Skip to main content

रिअल हिरोंना इलेक्ट्रोनिक्स मधमे योग्य प्रसिद्धी देतात का?

लेखक मस्त् राम यांनी शनिवार, 26/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ २०० रुपयात स्वतःच लग्न करणारा ग्रामीण भागातील सुशिक्षीत तरुण, मुंबई मारेथोन मध्ये यश मिळवणारी एका सामान्य शेतकर्याची मुलगी, प्रतिकूल आर्थिक परस्तीतीत C A होणारी ग्रामीण युवती, विकालान्गांसाठी कार्यरत असणाऱ्या पाचोरा गावातील मुली, या व अश्या अनेक रिअल हिरोंना सकाळ ने लोकांसमोर आणले. परंतु टीवी, नेट सारखी इलेक्ट्रोनिक माध्यमे या लोकांना प्रसिद्धी देउन समाजात एक आशावादी विचार प्रवाह निर्माण करण्यात मागे राहतात. पाण्या काळी संपन्न झालेला विवाह, हेलीकॉप्तोर मधून वराच विवाह साठी आगमन, सोन्याचा सदरा, खून, बलात्कार, घोटाळे, अश्या घटनां वर focus ठेवणे, चर्चा सत्र बोलावणे, त्यात होणारी भांडणे प्रसारित करणे या बरोबरच काही आशादायक घटना समाजात घडतात त्यालाही योग्य प्रसिधी देणे हे या माध्यमांचे कर्तय्व आहे असे वाटते म्हणून हा धागा इथे चर्चे साठी घ्यावा वाटतो म्हणून हा लेख प्रपंच.

वाचने 1484
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

रिअल हिरोंना इलेक्ट्रोनिक्स मधमे योग्य प्रसिद्धी देतात का?
अजिबात नाही! "अप्रामाणिक" कुठली ;)

हो शक्य आहे, या जगात रिअल हिरोंना इलेक्ट्रोनिक्स माध्यमे योग्य प्रसिद्धी देत नसावेतही... प्रेरणा देणारे काम घडले की हिरो समजावे ही गोश्ट मान्य असली तरी हिरोपणाचे निकश परिस्थितीनुरुप ठरतात म्हणुनच... जाणकारांच्या रोचक प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत.

दुर्दैवाने तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही आहे. मिडियाला टी.आर.पी. वाढवण्यात जास्त रस असतो, या लोकांबद्दल दाखवून तो कसा मिळणार? त्या साठी पेज ३ वरचे चकचकीत चेहरे हवेत, बॉलिवूडचे कलाकार हवेत, किंवा राजकारण्यांमधले वाद हवेत. नुकत्याच जाहीर झालेल्या पद्म पुरस्कार विजेत्यांबद्दलसुद्धा हेच म्हणता येईल. डॉ. शरद काळे काय, मिलींद कांबळे काय, मिडिया मध्ये यांच्या कार्याचा साधा उल्लेखसुद्धा कुठे दिसला नाही.पण आत्ता बर्‍याचशा चॅनल्सवर स्टारडस्ट अवॉर्डस आणि काय काय धिंगाणा चाललाय त्याचं मात्र इत्थंभूत वर्णन न्यूज चॅनेल्सवर दिसतंय.

In reply to by अग्निकोल्हा

@हिरों रिअल आहे तर प्रसिध्दी हवी कशाला ?>>> खोटारड्यांना प्रसिद्धि कचकाऊन मिळते...ज्यांना प्रसिद्धि मिळणं,न्याय्य व उचित आहे,त्यांना मिळत नाही...हीच तर खंत/तक्रार धागाकर्त्यानी बोलून दाखवली आहे... म्हणून त्यांना मिळायला(च) हवी. :-)

In reply to by अग्निकोल्हा

रिअल हिरोंना प्रसिद्धी देणे फार महत्वाचे नाही. पण त्यांच्या कार्यामुळे समाजामध्ये थोडेतरी विचार मंथन होईल, थोडा तरी आशावादी सूर ऐकायला मिळेल हि अपेक्षा.

अश्या अनेक रिअल हिरोंना सकाळ ने लोकांसमोर आणले.
पण तुमच्या ई-सकाळमध्ये डाव्या कोपर्‍यात बहुतेक वेळी आपला शष्प संबंध नसलेल्या कुठल्याश्या परदेशी अ‍ॅवार्ड समारंभातली 'हिअरवीनची अदा' असलेला फोटू असतात की. तिथेच एका कुठल्याश्या उत्तान फोटू खाली कुणा एकाची 'आय वील इट हर लाईक अ थॅक्सगिवींग डे डिनर' अशी मांसाहारी प्रतिक्रिया वाचलेली आहे.

"काही निवडक काही सुखद" असे काहीसे सदर आतातर म्.टा. ने पण सुरु केले आहे... आता बोला!!! पण unsung stories (मायमराठीचा प्रतिशब्द ?) खुप आहेत पण लोकाना त्यात मसाला दिसत नाही... दुर्दैव!!!