✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

निरक्षर

स
संजय क्षीरसागर यांनी
गुरुवार, 01/17/2013 - 18:23  ·  लेख
लेख
कधीही न भेटणार्‍या, पण जिवलग मित्रांची ही स्टोरी. न भेटता (किंवा भेटण्याची शक्यता नसताना) ते जिवलग कसे झाले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. तो भेटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा चालतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायच नाही.... फक्त वाचायच. _________________________________ मुक्कामाचं ठिकाण ठाऊक नाही पण चालयच,... वेड्यासारखं चालायच. आजूबाजूच्या गर्दीला जुमानतय कोण? उन्हातान्हातून वणवण त्यात सावली कुठली बोंबलायला ? आपलीच पावलं म्हटल्यावर झक मारत चालणारच आणि पावलं चालतायत म्हटल्यावर रस्ता न सरून सांगतोय कुणाला? अरे एक सांगायच राहिलं, वाळवंटातनं चालायच....फार मजा येते. अचानक वाळूत अक्षरं उमटलेली दिसतात. कोण लिहून गेला कसं कळणार? चालायची ताकद संपली पण बघायची आहे ना? (बघा!) ...पण दिसलं काहीच नाही. तरी कुणीतरी आहे असं भासलं...(मला भास होतायत वगैरे निष्कर्ष काढू नका वाळूवरची अक्षर दिसली म्हटलयना?) चला आता वाळूवरच्या अक्षरांशी खेळू . डोळ्यांची वाट लागली तरी हरकत नाही... ‘आत’ शांत वाटायला हवं. त्या लिहित्या हाताला उत्तर देतो. ‘कसं देणार’ काय विचारताय? मगाशी सांगीतलं ना ‘कुणी रेखाटलीयेत माहिती नाही’ तरी आपल्याकडे आयडीया आहे ना!.... त्याच वाळूत अक्षरं लिहून उत्तरं द्यायची! आह..! झाला संवाद चालू! (स्वत:चा स्वत:शी का होईना)...‘काही तरी चालू झालं’ हे महत्त्वाच. सुरुवातीला वेड्यासारखा वाटणारा हा अनोखा संवाद हळूहळू.. पावलागणिक वाढत गेला (तुम्हाला काय वाटलं थांबलो? छे, .....चालता चालता लिहीतोय ). अक्षरं उमटत राहिली. कधी वरून खाली कधी खालून वर. (मायला वाचणारेय कोण? मीच ना?) मग कशी लिहीली काय विचारताय? तू. मी. मी. तू. ..... मी काय वाळूतली हुतूतू खेळत नाय, नीट वाचा... तू. मी. मी. तू. ..आय एम रायटींग संवाद फ्रॉम बोथ साइडस. आता पुन्हा ‘कश्याला लिहीतोय’ विचारू नका... न भेटणार्‍या `जिवलग मित्रांची' स्टोरी आहे ही (एकदा सांगीतलय ना) आता वाळूतली अक्षरं डोक्यात गेली. सगळीकडे अक्षरं... पानापानांवर, फुलाफुलावर. कधी वार्‍याच्या झुळकीवरदेखील. कधी तर थेट मोठ्यांदा वाचायलाच लागलो. अक्षरांच्या सोबतीनं आता जगणं आलं. इतकं इतकं बोलतोय तुझ्याशी. तुझ्याच शब्दात सांगायचं तर स्वतःशी बोलावं इतकं. (पब्लिक माझ्याकडे विचित्र नजरेनं बघतय,... बघू दे) येड्यावाणी उर्दू-मराठीची भेसळ चाललीये पण अजूनही अक्षरंच. लिहिणारा हात नाही. त्या अक्षरांना तुझा चेहरा नाही.. कधी येशील समोर? या प्रश्नाला उत्तरही अक्षरीच. समोर येऊन नाही.... (अजून सॅंडवरच चाललय सगळं, आलं ना लक्षात?) माझ्याकडे तुझा फोन नाही, पत्ता नाही, इ-मेल नाही, फेसबुक कश्याला म्हणतात मला माहिती नाही. अगम्य अश्या `संपर्कमाध्यमांतून आपण एकमेकांचे मित्र आहोत. पण आपण एकमेकांना कॉंटॅक्ट करायचा नाही. आपण फक्त बोलायच. वन वे...वाळूत अक्षरं लिहून. काही क्षणांत.. किंवा कुठेसं म्हटलंय तसं दोन क्षणांच्या गॅपमधे का होईना पण तुझ्याशी जोडलं राहण्याचं अक्षराशिवाय साधन नाही, हे जाणून फार येड्यासारखं होतं. (तरी मी लिहीणार!) नुसतेच शब्द, त्यांचे कधी तू, कधी मी, आणि कधी आपण मिळून लावलेले अर्थ. कळतयं ना तुला? मीच लावतोय अर्थ पण तुला मधे ओढतोय.... (नायतर पब्लिक ट्यांपोत बसवेल) आनंद देणार्‍या इतर कोणत्याच गोष्टी तुझ्यासोबत करता येत नाहीत. (....ते केलं तर पारच कामातून गेला म्हणतील सगळे) स्वतःला दिवसातून केव्हाही आरशात बघतो तेंव्हा तूच दिसायला लागलायस..नाही नाही... असाही दिवस येईल कधी तरी . ( अजून तरी आरश्यात बघीतल्यावर मीच दिसतोय) तुझंमाझं नातं ते काय मग? निव्वळ शब्द?... नाही नाही... निदान तू तरी असं म्हणू नकोस. ‘आरशाच्या पलिकडे’ बघतो कसलाच शोध लागत नाही. मग तुला बघण्याचा हा विलक्षण सोस तरी का लावून घ्यायचा जिवाला? तू दिसलास कदाचित, तर काय होईल त्याने? स्वप्नपूर्ती? अपेक्षाभंग?.... छे, छे, तू दिसावास अशी अपेक्षा तरी कशाला? (वाळूतली हुतूतू काय कमी मजा आणतेय?) याच विचारात मग्न असताना कुणीतरी एफेम लावला..... मेरे फोटोको, मेरे फोटोको सीनेसे यार, चिपकाले सैंय्या फेविकॉल से! ....अचानक उत्तर मिळूनही गेलं. . तू आहेस अशी पाटीच गळ्यात अडकवून घेतली! आता एकदम झ्याक झालं.. एकरूप असणे, समरस होणे अनुभवतोच आहे प्रत्येक क्षणी. हे ‘नसलेल्याच असलेल्याशी नातं’.... अशी फेविकॉल सोबत मिळणे हे माझं परमभाग्यच! तेव्हा तुझंमाझं नातं. निरंतर टिकणारं.... फेविकॉल कशाला हवा? कल्पनेची पकड काही कमी नाही. निरक्षर म्हणजे अक्षर ओळख नसलेला असा नाही. त्याला लिहीता वाचता येतं, पण अर्थ समजत नाही. आता आपलं नातं निव्वळ शब्दात बांधलेलं नव्हे, तर कधी न मिटणारं.... फेविकॉलपेक्षा मजबूत....निरक्षर भ्रमाच्या लेपाचं. आता तू असलास काय आणि नसलास काय, दिसलास काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही... माझ्या बाजूनं नातं पक्कं आहे! त्याला स्थळाकाळाचं बंधन नाही....कल्पना हेच त्याचं लिमिट आणि तीच त्याची पॉवर.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
औषधोपचार
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
28910 वाचन

💬 प्रतिसाद (147)

प्रतिक्रिया

हे एक्दम पटले..

अक्षया
Fri, 01/18/2013 - 17:05 नवीन
लेखाचा मुळ विषय जर जीने लिहीला आहे तीने समजावुन सांगुन पण नाकारला जातोय तीथे कोण काय बोलणार? आणि स्वतःला हवा तसा अर्थ काढुन उगीच काथ्याकुट केला जात आहे असे वाटते आहे. त्या अक्षर लेखाचा आणि स्वाक्षरीचा संबंध का लावला जातो आहे? लेखावर प्रतिक्रीया लिहिणे ठीक पण कोणाची स्वाक्षरी आणि लेख याची सांगड घालण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

त्या अक्षर लेखाचा आणि

धन्या
Fri, 01/18/2013 - 17:15 नवीन
त्या अक्षर लेखाचा आणि स्वाक्षरीचा संबंध का लावला जातो आहे? लेखावर प्रतिक्रीया लिहिणे ठीक पण कोणाची स्वाक्षरी आणि लेख याची सांगड घालण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे असे मला वाटते.
असेच मलाही वाटते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षया

सो शिंपळ

अनाम
Fri, 01/18/2013 - 17:21 नवीन
मुद्दे संपले की गुद्दे सुरु होतात अस मोठमोठाली माणसं सांगुन गेलीत . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अक्षर लेखाचा आणि स्वाक्षरीचा संबंध का लावला जातो आहे?

संजय क्षीरसागर
Fri, 01/18/2013 - 17:31 नवीन
केवळ मी गुडघ्यावर डोकं टेकून बसल्याने सिद्ध किंवा बुद्ध झालो, असा भ्रम किती काळ बाळगणार?
हे त्यांनी लेखनाचा आशय लक्षात न घेता केलेलं विधान आहे. म्हणून विचारलय की `देव आहे अशी स्वाक्षरी ठोकणं' म्हणजे देव आहे हे सिद्ध करणं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

उत्तम लिहीणार्‍या दोन

गवि
Fri, 01/18/2013 - 17:34 नवीन
उत्तम लिहीणार्‍या दोन चांगल्या सदस्यांमधे वाद आणि चकमकी चालत राहू नयेत, शब्दच्छल होत राहू नये म्हणून आपल्याला काहीच करता येत नसल्याने मी गुडघ्यावर डोकं टेकून हत"बुद्ध" झालो आहे इतकंच कळतंय.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बुद्ध हे कुणा व्यक्तीचं नाव

धन्या
Fri, 01/18/2013 - 17:40 नवीन
बुद्ध हे कुणा व्यक्तीचं नाव नसून ती एक अवस्था आहे. तुमच्या या प्रतिसादावरुन तुमची अवस्था खुपच अवघडल्यासारखी झाली आहे असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि,

किसन शिंदे
Fri, 01/18/2013 - 17:51 नवीन
गवि, एक बाजू शांत असली तरी दुसर्या बाजुने हा वाद मुद्दामच उकरून काढला जातोय असंच दिसतंय आणि एकदा का डोळ्यावर तिरस्काराची पट्टी बांधली कि सगळं जगंच तिरस्कारमय वाटू लागतं आणि मग अशा वेळी आपल्याकडून कितीही समझोता करण्याचा प्रयत्न केला तरी तो निष्फळच ठरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

किसनदेवा, येनकेनप्रकारेण

बॅटमॅन
Fri, 01/18/2013 - 18:10 नवीन
किसनदेवा, येनकेनप्रकारेण ट्यार्पी वाढवायचा असला की असंच होतं. "बदनाम होगा तो क्या नाम न होगा?" असे श्री श्री श्री १००८ जॅक चिमणाजी(स्पॅरो, रा. ब्ल्याक पर्ल, मु. टोर्टूगा बुद्रुक) म्हणून गेलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

सहमत..

मोदक
Sat, 01/19/2013 - 07:23 नवीन
सहमत.. खरे तर लेखिकेने 'लेख समजावून देण्याची' आवश्यकता नव्हती. अक्षर सारखा नितांतसुंदर लेख 'समजावून देणे' हा प्रकारच मुळी ' साक्षर आणि सुजाण' वाचकांच्या बुध्दीचा उपमर्द ठरतो. "कंस्ट्रक्टीव्ह क्रिटिसिझम नसेल तर दुर्लक्ष ही सर्वात मोठी शिवी आहे" असे विमे इथेच कुठेतरी म्हणाला आहे ते आठवले. हे व अशाप्रकारची सूडभावनेतून केलेली सो कॉल्ड विडंबने मात्र मानवी स्वभावाचा मजेशीर पैलू दाखवून जातात. 'अहंकार माणसाकडून काय काय करवून घेतो' याची प्रचिती आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षया

लेखात सूड भावना कुणीही दाखवून द्यावी

संजय क्षीरसागर
Sat, 01/19/2013 - 10:54 नवीन
लेखनाकडे त्या भावनेतून बघितलं जातय. लेखिकेनं देखील स्पष्टीकरण देता येईनासं झाल्यावर
केवळ मी गुडघ्यावर डोकं टेकून बसल्याने सिद्ध किंवा बुद्ध झालो, असा भ्रम किती काळ बाळगणार?
असा उघडपणे व्यक्तिगत प्रतिसाद दिलाय.... कोणत्या प्रतिसादात तिरस्कार आहे आणि तिरस्कार कशाला म्हणतात हे तुमचे प्रतिसाद दर्शवतात असं विचाराअंती लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ब्वॉर.....

मोदक
Sat, 01/19/2013 - 11:57 नवीन
ब्वॉर संक्षी. तुम्ही जिंकलात आम्ही हरलो. खुश?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अक्षर सारखा नितांतसुंदर लेख

धन्या
Sat, 01/19/2013 - 12:15 नवीन
अक्षर सारखा नितांतसुंदर लेख 'समजावून देणे' हा प्रकारच मुळी ' साक्षर आणि सुजाण' वाचकांच्या बुध्दीचा उपमर्द ठरतो.
हे पटलं. बाकी चालू दया. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हा लेख आणि त्यामागची प्रेरणा

५० फक्त
Fri, 01/18/2013 - 16:34 नवीन
हा लेख आणि त्यामागची प्रेरणा असलेला लेख माझ्यासारख्या ब-याच अज्ञानी मिपाकरांना ओएसओएस पडला आहे, कुणीतरी समजावुन सांगायला एक नविन लेख लिहिलं का आम्हासाठी ?
  • Log in or register to post comments

आणि हा तुमचा दुसरा मुद्दा!

संजय क्षीरसागर
Fri, 01/18/2013 - 17:03 नवीन
'संपर्काशिवाय मैत्री' असं कुठेही अक्षर मध्ये म्हटलेलं नाहीय. 'प्रत्यक्ष भेटीशिवाय मैत्री' असं ते सूत्र आहे
यात तुम्ही सगळ्यांना गोवायचा प्रयत्न करून इंटरनेट मैत्रीशी संबंध जोडलाय! लेखावरच्या प्रतिसादात मात्र तुम्ही म्हटलय
एकमेकांना कधी न भेटणार्‍या पण एकमेकांचे निव्वळ 'व्हर्च्युअल स्नेही' असणार्‍यांचं मनोगत आहे हे.
आता भेटणार नाहीच म्हटल्यावर चालायच कशाला? आणि हो,
मृण्मयाशी नातेच नसलेली अशी चिन्मयाची सोबत मिळणे हे माझे अहोभाग्यच!
इंटरनेट मैत्री रियलशी असते चिन्मयशी नाही!
  • Log in or register to post comments

जराशी गंमत!!!

विलासिनि
Fri, 01/18/2013 - 17:49 नवीन
नितस अजून काही कळ्त नाही पण हात हे काय लिहीताहेत वेडयासारखे.... रोको मत!! टोको मत!! रोको मत!! टोको मत!! किताबोंके बाहर किताबे बहोत....
  • Log in or register to post comments

निरबुद्ध

Dhananjay Borgaonkar
Fri, 01/18/2013 - 18:21 नवीन
निरबुद्ध लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण. मी मी मी मी मी मी मी आणि फक्त मीच...
  • Log in or register to post comments

कुंकु का लावतात? थुक्का का...

अक्षया
Fri, 01/18/2013 - 18:24 नवीन
कुंकु का लावतात? थुक्का का लावतात? बार का लावतात? लोक जास्त डोकं का लावतात? :)
  • Log in or register to post comments

लोक जास्त डोकं का लावतात?

किसन शिंदे
Fri, 01/18/2013 - 18:58 नवीन
लोक जास्त डोकं का लावतात?
अक्षया ताई, ह्याच्याऎवजी लोक जास्त डोकं का खातात असा बदल केला तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षया

+ १

अक्षया
Sat, 01/19/2013 - 09:52 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

देव (किंवा कधीही न भेटणारा मित्र) यातला संवाद एकतर्फी असतो

संजय क्षीरसागर
Fri, 01/18/2013 - 19:36 नवीन
इतकंच सांगण्याचा प्रयत्न होता. चर्चा व्यक्तिगत होऊन वातावरण बिघडू नये म्हणून इथे थांबतो.
  • Log in or register to post comments

एव्हडाच उद्देश होता ?

अग्निकोल्हा
Fri, 01/18/2013 - 20:04 नवीन
मग "निरक्षर" असं नाव का दिलयं कथेला ? ते अजिबात समर्पक नाही असंच वाटलं, हा प्रतीसाद वाचुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कथा स्वानुभव म्हणत चितारली

अग्निकोल्हा
Fri, 01/18/2013 - 20:27 नवीन
कथा स्वानुभव म्हणत चितारली गेली आहे, म्हणुनच
तू असलास काय आणि नसलास काय............................ती कल्पना हेच त्याचं लिमिट आणि तीच त्याची पॉवर.
या शेवटच्या वाक्याचे ती अतिशय समर्थनच करत आहे असा भास या लेखातुन निर्माण होतो. आणि जर तुम्हाला
देव (किंवा कधीही न भेटणारा मित्र) यातला संवाद एकतर्फी असतो
फक्त इतकच या कथेतुन सांगायच होतं तर आपण लेखाची अनुभवरचना/वाक्यरचना पराकोटीची चुकीची केली आहे. अथवा सामान्याची दिशाभुल करणारी केलि आहे इतपतच निश्कर्ष इथं उभा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ग्लिफ, मुळात देव ही मानवी कल्पना आहे

संजय क्षीरसागर
Fri, 01/18/2013 - 22:49 नवीन
तुम्ही काहीही केलं तरी त्याची भेट होत नाही. आणि झाली याचा अर्थ तुम्ही (स्वतःपुरता तयार केलेला) भ्रम सार्थ झालाय. वॉटेवर वन कम्युनिकेटस विथ गॉड इज जस्ट वन वे. म्हणून शेवट असा केलाय : कल्पना हेच त्याचं लिमिट आणि तीच त्याची पॉवर पोस्ट लिहीताना इथल्या पूर्वप्रकाशित लेखाचा संदर्भ घेतला होता. दुर्दैवानं तो स्कोरसेटलींग समजला गेला आणि त्यामुळे लेखनातला मुद्दा हरवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

मुळात देव ही मानवी कल्पना आहे

अर्धवटराव
Fri, 01/18/2013 - 22:51 नवीन
एक असं उदाहरण द्या जी मानवी कल्पना नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही स्वतः!

संजय क्षीरसागर
Fri, 01/18/2013 - 22:54 नवीन
यू कांट डिनाय योरसेल्फ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

यु कान्ट डिनाय योरसेल्फ.

अर्धवटराव
Fri, 01/18/2013 - 23:31 नवीन
जर "तुम्ही" कल्पना नाहि तर "स्वतः" कल्पना आहे जर "स्वतः" कल्पना नाहि तर "तुम्ही" कल्पना आहे जर "तुम्ही" आणि "स्वतः" कल्पना नाहि "आहोत" हि कल्पना आहे इजण्ट इट ?? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एक असं उदाहरण द्या जी मानवी

सोत्रि
Fri, 01/18/2013 - 23:31 नवीन
एक असं उदाहरण द्या जी मानवी कल्पना नाहि.
तुम्ही स्वतः!
अहाहा, मस्त! _/\_ बाकी चर्चा चालू राहूदे! - (निरक्षर) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

थोडा थोडा अर्थ बोध होतोय... पण गुंताही वाढतोय.

अग्निकोल्हा
Sat, 01/19/2013 - 03:47 नवीन
यू कांट डिनाय योरसेल्फ... वॉटेवर वन कम्युनिकेटस विथ गॉड इज जस्ट वन वे.
अहो मग तर एक गम्मतच आहे. त्याचा मतितार्थ असा की गॉडच न्हवे तर तुमचं माझाशी अथवा माझं तुमच्याशी अथवा कोणाचही कोणाशी असलेलं सगळंच कम्युनीकेशन फक्त वन वेच आहे. कारण जर आपण स्वतःच अस्तित्वात नाही तर अनुभवाला येणारं हे जगही अस्तित्वात नाही. म्हणजेच फक्त आणि फक्त स्वतःच्या अस्तित्वाच्या आधारावरच जगाचं/देवाचं/मित्रांच/आइ-वडिलांच अथवा यच्चावत अस्तित्व असलेल्या/नसलेल्या गोश्टींच अस्तित्व आहे हे घडतं. ह्य नियमानुसार/प्रत्यक्ष अनुभवानुसार सगळं जिवन अथवा जगच काय मुळात आपलंही अस्तित्व आहे असं मानणं हेही एक प्रकारे वन वे कम्युनिकेशनच झालं की... आणि वन वे कम्युनिकेशन भ्रामक असतं असंच आपण या लेखात सुचवत आहात, मग आपलं आस्तित्व "यू कांट डिनाय" कसं म्हणता येइल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ह्य नियमानुसार/प्रत्यक्ष

अग्निकोल्हा
Sat, 01/19/2013 - 04:24 नवीन
ह्य नियमानुसार/प्रत्यक्ष अनुभवानुसार सगळं जिवन अथवा जगच काय मुळात आपलंही अस्तित्व आहे असं मानणं हेही एक प्रकारे वन वे कम्युनिकेशनच झालं की... आणि वन वे कम्युनिकेशन भ्रामक असतं असंच आपण या लेखात सुचवत आहात, मग आपलं आस्तित्व "यू कांट डिनाय" कसं म्हणता येइल ?
- थोडक्यात व्यापक विचारांती (Big Picture) आपल्या लेखनातुन (हा लेख व त्यावरचे आपण दिलेल्या प्रतिसादांचे सार यावरुन) तयार होणारा निष्कर्श असा बनतोय की, केवळ वन वे कम्युनिकेशन आहे ह्या मुद्यावर ज्या कशा सोबत/बाबत हे कम्युनिकेशन वन वे आहे त्या गोष्टिचं अस्तित्व ठामपणे नाकारता येइलच अथवा भ्रामक आहे असं म्हणता येइलच असं नाही. उदा. आपली भेट अजुन झाली नाहीये, मग आत्ता जर तुम्ही तुमच्या मनात म्हणालात (वन वे कम्युनिकेशन केलं) कि ग्लिफ ही व्यक्ती रंगाने काळी, बूटकी व अक्कडबाज मिशी राखणारी अथवा कुंकु लावणारी आहे(समोरीला). तर ती व्यक्ती तशी(च) असेलही अथवा नसेलही... बस इतकच. म्हणजे ग्लिफ ही व्यक्ती रंगाने काळी, बूटकी व अक्कडबाज मिशी राखणारी हे ठामपणे सिध्द व्हायला तुम्ही केवळ वन वे कम्युनिकेशन केलतं ही एकमेव प्रक्रिया पुरेशि नाही व अवैज्ञानिकही ठरु शकते. म्हणुनच जर का मी आपले लिखाण वाचण्यात्/समजण्यात चुक करत नसेन तर या लेखाचा आपण व्यक्त करत असलेला उद्देश व लिखाणातुन निघणारा निष्कर्श यात कमालिची तफावत आश्चर्यकारकपणे सामोर येत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

ग्लिफ, तुम्ही स्वतः कल्पना नाही पण तुम्ही कल्पना करू शकता

संजय क्षीरसागर
Sat, 01/19/2013 - 10:06 नवीन
पहिल्या प्रतिसादात तुम्ही केलेली जोडणी बरोबर आहे पण काढलेला अर्थ तर्कपूर्ण नाही
यू कांट डिनाय योरसेल्फ... वॉटेवर वन कम्युनिकेटस विथ गॉड इज जस्ट वन वे
याचा अर्थ असा नाही :
अहो मग तर एक गम्मतच आहे. त्याचा मतितार्थ असा की गॉडच न्हवे तर तुमचं माझाशी अथवा माझं तुमच्याशी अथवा कोणाचही कोणाशी असलेलं सगळंच कम्युनीकेशन फक्त वन वेच आहे.
तुम्ही आणि मी एकच रिअ‍ॅलिटी आहे कारण आपल्या सर्वांचा `मी' एकच आहे. ती निर्वैयक्तिक जाणिव आहे. तुमच्या आणि माझ्यातला संवाद (जरी इंटनेटवर आणि दोन अनोळखी व्यक्तीत असला) तरी तो अ‍ॅक्च्युअल आहे. मी माझ्या कल्पनेशी (देव) संवाद साधत नाहीये, अस्तित्वात असलेल्याशी संवाद साधतोय.
थोडक्यात व्यापक विचारांती (Big Picture) आपल्या लेखनातुन (हा लेख व त्यावरचे आपण दिलेल्या प्रतिसादांचे सार यावरुन) तयार होणारा निष्कर्श असा बनतोय की, केवळ वन वे कम्युनिकेशन आहे ह्या मुद्यावर ज्या कशा सोबत/बाबत हे कम्युनिकेशन वन वे आहे त्या गोष्टिचं अस्तित्व ठामपणे नाकारता येइलच अथवा भ्रामक आहे असं म्हणता येइलच असं नाही.
संवाद निरर्थक होण्यासाठी एक गोष्ट अस्तित्वात नसावी लागते. इथे आपण दोघही अस्तित्वात आहोत (आणि मनात आणलं तर एकमेकांना प्रत्यक्ष भेटू शकतो) देव हा भक्तानी स्वतःपुरता निर्माण केलेला भ्रम आहे. जर एखाद्याचा देव त्याला पानापानात, फुलाफुलात, वार्‍याच्या झुळूकेत वगैरे दिसायला लागला तर ती व्यक्ती वास्तवापासून अलग झाली आहे. तिचा भ्रम सघन झाला आहे. शी (ऑर ही) इज कंप्लीटली टेकन ओवर बाय हर ओन इल्यूजन. आणि ती अवस्था दारूण आहे, म्हणून हा लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

सुरेख! आपण शिक्षकच असणार. फारच सोपं करता सगळं.

अग्निकोल्हा
Sat, 01/19/2013 - 15:39 नवीन
धार्मिक साहित्यातुन अधोरेखित झालेला देव अस्तित्वात नाही एव्हड्यासाठिच हा लेखन प्रपंच असेल तर मुद्देसुद मांडणी वाटत आहे.
देव हा भक्तानी स्वतःपुरता निर्माण केलेला भ्रम आहे. जर एखाद्याचा देव त्याला पानापानात, फुलाफुलात, वार्‍याच्या झुळूकेत वगैरे दिसायला लागला तर ती व्यक्ती वास्तवापासून अलग झाली आहे.
:) क्लासच _/\_ ! म्हणजे आता तुम्ही पाकिस्तान मधे राहता असं कोणी म्हटलं तर तुमची तक्रार नसावी, उगाच कशाला आपण रहात असलेल्या आजुबाजुच्या प्रत्येक कस्पटामधे हा भारताचा अविभाज्य घटक आहे म्हणुन ठासुन बरळायचं ते ? असले मानसिक विभ्रम हवेतच कशाला ?
संवाद निरर्थक होण्यासाठी एक गोष्ट अस्तित्वात नसावी लागते. इथे आपण दोघही अस्तित्वात आहोत (आणि मनात आणलं तर एकमेकांना प्रत्यक्ष भेटू शकतो)
पुन्हा गोधंळ उडवलात. आपण दोघही अस्तित्वात आहोत म्हणजे काय ? तुम्हाला कशावरुन खात्री आहे की "ग्लिफ" सुध्दा अस्तित्वात आहे ? आणि तो फक्त मनाचा खेळ नाही (मी अतिशय गांभिर्यानेच हा प्रश्न अतिशय Frank उत्तराच्या अपेक्षेनेच केला आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्हाला कशावरुन खात्री आहे की "ग्लिफ" सुध्दा अस्तित्वात आहे ?

संजय क्षीरसागर
Sat, 01/19/2013 - 20:41 नवीन
तुमच्या प्रतिसादावरून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

:)

अग्निकोल्हा
Sat, 01/19/2013 - 22:01 नवीन
मग
म्हणजे आता तुम्ही पाकिस्तान मधे राहता असं कोणी म्हटलं तर तुमची तक्रार नसावी, उगाच कशाला आपण रहात असलेल्या आजुबाजुच्या प्रत्येक कस्पटामधे हा भारताचा अविभाज्य घटक आहे म्हणुन ठासुन बरळायचं ते ? असले मानसिक विभ्रम हवेतच कशाला ?
हा निष्कर्श बरोबर आहे का समजण्यात अजुनही वाचकांची चुक होतेय ?
तुमच्या प्रतिसादावरून!
अरे बापरे हा तर निरक्षर भ्रमाच्या किती मोठा लेप झाला ? कारण आपण म्हणताय की केवळ "तुमच्या प्रतिसादावरून!" तुम्हि माझं अस्तित्व मान्य केलतं. हे मूळातच "एक वन वे कम्युनिकेशन" आहे. कारण याक्षणी "ग्लिफ" या व्यक्तिने या धाग्यावर लिहलेले प्रतीसाद हे केवळ एकाच व्यक्तिने लिहले आहेत असे आपण "वन वे" ठरवुन मो़कळे झालात. थोडक्यात "ग्लिफ" ही एकच व्यक्ती आहे अस्तित्वात आहे जी प्रतिसाद लिहते आहे याबद्द आपण वन वे शुअर आहात, "ग्लिफ" बद्दल आपण तशी दाट अंधश्रध्दा बाळगली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग "ग्लिफ" चे अस्तित्व तुम्ही खरे कसे मानता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ग्लिफ,

संजय क्षीरसागर
Sat, 01/19/2013 - 23:11 नवीन
दोन गोष्टी आहेत : एक, यू कांट डिनाय योरसेल्फ. आणि दोन, देव ही मानवी कल्पना आहे माझं या पलिकडे एकही स्टेटमंट नाही. आता तुमचे मुद्दे :
आता तुम्ही पाकिस्तान मधे राहता असं कोणी म्हटलं तर तुमची तक्रार नसावी
देश किंवा सरहद्द या देखील कल्पनाच आहेत. याचा अर्थ भारताला पाकिस्तान म्हणा असा नाही.
मग "ग्लिफ" चे अस्तित्व तुम्ही खरे कसे मानता ?
तुम्ही ग्लिफ असा की संजय मुद्दा तो नाही. `तुम्ही आहात' यू एक्सिस्ट... दॅटस द पॉइंट. आणि देव नाही कारण ती कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

अकारण विषय भरकटतोय.

अग्निकोल्हा
Sun, 01/20/2013 - 00:38 नवीन
एक, यू कांट डिनाय योरसेल्फ. आणि दोन, देव ही मानवी कल्पना आहे
तुम्ही ग्लिफ असा की संजय मुद्दा तो नाही. `तुम्ही आहात' यू एक्सिस्ट... दॅटस द पॉइंट. आणि देव नाही कारण ती कल्पना आहे.
अहो पण मुळात मी सुध्दा तेच म्हणतोय की वन्स यु एक्सेप्ट ओन्ली यु एक्सिट, देन ऑल द रेस्ट इज जस्ट अ वन वे कम्युनीकेशन... इनक्लुडींग बट नॉट लिमीटेड टु अ गॉड बट एव्हरिथींग. दॅट इज द रिअल मॅग्निट्युड ऑफ युअर स्टेटमेंट कमिंग अप. अँड इट इज यु हु सेड हिअर कि वन वे कम्युनीकेशन हा भास असतो. म्हणजे केवळ देवच न्हवे तर सगळाच भास असतो असं आपण म्हणत आहात. जे मला फार विचीत्र वाटतयं.
देश किंवा सरहद्द या देखील कल्पनाच आहेत. याचा अर्थ भारताला पाकिस्तान म्हणा असा नाही.
विधान चर्चेच्या माध्यमातुन भरकटले आहे. ज्या प्रमाणे भारताचा कण अन कण भारताचा अविभाज्य भाग आहे मग माती असो नाही तर आंबे (रिगार्डलेस ऑफ नेमिंग कन्वेंशन) व देश किंवा सरहद्द या देखील कल्पनाच. तसच जर काल्पनिक परमेश्वराची सर्वव्यापकता सर्वत्र शोधणार्‍या(पानापानात, फुलाफुलात, वार्‍याच्या झुळूकेत वगैरे ) वैज्ञानिकास आपण जे म्हटले आहे तेच प्रंमाण भारत पाकिस्तान जपान अशी सरहद मानणार्‍यालाही म्हटले पाहिजे/लागु होते कारण आपण म्हणता तसं देश किंवा सरहद्द या देखील कल्पनाच/भ्रमच आहेत. नाही का ? या लोकांना भ्रमीश्टच म्हटलं पाहीजे. बरोबर ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

थोडक्यात "ग्लिफ" ही एकच

कवितानागेश
Sat, 01/19/2013 - 23:58 नवीन
थोडक्यात "ग्लिफ" ही एकच व्यक्ती आहे अस्तित्वात आहे जी प्रतिसाद लिहते आहे याबद्द आपण वन वे शुअर आहात, "ग्लिफ" बद्दल आपण तशी दाट अंधश्रध्दा बाळगली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग "ग्लिफ" चे अस्तित्व तुम्ही खरे कसे मानता ?> म्हणजे ग्लिफ या अनेक व्यक्ती आहेत का? की glyph feels that he doesn't exist! असे काही होतय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

वेल माय डिअर चाइल्ड ऑफ गॉड....

अग्निकोल्हा
Sun, 01/20/2013 - 00:49 नवीन
ग्लिफ काय आहे अथवा तो काय फिल करतो या पेक्षा आपण ग्लिफ बाबत जे काय फिल करतो तो एक भास आहे असे या धाग्याच्या लेखकाचे जे विधानीक विचार आहेत जे मला पटायला अवघड जातात... लेखकाने दिलेल्या विधानांचा सखोल निरीक्षण केल्यास ते केवळ देवच न्हवे तर इतर सगळ्यालाच (अगदी देशा पासुन सरह्द्दी पर्यंत ते अनुभवाला येणार्‍या प्रत्येक गोश्टीला) फक्त एक "कल्पना" हे रुप (बहुदा अजाणतेपणे पण अतिशय सुस्पष्टतेने) लागु करत आहेत. असं कसं काय ते या सगळ्याला भ्रम म्हणु शकतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

कारण त्यांच्या म्हणन्या नुसार "तुम्ही आहात" हाच मुद्दा आहे.

अग्निकोल्हा
Sun, 01/20/2013 - 00:53 नवीन
आणि वन्स वि एक्सेप्ट ओन्ली यु एक्सिट, देन ऑल द रेस्ट इज जस्ट अ वन वे कम्युनीकेशन... इनक्लुडींग बट नॉट लिमीटेड टु अ गॉड बट एव्हरिथींग. दे शुड बी रिस्पॉन्सीबल फॉर व्हाट आर दे क्लेमिंग हिर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

आपुलाचि वाद आपणासि|

कवितानागेश
Sun, 01/20/2013 - 00:58 नवीन
आपुलाचि वाद आपणासि|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

:)

अग्निकोल्हा
Sun, 01/20/2013 - 01:12 नवीन
एखादी गोश्ट कल्पना आहे असं म्हणताना कल्पना या प्रक्रियेची व्याप्ती केवळ परमेश्वर मानणे इतपतच नाहिये तर त्या पलिकडे ही पोचली आहे. नसलेल्या गोश्टींची कल्पना करुनच असलेल्या गोश्टींची सोय केली जाते. जसं कि... १) कालगणना. प्रत्यक्षात याला अस्तित्व नाही पण ही काल्पनीक गोश्टही किती सुसुत्रता आणते रोजच्या दिनक्रमात ? २) आपण बघत असलेला चित्रपट, याला अस्तित्व नाही तरी किती समरस होतो आपण कल्पनेकडे ? ३) आवाज कॅसेट वर टेप करुन मोटार जोरात फिरवली की मांजराचा आवाज निघतो, त्याला मांजराचं चित्र जोडल कि सुरेख काम झालं, याच संकल्पनेवर अँड्रॉइड अ‍ॅप आज किती पॉप्युलर झालय. आपण असं वाटत तिथल मांजर जणु आपण जे बोलु ते त्याच्या आवाजात रिपीट करतयं.... काल्पनिकच पण किती सुरेख ? कल्पना ही एक भलेही गुंतागुंत असताना त्याच वापर हा एक भ्रमच असताना आज त्याने आपल आयुष्य किती व्यापलय/ सुसह्य करत आहे... आणी हे सगळ घडायला या धाग्याच्या लेखकाने म्हटल्याप्रमाणे कल्पना हेच यामागचं लिमिट आणि तीच यामागची पॉवर आहे. असं असताना धागा कर्ता सामान्यांना गोधंळा पाडणारी विधाने का सपोर्ट करत आहे हे अनाकलनिय होतयं... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

देव आहे आणि देव नाही याबाबत

धन्या
Sun, 01/20/2013 - 12:34 नवीन
देव आहे आणि देव नाही याबाबत टोकाची मते असणार्‍या दोन्ही गटांना भानावर आणणारा प्रतिसाद. बहोत खुब !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

धन्याचे सर्व प्रतिसाद पटले.

भीमाईचा पिपळ्या.
Fri, 01/18/2013 - 23:04 नवीन
धन्याचे सर्व प्रतिसाद पटले. संक्षीप्त "काय राव तुम्ही, मरुन रोबच्या धाग्यावर भरपूर कमावले" पण -------------------------- =))
  • Log in or register to post comments

काय राव तुम्ही, मरुन रोबच्या

धन्या
Sat, 01/19/2013 - 00:13 नवीन
काय राव तुम्ही, मरुन रोबच्या धाग्यावर भरपूर कमावले पण त्या देवाच्या नादानं, सारं निरक्षर विडंबनात गमावले धनाजी शिंदे आणि पार्टी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमाईचा पिपळ्या.

धनाजीराव, ही पोस्ट स्कोरसेटलींग म्हणून वाचली जातीये त्यामुळे

संजय क्षीरसागर
Sat, 01/19/2013 - 10:28 नवीन
तसं वाटतय. इट इज अ प्लेन ज्योक. देव या काल्पनिक गोष्टीशी (किंवा कधीही न भेटणार्‍या मित्राशी) संवाद साधत गेलं तर काय घडू शकतं याच ते वर्णन आहे. लोक `तो' भेटावा म्हणून कायकाय करतात; परिक्रमा, तिथयात्रा, नामस्मरणाच्या दीर्घ साधना, लांबच्यालांब क्यूमधे तासंतास उभं राहणं.. आणि प्रत्येक भक्ताला वाटतं `तो' आधार आहे. त्याच आणि माझं नातं अक्षर आहे (तो मला अंतर देणार नाही). वन गेटस इंटू मोर अँड मोर इल्यूजन. इथे ग्लिफ या एकमेव सदस्यानं लेख पूर्वधारणेशिवाय वाचलाय... अँड दॅटस द पॉइंट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

@धनाजी शिंदे आणि पार्टी>>>

अत्रुप्त आत्मा
Sun, 01/20/2013 - 00:24 नवीन
@धनाजी शिंदे आणि पार्टी>>> Image removed. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

धनाजी शिंदे आणि पार्टी

भीमाईचा पिपळ्या.
Sat, 01/19/2013 - 00:20 नवीन
धनाजी शिंदे आणि पार्टी
हांग्ग्ग्ग्ग्ग आशि...... व्हौन जाऊद्या घुमशान...... =))
  • Log in or register to post comments

स्वतःचे अस्तित्व कबूल करणे

बॅटमॅन
Sat, 01/19/2013 - 23:52 नवीन
स्वतःचे अस्तित्व कबूल करणे किंवा नाकारता न येणे ही माणसांची किंवा सजीवांची नेसेसरी कंडिशन आहे असे फारतर म्हणता येईल, सफिशियंट आहे हे कशावरून????
  • Log in or register to post comments

मैं कौन हूं??

कवितानागेश
Sun, 01/20/2013 - 00:19 नवीन
मैं कौन हूं?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हम्म

पैसा
Sun, 01/20/2013 - 09:29 नवीन
आमच्या एका आभासी मित्रा(?)च्या म्हणण्याप्रमाणे मी जर मीच असेन तर "तुम्ही कोण?" या प्रश्नाचे खरे उत्तर काय? इथे प्रश्नचिन्ह टाकण्याचे कारण म्हणजे आता सगळ्याबद्दल(च) शंका यायला लागलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ग्लिफ ह्यांचे प्रतिसाद वाचून

निवांत पोपट
Sat, 01/19/2013 - 23:55 नवीन
ग्लिफ ह्यांचे प्रतिसाद वाचून लेखातील "कधीही न भेटणार्‍या, पण जिवलग)?) मित्रांची ही स्टोरी." ह्या लेखामधील पहिल्या व्याक्यातील सार्थता जाणवली ;) ..हम दोनो है अनजान मगर पहचान पुरानी लगती है ..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा