✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तीळ गुळ घ्या , गोड गोड बोला

ब
बापू मामा यांनी
Sun, 01/13/2013 - 16:00  ·  लेख
लेख
बरे बोलता सुख वाटते ! हे तो प्रत्यक्ष कळते ! आत्मवत् परावे ते ! मानित जावे ॥ कठिण शब्दे वाईट वाटते ! हे तो प्रत्ययास येते ! तरी मग वाईट बोलावे ते ! काय निमित्त्ये ॥ आपणास चिमोटा घेतला ! तेणे कासाविस झाला ! आपणावरुन दुसर्‍याला ! राखत जावे ॥ पेरिले ते उगवते !बोलण्यासारिखे उत्तर येते ! तरी मग कर्कश बोलावे ते ! काय निमित्त्ये ॥ श्री मद् दासबोध् दशक १२,समास 10 तीळ गुळ घ्या ! गोड गोड बोला ॥ shivthar ghal
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
सुभाषिते
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
10984 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

शुभेच्छा!

पैसा
Sun, 01/13/2013 - 17:23 नवीन
संक्रांतीच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

तीळ गुळ घ्या , गोड गोड बोला

निवेदिता-ताई
Sun, 01/13/2013 - 18:32 नवीन
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

प्रपात...

स्पंदना
Mon, 01/14/2013 - 02:27 नवीन
प्रपात... चला काटेरी हलव्या सारखे करकरीत अन गोड रहा.
  • Log in or register to post comments

हेही म्हणतो आणिक

समयांत
Mon, 01/14/2013 - 21:46 नवीन
अतिशय निर्मम होता येते दासबोधातल्या शब्दांमुळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

ध्न्यवाद आणि शुभेच्छा !

विटेकर
Mon, 01/14/2013 - 18:26 नवीन
तिळगुळ घ्या गोड बोला ! चित्र शिवथर घळीतील आहे का ? समर्थांच्या मूर्ती समोरुन काढलेले ?
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

विकास
Mon, 01/14/2013 - 21:46 नवीन
तुम्हाला आणि मिपा कुटूंबाला संक्रांतीच्या शुभेच्छा! दासबोधातील त्याच दशक-समासातील अजून थोडे: आपल्या पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें । परंतु कष्टी करावें । हे राक्षेसी क्रिया ॥ २७ ॥ दंभ दर्प अभिमान । क्रोध आणी कठिण वचन । हें अज्ञानाचें लक्षण । भगवद्गीतेंत बोलिलें ॥ २८ ॥
  • Log in or register to post comments

चांगले श्लोक या निमित्ताने

शुचि
Tue, 01/15/2013 - 21:35 नवीन
चांगले श्लोक या निमित्ताने वाचावयास मिळाले. बापू मामा व विकास यांचे श्लोकांबद्दल विशेष आभार.
  • Log in or register to post comments

या सारख्या किती तरी ओव्यांतून

बापू मामा
Sun, 01/20/2013 - 17:19 नवीन
या सारख्या किती तरी ओव्यांतून समर्थांनी बोलणे, वागणे मार्दवपूर्ण, नेमस्त असावे असा उपदेश केलेला आहे, जसे कठीण शब्द बोलो नये I कठीण आज्ञा करू नये I कठीण धिरत्व सोडू नये I काही केल्या II राखे सकलांचे अंतर I उदंड करी पाठांतर I नेमस्तपणाचा विसर I पडणार नाही II सकळास नम्र बोले I मर्यादा धरून चाले I सर्व जन तोषविले I तो सत्वगुण II सकळ जनांसी आर्जव I नाही विरोधाचा ठाव I परोपकारी वेची जीव I तो सत्वगुण II नीच उत्तर सहाणे I प्रत्योत्तर न देणे I आला क्रोध सावरणे I तो सत्वगुण II शब्द कठीण न बोले I अतिनेमेसी चाले I योगी जेणे तोषविले I तो सत्वगुण II नम्रपणे पुसो जाणे I नेमस्त अर्थ सांगो जाणे I बोला ऐसे वर्तो जाणे I उत्तम क्रिया II
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा