सध्या ओरीसात जे काही चालले आहे त्याने प्रत्येक भारतीयाला दु:खच होत आहे. तसेच आज पोप महाशयांनी सुद्धा या विषयाबद्दल त्यांची चिंता व्यक्त केली. मला बुवा त्यांची कमाल वाटते.
काही आठवड्यांपूर्वी याच पोप महाशयांनी ऑस्ट्रेलियात जाऊन तेथील मूळ वंशजांची माफी मागितली होती. त्यात त्यांनी "मूळ वंशजांची संस्कृती, धर्म व भाषा यांचा ख्रिश्चनांनी नाश केला" याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. या अगोदर पोप महाशयांनी अशा प्रकारच्या माफी अमेरिकेत व इतरत्र सुद्धा मागितल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला याबद्दल त्यांचा आदरच वाटणार. जर शांतीदूत म्हणजे जर कोणी असेल तर केवळ हेच अशी अनेकांची यामुळे समजूत होणे शक्य आहे!
पण जरा खोलात जाऊन बघितल्यास आपल्या लक्षात येईल की त्यांनी ज्यांची माफी मागितली ते आता ख्रिश्चन धर्मात जवळपास संपूर्णपणे मिसळून गेलेले आहेत. त्यांना त्यांचे धर्म, संस्कृती वा भाषांचे पुनरुज्जीवन करणे केवळ आशक्य आहे. जर पोप यांना खरेच पश्चताप होत असेल तर त्यांनी येथून पुढे असे होऊ नये याची काळजी घेतल्यास जगातले बरेच प्रश्न कमी होतील.
भारतापुरते बोलायचे झाल्यास पोप महाशयांनी खालील गोष्टी कराव्यात जेणे करून त्यांना आजच्या सारखा शोकसंदेश पुन्हा द्यायची वेळ येणार नाही.
१. भारतात मिशनर्यांनी धर्मांतरे पूर्ण बंद करावीत जेणेकरून स्थानिक लोकांची त्यांच्या धर्म/संस्कृती पासून नाळ तुटणार नाही.
२. मिशनरी शाळांतून सक्ती असणारे हे नियम पुर्णतः रद्द करावेत जेणेकरुन मुलांची त्यांच्या संस्कृतीशी नाळ ढिली होणार नाही...
मुलींनी टिकली न लावणे, सणावारंना सुटी न घेणे, सक्तीने ख्रिस्मस साजरा करायला लावने, बळजवरीने बायबलवरील "प्रोजेक्ट" करुन घेणे (न केल्यास खूप कमी मार्क देणे वा नापास करणे), डब्यात भारतीय जेवन आणन्यास मज्जाव करणे, वगैरे.
३. सेवाभावी मिशनरी दवाखाण्यातून कसल्याही धार्मिक शपथा वगैरे न घ्यायला लावता रुग्णांची सेवा करणे. (येशु महाराजांची आरती न म्हणनार्यास इलाज लागू होत नाही अशा तद्दन फोटारड्या गोष्टी सांगून आदिवासींना न फसवने).
४. भुकंप/पूर वगैरे नैसर्गिक आपत्तींच्या वेळी कोणाच्याही नावात बदल न करता मदत करने.
(सर्वांत महत्वाचे) - ५. आतापर्यंत धर्मांतरीत झालेल्या भारतीयांना त्यांच्या मूळ संस्कृती/धर्मा नुसार पुन्हा जगणे शक्य आहे. त्यांची माफी मागून त्यांना परत आपल्या मूळ धर्मात जायला सांगावे.
वरील मुद्दे २,३,४ सारख्या अनेक बाबी आहेत ज्या स्थानिक हिंदूंना ख्रिश्चनांच्या विरुद्ध भडकवतात. त्यांनी या टाळल्या तरच या दोन धर्मांमध्ये सलोखा निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतू मिशनर्यांचे डाव वेगळे आहेत. पुर्वांचलात ख्रिस्ती धर्म मोठा करुन आल्पसंख्यांक हिंदूंना आपल्या इशार्यावर नाचवायला सुरु केल्यावर त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी अदिवासी/वनवासी भागातील भारतीयांना आपले "टार्गेट" बनवून धर्मांतरांचा सपाटा चालवला आहे व या मार्गात कोणी स्वामी लक्ष्मानंद सरस्वतीसारखा आलाच तर त्यांचा काटा काढून बाकीच्यांना दहशत बसवून आपले काम फत्ते करण्याचा त्यांचा मानस दिसतो आहे.
आपल्याला पोप यांच्या भुमिकेबद्द्ल काय वाटते?
वाचने
7156
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
कल्पना नाही.
येशूचीदेवाची प्रार्थना करायला लावतात काही वावगे वाटत नाही. या प्रार्थनेवरून आठवले, मी ज्या शाळेत जात होतो तिथे या कुंदेन्दु तुषारहार धवला वगैरे प्रार्थना सकाळी म्हणत असत. त्याच्या शेवटी 'नि:शेष जाड्यापहा' असे आले की वर्गातल्या जाड्या मुलाकडे पाहत मुलेमुली हसू दाबत असत. (असे केल्याने त्या प्रार्थनेची विटंबना होते असे मला वाटते) डब्यात भारतीय जेवन आणन्यास मज्जाव करणे हे तर फारच भयंकर. म्हणजे शाळेत अभारतीय असे कोणते जेवण आणायला लावतात? पिझ्झा/बर्गर/स्यांडविच का? अरेरे. मात्र गावातील काही जॉन कांबळे वगैरे नावाचे कन्व्हर्टेड ख्रिश्चन आमचे मित्र होते. त्यांनी घरात येशू/मेरीचे फोटो आणि गणपतीचा फोटो एकाच लायनीत लावलेले पाहिले आहेत. आपले हिंदू लोक मोठे च्याप्टर आहेत पैशासाठी धर्म बदलून घेतील आणि घरात गुपचूप गणपतीचीच पूजा करतील आपला, (हिंदू) लाझारस आजानुकर्णह ह पु वा
In reply to कल्पना नाही. by आजानुकर्ण
आणि हो
In reply to कल्पना नाही. by आजानुकर्ण
मित्र कर्णा
In reply to कल्पना नाही. by आजानुकर्ण
भारतात
वर उल्लेख केलेले प्रकार सगळ्याच मिशनरी शाळातं होत नाहीत.
खरे आहे. पण
In reply to वर उल्लेख केलेले प्रकार सगळ्याच मिशनरी शाळातं होत नाहीत. by मुशाफिर
माझं शि़क्षण
आनंद
In reply to माझं शि़क्षण by रामदास
सहमत
मस्त प्रतिसाद ...
In reply to सहमत by ऋषिकेश
मिशनरी शाळा
हेच मांडायचे होते
In reply to मिशनरी शाळा by वेताळ
धर्मान्तर हे राष्ट्रान्तर होते
होय... पण
In reply to धर्मान्तर हे राष्ट्रान्तर होते by विदुषक
सहमत...
मला काय वाटते ते...
- मी देवदेवतांची पूजा करतो पण इतर कोणी त्यांच्या व्यैतिरीक्त कशाची पूजा करत असतील अथवा कशाचीच करत नसतील तर त्याला विरोध करत नाही, त्यांना माझ्या सारखे वागायला सांगत नाही. पण त्यांनी तसे करायचा प्रयत्न केला तर तो मात्र विरोधून मोडायचा किमान माझ्यापुरता प्रयत्न करतो.
- मला संतमहंत आवडत असतील बरेचसे शतकांपूर्वीचेच आहेत आणि त्यांची सारासार शिकवणूक ही भूतदया आहे मग ती शिकवताना कधी त्यात राम तर कधी विठोबा का आला असेना.
- मला आठवत तरी नाही की मी कुठल्या संतमहंताला अथवा साधूपुरूषाला ज्याच्या मागे बरीच लोकसंख्या आहे असे आणि जे हयात आहेत असे, कधी भेटलो. अपवाद फक्त सहावी-सातवीत असताना ठाण्याला कांचीकामकोटीचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आले होते त्यांच्या समोर तमाम शाळांतील मुलांचा कार्यक्रम झाला त्यात होतो. पण त्यांनी थोडेफार त्यावेळेस अध्यात्मिक प्रवचन केले असेल - आठवण्यासारखे काहीच नाही...
- अमेरिकेत आल्यावर माझे दोघां-तिघांना बघणे/भेटणे झाले आहे. त्यात स्वामी चिन्मयानंद होते, आर्शविद्यागुरूकुलमचे (पेन्सिल्व्हेनियात आहे) स्वामी दयानंद सरस्वती आहेत आणि रामकृष्ण मिशनचे आता ९३+ असलेले स्वामी सर्वगतानंद आहेत. स्वामी सर्वगतानंदांना २-३ वेळेस व्यक्तिगत भेटायचा योग आला आहे. यातील शेवटच्या दोघांनी मला (अध्यात्मिक दृष्ट्या नाही, पण) विशेष प्रभावित केले. तरी तिघांनिही असे कधी काहीच या हिंदू धर्मासाठी, परक्या देशात सांगितले जेणे करून मी इतर धर्मियांना अथवा,मला असलेल्या परधर्मांनाच तुच्छ मानेन तसेच त्यांनी या परक्या देशासंदर्भात पण कधी काही चुकून देखील वाईट अर्थ निघेल, त्याचे वाईट होईल असले विचार चिंतले नाहीत.
- जर असे धर्मगुरू मला भेटले असते जे स्वधर्मियांना शहाणे आणि परधर्मियांना कमी लेखत आहेत, स्वतःच्या अनुयायांमधे इतरांसंदर्भात चुकीचा अर्थ सांगत आहेत तर त्यांना मीच काय पण अनेक श्रद्धावंतांनी (मी स्वतः या संदर्भात श्रद्धावंत आहे का या संदर्भात मला खात्री नाही) धुडकावून लावले असते.
बहुसंख्य श्रद्धाळू आणि अंधश्रद्धाळू हिंदू, स्वतःस नास्तिक सम़जणारे, अज्ञेयवादी आणि कायद्याने हिंदू (म्हणजे बौद्ध, शिख, जैन आदी) असलेले, असे सर्वच थोड्याफार फरकाने वरील प्रकारात मोडत असतील. अर्थात तसेच अनेक इतर धर्मियपण असतील असे वाटते. शिखांच्या संदर्भातपण अगदी १९८०-९० च्या दशकातील अतिरेकी कारवाया लक्षात घेतल्या तरी असेच म्हणावेसे वाटते. आता या संदर्भात मी पोप-ख्रिश्चॅनिटी यांचा भारतासंदर्भात विचार करतो. मला नक्की त्यात काय गंभिर वाटते?- सर्वप्रथम कॅथलीक ख्रिश्चॅनिटी हा धर्म म्हणून "जागृक (लाईव्ह)" धर्मसंस्थेच्या आदेशावर चालणारा धर्म आहे. त्याच्या ऐतिहासीक मूळात पण धर्मांतर करून स्वत:च्या (म्हणजे धर्मसंस्थेच्या) अख्त्यारीत जग आणणे - थोडक्यात नियंत्रण / कंट्रोल आणणे दिसते...
- याचाच दुसरा अर्थ असा की धर्मसत्ता, ती ही परकीय, ज्याला आपल्या संदर्भात, भारतीय भूभाग, त्यातील माणसे, इथली सांस्कृतीक श्रीमंती याचे कशाचेच काही पडलेले नाही. सर्वात मुख्य म्हणजे राजसत्तेवर नियंत्रंण जिथे जिथे शक्य आहे तेथे आणण्याचा प्रयत्न करते.
- दुसरा महत्वाचा भाग असा आहे की पोप आणि व्हॅटिकन ही जशी धर्मसत्ता आहे तशीच त्यालाच राजसत्ता म्हणून २०व्या शतकात मानले गेले आहे. थोडक्यात जेंव्हा रोमन कॅथलीक ख्रिश्चन व्यक्ती जेंव्हा पोपचे नेतृत्व मानते तेंव्हा ते नेतृत्व हे एका परकीय राजसत्तेचे पण असते. त्यात मध्यपूर्वेतील येशूचे देवपण अथवा देवपुत्रपण मानण्याच्या धार्मिक भागपेक्षा नकळत युरोपातील इटालीयन राजकीय भाग जास्त आहे - जरी ते जनसामान्यातील ख्रिश्चनांना समजत नसले तरी. (यातील "इटालीयन" हा केवळ योगायोग!)
- माझे अनेक ख्रिश्चन मित्र अगदी कुटूंबमित्र आहेत जे मला मोठ्या भावासारखे आहेत आणि माझ्या रक्ताच्या नात्यातील इतर अनेकापेक्षा देखील ते जास्त जवळचे आहेत. त्यांचे देश हा देवा आधी आणि पोपचा त्यात काही संबंध न ठेवणे स्पष्टपणे जाणवते. पण ते झाले मुंबई-पुण्याचे.... तीच कथा गोव्याच्या ख्रिस्ती बांधवांची, थोड्याफार फरकाने असावी.
- पण हेच जेंव्हा आपण पूर्वेकडे आणि वनवासि भागात जातो तेंव्हा गोष्टी बदलतात. आज इशान्येकडील राज्ये आणि त्यात चालू असलेल्या अतिरेकी कारवाया या जशा कम्युनिस्ट अतिरेक्यांशी संबंधीत आहेत तशाच त्या ख्रिस्ती अतिरेक्यांशी संबंधीतपण आहेत. त्यांना हा देश, ही संस्कृती आपली न वाटावी इतके त्यांचे "ब्रेन वॉशिंग" करण्यात आले आहे.
- यावर असे कोणी म्हणू शकेल की हिंदूंनी आधी दुर्लक्ष केले मग मिशनर्यांनी त्यांना जवळ केले तर त्यात काय चुकले? याच संदर्भात माझे म्हणणे आहे की धर्म हा व्यक्तिगत आहे.
- तेथे कॅथलीक मिशनरी केवळ धर्मप्रचारासाठीच गेले नाहीत तर त्याचा संदर्भ हा राजकीय महत्वाकांक्षेशी आणि सांस्कृतिक नाळ तोडण्यासाठी लावला. मग ते केवळ नावच जॉन होत नाही तर लिपीपण रोमनच असावी हा हट्ट सुरू होतो. मग येशूलाच मानणे म्हणजे बरोबर, मुर्तिपूजक वाईट अथवा मागासलेले असे म्हणत जे काही तत्वज्ञान तयार झाले ते रसातळाला नेण्याचा सातत्याने यत्न करणे चालू होते.
- परीणामी भारतासाख्या देशाची महासत्ता होण्याच्या आधीच महाशकले करण्याचा डाव रचणे असे उद्देशा आहेत असे जर कुणाला वाटले तर त्यात गैर काय?
- याचा अर्थ मी काही ख्रिस्ती धर्माच्या विरोधात आहे अथवा भारतात केवळ हिंदूधर्मच असावा अथवा भारत फक्त हिंदूंचाच आहे असे म्हणतोय असा कृपया घेऊ नका. कारण तो स्वप्नात देखील उद्देश नाही.
- पण मला असे वाटते की जर इंग्लंड स्वतःला पोप पासून बाजूला लोटून स्वत:चे ख्रिश्चनत्व टिकवू शकते, कॅथलीक रहाण्याऐवजी प्रोटेस्टंट होवून एक प्रबळ आअणि स्वतंत्र राज्य होऊ शकते तर भारतातील ख्रिस्ती बांधवांना तसेच भारत हा देश मानून आणि आकाश सर्वत्र सारखे आहे तर आकाशातील बाप सर्वत्र जमिनीवरील धर्मसत्तेच्या मदतीविना केवळ धर्म आचरूनपण भेटू शकतो असे का वाटू नये?
- "आमचा देव/प्रेषित येशू तर आमचा देश हा भारत आहे. पोप आमचा धर्मबांधव असू शकेल पण त्याचे वर्चस्व मानणे हे एका स्वतंत्र देशाचे मूळचे नागरीक म्हणून परतंत्र असल्यासारखेच वाटते" इतके वाटायला काहीच हरकत नाही.
- कधी काळी दक्षिण अमेरिकेत मिशनरी गेले आणि स्थानिक संस्कृती लयास गेली - तेथे दडपशाही आणि कृर हिंसा ही ख्रिस्ताची करूणा आणि सेवाभाव समजवण्यासाठी वापरली गेली. तीच अवस्था कधीकाळी गोव्यात पण झाली. तेच अफ्रिकेत. थोड्याफार फरकाने तेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका/कॅनडा मधील नेटीव्ह अमेरिकन्सच्या संदर्भात. ..
- कारणे अनेक आहेत, विविध आहेत पण भारतात ह्याला हवे ते यश येउ शकले नाही. पोर्तुगिजांची कृर राजवट गोव्यातील मंगेशीला दूर लोटू शकली नाही की ब्रिटीशांची सत्ता ही संकृतीचा र्हास करू शकली... किंबहूना या संस्कृतीनेच ब्रिटीशांना आजही ६१ वर्षांनी भारताबद्दल आकर्षित ठेवले आहे, असे जेंव्हा ब्रिटीश भेटतात अथवा त्यांचे वाचले जाते तेंव्हा माझ्या मर्यादीत निरीक्षणावरून वाटते.
- तरी देखील आज पोपसंदर्भात आणि परकीय म्हणून, पण परधर्म म्हणून नाही, हीच "रोमन कॅथलीक" या नावाखाली पोपचे वर्चस्व मानणारी धर्मसत्ता, आपली जिद्द न सोडता भारताचा, इतर विकसनशील राष्ट्रांप्रमाणेच कब्जा घेण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात यावेळेस त्यात दडपशाही नसून ज्या गोष्टीचा तमाम सुशिक्षित भारतीयांना अभिमान आहे, गर्व आहे त्याचा व्यवस्थित वापर करून - ते म्हणजे आम्ही कसे निधर्मी, आदर्श, बुद्धीवादी आहोत, ह्या अहंकाराचा.
- थोडक्यात एका वाक्यात मला वाटते की गेले काही दशके आपल्यावर "इंटलेक्च्युअल इन्वेजन" होत आहे....मॅकॉलेची यशस्वी खेळी - या वेळेस ब्रिटीश साम्राज्यापेक्षा ख्रिस्ती धर्मसत्तेच्या स्वार्थासाठी -भौगोलीक वर्चस्वापेक्षा वैचारीक ताबा घेऊन
असो.... भास्कररावांच्या चर्चेतील पोप संदर्भातील मुद्दे हे पोटतिडकीने लिहीले असल्याने त्यातील विचार न समजता आपण त्यातील भावनांच्या उद्रेकासंदर्भातच काही अंशी चर्चा करत नाही आहोत ना?विकास,
In reply to मला काय वाटते ते... by विकास
कायद्याने हिंदू
In reply to विकास, by ३_१४ विक्षिप्त अदिती
अशी ही खोली...
In reply to मला काय वाटते ते... by विकास