खर तर हा धागा काढावा की नाही याचा विचार बर्याच दिवसांपासुन करत होतो. मिपा दिवाळी अंकावरील प्रतिक्रिया मुख्य पानांवर दिसत नसल्याने बर्याच अप्रतिम लेखांवर कमी प्रतिक्रिया आल्या. याबद्दल संपादक मंड्ळाने काही प्रयत्न नक्की केले असतील पण ही सोय काही उपल्ब्ध झाली नाही. मग म्हणलं एक काथ्याकुट टाकुन मला आवडलेल्या काही लेखांची शिफारस करुन बघावी म्हणुन हा प्रपंच
मला आवडलेल्या काही लेखनाची ही यादी
वन फिश अॅट अ टाईम..
इतकी डिटेल आणि थरारक पोलीस इन्व्हेस्टिगेशन कथा बर्याच दिवसांनी वाचली. पहिल्यांदा कथेची लांबी पाहुन नंतर वाचेन असे ठरवले. ही कथा वेगवान आणि बारकाईने लिह्ली असल्याने अप्रतीम झाली आहे. (must read :-) )
मृत्यूछायेतले ६९ दिवस...
नेहमी प्रमाणे मोदकाचे थरारक आणि डिटेल वर्णन. या घटने बद्दल ऐकले होते पण थोडेसेच(नक्की वाचा)
बाप..
रामदास काकांच्या लेखाबद्दल लिहण्यासाठी आमचे शब्ददारिद्र्य आडवे येते. असो पण खास रामदास टच
फॉरबिडन
नगरीरंजन यांच्या लेखनाने नेहमीच भुरळ घातली आहे. ही लघुकथा मात्र तुफानच जमलेय.
अलख
क्रांती ताईंच्या कविता नेहमीच सुंदर असतात. अशिच शब्दसौंदर्याने नटलेली हि कविता
शिलाहार राजवंश आणि गंडरादित्याचा कोल्हापूर ताम्रपट
इंडियाना जोन्स वल्लीचा हा आणखी सुरेख माहितीपुर्ण लेख
एक न रुळलेली वाट...
एक वेगळिच नेटक्या शब्दात रंगवलेली वाट मला तरी नक्कीच आवडली.
काठमांडू ते कंदहार..
खर तर नको ती आठवण पण नक्कीच माहितीपुर्ण लेख (जरुर वाचा)
गवींचे संपादकीय आणि अजुन बरेच आहेत आणि तुम्हीही भर घालालच
जाता जाता
अल्बर्ट ब्रोकोली प्रेझेन्ट्स इयान फ्लेमींग.... हा लेख आवडला पण पिअर्स ब्रॉसननचे नाव नसल्याने यादित समाविष्ट नाही ;-)
चेतन
वाचने
2448
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद!
मालोजीरावांचा औरंगजेबाचे
एक सुचना
स्वगृह पान
In reply to एक सुचना by डॉ सुहास म्हात्रे
अजुन काही लेखन
ती चाफा यांची एकांकिका भलतीच
In reply to अजुन काही लेखन by चेतन
रामदास यांची "बाप" ही कथा