नमस्कार मंडळी,
काही दिवसापूर्वीच ई-सकाळमधल्या ह्या baatamee ने लक्ष वेधले आणि समाजातल्या काही घटकांच्या तरी जाणिवा अजूनही जागृत आहेत याचा एक सुखद प्रत्यय आला.
ही गोष्ट आहे पुण्याजवळच्या हडपसर मधील डॉ. गणेश राख यांची आणि त्यांनी चालू केलेल्या एका जगावेगळ्या आणि सेवाभावी उपक्रमाची. अतिशय गरीबीतून आणि कष्टातून पुढे आलेल्या डॉ राख यानी आपल्या व्यवसायाच्या आत्ता घटत चाललेल्या नीतिमत्तेची आणि आदर्शाची बूज ठेवत चालू केलेल्या ह्या उपक्रमाने समाजातल्या विझत चाललेल्या माणुसकीचा एक गहिवर आणून दिला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मुलगी जन्माला आल्यानंतर जणू दुःखच जन्माला आले, या भावनेने लेबर रुममध्ये रडणारी आई आणि तिचे नातेवाईक... पुढे बिल भरण्यावरून सासर-माहेरच्यांचे वाद... कोणाही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारे रुग्णालयातले हे चित्र... डॉ. गणेश राख यांनी ते बदलायचे ठरवले आणि गेले वर्षभर ते मुलगी जन्माला आल्यानंतर बाळंतपणाचे बिलच घेत नाहीत.
आजवर गेल्या वर्षात सुमारे १३६ प्रसूती त्यांनी विनामोबदला केल्यात! साधारणपणे, एका प्रसूतीमागे होणारे अंदाजे १० हजार रु. बिल धरले तर जवळपास १३-१४ लाख रु.चे स्वतःचे नुकसान त्यांनी आनंदाने सहन केले आहे. खोट्या-खोट्या कारणावरुन रुग्णांना लुटणार्या आणि बिल द्यायला उशीर केला इ. कारणावरुन गोरगरीब रुग्णांची अडवणूक करणार्या आमच्या दुसर्या व्यवसायबंधूंना आपण कशासाठी हा व्यवसाय करायचा असतो त्याची जणू आठवणच करुन दिली आहे.
डॉ राख यांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन!
या निमित्ताने काही प्रश्न उभे राहातात-
१. ज्या प्रसूता स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबाना या सेवेचा लाभ मिळाला आहे, त्यांच्या मनातील स्त्री-अपत्याबद्दल दृष्टीकोण आता निकोप असेल किंवा तो पुढचे आयुष्यभर तसाच असेल अशी अपेक्षा भाबडेपणाची ठरेल का?
२. स्त्री-अपत्यजन्माबद्दल आणि स्त्री-भ्रूणहत्येबद्दल समाजमन जागृत करण्यासाठी अशाच तर्हेचे आणखी कुठले-कुठले उपाय करता येतील किंवा इतरत्र चालू आहेत?
या उपक्रमाची माहिती सर्वांना मिळावी व अशा उपक्रमांवर काही उपयुक्त चर्चा घडून यावी हाच या चर्चाप्रस्तावाचा उद्देश.
वाचने
5184
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
या उपक्रमाच्या निमित्ताने
इतका उमदा उपक्रम चालवत
+१
In reply to इतका उमदा उपक्रम चालवत by इनिगोय
मस्त उपक्रम आहे
बातमी आधीच वाचली होती.
प्रथमदर्शनी हा अतिशय उत्तम
+१
In reply to प्रथमदर्शनी हा अतिशय उत्तम by गवि
अगदी हेच लिहिणार होतो, पण
In reply to +१ by दादा कोंडके
थोडी गल्लत होते आहे
In reply to प्रथमदर्शनी हा अतिशय उत्तम by गवि
डॉक्टरांचे कार्य खरेच कौतुकास्पद आहे.
मला तर अशी भिती वाट्ते...
छान वाटलं
स्तुत्त्या उपक्रम..
अतिशय सुत्य उपक्रम.
आँ?
In reply to अतिशय सुत्य उपक्रम. by अग्निकोल्हा
होय.
In reply to आँ? by पैसा
म्हणजे
In reply to होय. by अग्निकोल्हा
बरोबर आहे
In reply to म्हणजे by अग्निकोल्हा
सलाम!
प्रत्येकजण (येथे चांगले
बायकोच्या माहेरचे लोक
In reply to प्रत्येकजण (येथे चांगले by रेवती
साहेब, निदान वर्षभराने तरी
In reply to बायकोच्या माहेरचे लोक by बाळकराम
+१
In reply to साहेब, निदान वर्षभराने तरी by रेवती
हलके घ्या!
In reply to साहेब, निदान वर्षभराने तरी by रेवती
हां मग ठीक आहे.
In reply to हलके घ्या! by बाळकराम
"जननि शिशु सुरक्षा कार्यक्रम"
'बातमी' येथे दिल्याबद्दल
मलाही गविंचा प्रतिसाद एकांगी
In reply to 'बातमी' येथे दिल्याबद्दल by इन्दुसुता
एकांगी आणि अपुर्या माहितीवर
In reply to मलाही गविंचा प्रतिसाद एकांगी by बॅटमॅन
ओक्के बॉस. तुम्ही आणि
In reply to एकांगी आणि अपुर्या माहितीवर by गवि
सर्वांचे आभार!