४८ तास

Primary tabs

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
18 Jan 2013 - 9:32 pm

हि गोष्ट माझ्या मित्राची आहे.(सर्जन लेफ्टनंट शिवा नायर याने प्रत्यक्ष अनुभवलेली.)ऑपरेशन ब्रासटांक्स १९८६-८७ मधील गोष्ट आहे. हा लष्करी सराव दुसर्या महायुद्धानंतर झालेला सर्वात मोठा सराव होता.तो नौदलाच्या शंकुश या HDW कंपनीच्या जर्मन पाणबुडी मध्ये डॉक्टर म्हणून पोस्टेड होता.त्या सरावासाठी त्यांनी ती पाणबुडी मुंबई बंदराच्या बाहेर काढली आणि त्यानंतर ते पाण्याखाली डुबकी मारून पाकिस्तान च्या दिशेने रवाना झाले.war patrol वर जेंव्हा पाणबुड्या जातात तेंव्हा त्या एक महिना भर पूर्ण पाण्याखालीच राहतात. त्यावेळेला सूर्याचे दर्शन एक महिना भर होत नाही.दिवसभर पाण्याखाली राहून गस्त घालायची आणि रात्री जेंव्हा पूर्ण अंधार असतो तेंव्हा पाण्याच्या खाली ४-५ मीटर राहून टोर्पेडो टयूब ने हवा घेऊन आपल्या बेंटर्या चार्ज करायच्या असा एक महिना काढायचा असतो.माणशी १५ लिटर पाणी दिवसाला मिळते.कपडे धुण्याचा प्रश्नच नसतो. कपडे वापरा आणि फेकून द्या.(disposable) (अंतरवस्त्रांसहित). कावळ्याची अंघोळ ३ दिवसात एकदा. बाकी पाणी पिणे आणि भांडी धुणे या साठी जास्त वापरले जाते.पाण्याचा साठा फारच थोडा असतो बाकी पाणी RO (रिवर्स ओस्मोसीस) या पद्धतीने मिळवले जाते त्यासाठी उर्जा कमीत कमी वापरावायासाठी पाण्याचे रेशनिंग करायला लागते.असो.
त्यांची पाणबुडी मुंबई बंदराच्या बाहेर निघाली आणि डुबकी मारून पाकिस्तानच्या हदीत शिरली.५-६ दिवस गस्त घातल्यावर त्यांच्या gps (गोल्बल पोसीशनिंग सिस्टीम )मध्ये काहीतरी गडबड असावी असे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी एके दिवशी पहाटे ६ वाजता पाण्याच्या पृष्ठभागावर येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस त्यांना आपण नक्की कोठे आहोत याची खात्री नव्हती. त्यामुळे त्यांनी पाणबुडी अगदी हळूहळू वर आणण्याचा निर्णय घेतला होता.परंतु
जेंव्हा ते पाण्याच्या पृष्ठभागा वळ आले तेंव्हा त्यांना जवळून जाणारया जहाजाची चाहूल लागली. त्यांनी आपला पेरीस्कॉप वर केला तर अगदी जवळ (नजरेच्या टप्प्यात एक पाकिस्तानी नौदलाचे जहाज "बाबर" दिसले (PNS बाबर). त्यांनी पेरीस्कॉप मधूनच आपली परिस्थिती जाणून घेण्यासाठी आजूबाजूला रडार आणि सोनार ने चाचपणी केली असता अजून दोन जहाजे असावीत असा अंदाज आला. एकदम त्यांना असे जाणवले कि आपण पाकिस्तान च्या हद्दीत खोलवर घुसलो आहोत.पाकिस्तानच्या हद्दीत घुसणे हा एक फार मोठा गुन्हाच होता. दुसर्या देशाच्या सागरी हद्दीत परवानगी शिवाय शिरणे ते सुद्धा तुमच्या कट्टर शत्रू असणाऱ्या पाकिस्तानच्या म्हणजे युद्धालाच निमंत्रण. त्या पाणबुडीच्या कॅप्टन च्या लक्षात हि गंभीर बाब ताबडतोब आली.त्याने ताबडतोब पाणबुडीत गंभीर प्रसंग असल्याचा घोष केला. सर्व सैनिक आपापल्या कामाच्या जागेवर ताबडतोब हजर झाले.
कॅप्टन ने पाणबुडीला परत बुडी मारण्याचा आदेश दिला.त्यांनी ती पाणबुडी सागर तळाच्या वर ५० मीटर वर आणून पाणबुडीची सर्व यंत्रे बंद करण्याचा आदेश दिला.
पाणबुडी उत्तर दक्षिण अशी उभी केली जाते.(पाणबुडीच्या लोखंडी आवरणामुळे आणि त्यात असलेल्या मोटार जनरेटर इत्यादी विजेच्या उपकरणांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात फेरबदल होतात.प्रत्येक जहाजात एक mad (magnetic anomaly detector) बसवलेला असतो त्यामुळे पाणबुडीने होणारे चुंबकीय बदल कळू शकतात.सगळी active सोनार बंद केली गेली.(active सोनार मध्ये तुम्ही ध्वनी लहरी
सोडता आणि त्याचा येणारा प्रतिध्वनी तुम्ही "ऐकता") फक्त बाहेरून येणारे आवाज ऐकण्यासाठी passive सोनार चालू होते. म्हणजे बोलणे बंद होते आणि ऐकणे चालू होते.
इकडे पाकिस्तानी जहाजांची हबेलंडी उडाली होती.भारतीय पाणबुडी कुठेही शोध न लागता एकदम पाकिस्तानी पण हद्दीत शिरते हि गोस्त त्यांच्या दृष्टीने नामुष्कीची आणि अत्यंत होती.ताबडतोब तिकडे रेड अलर्ट जाहीर झाला होता त्या भागात फिरणारी सर्व पाकिस्तानी जहाजाना पाचारण केले गेले शंकुश ला असे जाणवले कि बाबर बरोबर पाकिस्तानी नौदलाची आणखी तीन जहाजे आजूबाजूला फिरत होती आलमगीर,शहाजहान आणि खैबर.ते अतिशय काळजीने(desparately) भारतीय घुसखोर पाणबुडीचा शोध घेत होते.
शंकुशमध्ये सर्व लोक पूर्ण तणावाखाली होते. जर त्यांचा शोध लागला असता तर पाकिस्तानी नौदलाने त्यांना जलसमाधी दिली असती. आणि हि गोष्ट जगाला कळली सुद्धा नसती.पाणबुडीचा शोध लागला तर तिला बुडवणे एकदम सोपे असते. शत्रूची विमाने त्याच्या आसपास डेप्थ चार्जस (खोलवर फुटणारे पाण सुरुंग) टाकतात. त्याच्या स्फोटामुळे होणार्या लहरींनी पाणबुडीचे कवच(hull) फाटते आणि पाणबुडीला जलसमाधी मिळते.
पाणबुडी पाण्याच्या खाली फार वेगाने पळू शकत नाही आणि वर आली तर ताबडतोब बॉम्ब टाकून तिला बुडवले जाते शत्रूच्या भूमीवर मरण येणे ते सुद्धा जगाला न कळता. प्रेताला अंत्यसंस्कार नाही. कुटुंबाला अर्धा पगार सात वर्षे पर्यंत काही बातमी नाही कुठे गेले केंव्हा येणार ?
सर्व नौसैनिकांच्या काळजाचे ठोके चुकत होते. वर थोड्याथोड्या वेळाने एखादे पाकिस्तानचे जहाज आवाजाच्या टप्प्यात येत होते आणि जात होते.
लोकांना जेवणाची शुद्ध होती न झोपेची.त्यातून काही शूर सैनिक्म्हणु लागले नाहीतरी मरायचे आहे तर एकदोन पाकिस्तानी जहाजांना बुडवून मरुया. टोरपेडो किंवा क्षेपणास्त्रे डागुया.अशा परिस्थितीत कॅप्टन च्या नेतृत्वाची कसोटी लागते.आपला तणाव दूर ठेवून सर्न सैनिकांना डोके थंड ठेवण्यास सांगायला लागते.एक एक क्षण एका एका वर्षासारखा भासत होता. ऑफ द्ड्युटी माणसाना झोप येत नव्हती कूक ला स्वयंपाक सुचत नव्हता जेवणार्यांना भूक नव्हती.करण्यासारखे काहीच नव्हते. आय सी यु च्या बाहेर असणार्या लोकांसारखी परिस्थिती होती. फक्त फरक एवढाच होता कि इथे स्वतः च आय सी यु मध्ये होते.
क्रमश

प्रकटनमुक्तक

प्रतिक्रिया

शुचि's picture

18 Jan 2013 - 9:38 pm | शुचि

अतिशय थरारक वर्णन आहे. पाणबुडीवरील जीवनाची माहीती तर मिळालीच तसेच उत्कंठा खूप वाढली आहे आपल्या जवानांचे काय झाले, ते कसे शत्रूगोटातून परतले हे वाचण्याची. खरे सर आपले हे अनुभव खरच अतिशय रंजक आणि धाडसी वर्णनाचे आहेत. खरच मेजवानी आहे.

इष्टुर फाकडा's picture

18 Jan 2013 - 9:53 pm | इष्टुर फाकडा

मम म्हणतो. पुभाप्र !

चिर्कुट's picture

18 Jan 2013 - 9:47 pm | चिर्कुट

जबरदस्त अनुभव आणि तितकीच उत्तम लेखनशैली..

पुढे वाचण्यास उत्सुक. लौकर पुढचा भाग टाका आणि अजून मोठा भाग येउद्या.

श्रीरंग_जोशी's picture

18 Jan 2013 - 9:49 pm | श्रीरंग_जोशी

युधस्य कथा: रम्या:..! प्रत्यक्षात हि चकमक घडलीही नसेल पण परिस्थिती युद्धसदृश्यच होती.

प्रथम भागात जोरदार वातावरणनिर्मिती झालेली आहे.
पु. भा. प्र.

काही महिन्यांपूर्वीच मी हॅरीसन फोर्डचा के-१९ द विडोमेकर हा चित्रपट पाहिला होता त्यामूळे तुम्ही लिहिलेले वर्णन डोळ्यासमोर आणणे शक्य झाले.

सुबोध खरे's picture

19 Jan 2013 - 11:47 am | सुबोध खरे

साहेब
वरील घटना १००% सत्य आहे. फक्त मी त्याचा साक्षीदार नाही. सर्जन लेफ्टनंट शिवा नायर हा माझा मित्र त्या पाणबुडीत प्रत्यक्ष हजर होता आणि हि त्याने सांगितलेली खरी गोष्ट आहे. दुर्दैवाने माझी कल्पना शक्ती/ प्रतिभा तोकडी असल्याने मला कोणतेही लेख आपल्या प्रतिभेने लिहिता येत नाहीत. अगोदर लिहिलेले तिन्ही लेख हे माझे स्वतःचे (first hand) अनुभव आहेत. हा चौथा माझा स्वतः चा अनुभव नसला तरी मी पहिल्यानेच तसे नमूद केले आहे.

कृपया पुढचे लेखन लवकर करा. भयंकर उत्सुकता आहे.

विकास's picture

18 Jan 2013 - 10:11 pm | विकास

कृपया पुढचे लेखन लवकर करा. भयंकर उत्सुकता आहे.

सहमत! लेखनशैली देखील आवडली.

पाणबुडीबद्दल बरीच नवीन माहिती या निमित्ताने समजली.

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2013 - 10:06 pm | श्रीगुरुजी

लवकर पुढचा भाग टाका. उत्सुकता ताणली गेली आहे.

पैसा's picture

18 Jan 2013 - 10:08 pm | पैसा

अगदी थरारक आहे! पुढचा भाग लवकर आणि मोठा टाका जरा!

खुप सविस्तर लिहिलय त्यामुळे वाचता वाचता पडणार्‍या प्रश्नांचीहि उत्तर लगेच दुसर्‍या
ओळीत मिळतायत ...
हल्ली मी तर तुमचे लेख शोधुन शोधुन वाचतेय

पूढचं लवकर लवकर लिहा

अग्निकोल्हा's picture

18 Jan 2013 - 10:14 pm | अग्निकोल्हा

प्रेताला अंत्यसंस्कार नाही. कुटुंबाला अर्धा पगार सात वर्षे पर्यंत काही बातमी नाही कुठे गेले केंव्हा येणार ?

समजले नाही. ७ वर्ष बातमी नाही व अर्धा पगार येतोय म्हटल्यावर कुशंका तयार होणारच की ?

अहो ७ वर्षापर्यंत अर्धा पगार असे असावे.

अर्धा पगार सात वर्षापर्यंत ,
काहि बातमी नाहि ,
कुठे गेले ?
केव्हा येणार ??
असं वाचा म्हणजे बहुतेक तुम्हाला क्लिअर होइल

कलश's picture

18 Jan 2013 - 10:18 pm | कलश

अता वातावरण निर्मिती झालीच आहे पुढचा भाग लवकर येउदे.

आनन्दिता's picture

18 Jan 2013 - 10:59 pm | आनन्दिता

असले ऊत्कंठावर्धक भाग मोठे मोठे टाकलेत तर बरं होइल.

किसन शिंदे's picture

18 Jan 2013 - 11:58 pm | किसन शिंदे

सह्हीच लिहलंय!! पुढचा भाग लवकर टाका.

रामपुरी's picture

19 Jan 2013 - 12:00 am | रामपुरी

कॄपा करून 'क्रमशः' शब्द तुमच्या शब्दकोशातून काढून टाकावा ही विनंती...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Jan 2013 - 12:08 am | विश्वनाथ मेहेंदळे

फूडचा भाग लवकर आला पायजेल...

जेनी...'s picture

19 Jan 2013 - 12:09 am | जेनी...

सुब्बु काका अगदि योग्य ठिकाणी क्रमश टाकलायत .

इथल्या लोकांचं कसय माहितिय का ? ... जास्त लिहिलत कि मग

लांबडाय लय लेख ,
एकाचे दोन भाग करायला हवे होते .... असल्या प्रतिक्रिया देतात ...

त्यापेक्षा तुम्ही सावध राहुन क्रमशः टाकल्यामुळे तुमचं खरच कौतुक .

बॅटमॅन's picture

19 Jan 2013 - 1:11 am | बॅटमॅन

सुब्बु काका

शब्द काळजाला भिडला गो बहिणाबाई. सुब्बूच्या मिश्या आठवल्या उगीच. चांगल्या धाग्यावर हे नाव कशाला काढलेस ;)

आय एन एस शंकुश अजूनही कार्यरत आहे. त्यामुळे काही अभद्र घडले नसावे.

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2013 - 12:49 am | टवाळ कार्टा

एकच मोठा लेख येउदे
पिच्चर बनवण्याच्या लायकीचा लेख आहे
खानांच्या आमिरला दाखवा

शैलेन्द्र's picture

19 Jan 2013 - 12:58 am | शैलेन्द्र

मस्तच.. येवुंद्या हळुहळ्ळु..

आउर आंदो रे भाई जल्दी येकदम!!! उत्सुकता लैच वाढलीये!

दादा कोंडके's picture

19 Jan 2013 - 3:50 am | दादा कोंडके

घटणेचं वर्णन, तांत्रिक माहिती सगळंच झकास. पुढचा भाग येउद्या.

कौशी's picture

19 Jan 2013 - 4:35 am | कौशी

पुढचा भाग लवकर लिहा

मस्त लिहिलंय, अर्थात हे घडलं तेंव्हा फार मस्त नसणार ह्याची कल्पना आलेली आहेच.

मोदक's picture

19 Jan 2013 - 8:41 am | मोदक

पुभाप्र...

थरारक लेखन.

प्रचेतस's picture

19 Jan 2013 - 8:44 am | प्रचेतस

एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवून आणत आहात.
पुढचा भाग लवकर लिहा.

स्पंदना's picture

19 Jan 2013 - 9:02 am | स्पंदना

जबरदस्त!

मुख्य म्हणजे सार्‍या तांत्रिक बाबी तुम्ही उलगडुन सांगताय. त्यामुळे काहीही गोंधळ न उडता या गोष्टीतला थरार जाणवतो आहे. जान हथेली पे गेउन आपले सैनिक कसे जगले हे वाचायची उत्सुकता.

रुमानी's picture

19 Jan 2013 - 9:57 am | रुमानी

हे सगळे फरच भंयकर आहे .
पु.भा. लवकर येउ देत.

रोहन अजय संसारे's picture

19 Jan 2013 - 10:25 am | रोहन अजय संसारे

पुढील भागाची वाट पाहत आहे

आता प्रत्येक अर्ध्या तासाने साईट उघडून बघणे आलं ..
वाट बघतोय साहेब

पुढच्या भागाची

शिलेदार's picture

19 Jan 2013 - 11:23 am | शिलेदार

खुपच थरारक लिहिलय खुप उथ्सुकता लागलीये वाट पाहतोय येवु दे!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jan 2013 - 11:53 am | डॉ सुहास म्हात्रे

पुढच्या भागाची उत्कंठेने प्रतिक्षा चालू आहे. लवकर टाका.

तिमा's picture

19 Jan 2013 - 12:24 pm | तिमा

आले की मिपाचे सदस्य आहोत याचा अभिमान वाटतो. इथल्या अनेक चांगल्या लेखकांच्या पंक्तीत शोभता आहात खरे साहेब.
पुढील भागाचीच काय, तुमच्या अनेक अनुभवांची वाट पहात आहे.

कवितानागेश's picture

19 Jan 2013 - 1:12 pm | कवितानागेश

कठीण परिस्थिती आहे. अश्या वेळेस घरच्यांची आठवण काढायचे देखिल सुचत नसेल.... फक्त १-१ क्षण आता काय होईल, आणि आता काय करायचे...याचाच विचार.

मी एक मावळा...'s picture

4 Feb 2013 - 6:30 pm | मी एक मावळा...

सिन कोनेरीचा पानबुडिवर असलेला दि हन्त (शिकार) फोर रेड ओक्तोबअर हा सिनेमा जरुर पाहावा...

स्मिता चौगुले's picture

11 Feb 2013 - 2:35 pm | स्मिता चौगुले

+१

चिगो's picture

11 Feb 2013 - 7:00 pm | चिगो

उत्कंठावर्धक लेख.. छान जमलाय. पुभाप्र..

अप्रतिम,थरारक,उत्कंठावर्धक,मस्तच....
वाचत वाचत शेवट पर्यंत आलो .........
आणि तोंडातून अचानक निघाले च्यायला क्रमशः आलेच का ....
हीच तुमच्या लिखाणाची ताकत आहे;येवुद्यात पुढचा भाग जरा लवकर .........

सुपरमॅन's picture

11 Feb 2013 - 9:53 pm | सुपरमॅन

लई भारि!! पुठचा भाग येउ द्या लवकर >>>>

सुपरमॅन's picture

11 Feb 2013 - 9:55 pm | सुपरमॅन

पुढचा**: नविन आहे समजुन घ्यावे :)

सुबोध खरे's picture

12 Feb 2013 - 11:40 pm | सुबोध खरे

साहेब पुढचा भाग लगेचच भाग २ म्हणून आलेला आहे
आपण कृपा करून पहावा