राज ठाकरेंचं मौन?
गेल्या ४-५ महिन्यांपासून राज ठाकरे 'जरा' शांत वाटताहेत. विशेषतः राज्यातील सरकारविरुद्ध त्यांनी 'ब्र'सुद्धा काढलेला नाहीये. कधीतरी 'बिहारी' म्हणून ओरडतात पण त्यातही पूर्वीसारखा 'दम' नाही वाटत.
मी मनसेच्या सुरुवातीपासून 'मनसे'चा प्रशंसक राहिलो आहे हे ईथे मुद्दाम नमुद करावे वाटते, नाहीतर निव्वळ कुरापत काढण्यासाठी काढलेला धागा अशी माझी संभावना व्हायची. मला राजकारणातलं फार काही कळत नाही. तरीही माझ्या अल्पमतीनुसार काही संभाव्य कारणांचा अंदाज केला.
१. काका गेल्याचे दु:ख ?(शक्यता फारच कमी आहे)
२. काकांनी जाण्यापुर्वी काही विनंती केली का? (शिवसेना आणि उद्धवसाठी) (अगदीच फिल्मी वाटतंय)
३. सत्ताधारीपक्ष कोणत्यातरी कारणास्तव त्यांना ब्लॅकमेल करत आहे का? (पूर्वीची कोणतीतरी खूनाची केस आहे ना?)
४. अनेक केसेसला तोंड देता देता त्यांच्या नाकी नऊ तरी आले नाहीये ना?
५. पक्षांतर्गत घडी (पक्षी अंतर्गत बंडाळी) नीट बसवत आहेत का? (हर्षवर्धन जाधव राजीनामा प्रकरण)
६. विकासाची ब्लू प्रिंट तयार करण्यात व्यस्त आहेत का?
७. .......
तुम्हाला आणखी काही कारणे असावीत असे वाटत आहे का? राजकीय विश्लेषकांनी यावर प्रकाश टाकल्यास गोष्टी चांगल्या समजतील. मला स्वत:ला अंदाज क्र. ३ बरोबर असावा असे फार वाटते आहे.
प्रतिक्रिया
तुम्ही बिहारी आहात काय्? तुमच
जळ.लि !!! लगेच वापरायलाच
तुम्ही बिहारी आहात काय्? तुमच
हेच विचार कागदावर उतरवून
हॉर्स माऊथचा अक्सेस असता तर
ऑ?
येथे चोप्य पस्ते करा....
बरोब्बर..
मिपाच्या सुरुवातीलाच एक गुंडी
सूचना रास्त असली तरी धागा
हा हा हा... बरोबर!
टोल नाका आंदोलनाचे 'हिशेब'
विकासाची ब्लू प्रिंट
नाही कसं?
-१
मतं नाही पण सभा हाऊसफुल्ल
राज ठाकरे... गेट वेल सून....
राज ठाकरेंच्या मौनाची
माझे मत
राज ठाकरे बोलले तरी प्रॉब्लेम