मसालेभात
साहित्यः
बासमती तांदूळ २ वाट्या
तोंडली १ वाटी
हळद १/२ लहान चमचा (टी स्पून)
तिखट १ लहान चमचा
कच्चा मसाला ४ लहान चमचे
दही १ वाटी
गूळ लिंबा एवढा
कोथिंबीर १ वाटी
ओले खोबरे १ वाटी
मीठ चवीनुसार
तेल फोडणीसाठी
मोहरी २ लहान चमचे
कढीलिंब पाने दोन डहाळ्या
काळीमिरी १ लहान चमचा.
काजू तुकडा १२ ते १५
साजुक तुप १ छोटा डाव
तयारी:
तांदूळ अर्धा तास भिजत ठेवा.
तोंडल्यांची दोन टोके कापून त्यांच्या चार उभ्या फोडी करा.
कोथिंबीर चिरुन घ्या.
४ वाट्या पाणी तापत ठेवा.
कच्चा मसाला:
अर्धी वाटी धणे, पाव वाटी जिरे, शाहिजिरे २ लहान चमचे, १२ लवंग, ८" दालचिनी. हे सर्व साहित्य न भाजता मिक्सरवर दळून घ्या. (आवश्यकता भासल्यास बारीक चाळणीने चाळून घ्या) पाककृतीत हा मसाला फक्त ४ लहान चमचे घ्यायचा आहे. उरलेला मसाला उसळींसाठी वापरता येईल.
कृती:
पातेल्यात ४ मोठे चमचे तेल घेऊन मध्यम आंचेवर तापवा. तेल तापले की त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की कढीलिंबाची पाने आणि काळीमिरी घाला.
आता काजू घालून परता. काजूंचा रंग बदलायला लागला तोंडली घालून अर्धी वाटी पाणी घालून झाकण ठेवून तोंडली अर्धवट शिजवा. तोंडली शिजली की निथळविलेले तांदूळ घालून परता. आता त्यावर हळद, तिखट, कच्चा मसाला, फेटलेले दही घालून परता.
जरा परतल्यावर गरम केलेले ४ वाट्या पाणी घालून सर्व हलक्या हाताने मिसळा. आता त्यात गूळ घाला. सजावटीसाठी थोडी बाजूला ठेवून बाकीची कोथिंबीर आणि ओले खोबरे घाला. चवीपुरते मीठ घालून पुन्हा सर्व मिसळा>
आता आंच अगदी बारीक करून भात पूर्ण शिजवून घ्या.
भात शिजल्यावर वरून एक छोटा डाव साजूक तुप सोडा.
भाताची मुद पाडून त्यावर थोडे ओले खोबरे, कोथिंबीर घालून लिंबाची फोड आणि लोणच्या बरोबर खायला घ्या.
शुभेच्छा....!
वाचने
53764
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
वाह !
पण...
मुखपृष्ठ..
In reply to मुखपृष्ठ.. by प्रभाकर पेठकर
योग्य ते बदल केलेत.
मस्त
छान
गणेशचतुर्थीच्या दिवशी
या आठवड्यात करुन बघते.
मसालेभात अतिशय
पेठकर काका छानच
एकदम छान दिसतोय मसालेभात!!
मस्त !!! कधी येउ काका
In reply to मस्त !!! कधी येउ काका by पियुशा
थट्टा...
In reply to थट्टा... by प्रभाकर पेठकर
@फक्त यायच्या तासभर आधी कळव
पेठकरकाका, फोडणी आवडली.
अहाहा!
पेठकरकाका,
पाकक्रूती दिसत नाही
पाकृ अतिशय सात्विक वाटली.
In reply to पाकृ अतिशय सात्विक वाटली. by दीपा माने
धन्यवाद.
मस्त
वाचन खूण म्हणून कसं साठवायचं
माझा मसालेभात केल्यावर
फोटोतला मसालेभात एकदम खास!
फार आवडीचा पदार्थ. मठ्ठा
धन्यवाद
मला फोटो दिसत नाही, पण आज हीच