अफजल गुरूला फाशी होणार तर.
गृहखात्याने दयेचा अर्ज फेटाळण्याची राष्ट्रपतींना शिफारस केली आहे. आता अनावश्यक आणि काल्पनिक चर्चांना पूर्णविराम मिळायला हरकत नाही.
योग्य निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे अभिनंदन.
भविष्यकाळात क्ष अथवा य या नावाचा एखादा सदस्य (अथवा क्ष आणि य असे दोन सदस्य) मिपावर उपस्थित झाल्यास काय...
भविष्यात असा/ असे सदस्य उपस्थित झाल्यास त्यांना स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नसावी. अमेरिकेत गैरकृष्णवर्णीय व्यक्तिने एन शब्द वापरल्यास अवमानकारक मानले जाते. परंतु तो शब्द अवमानकारक मानला जाण्यापुर्वी जोसेफ कॉन्रॅडने 'द निगर ऑफ नार्सिसस' नावाची कादंबरी लिहिली होती. तसेच आगाथा क्रिस्तीची 'टेन लिटल निगर्स' ही कादंबरी. कॉन्रॅड आणि क्रिस्ती यांनी एन शब्दाचा अवमानकारक वापर केला असे म्हटले जात नाही.
तूर्तास अफझल गुरूस बाजूला ठेऊन सर्वस्वी अराजकीय अशा धनंजय चटर्जीचे उदाहरण घेऊ.
१) धनंजय चटर्जीने एका १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला १९९० साली.
२) सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम केली १९९४ साली.
३) त्याचा दयेचा अर्ज फेटाळला जाऊन त्याला प्रत्यक्ष फाशी दिली गेली २००४ साली.
दिरंगाई येथेही दिसते. कारण ती आपल्या न्यायव्यवस्थेचा अंगभूत भाग आहे. त्यावर चर्चा जरूर व्हावी, राजकीय धुळवडीविना!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अंशतः सहमत.
दिंरगाई ही आपल्या न्यायव्यवस्थेचा अंगभूत भाग आहे.
पण ही दिंरगाई फक्त न्यायव्यवस्थेचाच भाग आहे का?
राजकीय(मंत्रीमंडळ) यंत्रणेचा नाही का? नोकर/प्रशासन(सनदी अधिकारी) यंत्रणेचा नाही का?
या दोन्ही केसेस मधे हे दिसून येते की, न्यायव्यवस्थेकडून(न्यायालय) दिरंगाई झालेली नाही. जी काही अक्षम्य दिंरगाई झालेली आहे ती राजकीय(मंत्रीमंडळ) आणि नोकर/प्रशासन(सनदी अधिकारी) यांच्या कडून झालेली आहे.
ह्या दिरंगाईस कोण जबाबदार आहे? ह्या दिरंगाईचं खापर न्यायालयांवर का फोडावं?
काही फाइली जेव्हा लवकर सरकतात(हेतूपुरस्सर) आणि काही फाइली उशीरा सरकतात(हेतूपुरस्सर) तेव्हा दोष कोणाचा? यंत्रणेचा? हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की फाइली सरकवणारी यंत्रणा ही एखादी मशीन नाही किंवा एखादा Conveyor belt नाही. ही यंत्रणा आहे आमच्या सारखीच माणसे(!).
आणि आमच्या सारखी माणसे म्हटल्यावर काही फायदा/नुकसान बघणे आलंच(फाइल सरकवताना).
[न्यायव्यवस्थेला दोष देण्या आधी हे लक्षात घ्यावं की, न्यायव्यवस्थेचं कार्य सुरळीत आणि आवश्यक त्या क्षमतेनी चालण्याकरीता आवश्यक असणारी साधन सामुग्री, जास्तीच्या नविन ईमारती, न्यायाधिशांची पुरेशी संख्या, त्यांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष मदत करणारा कर्मचारी वर्ग, पुरेसं पोलिससंख्याबळ ह्या सगळ्यांची पुर्तता करणे हे राजकीय(मंत्रीमंडळ) यंत्रणेचं आणि प्रशासन/सनदी अधिकारी यंत्रणेचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यात ह्या दोन्ही यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. न्यायव्यस्थेच्या दिरंगाई मागे किंवा निर्णयाला उशीर होण्यामागे ह्या दोन यंत्रणा कारणीभूत आहेत. स्वतः च्या वैयक्तीक फायद्या करता मात्र ह्या दोन्ही यंत्रणा खुपच तडफदारपणे, प्रभावीपणे, पुर्णक्षमतेने कार्य करताना दिसतात. पण जेव्हा प्रश्न-समस्या इतरांशी/समाजाशी/देशाशी/पिडीतांशी संबंधित असते तेव्हा मात्र अचानक ह्या यंत्रणेला पक्षाघात होतो]
(१) धनंजय चतर्जीच्या केसचा निकाल लागायच्या अगोदर एक वर्षे एक फाशीची शिक्षा अंमलात आण्यण्यात आलेली होती. त्यानंतर ह्यूमन राईट्स वाल्यांनी देहांताच्या शिक्षेविरूद्ध बरीच हालचाल केली. तिचे पडसाद ह्या केसमधे उमटले असावेत. कारण हा नुसता एका आरोपीच्या फाशीचा प्रश्न नव्हता,तर जागतिक स्तरावर देशाच्या इमेजचा प्रश्न होता.
कधीकधी अगदी पुढारलेल्या देशातही असे होऊ शकते. परवाच अमेरिकेत एका खुन्याची देहांताची (फायरिंग स्क्वाडकडून देहांत) शिक्षा अंमलात आणण्यात आली. त्याअगोदर हा खुनी २५ वर्षे 'डेथ रो' वर होता. इथे कायद्याच्या किचकट तरतूदी वगैरे आड आल्या असाव्यात.
(२) एका सर्वसाधारण खुनाच्या आरोपावरील इसमाची केस व संसदेवर हल्ला करणार्या इसमाची केस ह्यात --आरोप शाबित झाल्यानंतरच्या सरकारच्या वर्तणूकीत--काही फरक असावा की नाही?
धनंजय चॅटर्जीच्या बाबतीत ज्या मानवाधिकारवाल्यांचे नाव घेतले आहे तशाच प्रकारच्या मागण्या अफजल गुरूबाबतही झाल्या आहेत. अफजल गुरू डिड नॉट गेट अ फेअर ट्रायल हे भाजपच्या नव्या राज्यसभा खासदाराचे मत आहेच. तसे पडसाद या केस मध्येही पडले असावेत असे मानायचेच नाही का ?
जागतिक इमेजचा प्रश्न म्हणावे तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ पाळली हे दिसणे जास्त महत्त्वाचे आहे.
नितिन थत्ते
चॅटर्जीच्या बाबतीत मुद्दा प्रोसेस ओफ लॉ चा नव्हता तर देहांताची सजा दिली जावी का आजच्ज्या युगात, हा होता. ती तशी २००४ साली दिली गेल्याने गुरुच्या बाबतीत तो मुद्दा पुन्हा लागू करण्याची जरूरी नसावी. ह्यूमन राईट्स वाल्यांनी गुरुला फेयर ट्रायल दिली गेली नाही वगैरे जे काही म्हटले ते मला वाटते त्याच्या पहिल्या (सेशन्स कोर्टातील ) निकालाविषयी. त्यानंतर वरील दोन कोर्टांनी निकालावर शिक्कामोर्तब केलेले आहे. त्यानंतर तो ह्यू. रा. धुरळा केव्हाच खाली बसला आहे. सर्व न्यायप्रक्रिया नीट पार पाडून शिक्षा अंमलात आणली जात आहे हे पाहिल्यावर जागतिक इमेज बळकटच होईल-- जसे आता (म्हणजे सध्यातरी) कसाबच्या बाबतीतही हे होत आहे.
पण न्यायप्रक्रिया नीट होऊनही दिली गेलेली शिक्षा वेळच्यावेळी अंमलात न आणल्याने मात्र देशाची जागतिक, व विशेषेंकरून दहशतवादी जगतात फारच (निरनिराळ्या अर्थांनी) वाईट होण्याची शक्यताच जास्त, नाही का?
दहशतवाद्याला फाशी झाली की नाही यावर दहशतवादी जगाचे प्लॅन अवलंबून नसतात.
कान्हेरेला फाशी झाली म्हणून भगतसिंग निर्माण व्हायचे थांबत नाहीत. (कान्हेरे - भगतसिंग दहशतवादी होते/नव्हते यावरून येथे चर्चा सुरू करू नये. हे केवळ उदाहरण आहे.)
नितिन थत्ते
हे कळलं नाही ब्वॉ.
कुठल्याही शिक्षेने कुठलाही गुन्हा (ना चोरी,ना दरोडेखोरी ना इतर गुन्हे)पूर्णपणे संपत नाही.(Generalization करणं भाग पडलं. क्षमस्व. )
म्हणुन " शिक्षा देण्यात काय तथ्य आहे मग?" असं म्हणणं किंवा शिक्षेला होणार्या अतिरेकी विलंबाला पाठिंबा देणं कसं काय बरोबर ठरु शकतं?
"दहशतवाद्याला फाशी झाली की नाही यावर दहशतवादी जगाचे प्लॅन अवलंबून नसतात. " ह्या वाक्यातुन नक्की काय म्हणायचय ते कळलं नाही.
आपलाच,
मनोबा
दहशतवाद्याला फाशी झाली की नाही यावर दहशतवादी जगाचे प्लॅन अवलंबून नसतात.
कान्हेरेला फाशी झाली म्हणून भगतसिंग निर्माण व्हायचे थांबत नाहीत.
==========================================
वरील वाक्य हे, अफझल गुरू ला फाशी देउ नये ह्याचं समर्थन आहे का?
इस्राएलचे उदाहरण तुम्ही दिलेत, त्याचे खंडन करून झाले. जरा जगात आजूबाजूस (म्हणजे आपल्या भारतभूमिच्या पलिकडे) पाहिले तर हे लक्षात यावे की दहशतवादाचा मुकाबला खंबीरपणे जिथे सातत्याने केला जात आहे तेथे घातपाताचे प्रयत्न कमीकमी होत गेले आहेत. अमेरिका, यू. के, स्पेन, इस्राएल, इंडोनेशिया (तोच तो!!!), चीन (क्षिंज्यांगमधील प्रयत्न, तिबेटातील उठाव), चेचेन्या, श्रीलंका..... किती उदाहरणे द्यायची?
ह्याउलट भारत, फिलीपीन्स, थायलंड इथे खंबीर व सातत्यपूर्ण उपाययोजना नाहीत, तेव्हा अनेक रंगांच्या व ढंगांच्या दहशतवाद्यांना इथे रान मोकळे आहे.
गुरूच्या शिक्षेच्या अंमलबजावणीतील दिरंगाईवरून सुरू केलेली ही चर्चा आता दुसर्याच दिशेने सरकत आहे, त्यातून भगतसिंग वगैरे उल्लेख आले की ती मूळ चर्चाविषया अजूनही दूर जाईल, ह्यात कुणाला शंका नसावी!!
अतिरेक्याला फाशी होते की नाही ह्यावर नव्या अतिरेक्यांचे प्ल्यान ठरत नाहीत हे विधान साफ बिनबुडाचे आहे.
रवींद्र म्हात्रेंचे अपहरण. मकबूल भटला सोडवण्यासाठी अतिरेक्यांनी रवींद्र म्हात्रेंचे अपहरण केले. त्यांना ठार केले. जर मकबूल भटला आधीच फाशी दिले असते तर अतिरेक्यांनी म्हात्रेंचे अपहरण केले नसते.
कंदाहार विमान अपहरण. भारताच्या ताब्यात असणारे अतिरेकी सोडवून घेण्याकरता केलेला नवा अतिरेक. जर भारताच्या ताब्यात असणारे अतिरेकी फासावर लटकवले असते तर अपहरण घडले नसते.
नंतर वाद नको म्हणून सांगतो. विमान सोडवून घेण्यासाठी अतिरेकी सोडण्याची संघवादी, राष्ट्रप्रेमी, पोलादी कण्याच्या आणि बाण्याच्या भाजप सरकारची कृती मला आजिबात पटली नव्हती.
अजून अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा सरकारच्या अतिरेकींचे काय होत आहे ह्यावर अतिरेक्यांचे प्ल्यान अनेकदा ठरले आहेत.
भारताच्या संसदेवर हल्ला झाला ही गंभीरच गोष्ट होती.
पण
त्यावेळी देशाचे गृहमंत्री कोण होते.
त्यांची याबाबतीत जबाबदारी काय ?
त्यावेळी त्यांनी राजीनामा देला होता का !
त्या निमित्ताने तिहार जेल चे अधीक्षक मनोज द्विवेदी यांनी गुरु वरिल लिहीलेले पुस्तक लवकरीच प्रकाशित होऊन वाचनात येवो.
http://pradeshtoday.com/new_details.php?news=Afzal+Guru+Brahmin+ancestors!
पुस्तक प्रकाशनाच्या प्रतिक्षेत ...
~ वाहीदा
अरुंधती राय ही पागल झाल्याने काहीही बडबडत आहे,' तिने हँगिंग ऑफ अफझल गुरू' या आपल्या पुस्तकात अफझल गुरूला फाशी देण्याचा निर्णय लोकशाहीविरोधी ठरवून सरकारवर टीका केली आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19018742.cms
प्रतिक्रिया
रेट्रोअॅक्टिव
दिरंगाई
उपयोगी माहिती
कसाबचा निकाल आणि गुरुची फाईल हलण्याचे टायमिंग
सहमत
खरे आहे, पण
म्हणूनच
गल्लत
इमेज
"दहशतवाद्याला फाशी झाली की नाही यावर दहशतवादी जगाचे प्लॅन ..."
थत्ते साहेब..
नाही.
असहमत
साफ चूक
थँक्यू
सरकार आणि तमाम भारतीयांचे
कॉग्रेस व कॉग्रेसचे खंदे समर्थक
भारताच्या संसदेवर हल्ला झाला
सहमत आहे. याविषयावर एकदा
-
ब्रह्मास्त्र वाया घालवले
त्या निमित्ताने द्विवेदी यांचे गुरु वरील पुस्तक प्रकाशित व्हावे
अरुंधती राय ही पागल झाल्याने
पागल
मला तर ती मोठी पुरोगामी विचारवंत वाटते.
बाइने एवढ्या जलद अफझल वर पुस्तक पण लिहले?