Skip to main content

हिंसा आणि अहिंसा...

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 02/02/2013 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
मोहनदास करमचंद गांधी यांच्यासंदर्भात दोन-तीन धागे गेल्या काही दिवसांत मिपावर चर्चेत आले आहेत. काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. धाग्यांवरील चर्चेत काही जण गांधी यांच्या अहिंसावादाचे समर्थक आहेत. बाकी काही जण त्याचे विरोधक आहेत. ते असो. जे अहिंसेचे विरोधक आहेत, त्यांच्या मांडणीतून काही गोष्टी मला जाणवल्या (हे माझे आकलन, समज वगैरे आहे): १. गांधींनी मांडलेली अहिंसा ही एक प्रकारे कमजोरीच असते, तो भ्याडपणा असतो. २. गांधींची हत्या समर्थनीय ठरू शकते, कारण नथुराम गोडसे यांची (यांची, याची नव्हे) तशी राष्ट्रविषयक, मातृभूमीविषयक धारणा होती. ३. हिंसेला उत्तर अहिंसा हे असू शकत नाही, तिथे हिंसा करावीच लागते. गांधींच्या अहिंसेविषयीचे ज्याचे-त्याचे आकलन, समज वगैरे काहीही असो. माझ्या आकलनात आणि समजेनुसार काही प्रश्न निर्माण झालेच. भारतात एक राजकीय पक्ष आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) असे त्याचे नाव आहे. या पक्षावर बंदी आहे. पण त्या पक्षाचे 'कार्य' सुरू असते. या पक्षाने हिंसेचे तत्वज्ञान केले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार राज्यसंस्था हिंसा करतेच, 'आहे रे' वर्ग हिंसा करत असतोच. त्याला प्रत्युत्तर हिंसेचेच असू शकते, म्हणून आमच्या (तथाकथित) हिंसेकडे त्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. आता मला असे दिसते आहे की, गांधींचा मारेकरी आणि त्याच्या बाजूने होत असलेले तत्वज्ञान हे 'हिंसा हा सामाजिक परिवर्तनाचा (यात सारे काही आले) एक मार्ग (किंवा साधन म्हणा) आहे' अशाच स्वरूपाचा आहे. माझ्यासमोरचे प्रश्न आहेत: नथुरामवादी व माओवादी या दोघांना एक मानायचे का? नथुरामवादी व माओवादी समधर्मी नसतील तर त्यांच्यातील फरक कशाच्या आधारे करावयाचा? मला फक्त या साम्यस्थळांचा किंवा त्यांच्यातील भेदाचा विचारविमर्ष अपेक्षीत आहे आणि तो करताना हिंसा हा मुद्दा यावा.

वाचने 19933
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

In reply to by नगरीनिरंजन

>>>अहिंसेचं तत्त्वज्ञान हे इंडस्ट्रिअल सिव्हिलायझेशनसाठी उपयुक्त असलेलं दुतोंडी तत्त्वज्ञान झालं आहे यात शंका नाही. म्हणूनच जन्माने अनेक भांडवलदारांना आणि भांडवलशाही प्रायोजित विचारवंतांना हल्ली गांधीविचारांवर गदगदून बोलतांना पाहिलेले आहे.

In reply to by नाना चेंगट

जन्माने या शब्दाऐवजी जनतेने असा शब्द वाचावा. प्रतिक्रिया संपादनाची सोय सर्वसामान्य सदस्यांना कधी मिळणार आहे संस्थापक जाणे. काही संपादक मंडळी मात्र त्यांचे स्वतःचे प्रतिसाद पन्नास वेळा संपादित करतात. सर्वसामान्य सदस्यांना जी सोय नाही ती आपण वापरु नये असा गांधीवादी विचार त्यांच्या मनात येत नसेल का ? पण हीच मंडळी गांधीवाद मात्र कित्ती कित्ती भारी यावर प्रवचन झोडतील. दुतोंडी पणा हा असा असतो. ही सुद्धा एक प्रकारे हिंसाच नव्हे का? असो.

प्रस्थापित व्यवस्थेचे नियम पाळूनच ते लढले तर आम्ही थोडीफार सहानुभूति देऊ फारतर; पण जास्त आवाज केला तर गोळ्या घातल्या जातील आणि ते आम्हाला मान्य असेल. नगरीनिरंजन - यांच्या मतांशी सहमत.

वाचली सगळे चर्चा. "नथुरामवादी व माओवादी या दोघांना एक मानायचे का?" याच धर्तीवर अजून एक प्रश्न मनात उद्भवला, 'न आवडणार्‍या प्रतिक्रिया खोडून काढण्यासाठी वाद घालणारे सदस्य, आणि न आवडणार्‍या प्रतिक्रिया खोडून टाकणारे संपादक समधर्मी मानायचे का?' ;)

इतके दिवस इथे काही लिहायला घाबरत होते. पण लिहितेच. मला कळलेले: १. गांधीजींच्या अहिंसेचे विरोधक हे हिंसेचे समर्थक असतीलच असे नाही. ते निव्वळ गोंधळलेले असू शकतात. २. अतिशय घाबरलेला प्राणी कधी कधी तीव्र हल्ला/प्रतिहल्ला करतो. म्हणजे अहिंसा हा भ्याडपणा आहे असे ठामपणे म्हणता येणार नाही. ३. हिंसेला उत्तर म्हणून हिंसा करायला पाहिजे असे नाही. यशस्वी माघार किंवा पळ काढणे एवढे सोपे उत्तर असू शकते. विशेषतः हिंसा करणारा जास्त ताकतवान असेल तेव्हा. ४. नथुरामाने केला तो खून होता. त्याला वेगवेगळ्या कारणाने कोणी पाठिंबा देत असतील, पण नथुरामवाद असे काही नाही. ५. राहीने म्हटल्याप्रमाणे माओवादी जेव्हा राज्यकर्ते होतील तेव्हा त्यांच्याविरुद्ध हिंसा करणारे कोणीतरी तयार होतीलच. माओवादी, नक्षलवादी चळवळी या विशुद्ध तत्त्वज्ञानावर चालतात असे समजणे भाबडेपणा ठरेल. त्यांच्या मागे राजकारण हा मोठा घटक आहे. नाहीतर नक्षल्यांनी पाकिस्तान आणि चीनची मदत का घेतली असती? ६. एखादा आपला जवळचा माणूस जर नक्षलवादी/माओवादी यांच्या हिंसेच्या तत्त्वज्ञानाचा बळी ठरला तर असल्या तत्त्वज्ञानाला कोण पाठिंबा देईल? ७.
हिंसा हा सामाजिक परिवर्तनाचा (यात सारे काही आले) एक मार्ग (किंवा साधन म्हणा) आहे
२/४ किंवा अगदी २/४ हजार माणसांची हत्या करून सामाजिक परिवर्तन कसे होईल? त्यांची जागा दुसरे कोणीतरी अबक घेतील. माणूस हा समाजाचा एक फार लहान हिस्सा असतो. सामाजिक परिवर्तन वगैरे व्हायला फार मोठा कालावधी जावा लागतो. हिंसा करून जर कोणी परिवर्तन करू बघत असतील तर लोक त्यांना फक्त घाबरायला लागतील. बदलणार नाहीत. हिंसेच्या या तत्त्वज्ञानातच घोळ आहे.

नक्षलवाद्यांनी नुकत्याच घडवलेल्या हत्याकांडांनंतर ह्या लेखामधली चर्चा आणि संदर्भ पुन्हा ताजे झाले ..