गेल्या काही वर्षांपासून भारताचा चेहरामोहराच पार बदलत चाललाय. श्रीमंतीचे बेफाट वारे वाहायला लागलेत. (आता हे वारे कुठून कुठे, आणि कुठल्या भागात कसे वाहतायत हे मी "वेगळं" सांगायला नकोच.) तरी याच श्रीमंतीच्या विश्वातला मैलाचा दगड सध्या मुंबईच्या वरळी भागात उभा राहतोय. त्याचं नाव "पॅलेस रॉयल".
सध्या एका प्रोजेक्टसाठी कान्साई नेरोलॅक च्या हेड ऑफिसला लोअर परेल ला जावं लागतंय. तिकडेच पहिल्यांदा गेल्यावर या पॅलेस महाशयांचं दर्शन झालं. लोअर परेल वरून वरळी नाक्याकडे जाणार्या गणपतराव कदम मार्गावर श्री राम मिलच्या जागेवर सध्या ही वास्तू आकार घेत आहे. पहिल्या दिवशी पाहताक्षणीच या इमारतीची भव्यता डोळ्यांचं पारणं फेडून गेली. तिची उंची पाहताच ही काही तिथल्या इतर चार चौघींसारखी २५-३० माळ्यांची साधीसुधी इमारत नाही याचा अंदाज आला. आणि म्हणून एके दिवशी काम आटपून हापिसातून बाहेर आल्यानंतर मुद्दाम वेळ काढून इमारतीसमोरील फूटपाथवर बराच वेळ घालवून तिच्याकडे याचि देहि, याचि डोळा बघून घेतलं. आणि अस्सल आम आदमीप्रमाणे तिचे मजले मोजायचा कार्यक्रम सुरू केला. पण मोजमाप क्षेत्रातला माझा वावर फारच सामान्य असल्यामुळे अर्थातच पहिल्यांदा त्यात अपयश आलं. पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते या वाक्यावर नितांत विश्वास ठेऊन मी तो कार्यक्रम सुरूच ठेवला, आणि अखेरीस तिसर्या की चौथ्या खेपेस यश आलंच, आणि सध्या बांधकाम सुरू असलेला मजला हा ७४ वा आहे हे कळलं.
मग हळूहळू नेरोलॅक मधले काही साथीदार आणि विकीपेडियाकडून तिची बाकी माहिती कळली. श्री राम अर्बन ईन्फ्रास्ट्रक्चर्स लि. यांनी या इमारतीचं बांधकाम २००५ साली सुरू केलंय, आणि २०१३ मध्ये ते पूर्णत्वाला जाणं अपेक्षित होतं. (पण सध्या फक्त मजले बांधून झालेत असं दिसतंय.) या इमारतीची उंची ३२० मीटर च्या आसपास असेल असा अंदाज आहे, आणि ते खरं असेल तर पॅलेस रॉयल ही भारतातली पहिली,आणि जगातली १४ वी सर्वात उंच इमारत असेल.
इमारतीमध्ये सुविधा अर्थातच सगळ्या प्रचंड उच्चभ्रू प्रतिच्या असणार आहेत. प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र पार्किंग, अॅम्फिथिएटर, स्पा, प्रत्येक फ्लॅटधारकाला स्वतंत्र जॅकुझी, एकूण ६ तरणतलाव, मिनी क्रिकेट स्टेडियम, आणि फूटबॉल स्टेडियमसुद्धा असणार आहे. आणि ते पण चक्क ५०व्या मजल्यावर !!
घरांच्या किंमती अर्थात आपण स्व्प्नात पाहणार्या स्वप्नातल्या स्वप्नातसुद्धा परवडणार नाहीत अशा असणार आहेत. (किमान ५५ करोड ते कमाल २५० करोड).
असो, पॅलेस रॉयलमध्ये घर घेणं जरी आपल्याला शक्य नसलं, तरी उंच इमारतींच्या यादीत आता आपल्या भारताचंसुद्धा नाव खूप वरच्या क्रमांकावर येईल याचा अभिमान वाटण्यास काय हरकत आहे?
पॅलेस रॉयल, मुंबई.
फूटपाथवरून काढलेला फोटु.
महालक्ष्मी रेसकोर्सकडून दिसणारा पॅलेस रॉयल.

फूटपाथवरून काढलेला फोटु.
महालक्ष्मी रेसकोर्सकडून दिसणारा पॅलेस रॉयल.

वाचने
6530
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम.
(No subject)
अरे बापरे! खरच उंच आहे
काही दिवसांपूर्वी "नागू
ह्यात दांभीकपणा तो काय?
In reply to काही दिवसांपूर्वी "नागू by आदूबाळ
>>ह्यात दांभीकपणा तो काय?
In reply to ह्यात दांभीकपणा तो काय? by अनुराधा१९८०
अनुराधाताई, काहीतरी गडबड होते
In reply to ह्यात दांभीकपणा तो काय? by अनुराधा१९८०
दांभिकपणा कुठे आहे असेच मी
In reply to अनुराधाताई, काहीतरी गडबड होते by आदूबाळ
दांभिकपणाचा मला कळलेला अर्थ
In reply to दांभिकपणा कुठे आहे असेच मी by अनुराधा१९८०
रोचक माहिती
अरे वा... अंबांनींच्या (थोरले
अँटीलियाच्या प्रकाशयोजनेसाठी
In reply to अरे वा... अंबांनींच्या (थोरले by मदनबाण
अँटिलियामध्ये पावसाळ्यात
In reply to अँटीलियाच्या प्रकाशयोजनेसाठी by रेवती
छान!
+१, सहमत.
In reply to छान! by दादा कोंडके
एके दिवशी ही विषमता असह्य
In reply to छान! by दादा कोंडके
छान...
In reply to एके दिवशी ही विषमता असह्य by ५० फक्त
आयटिपिएल बेंगलोर का ?
In reply to छान... by दादा कोंडके
हो
In reply to आयटिपिएल बेंगलोर का ? by ५० फक्त
आटिपिएल बेंगल्रोरचे बरेच
In reply to हो by दादा कोंडके
एके दिवशी ही विषमता असह्य
In reply to छान! by दादा कोंडके
हेच मनात आले. चूक की बरोबर
In reply to एके दिवशी ही विषमता असह्य by निम (verified= न पडताळणी केलेला)
एके दिवशी ही विषमता असह्य
In reply to छान! by दादा कोंडके
हि विषमता कधीच असह्य होणार
In reply to एके दिवशी ही विषमता असह्य by नाना चेंगट
हो. आपल्याकडे शिमीट
In reply to हि विषमता कधीच असह्य होणार by निनाद मुक्काम …
एखादा रस्त्यावरचा भिकारी मला
In reply to हि विषमता कधीच असह्य होणार by निनाद मुक्काम …
बाकी प्रत्येक मजल्यावर स्पा
प्रत्येक मजल्यावर स्पा
In reply to बाकी प्रत्येक मजल्यावर स्पा by ५० फक्त
प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र
अजुन एक भर...
अरे आमच्या लाडक्या लवासाला
मुंबईत आमच्या कॉलनीशेजारील