आपल्याकडे कला पदवीधरांचे पीक बेसुमार आहे. हा एक असा मोठा गट आहे जो सध्याच्या प्रगतीच्या वार्यापासून कोसो दूर रहिला आहे. शेती परवडत नाही, व्यवसायासाठी भांडवल/मार्गदर्शन नाही, इंग्रजी येत नसल्याने कॉल सेंटर सारख्या नोकर्या मिळत नाहीत, कॉमर्स शिकल्याले नसल्याने बँकांच्या/वित्तीय संस्थांच्या नोकर्या मिळत नाहीत, विज्ञान/तंत्रशिक्षण झालेले नसल्याने कारखान्यांमध्ये नोकर्या मिळत नाहीत... अशी या पदवीधरांची शोकांतिका आहे. हा तरुण वर्ग मग कारखाण्यांमध्ये कामगार बनतो वा कारकून/चपराशी/हवालदार अशा नोकर्या मिळवण्यासाठी लाखोंची गर्दी करतो (उदा. या आठवड्यातली पोलीस भरती).
रोजगार मिळवण्यात सर्वांत जास्त हाल होतात ते कला विषयातल्या महिला पदवीधारकांना. कारण वरील सर्व सामाजिक समस्यांबरोबरच त्यांना घरातल्या समस्यांना/जबाबदार्यांना तोंड द्यावे लागते. लग्न, नवरा, मुलेबाळे, घरकाम या सगळ्या कसरती करत त्या बिचार्यांनी रोजगाराच्या नव्या संधींचा शोध कसा घ्यावा?
पुण्यात माझ्या परिचयातल्या बर्याच कुटुंबात हा प्रश्न आहे. तरुण महिलांना स्वतः काहीतरी करायचे आहे पण काय करता येऊ शकेल याची कल्पना नाही. अशा महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी काही संस्था आहेत का? अथवा तुम्हाला कोणाला या महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शन करता येईल का?
आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत....
वाचने
4809
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
सकाळ
मिटकॉन
प्रादेशिक!
कदाचित थोडं अवांतर
बेअरफुट
In reply to कदाचित थोडं अवांतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद!