
१ जानेवारीला दुपारी मामांचा फोन आला. ते म्हणाले की आजोबा (आईचे वडील) तुझी आठवण काढत होते, भेटून जा ! आजोबा गेले काही महिने वृद्धापकाळानुसार तब्येतीच्या तक्रारीने सारखे, दवाखाना व घर अश्या स्वरूपात होते. पण मला आजोबांनी 'का आणि कशासाठी' बोलावले याची कल्पना नक्कीच होती.
आजोबांना भेटायला जायला ४ जानेवारीची तारीख निघाली. ६ तारखेला लहान बहिणीच्या लग्नाची गडबड असल्यामुळे उशीर झाला होता. आजोबांना भेटायला आयसीयूत गेलो तर काळजात धक्कं झालं. आजोबांची तब्येत बरीच खालावली होती. शरीर जास्तच सुरूकतलेलं दिसत होतं. प्रचंड थकवा आलेला होता. आजोबांचं वय होतं ८४ वर्षे आणि आता ते नक्कीच जाणवत होतं.
आजोबांजवळ बसलो, त्यांच्याशी बोललो... आई सोबत होती तिने आजोबांना जेवू घातलं. जेवणाच्या तयारीची आजोबांची लगबग वेगळीच होती. जेवायच्या आधी हात धुवायचे, जेवताना शितं सांडायला नको... आदी सर्वकाही मसल्समेमरी असल्यासारखं आजोबांचं चाललं होतं. मी लहानपणापासून आजोबांना असं नीट नेटकं राहताना बघत आलोय त्यामुळे ते नवीन नव्हतं, मात्र आयुष्याच्या या टप्प्यावर सुद्धा त्यांच्या वागण्यात बदल नव्हता हे विशेष. जेवण झाल्यावर बोलले की डॉक्टरांनी परवानगी दिली तर मी लग्नात येईल आणि नाही दिली तर नाही येणार... मी 'हो' म्हणून मान डोलवली.
थोड्यावेळाने परत 'तो' विषय काढला ज्यासाठी त्यांनी मला बोलावले होते. त्यांना देहदान करायचे होते. त्यासाठी सर्व औपचारिकता मी पूर्णं कराव्यात असे त्यांना वाटत होते. गेल्या जुलै महिन्यापासून त्यांचा हा आग्रह होता की त्यांना देहदान करायचे आहे. मी अनेकदा त्यांना म्हणालोसुद्धा की, "आम्ही करू की तुमचं सगळं, तुम्हाला विश्वास वाटत नाही का?" तर ते त्यावर कायम म्हणायचे की, "तुम्ही तरी राखच करणार ना? त्यापेक्षा चार पोरं शिकली तर काय वाईट?" मग हा विषय तिथेच थांबायचा. जेव्हा आजोबा आयसीयू मध्ये दाखल झाले तेव्हापासून त्यांचा हा आग्रह अधिकच वाढला. मग त्यांच्या इच्छेखातर सर्व औपचारिकता पूर्णं केल्या. त्या दिवशी ते समाधानी दिसले.
आजोबांचा जन्म एका खेड्यात झाला. शिक्षण बेताचेच, घरची परिस्थिती बर्यापैकी होती. मात्र संपूर्ण आयुष्य गेलं ते एका छोट्या खेड्यात शेती करण्यामध्ये... नातेवाइकांकडे कुठे गेलं तरच गाव सोडलं असेल. शेगावची वारी मात्र नित्यनेमाने केली. एकदा तर शेगाव ते पंढरपूर पायीवारी सुद्धा त्यांनी केल्याचं मला आठवतं. गजानन बाबांवर खूप श्रद्धा होती त्यांची. एकदा असंच दवाखान्यात झोपून खिशातील गजानन विजय या ग्रंथाची छोटी आवृत्ती वाचत होते, मी विचारलं की, "कशाला त्रास करून घेताय तुम्ही? आणि एवढं बारीक वाचता येतं का आता तुम्हाला?" तर त्यावर ते म्हणाले की, "मला आता वाचावं कुठे लागतं? हे (पुस्तक) तर सवयीनुसार हातात पकडलेलं आहे बाकी आता सर्व पाठ झालेलं आहे. वाचायची गरजच नाही."
आजोबांशी असा अनेकदा संवाद साधत असताना मला अनेक प्रश्न पडायचे, काहींचा उलगडा झाला काहींचा नाही झाला. गेल्या एक-दीड वर्षांपासून आजोबांनी सर्व विषयांतून स्वतः:ला बाजूला केले. तसे सर्व व्यवहार मामांच्या हाती देऊन, दहापेक्षा जास्त वर्षे झाली होती, मात्र गेलं दीड वर्ष तर आजोबांनी अक्षरशः सर्वच गोष्टींतून मन बाजूला केले होते. हे असं म्हणायला फार सोपं असतं, मात्र आपलं मन असं असतं की जे हातातून निसटतंय त्याचाच जास्त हट्ट आपलं मन करत असतं. अश्या वेळी आजोबा मात्र अगदी वेळापत्रकानुसार ठरवल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने बाजूला होत गेले. शेवटी 'गजानन बाबा आणि ते' एवढाच व्याप उरला होता.
दिनांक २० जानेवारी २०१३ ला संध्याकाळी मामांचा परत फोन आला - आजोबा गेले !
आजोबा गेले याचं खूप दु:ख होतंच पण खरं सांगायचं तर आजोबांनी हेवा वाटावा अशी सांगता केली होती. शेतकरी कुटुंबात जन्मलेले आजोबा, त्यांनी आयुष्यभर शेती केली, स्वतः:चं शिक्षण बेताचेच होते मात्र दोन मुले व चार मुलींना शिकतील तेवढं शिक्षण दिलं. आयुष्यभर जयपूर नावाच्या एका खेड्यात राहिले जेथे दिवसातून केवळ एक बस जाते व तेवढीच परत येते. अश्या वातावरणात जगताना आजोबांनी एवढं छान जीवन कसं काय ठरवलं असेल? त्यांच्या शेवटच्या काही वर्षांत मला त्यांचा सहवास जास्त लाभला. त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या, आयुष्य, नाते-संबंध, अध्यात्म, गजाननबाबा, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज हे आमचे चर्चेचे विषय असायचे. यातून अनेकदा जाणवायचं की आजोबांचे विचार बर्यापैकी पुरोगामी होते.
अध्यात्माच्या मार्गावर असताना आजोबांनी अचानक विज्ञानवाद्यांप्रमाणे देहदानाचा आग्रह धरावा आणि हा संकल्प पूर्णं व्हावा अशी तजवीज करून घ्यावी हे नवल होते.
मध्येच अचानक माहिती पडलं की आजोबा जेव्हा पर्यंत सक्रिय शेती करीत होते तो पर्यंत त्यांचा व देवा-धर्माच्या आचरणाचा काही संबंध नव्हता. नियमाने शनिवारी पारावरच्या मारोतीला पाणी वाहायचा नेम त्यांनी केला. यथावकाश मुले कर्ती सवरती झाल्यावर, ते बाजूला झाले आणि मग त्यांची देवांशी, विशेषतः: गजानन बाबाशी फार चांगली गट्टी जमली. शेगाव वारी करायचा छंद जमला आणि अश्यांतच पंढरपुराची वारी सुद्धा झाली. तिथे तुळशीची म्हणून घेतलेली माळ जेव्हा तुळशीची नाही हे लक्षात आलं तेव्हापासून त्यांनी हाताने बनवलेल्या तुळशीच्याच माळा केवळ धारण केल्या आणि नंतर अश्या माळी अनेकांना तयार करून दिल्या.
अश्या भक्ती मार्गावर असताना त्यांना माझा काही रूढींना विरोध पटत होता. सत्यनारायणाचा भाकडपणा मान्य होता. आणि आपल्या धार्मिक आचरणात बदल व्हायला हवा असेही वाटत होते. मला कौतुक वाटतंय ते त्यांच्या अश्या कप्पेखानी जगण्याचं. आपण कायम सगळी सरमिसळ करत जगत असतो असं मला वाटतं. यामुळे त्यांनी केलेली ही विभागणी उत्तम वाटते.
ग्रामीण पार्श्वभूमी , भक्ती किंवा आध्यात्मिक ओढ आदी असून सुद्धा आजोबांना देहदानाचे महत्त्व पटले होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. एखादा निर्णय घेणे आणि तो पूर्णत्वास नेणे हा सुद्धा आजोबांचा स्वभावगुण. एखादी गोष्ट मनापासून पटल्यास ती अन्य लोकास मान्य नाही म्हणून आपण ते करू नये असे त्यांना वाटत नव्हते. ते जगले ते आयुष्य फार उत्तम होते. त्यांनी शेवटी हे बोलून दाखवले होते की देवाने सर्व काही भरभरून दिले. आता त्याने घेऊन जावे एवढंच मागणं आहे.
आजोबांनी शेवटी शेवटी सर्वच विषयांतून आपले मन काढले होते. त्यांना ज्या टप्प्यावर जे करायला हवे होते ते त्यांनी केल्याचं आता जाणवतं. कप्पेखानी व टप्पेसुद जीवन जगले...
आज आता पहाटेचे दीड वाजत आहेत. आज आजोबांची तेरवी आहे. आजोबांच्या मागे उरलेला भलामोठा गोतावळा जमलेला आहे. मामांनी कालच आजोबांचा छान हसरा फोटो फ्रेमकरून आणला आहे. तो समोरच्या भिंतीवर आहे. आजोबांना हव्या त्यापध्दतीने देहदान झाले मात्र उरलेल्यांच्या इच्छेनुसार बाकी संस्कार होत आहेत.
आज असं नक्की वाटतं की देवाने असं भरभरून आयुष्य द्यावे. मात्र शेवटाला सर्व व्यापातून बाजूला होता येईल एवढा विवेकसुद्धा द्यावा. आजोबांना शेवटाला असं जगतांना बघून त्यांच्या बद्दल हेवा वाटत होता. एका ८४ वर्षाच्या माणसाचे आयुष्य एवढे सुंदर असावे की ३० वर्षाच्या नातवाला त्याचा हेवा वाटावा? काय म्हणावं याला?
आजोबा तुम्ही छान जगलात, मला सुद्धा आयुष्यभर पुरेल इतकी शिदोरी देऊन गेलात.
- नीलकांत
वाचने
26375
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
..
सहमत
In reply to .. by विकास
सहमत
In reply to सहमत by आजानुकर्ण
+१
In reply to .. by विकास
+१
In reply to .. by विकास
+१
In reply to .. by विकास
श्रद्धांजली
+ १
In reply to श्रद्धांजली by श्रीरंग_जोशी
+११
In reply to + १ by अक्षया
देहदान.
सहमत...
In reply to देहदान. by प्रभाकर पेठकर
संधिप्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी...
असेच..
In reply to संधिप्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी... by नंदन
मालकानू,
फार सुरेख लिहिले आहेस नीलकांत
समाधान. सगळ्यात मोठी शिदोरी.
आजोबा
आदरांजली
आदरांजली
मला कौतुक वाटतंय ते त्यांच्या
आजोबा गेल्याचे ऐकून वाईट
काय बोलू?
सुंदर मी होणार!
मनातील भावना खूप साध्यासोप्या
खुप
शब्दाशब्दाशी सहमत.
In reply to खुप by मिसळलेला काव्यप्रेमी
+१
In reply to शब्दाशब्दाशी सहमत. by इनिगोय
तुमच्या आजोबांना आदरांजली.
आजोबांना श्रध्दांजली!!
नीलकांत, तुझ्या आजोबांना
'मरावे परि किर्तीरुपी उरावे'
नीलकांत, तुझ्या आजोबांना
क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे
तुमचे आजोबा लै भारी होते.
कप्पेखानी
विनम्र श्रद्धांजली !
तुझ्या आजोबांना श्रद्धांजली
आदर्श जीवन
एकदम सहमत
In reply to आदर्श जीवन by सस्नेह
आजोबांना श्रध्दांजली..
बावनकशी सोने...
देहदानाची इच्छा मृत्यूपूर्वी देहाची अॅटॅचमेंट संपल्याचं दर्शवते
…
सुरेख लिहिले आहे.
अत्यंत चांगल्या रितीने
खुप छान लेख... लेख वाचुन मला
आदरांजली
सहज लेखन.
आजोबा म्हणजे आयुष्यातील एक
आजोबांच्या स्मृतीस मनःपूर्वक प्रणाम!
त्यांना श्रद्धांजली आणि तुला
असेच म्हणते.आभारी आहे
धन्यवाद.
In reply to आभारी आहे by नीलकांत
फार छान
ओळख भिडली
श्रद्धांजली
नीलकांता, किती सुरेख लिहिलं आहेस रे!
आदरांजली. (लेख आज वाचला)
आजोबांना आदरांजली
आजोबांना आदरांजली