...इतकी वर्ष दुधातुपात नाहुनही अजुन ही तितकाच काला
पण
त्याच्या चेहर्यावर ही एक तसंच स्मित हास्य
अगदी तसाच तो धन्यतेचा समाधानाचा भाव... आज्जी आठवण करुन देणारा
...
...
...
हे स्मित हास्य कधी उलगडनार आहे की नाही रामच जाणे !!!
॥ कल्याण करी रामराया कल्याण करी देवराया ॥
॥ जनहित विवरी ,कल्याण करी राम राया ॥
वाचने
3781
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!
माझीही आज्जी नि पणजी
पहाटेचा अंधार, त्यात गंगेवर
In reply to माझीही आज्जी नि पणजी by मितान
++१
In reply to माझीही आज्जी नि पणजी by मितान
वा!!
In reply to माझीही आज्जी नि पणजी by मितान
मला नरसोबा वाडीची आठवण आली
सुंदर वर्णन.
काकड आरतीचं अगदी सुंदर वर्णन
अगदी आठवण आली आज्जीची! लेखन
सुरेख!
+१
In reply to सुरेख! by स्पंदना
छान लिहिले आहे.
सुंदर, लेखन आवडले.
दुरुस्तीपत्र
आजी आजोबांचं सुख लाभणार नाही
काकडआरती
आवडले.
नशिबवान