✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डीझेल दरवाढ्,महागाई ई. संबंधी चाललेल्या विविध ३ चर्चा- तुमचं मत अपेक्षित ..

१
१००मित्र यांनी
गुरुवार, 01/10/2013 - 16:42  ·  लेख
लेख
सकाळी ९-१५ – ग्रुप क्र. १ “हल्ली कोण पण गाड्या घेतं राव” “अरे, जागा विकून पैसे आलेले असतात ना !” “बरोबर आहे १ रू चे १ कोटी मिळाल्यावर काय व्हायचं” “पण सगळे दारू, किंवा पनवेल ला जातात हे पैसे , माहितिये ?” “हं.. इनव्हेस्ट्मेंट्चं नॉलेजच नसतं यार ह्यांना” “जागाच विकतात फटाफ़ट, सोनं का नाही घेत कुणास ठाऊक” “त्यांचं ठीक आहे रे, पण आपल्यासारख्यांनी काय करायचं ?” ——————————————————————– १०-१५ जिम :- ग्रुप क्र. २ :- “काय बरेच दिवसांनी … “जरा कामात होतो… “चांगलं आहे, म्हणजे कामं पाहिजेतच हो “!” “नाहीतर हल्ली अवघडच आहे ना! “५०,००० रू सुद्धा पुरायचे नाहीत. “हो , हो. “घरचा खर्च, इ.एम.आय. , गाडीचा हप्ता, इन्श्युरन्स… “मुलांची शिक्षणं भलतीच महाग झालीयेत हल्ली. “हो, तरी बरं बाई , मी स्वैपाक घरीच स्वत:च करते “ऑं ? त्यापेक्षा बाई लावा , आणी तुम्ही काहीतरी प्रॉडक्टिव्ह का करत नाही ? ======================================== सकाळी ११-१५ परशुराम हॉटेल , कर्वे नगर.ग्रुप क्र. ३ :- “१० रू.नी डिझेल वाढलं” “आता सर्वच हळू-हळू महाग होत जाणार” “अवघडच आहे यार कॉमन माणसाचं” “१००० रू. गॅस झाल्यावर गरीबानं करायचं तरी काय” “एकंदरीत काय , तर खर्च वारेमाप वाढत चाल्लेत अगदी” ——————————————————————- ह्या सर्व संवादांच्या शेवटी एकच कॉमन वाक्य होतं :- “इनकम वाढवण्याशिवाय पर्याय नाही” तुमचं मत ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4287 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

सहमत..

ह भ प
गुरुवार, 01/10/2013 - 16:46 नवीन
खरयं.. जोडधंदा पायजे राव.. शेअर ट्रेडिंग, किंवा व्यवसाय..
  • Log in or register to post comments

काडी

स्पा
गुरुवार, 01/10/2013 - 16:54 नवीन
मिळ. ली : ह्यात काथ्या कुटण्यासारखं काय आहे? सर्वांचंच एकमत आहे ह्या विषयावर जळ. ली : IT मध्ये करियर करा , कमीत कमी कष्टात , खोर्याने पैके ओढाल.
  • Log in or register to post comments

जळ. ली : IT मध्ये करियर करा ,

गवि
गुरुवार, 01/10/2013 - 17:06 नवीन
जळ. ली : IT मध्ये करियर करा , कमीत कमी कष्टात , खोर्याने पैके ओढाल.
छ्या.. काहीतरीच.. हे पहा जळ.लि: "अरे काय इन्कम इन्कम.. पैसा तर साला ** पण कमावते.. आपण सगळेच कोणा ना कोणाची **. रक्त ओकून पैसा कमवायचा आणि शेवटी काय उरणार तर तडकलेली कवटी अन सावडलेली मूठभर राख.. आणि तीही आपणच काढलेली पोरं आनंदाने एखाद्या हागणदारीच्या घाटावर जाऊन पाण्यात बुडवणार.." --------- जळ्.लि समाप्त. धागाकर्त्याने हबकू नये. संदर्भ वेगळा आहे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अस्खलित!!

इनिगोय
गुरुवार, 01/10/2013 - 17:55 नवीन
अस्खलित!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धागाकर्त्याने हबकू नये.

शुचि
Fri, 01/11/2013 - 02:47 नवीन
धागाकर्त्याने हबकू नये. संदर्भ वेगळा आहे..
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

खाणी घ्या ,पेट्रोल डिझेल विका

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 01/10/2013 - 17:10 नवीन
खाणी घ्या ,पेट्रोल डिझेल विका,गॅस ब्लॅक मार्केट मध्ये विका(जास्त कार्ड घेउन्),चेन स्नेचींग चे काम करा,वाळुचे ठेके घ्या,बाबा महाराज व्हा किंवा राजकारणात या नो प्रॉब्लेम
  • Log in or register to post comments

महाराज व्हा -लई ब्येस बघा

१००मित्र
गुरुवार, 01/10/2013 - 17:23 नवीन
म्हाराज व्हनं हे सम्द्यात ब्येस बघा, हां पन सध्या त्येचात पन कांपिटिशन हाय त्येच्या xxx !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

कसली कॉम्पीटीशन ,जसे दुकानदार

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 01/10/2013 - 17:48 नवीन
कसली कॉम्पीटीशन ,जसे दुकानदार वाढले तसे गिर्‍हाईक(मानसीक, शारिरीक रोगी, नापास होणारे,निवडणुक लढवणारे,ज्यांची पळुन गेलीये असे) पण वाढल की राव्, असेल लोकांना बनविन्यात दम्, तो फिर किस बात है गम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: १००मित्र

बाबा, भाई आणि शिक्षण सम्राट

मस्त् राम
गुरुवार, 01/10/2013 - 19:59 नवीन
बाबा, भाई आणि शिक्षण सम्राट हे तीन लय भारी धंदे हायत! आणि कांपिटिशन म्हंटल तर त्या मुलच कोन्ताबी धंदा वाढतो असं कोणी तरी बाबान म्हनला हाये म्हणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: १००मित्र

हायला!

पैसा
गुरुवार, 01/10/2013 - 17:20 नवीन
पैसे वाचवणे हे पैसे मिळवण्यासारखे नाही का? म्हणजे असं बघा, उदा. क्र. १ : महाग गाडी कशाला पाहिजे? शक्य तेवढे चालत जा. गरज असेल तेव्हा इंधन किफायती गाडी वापरा. ताष्ट्रीय संपत्ती वाचवाल. उदा. क्र. २ : गप्पाच मारायच्या असतील तर जिममधे पैसे देऊन कशाला जायला पाहिजे? पूर्वी बायका देवळात जाऊन वाती वळताना तेच करत असत. तसेही पैसे न देता घरच्या घरी व्यायाम करता येतो. शिवाय घरकाम, स्वयंपाक याला नोकर न ठेवता सगळी कामे स्वतः करा. उदा. क्र. ३ : हॉटेल कशाला? सगळे पदार्थ घरी करा. स्वच्छ आणि चांगले खाणे थोडक्यात होऊन जाईल. वरच्या तिन्ही उदाहरणात खर्च करायच्या जागी जायचेच कशाला? वाचलेल्या पैशांचा आणि वेळेचा उपयोग दुसर्‍या चांगल्या कारणासाठी करता येतोच की!
  • Log in or register to post comments

अगदीच आदर्श आदर्श !

१००मित्र
गुरुवार, 01/10/2013 - 17:27 नवीन
जोक्स अपार्ट , पण तुमचं म्हणणं पटणेबल नक्कीच आहे. १००० रू. जास्त मिळवायला जितके कष्ट घ्यावे लागतील, त्यापेक्षा १००० रू. फालतूचे खर्च वाचवून इझीली वाचवता येतील. थोडक्यात काय- प्वायंटाचा मुद्दा बरोबर हाये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अस केल की अर्थ व्यवस्था मंदीत

शैलेन्द्र
Fri, 01/11/2013 - 12:21 नवीन
अस केल की अर्थ व्यवस्था मंदीत जाते.. अर्थात सध्या थोड्या मंदीची गरज आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: १००मित्र

परफेक्ट शैलेन्द्र , व्हेरी

१००मित्र
Fri, 01/11/2013 - 18:06 नवीन
परफेक्ट शैलेन्द्र , व्हेरी वेल शेड !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

हम्म.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/10/2013 - 17:25 नवीन
डीझेल दरवाढ्, पेट्रोल दरवाढ, गॅस दरवाढ, रेल्वेची दरवाढ, अमुक दरवाढ, धमुक दरवाढ, वात आणलाय या दरवाढीच्या बातमींनी. च्यायला.....कशाचे तरी दर उतरले अशी बातमी कोणी तरी आणा रे.... :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

शुभवर्तमान

नितिन थत्ते
गुरुवार, 01/10/2013 - 18:14 नवीन
कायतरी माणसाचं आयुष्य स्वस्त झालंय असं ऐकलं होतं बुवा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हां ! सुपारीचे रेट उतरलेत

१००मित्र
गुरुवार, 01/10/2013 - 23:05 नवीन
हां ! सुपारीचे रेट उतरलेत म्हणे ! ५-१० हजारात पण आजकाल गेम वाजवतात म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

हा ना राव. सगळं ठिक होतं न

नाना चेंगट
Fri, 01/11/2013 - 09:55 नवीन
हा ना राव. सगळं ठिक होतं न होतं तोच कुणीतरी बातमी आणतो आता प्राध्यापकांना सातवा आयोग आधीच लागू करून सहाव्याचा आणि सातव्याचा फरक आगाऊ देणार आहेत... ढ्ण्ण,... परत सगळे भाव वाढतात रप्कन !! च्यामारी प्राध्यापकच व्हावं आता महागाईवर मात करायला !! हाकानाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा होणे हल्ली हाकानाका नाही

शैलेन्द्र
Fri, 01/11/2013 - 12:37 नवीन
प्रा होणे हल्ली हाकानाका नाही राहीलेलं. नुस्त प्रा डॉ असूनही नाही चालत.. नेट सेटची भानगड आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

एकदम बेश्ट धन्दा ! आमच्या एक

१००मित्र
Fri, 01/11/2013 - 18:13 नवीन
एकदम बेश्ट धन्दा ! आमच्या एक ओळखीचे प्रा. त्यांचे जो[वि]डधन्दे खालीलप्रमाणे :- १. पुस्तके लिहून छापणे , विकणे २. ट्युशन्स ३. त्यांनी एक हॉटेल पण चालवायचे, ते बोंबललं सदर प्रां.ना ह्या सगळ्या कामाचा भयंकर थकवा येतो, त्यामुळे आठवड्यातील एका ठराविक वारी ते नियमित पणे शिणवटा काढण्यासाठी "औषध" घेतात आणी मधून मधून थायलंड ला वगैरे पण जातात काय करणार ....! महागाई फारच वाढत चाल्लीये ना यार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

हे तर काहीच नाही, आमच्या

गवि
Fri, 01/11/2013 - 18:18 नवीन
हे तर काहीच नाही, आमच्या कोंकणात तर आमचे शिक्षक एकाचवेळी घरी बनवलेल्या केरसुण्या, ओव्याचा अर्क आणि परकर विकायचे. अन्य काही विजोडधंद्यांना तर तोड नाही. पण सर्वात लाजवाब पाटी जी पाहिली आहे ती इथे उल्लेखतो: "आमचे येथे देव, कोळसा व पँट चेन्स मिळतील." येस्स.. देवांच्या मूर्ती, कोळसा आणि पँटच्या सुट्या झिप्स.. आता बोला..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: १००मित्र

थोडस्सं विषयांतर ....

१००मित्र
Sat, 01/12/2013 - 13:57 नवीन
गवि, पुण्यात सर्रास दुकानं दिसतात :- "रद्दी व नारळ केंद्र " ह्या काय भानगड असा वो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

महिला प्राध्यापीका ब्युटी

श्री गावसेना प्रमुख
Sat, 01/12/2013 - 09:02 नवीन
महिला प्राध्यापीका ब्युटी पार्लर्,त्याचे क्लासेस्,शिवणकामाचे क्लासेस,पापड्,दाळीचे वडे,कुरडया विकणे असे साईड बिजनेस करु शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: १००मित्र

कोल्हापुरात

तिमा
गुरुवार, 01/10/2013 - 20:20 नवीन
कोल्हापुरात अंत्यविधी फुकट करून देतात म्हणे मुण्सिपाल्टीवाले.
  • Log in or register to post comments

कोणतीही खरेदी १० नाही १०००

शुचि
Fri, 01/11/2013 - 02:49 नवीन
कोणतीही खरेदी १० नाही १००० वेळा विचार करुन करा. गरजा अल्प ठेवा.
  • Log in or register to post comments

उपाय

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/11/2013 - 11:06 नवीन
भगवे कपडे विकत घ्या, हिमालयाला चला. सामुहिक संन्यास घ्यायची वेळ आली आहे. गर्दी होऊ नये म्हणुन नर्मदा परिक्रमा, गंगास्नान, तिर्थ दर्शन वैगरे उपाय सुद्धा आहेत. पण रेल्वे नी प्रवास टाळा, त्यांन्नी पण केली आहे भाव-वाढ. चालत जावा. निम्म्या यात्रेत "कैलास" नक्की दिसेलच.
  • Log in or register to post comments

उपयोग काय ??

सूड
Fri, 01/11/2013 - 12:07 नवीन
आमचं मत जाणून घेऊन त्याचा तुम्ही काय उपयोग करणार आहात ते सांगा आधी, मग देतो प्रतिक्रिया. कसें ?
  • Log in or register to post comments

हं .....

१००मित्र
Sat, 01/12/2013 - 13:59 नवीन
हं ..... तेवढाच काय साइड बिझनेस सेट झाला तर .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

काहीही करून ..

चौकटराजा
Fri, 01/11/2013 - 13:22 नवीन
अर्थ तज्ञाचे एकच काम असते. त्याला फार अक्कल लागत नाही. आपण उगीचच मनमोहन सिंग अहलूवालोया ई चे गोडवे गातो. हा तर काय सांगत होतो. अर्थ तज्ञाचे एकच काम. सरकारी तिजोरीतून बाहेर गेलेला पैसा या ना त्यामार्गाने परत आणणे. मग आयकराच्या दरात सवलत देणे लांबणीव्रर टाका. सबसिड्या कमी करा. काटकसर करता येण्यासाख्या वस्तू उदा. पेट्रोल, दारू, सिगरेट, डिझेल , वीज, जुगार, लांबचा प्रवास महाग करा. त्यावरचे कर वाढवा. सेक्शन ८० द्वारे मध्यम वर्गीयाची दिशाभूल करा. मनमोहन सिंग यांच्या निष्ठेवर शंका घ्यायला जागाच नाही. वरील उपाय ते करीत आहेत. कारण लोकांकडे पैसा आहेच. फक्त ते स्वत: सचिन तेंडूलकर , मुकेश अंबानी व मी यांच्या आयकराची स्लॅब एकच करायचा त्यांचा यापुढील मनसुबा आहे की काय ते न कळे !
  • Log in or register to post comments

अतिपरिचयात अवज्ञा

श्रिया
Fri, 01/11/2013 - 15:15 नवीन
एखादी गोष्ट खूप परिचयाची झाली किंवा सतत घडू लागली की तिचे महत्त्व कमी कमी होत जाते.सध्याच्या महागाईविषयी असेच करण्याचा सरकारचा हेतू असावा का? "अतिपरिचयात अवज्ञा"!!
  • Log in or register to post comments

श्रिया आपले प्रतिसाद मला

शुचि
Fri, 01/11/2013 - 19:38 नवीन
श्रिया आपले प्रतिसाद मला आवडतात. वेगळाच अँगल (दृष्टीकोन) मांडता तुम्ही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा