आईसक्रीम....लहानांनपासून म्हातार्या-कोतार्यापर्यतचा एक आवडता प्रकार. आईसक्रीम न आवडणारा बहूधा विराळाच. आता तर काय सगळ्याच गोष्टी सहज मिळतात पण लहानपणी मिळालेल्या प्रत्येक गोष्टीच अप्रुप असायच...त्यातलच एक आईसक्रीम. समुद्रावर मनसोक्त खेळल्यावर भेळ, शेवपुरी किंवा कधी कधी भाजलेलं मक्याचं कणीस हे तर असायचंच पण सांगता शेवटी आईसक्रीमनेच व्हायची. हि उत्सुकता / ओढ शेवटी घरी फ्रिज आल्यावर संपली. मला आठवतय आईने जेव्हा पहिल्यांदा घरी आईसक्रीम केलं तेव्हा दर पाच मिनटानी मी आणि बहीण फ्रिज उघडुन पहायचो....कितपत घट्ट झालय ते आणि खाताना तोंड जरी चालु असलं तरी कान टवकारलेले असायचे कि आई डबा कोणाला संपवायला सांगते. बाहेर खेळताना येता जाता एक एक चमचा खाण्याचा आनंद तर केवळ अवर्णनीय.....त्यावरुन आईचा मारहि खाल्लाय. असो लिहिता लिहिता फार भावनिक व्हायला झालं....काय करणार आईसक्रीम बद्द्लच्या आठवणी आहेतच ईतक्या गोड! चला तर मग परत एकदा घरी केलेल्या आईसक्रीमची चव चाखुया.
साहित्यः
१. किवी - ३
२. अवकादो - २ मध्यम
३. साखर - किवीच्या आंबटपणानुसार कमी/जास्त
४. नारळाचं घट्ट दूध - १ कप
५. काळ्या मनुका - मुठभर (एक ३-४ तास पाण्यात भिजवुन ठेवणे; थोडया सजावटिकरता बाजुला ठेवा)
६. दूध - १ कप
७. ताजं क्रीम - १/२ कप
कृती:
१. किवी / अवकादो सोलुन त्यावे मध्यम तुकडे करा
२. आता मिक्सर मधे तुकडे केलेले किवी/अवकादो/साखर आणि दुध एकत्र करुन मिश्रण स्मुथ होईस्त ब्लेंड करा
३. अवकादो मुळे मिश्रण घट्ट होईल तेव्हा लागेल तसं दुध घालुन बेताचं घट्ट होईल अस पहा
४. आता एका बाउल मधे नारळाच घट्ट दूध आणि फ्रेश क्रिम एकत्र करा. मिश्रणात गुठळि न होण्यासाठि एक/दोनदा गाळण्यातुन गाळुन घ्या
५. आता त्याच बाउल मधे किवी/अवकादोचं मिश्रण घाला व भिजवलेल्या काळ्या मनुका घालुन हळुवार एकत्र करा
६. ज्या भांड्यात आईसक्रिम सेट करायचय त्या भांड्यात ओतुन डिप फ्रिजर मधे ठेवा
७. एक ५-६ तासात आईसक्रिम सेट झालं कि वरुन काळ्या मनुका/पुदिना पान लावुन सर्व करा.....:)
८. अवकादो आणि क्रिम मुळे आईसक्रिम मस्त स्मु.......थ होतं
९. आवडत असल्यास ह्यात काजु, बदाम / पिस्ते घालु शकता

वाचने
8001
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो पाहून वाईट्ट रीतीने
अग्गाग्गा!
अरे दुष्टात्म्या!
हे अवकादो, किवी काय आहे?
जबरा ...............ट !!
अर्र्रे बापरे!!!!
वाह!!
फोटो काय जब्राट आहे.
एकच का ?
In reply to फोटो काय जब्राट आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिशय आवडता फ्लेवर आहे!
कन्च्या हाटेलात वो?
In reply to अतिशय आवडता फ्लेवर आहे! by अग्निकोल्हा
कल्याणी नगरला एग्ग्झॅक्टली
In reply to अतिशय आवडता फ्लेवर आहे! by अग्निकोल्हा
कल्याणीनगरचं गोल्ड अॅडलॅब मल्टिप्लेक्स!
In reply to कल्याणी नगरला एग्ग्झॅक्टली by गणामास्तर
छान. अव्होकॅडोचं आईस्क्रीम
अरे रे
मस्त्, मस्त् ,मस्त...........
लै भारी!
किवीत मध्यभागी ढीगाने असणार्
(No subject)
+१
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
+२ अगदी अस्सेच
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
अयय्य्यो
लई भारी, पण करुन खाण्याएवढा
ब्येस्ट फोटो
In reply to लई भारी, पण करुन खाण्याएवढा by ५० फक्त
अफलातून रेसिपी आहे
धन्यवाद लोक्स....
ओह्ह ओके ...
In reply to धन्यवाद लोक्स.... by दिपक.कुवेत
मस्त..
अवाकाडो एवढे आवडत नाही.. पण
आईसक्रीम छान !! पण ....
धन्यवाद पुजा आज्जी
+१.
In reply to धन्यवाद पुजा आज्जी by दिपक.कुवेत
(No subject)
In reply to धन्यवाद पुजा आज्जी by दिपक.कुवेत
ह्यो दीपक कोन हाय?
जबरदस्त आणि मनमोहक!
काल पडलेला बर्फ आणि चालु
मस्त!
मी आईसक्रीम न आवडणारी..
वुप्पी......
झक्कास
पाहून त्रास होतो.