रविवार सकाळ आणि समोर ढीगभर पुरवण्यांसहित पडलेले पेपर्स.. अशा वेळेला पोहे, शिरा, उपमा असे हपीसकॅन्टीनी नाश्ते समोर येऊ नयेत असं वाटतं. मटार करंजी किंवा शेप बदलून त्याचेच मटारसामोसे असा खुसखुशीत पदार्थ पेपरमधल्या वैचारिक लेखांसोबत मस्त.
आजच हा पदार्थ बनवता बनवता लाईव्ह इथे अपलोडवतोय. यापूर्वीही पेठकरकाका आणि इतर सन्माननीय बल्लवाचार्यांनी या पदार्थाच्या वेगवेगळ्या व्हेरिएशन्स इथे दिलेल्या आहेत. पण आज पुन्हा एकदा ही ताजी गरमागरम पेशकश.
साहित्यः टीप - इथे चित्रात दाखवलेलं साहित्य मोजण्यापूर्वीच्या स्थितीतलं आहे.
१. दोन वाट्या मटार:
२. सात आठ पाकळ्या लसूण, दीड इंच आलं, पाच सहा मिरच्या.. (या स्वतःच्या जबाबदारीवर वाढवता येतील.)
३. कोथिंबीर.. भरपूर... पण ही नंतर वरुन घालायची आहे
४. लिंबू, अर्धं
५. साखर एक चमचा
६. हिंग आणि हळद चिमटीभर किंवा आवडीप्रमाणे
७. कांदा बारीक चिरुन (वाटीभर), आणि गरम मसाला दोन्ही ऑप्शनल
८. ओलं खोबरं (खोवलेलं) एक वाटी
आता पुढचं..
मिरच्या, लसूण, आलं मिक्सरमधे वाटून घ्या..
मटार किंचित तेलावर वाफवत ठेवायचे. थोडेसेच वाफवले गेले की कांदा (ऑप्शनल), खोवलेलं खोबरं, हिंग, हळद, साखर, कोथिंबीर, मीठ घालून झाकण ठेवून आणखी जरा वाफवा.
मटार मऊ झाले की आधी वाटलेलं आलं, लसूण, मिरची मिश्रण ऊर्फ खर्डा त्यात मिसळा.
वरुन थोडं जिरं आणि गरम मसाला (ऑप्शनल) .. गरम मसाला काहींना फार आवडतो तर काहींना अजिबात नाही. मी दुसर्या प्रकारातला.
यात चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा हे सर्व जरासं वाफवून डावाने चेचून घ्या.. झेझरणे हा शब्द फिट्ट बसेल इथे..
मग हे सारण ग्यासवरुन उतरवुन गार करा. त्यात वरुन अर्धं लिंबू पिळा..
वरच्या पारीसाठी.. जर खुसखुशीत पारी हवी असेल तर मैदा हवा. अन्यथा टाळता येईल.
दीड वाटी कणीक, अर्धी वाटी मैदा (ऑप्शनल).. मैदा न वापराल तर दोन वाट्या कणीक.
दोन मोठे चमचे गरम तेल घालून अतिशय घट्ट भिजवावं. घरातल्या स्त्रीवर्गाची मदत घ्यावी आणि एकदाच त्यांच्याकडून कणकेचं तंत्र शिकून घ्यावं.
कणकेच्या लाट्या करुन मग त्यांचं लाटण्याने पुरीत रुपांतर करा. त्यात वरचं गार झालेलं सारण भरा.
टॅकोप्रमाणे दुमडून नंतर गठडी वळा. मग कातण्याने न कातता, चिमटींनी दाबून दाबून मुरड, दुमड घाला..हॅ हॅ..तेवढीच तेलात फुटण्याची शक्यता कमी होईल..
तेल कढईत तापत ठेवा. उत्तम तापल्याची खात्री करुन त्यात बेताने करंजी सोडा. खुसखुशीत तांबूस तळल्या गेल्या की निथळून काढा.
टॉमॅटो चिली सॉस, चिंचगुळाची चटणी, ओल्या खोबर्याची चटणी, किंवा पुदिन्याची चटणी यापैकी कशाहीमधे बुडवून फुंकत फुंकत वाफाळत्या खुसखुशीत करंज्या खाता येतील. कणकेची पट्टी बनवून सामोश्याचा आकार दिला तर याचाच सामोसा बनेल हे वेगळं सांगायला नको.
आज पेपर्सना सुट्टी आहे, पण कालच्या पुरवण्या तोंडी लावायला घेतल्या आहेत. अक्षरशः लाईव्ह पाककृती सादर केली आहे, आणि आता मात्र समोर तयार करंज्यांचं ताट घेऊन यापेक्षा जास्त टंकन शक्य नाही.. या करंज्या गार होऊ देणं म्हणजे महापाप..
तेव्हा लेखनसीमा.

वाचने
22146
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख.....
तोंपासु
मान्य.. बदल केला. धन्यवाद..
In reply to तोंपासु by ज्ञानोबाचे पैजार
अतिशय सुरेख
खमंग!
वा लेको, करा चैन!! खा रोज
+१
In reply to वा लेको, करा चैन!! खा रोज by बॅटमॅन
+२
In reply to वा लेको, करा चैन!! खा रोज by बॅटमॅन
कोटिनंदन
In reply to +२ by नंदन
+३
In reply to वा लेको, करा चैन!! खा रोज by बॅटमॅन
मस्तय!
अहाहाहा...
मस्त..
च्यायला
मस्त
मस्त.
मस्तच!
अशाच आयत्या करंज्या...
झक्कास!!
संपादक झाल्यापासून किसनाच्या
In reply to झक्कास!! by किसन शिंदे
उ.सं.डु
In reply to संपादक झाल्यापासून किसनाच्या by सूड
व्हॉट इज उ.सं.डु?
In reply to उ.सं.डु by नंदन
उसंडु= उपसंपादकाच्या डुलक्या.
In reply to व्हॉट इज उ.सं.डु? by यशोधरा
भारी शब्द आहे!
In reply to उसंडु= उपसंपादकाच्या डुलक्या. by बॅटमॅन
'अमृत' मासिक.
In reply to भारी शब्द आहे! by यशोधरा
"अमृत" या रीडर्स डायजेस्ट
In reply to 'अमृत' मासिक. by प्रभाकर पेठकर
हाहाहा आवळले वाला भीषण आहे
In reply to "अमृत" या रीडर्स डायजेस्ट by गवि
करंज्यांची दुमड अगदी मस्तच
मस्त
तुम्ही बनविलेल्या मटार
खल्लास...
गवि काका माझा अत्यंत आवडीचा
हो तर.. लाईव्ह काम केलं की
In reply to गवि काका माझा अत्यंत आवडीचा by jaypal
व्वा व्वा... अगदी तोंपासु...
झेझरणे हा शब्द फिट्ट बसेल इथे
झेझरणे हा शब्द फिट्ट बसेल इथेसापडला, सापडला ... हाच शब्द केव्हाचा शोधत होते ( तुमच्या 'दास्ताने आवारगी' मधला..) तुमच्या 'जळ-ली' मध्ये टाकायला विसरला असाल तर सुचविण्यासाठी... आणखी एक्, तुमचा असाच आवडीचा शब्द... झळंबणे.. तो ह्या पाकृ मध्ये दिसला नाही कुठे आणि 'जळ-ली' मध्येही.... :) पाकृ आवडली .. पण आम्हाला संध्याकाळ साठी... स्वगतः आता येथे घरातला स्त्रीवर्ग शोधणे आले.. :)व्वा व्वा... अगदी तोंपासु...
वा!! छानच.
मस्त.
सहीच...
(No subject)
कालच करुन हाणण्यात आल्या आहेत
मस्त
एक नंबर!
भल्या माणसा मिपाचा एखादं तरी
मस्त....
मटार करंज्या एकदम मस्त
मटार करंज्या एकदम
अगदी निगुतीने केल्या आहेत.
खुसखूशीत न मस्त....
फोटो आणि डिट्टेल पाकॄ बहिणीला
अगदि छान...
मीरु तेलुगु माटलाडतुन्नारु
In reply to अगदि छान... by कुलभूषण
(No subject)
In reply to मीरु तेलुगु माटलाडतुन्नारु by बॅटमॅन
व्वा काय खत्रा आहे, मटार
_/\_
मस्त आहे मटार करंजी
मटार करंज्या आन रेसिपी एक्दम
उफ्फ
असेच म्हणते.............
In reply to उफ्फ by शुचि
अहाहा...निव्वळ अप्रतिम..
हम्म..
In reply to अहाहा...निव्वळ अप्रतिम.. by प्रेरणा पित्रे
मस्तच आहे !!
-^-
अहाहा
अहाहा
हुम्म्म
In reply to अहाहा by श्रीरंग_जोशी
गवि आणि इतर जाणकार पाकतज्ज्ञ:
मस्तच गवि दा.