सुनिता
लेखनप्रकार
ही १९८७ च्या हिवाळ्यातील गोष्ट आहे.हि १०० % सत्य घटना चक्षुरवै सत्यं आहे
मी कमांड हॉस्पिटल पुणे मधल्या अति दक्षता विभागात २४ तासाच्या आपत्कालीन कामाला(emergency) होतो. साधारण रात्री ११ वाजता बाह्य रुग्ण विभागातून(casualty) एक बेशुद्ध रुग्णाला थेट अतिदक्षता विभागात आणले.त्याच कोणताही आगापिछा माहित नव्हता. वय साधारण २३-२४ असेल .अंगावर पँट शर्ट आणि स्वेटर. त्यापैकी स्वेटर वर अर्धवट वाळलेल्या ओकारीचे डाग.तोंडाला घाणेरडा वास येत असलेला.त्याची नाडी बघितली तेंव्हा ती मंद चालली होती (मिनिटाला ४८-५०).त्याचा श्वास पण मंद पणे चालला होता अंग थंड पडलेले(थंडीने आणि विषबाधेने दोन्ही) डोळ्याच्या बाहुल्या एकदम बारीक झाल्या होत्या. श्वासाला अगदी घाणेरडा वास येत होता. ज्या वार्ड बॉय ने आणले त्याला विचारले तर तो म्हणाला कि कोणीतरी ओ पी डी च्या बाहेर त्याला रिक्षाने आणून टाकले. त्याच्या बरोबर कोणी नाही. नाव आणि पत्ता माहिती नाही.
अर्थात त्याची नाडी आणि डोळ्याच्या बाहुल्या आणि एकंदर श्वासाच्या वासावरून कीटक नाशक प्यायल्याचे काळात होते.ताबडतोब त्याला सलाईन लावले गेले. त्यातून त्याला प्रतिविष (atropine) देणे सुरु केले. तोंडातून नळी घालून पोटात(जठरात) असलेले सर्व द्रव बाहेर काढले आणि ते केमिकल अनालिसिस साठी बाजूला काढून ठेवले. त्याला सलाईन मधून १४० ampoules atropine प्रतिविष दिले गेले.जोवर त्याच्या बाहुल्या प्रसारण पावत नाहीत तोवर त्याला हे प्रतिविष द्यावे लागते. तेंव्हा साधारण २ तासांनी त्याने डोळे उघडले. अजून अर्ध्या तासाने तो बोलण्याच्या परिस्थितीत आला. आता हा आर्मी चा माणूस नव्हता तर सिविलिअन होता तेंव्हा ती पोलिस केस होती म्हणून माझ्या मित्राने त्याला काय झाले ते विचारले. यावर तो म्हणाला कि माझे एका मुलीवर प्रेम होते पण माझे आई बाप माझे तिच्याशी लग्न करून देत नव्हते म्हणून मी बेगोन प्यायलो.
आता हि वारंवार घडणारी घटना असल्याने आम्ही हसण्यावारी नेले आणि त्याची पूर्ण तपासणी करण्यासाठी (त्याला कुठलीही शारीरिक इजा झालेली नाही हे पाहण्यासाठी) त्याचा शर्ट आणि बनियन काढला तर त्याच्या छातीवर डावीकडे हृदयाच्या जागेवर "सुनिता" गोंदलेले होते.
आमच्या सिनियर मेट्रनने त्याला हसत हसत विचारले काय रे हीच ना ती?
त्यावर तो म्हणाला कि नाही, ती वेगळी होती.
रात्री दीड वाजता अतिदक्षता विभागात हास्याचा कल्लोळ झाला.
आज सुद्धा कोणतीही महिला मला "सुनिता"नाव सांगते तेंव्हा मला हसू येते.
सुबोध खरे
वाचने
4711
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
प्रत्येक वेळी खरर्र खुरर्र
लै भारी!
प्रत्येक वेळी नाही, एकाच वेळी
In reply to प्रत्येक वेळी नाही, एकाच वेळी by अभ्या..
भूतकाळ
ही ही ही.
भूतकाळ ?
हा हा...
In reply to हा हा... by दादा कोंडके
बाप रे
गुड वन. या निमित्त्याने "आयला
:)
सैफ अली चा नातलग होता वाट्त
सही किस्सा.
In reply to सही किस्सा. by अमोल खरे
आता तात्पर्य सांग पाहू!
भारी किस्सा..
लेखन आवडले.
त्याची "सध्याची" जी होती तिने
In reply to त्याची "सध्याची" जी होती तिने by गवि
____/\____
हाहाहा!