नाणेघाट : मध्यम श्रेणीचा ट्रेक
उंची : अंदाजे २७०० फूट
जिल्हा: पुणे
कसे पोहोचाल :
१. कल्याण मार्गे : मुंबईकर कल्याण ला येऊन तिथून कल्याण - मुरबाड - टोकावडे - वैशाखरे असे करत नाणेघाटाच्या पायथ्याशी पोचू शकतात. इथून नाणेघाटात जायला साधारण २ तास लागतात
२. पुण्या मार्गे : पुण्याहून जुन्नर - घाटघर करत थेट नाणेघाटात येता येते .
भल्या पहाटे थंडीत निघून बरोबर ७ च्या आसपास आम्ही मिपाकर (मी, शैलेंद्र ,सौरभ उप्स ) नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या नामनिर्देशक बोर्डापाशी पोचलो. गाडी खालीच लावली (होय, यावेळी बायका नव्हत्या सोबत ) आणि वर निघालो.
थंडीसोबतच जंगलात तुफान वारं सुटलेलं होतं. हा अनुभव पहिल्यांदाच घेत होतो. झाडांच्या आवाजाने आजूबाजूला पाणी वाहत आहे कि काय असं वाटत होत.
१. नाणेघाटाचे प्रथम दर्शन
वाटेत टिपलेले काही क्षण
२.
३.भूछत्री
४.
मधेच रस्त्यात जे दिसेल त्याला सातवाहन कालीन म्हणण्याची हुक्की आली , दगड दिसलं कि सातवाहन कालीन, एके ठिकाणी जुनाट डाळींब असत तसं फळ दिसलं तेही सातवाहन कालीन ( वल्ली महाराज कि जय ) ! वल्ली काका मध्ये मध्ये फोन करून खुशाली विचारात होते.
फारसा दम न लागता, तब्येतीत वर पोचलो . आधीपासून एक ग्रुप वर आलेला होता, ते पुण्याहून आलेले होते, त्यामुळे त्यांना आम्ही ह्या मार्गाने आल्याचे कौतुक वाटले ( का ते समजले नाही :) )
घाटात वर पोचल्यावर एक पुरातन सातवाहन काळातली खोदलेली एक गुहा दिसते
५ .
नाणेघाट हा साधारण अडीज हजार वर्षांपूर्वी खोदला गेला. त्याकाळी तो कल्याण बंदर आणि जुन्नर यांना जोडणारा महत्वाचा राजमार्ग म्हणता येईल , व्यापारी दृष्टीने या मार्गाला महत्वाचे स्थान असे, सदर मार्गावरून प्रवास करण्यासाठी 'करही ' गोळा केला जात असे . कल्याण बंदरात उतरणारा व्यापारी माल , हा घोडे बैल यांवर लादून थेट सातवाहनांची राजधानी ' पैठण ' येथे नेला जात असे .
सदर गुहा हि अतिशय प्रशस्त असून , पन्नास साठ माणसं सहज यात राहू शकतात
६.
७.
या लेण्यांमधील तिन्ही भिंतींवर शिलालेख कोरलेले आहेत, हा लेख २०,२५ ओळींचा दिसतो ,
गुहेच्या आत जाऊन मस्त आराम केला , सोबत आणलेली खादाडी संपवली , बाहेर बरीच माकडं होती , त्यांच्या माकड चेष्टा टिपण्याचा मोह आवरला नाही :)
सायबानू मीच त्यो
९.
छोटा परिवार सुखी परिवार
१०.
गुहेच्या वर जी प्रचंड कातळाची भिंत दिसते , त्याला नानाचा अंगठा असे म्हणतात,वर तीन,चार पाण्याची टाकी आहेत. पाणी कायच्या काय थंड होतं
घाटातून चढून वर आलो
११.
१२.
डावीकडे एक भला मोठा दगडी रांजण दिसतो, त्यात म्हणे जकात भरली जात असे, खरे खोटे माहित नाही
13
उजव्या बाजूला एका लहानश्या गुहेत गणेशाची मूर्ती आहे .
१४.
१५.
१६.
आता उन्हात आल्याने ,मस्त उब जाणवत होती. थोडं अजून वर चढलो आणि आजूबाजूच्या भव्य प्रदेशाच दर्शन झालं.
मागच्या बाजूला भैरवगड , हडसर अशा किल्ल्यांची रांग होती
१९.
२०.
प्रचंड ,भणाणत्या वाऱ्यात समोरचा जीवधन , वानर लिंगी लक्ष वेधून घेत होती. त्यामागेही काही किल्ले दिसत होते.
२१.
प्रचंड माणूस हातपाय पसरून बसलाय कि काय असं वाटत होतं. हि आवळ्याची लिंगी
२२.
२३.
समोरच्या बाजूने गोरखगड , सिद्धगड , माहुली सुद्धा दिसतात
थोड्याच वेळात खाली उतरायला लागलो .
एके ठिकाणी पांगारा (? )फुललेला होता, तिथेही थोडा क्लिकक्लीकाट केला
२४.
२५.
२६.
२७.
साधारण तीन च्या सुमारास खाली आलो सुद्धा , एका दिवसात मुंबई - पुणेकरांना करण्याजोगा सहज ट्रेक आहे .
दोन दिवस असतील तर जीवधन - नाणेघाट करता येतो .
जेवणाची सोय होणं कठीणच आहे, सोबत जेवण नेल्यास उत्तम, जंगलात लाकूड फाटा बराच असल्याने गुहेतही मस्त जेवणाचा बेत करता येऊ शकतो .

या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत. पुराणकालातील इतकी संख्या असलेल्या भारतातील हा प्राचीन असा लेख आहे. या लेखात सातवाहन सम्राज्ञी ‘नागतिका’ हिने केलेल्या यज्ञांची नावे आहेत. येथे वाजपेय, राजसूय, अश्वमेध अशा प्रकारचे यज्ञ केले असल्याचे उल्लेख सापडतात. या यज्ञात ब्राह्मणांना केलेल्या दानांचा देखील उल्लेख या लेखांमध्ये आढळतो. या गुहेत सातवाहनांची शिल्पे देखील कोरलेली आहेत. यापैकी पहिले शिल्प सातवाहन संस्थापक शालिवाहनाचे, दुसरे शिल्प राजा सातकर्णी याची पत्नी देवी नायनिकीचे तर तिसरे शिल्प राजा सातकर्णीचे आहे.संदर्भ : ट्रेक क्षितीज संस्था ८. शिलालेख
गुहेच्या आत जाऊन मस्त आराम केला , सोबत आणलेली खादाडी संपवली , बाहेर बरीच माकडं होती , त्यांच्या माकड चेष्टा टिपण्याचा मोह आवरला नाही :)
सायबानू मीच त्यो
९.
छोटा परिवार सुखी परिवार
१०.
गुहेच्या वर जी प्रचंड कातळाची भिंत दिसते , त्याला नानाचा अंगठा असे म्हणतात,वर तीन,चार पाण्याची टाकी आहेत. पाणी कायच्या काय थंड होतं
घाटातून चढून वर आलो
११.
१२.
डावीकडे एक भला मोठा दगडी रांजण दिसतो, त्यात म्हणे जकात भरली जात असे, खरे खोटे माहित नाही
13
उजव्या बाजूला एका लहानश्या गुहेत गणेशाची मूर्ती आहे .
१४.
१५.
१६.
आता उन्हात आल्याने ,मस्त उब जाणवत होती. थोडं अजून वर चढलो आणि आजूबाजूच्या भव्य प्रदेशाच दर्शन झालं.
मागच्या बाजूला भैरवगड , हडसर अशा किल्ल्यांची रांग होती
१९.
२०.
प्रचंड ,भणाणत्या वाऱ्यात समोरचा जीवधन , वानर लिंगी लक्ष वेधून घेत होती. त्यामागेही काही किल्ले दिसत होते.
२१.
प्रचंड माणूस हातपाय पसरून बसलाय कि काय असं वाटत होतं. हि आवळ्याची लिंगी
२२.
२३.
समोरच्या बाजूने गोरखगड , सिद्धगड , माहुली सुद्धा दिसतात
थोड्याच वेळात खाली उतरायला लागलो .
एके ठिकाणी पांगारा (? )फुललेला होता, तिथेही थोडा क्लिकक्लीकाट केला
२४.
२५.
२६.
२७.
साधारण तीन च्या सुमारास खाली आलो सुद्धा , एका दिवसात मुंबई - पुणेकरांना करण्याजोगा सहज ट्रेक आहे .
दोन दिवस असतील तर जीवधन - नाणेघाट करता येतो .
जेवणाची सोय होणं कठीणच आहे, सोबत जेवण नेल्यास उत्तम, जंगलात लाकूड फाटा बराच असल्याने गुहेतही मस्त जेवणाचा बेत करता येऊ शकतो .
वाचने
21634
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त रे.
हो, परवाही त्यात पाणी होते..
In reply to मस्त रे. by प्रचेतस
आणि स्पा सातवाहन स्ट्रोक
In reply to हो, परवाही त्यात पाणी होते.. by शैलेन्द्र
वल्ली नामक आठवाहनाच्या
In reply to मस्त रे. by प्रचेतस
आठ वाहनं पुरतील? नक्की?
In reply to वल्ली नामक आठवाहनाच्या by मालोजीराव
वाह
मस्त लिहिलय रे.. फोटुपण भारी.
सही रे
मस्त..
लई भारी. सातवाहन ट्रेक आवडला
म्हणूनच म्हणतो की तो
In reply to लई भारी. सातवाहन ट्रेक आवडला by गवि
वाटसरुंच्या पाण्यासाठी असेल
In reply to म्हणूनच म्हणतो की तो by प्रचेतस
नाही.
In reply to वाटसरुंच्या पाण्यासाठी असेल by गवि
अच्छा.. या अँगलने वेगळा
In reply to नाही. by प्रचेतस
गवि, तोंड चिंचोळे नाही, एक
In reply to अच्छा.. या अँगलने वेगळा by गवि
आँ?? फोटोमुळे फसलो..अंदाज
In reply to गवि, तोंड चिंचोळे नाही, एक by शैलेन्द्र
(No subject)
In reply to आँ?? फोटोमुळे फसलो..अंदाज by गवि
स्पावड्या
In reply to (No subject) by स्पा
गवि स्पांडूच्या साईजचा माणुस
In reply to स्पावड्या by गवि
अगदी हेच
In reply to गवि स्पांडूच्या साईजचा माणुस by गणपा
प्रसन्न, मस्त झालय ट्रेक
सुंदर फोटो. वर्णनही आवडले.
मस्त लिहिलयस....
मस्त
मस्त आहेत फोटोज..!
छान लिहिले आहे..
बिनधास्त
In reply to छान लिहिले आहे.. by मुक्त विहारि
जाउन परत आलात हे उत्तम.
इथे भर पावसाळ्यात गेलो होतो..
खर्र खर्र सांग, नव्या कॅमेर्
नै नै
In reply to खर्र खर्र सांग, नव्या कॅमेर् by गणपा
@ नव्या कॅमेर्याने फोटू
In reply to खर्र खर्र सांग, नव्या कॅमेर् by गणपा
अच्छा!!
बेलाग कडा नाणेघाट!!
नाणेघाट.
नाणेघाटात अजून जायचा योग आला
In reply to नाणेघाट. by प्रभाकर पेठकर
छान.
बैल्गाड्या जाणे शक्य नाही..
In reply to छान. by चित्रगुप्त
अरे वा!
बयो परवा हॉल्स गॅपला जवळ्जवळ
In reply to अरे वा! by पैसा
ग्रेट!
In reply to बयो परवा हॉल्स गॅपला जवळ्जवळ by स्पंदना
मस्त फोटो आणि वर्णन!
In reply to अरे वा! by पैसा
हम्म
In reply to मस्त फोटो आणि वर्णन! by बॅटमॅन
तिथुन सिडनीला गेल्याचीही अफवा
In reply to हम्म by पैसा
वृत्तांत आणि फोटो दोन्ही
सहमत..
In reply to वृत्तांत आणि फोटो दोन्ही by किसन शिंदे
मी ही...
In reply to सहमत.. by मोदक
+३
In reply to मी ही... by धन्या
मस्त ट्रेक
हो तर.. आम्ही त्याच मार्गाने
In reply to मस्त ट्रेक by कपिलमुनी
सुंद्र्र ट्रेक आणि छान फोटो
मस्त रे श्पांडु......!!!
वॉव स्पा बेक इन एक्सन
खास फोटो!
ओह! स्पांडु
रच्याकने...
फोटो व वर्णन दोन्हीही आवडले.
रांजण
नाणेघाट मार्ग . जर तुमच्याकडे
अस नसत करायच, वैशाखरे सांगुन
In reply to नाणेघाट मार्ग . जर तुमच्याकडे by कंजूस
मस्त रे स्पांडू
व्वा व्वा काय फोटु आलेत
नाणेघाट आम्ही नाईट ट्रेक केला
आणि हो.. वरचे लख, फटु सगळे
In reply to नाणेघाट आम्ही नाईट ट्रेक केला by ऋषिकेश
सहीच रे.... मज्जा केलीस...
सुंदर वर्णन आणि फोटो. एकच
शम्मत आहे..
In reply to सुंदर वर्णन आणि फोटो. एकच by वेल्लाभट
धन्यवाद...!