✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रंगावली प्रदर्शन - २०१२, ठाणे!

क
किसन शिंदे यांनी
गुरुवार, 12/06/2012 - 20:17  ·  लेख
लेख
मदनबाणाचा रांगोळी प्रदर्शनाचा धागा पाहिल्यानंतर मलाही इथे धागा टाकण्याचा मोह आवरता येत नाहीये. ;) ठाण्यातल्या न्यु गर्ल्स स्कुलमध्ये रंगावली गृपतर्फे दरवर्षी रांगोळी प्रदर्शन भरवले जाते, ते या वर्षीही भरवले होते. १५ च्या संध्याकाळी चहाबरोबर जोरदार शंकरपाळ्या हादडल्यानंतर भाचेकंपनीला सोबत घेतलं आणि प्रदर्शनात पोहचलो. गणरायाच्या सुरेख रांगोळीने सुरूवात झाली.सध्या घडणार्‍या विविध घडामोडींना लक्षात ठेऊन एकापेक्षा एक सुरेख रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पैकी अ‍ॅपलचे जनक स्टिव्ह जॉब्स आणि भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह यांच्या रांगोळ्या दृष्ट लागण्याजोग्या होत्या. व्यक्तिशः मला त्या खुपच आवडल्या. पहा तुम्हाला आवडतात का.. सर्वात पहिली गणरायाची रांगोळी. 1 आणि हो, प्रत्येक रांगोळीसोबत एक सुंदर काव्यसुध्दा लिहिण्यात आलं होतं. रमाबाई रानडेंच्या आयुष्यावर सुरू असणार्‍या मालिकेत आपल्या अभिनयाने छोटा पडदा गाजवणारी हि बाल अभिनेत्री. 2 मदर तेरेसा. 3 माननीय सिंधुताई सकपाळ. यांच्या हनुवटीवर असणारा मुस इतक्या बेमालुमपणे काढला होता कि खरोखरचा भासत होता. दुर्दैवाने माझ्या मोबाईल कॅमेर्‍याने फोटो काढले असल्याने मला तो चांगल्या रितीने टिपता आला नाही. :( 4 मराठीतले दोन दिग्गज अभिनेते, ज्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने अनेक मराठी सिनेमात क्रुर खलनायक साकारले. 5 कँसरसारख्या भयानक आजारालासुध्दा मोठ्या धैर्याने तोंड देणारा आपला लाडका युवराज! 6 बाबु मोशाय.... 7 यश चोप्रा! 8 ह्या रांगोळीच्या कलाकाराने बुध्दाच्या मुर्तीवरची शायनिंग अतिशय जबर काढली होती. 9 हि पण चांगली काढली होती. 10 स्टिव्ह जॉब्स! 11 सायना नेहवाल. ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. 12
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
छायाचित्रण
रेखाटन

प्रतिक्रिया द्या
27659 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

सगळ्या रांगोळ्या अप्रतिम

रेवती
गुरुवार, 12/06/2012 - 20:23 नवीन
सगळ्या रांगोळ्या अप्रतिम आल्या आहेत. बुद्धाची रांगोळी हा फोटो असल्यासारखी आहे. अशक्य ग्रेट कला आहे. फक्त एकच राहून राहून वाटते की शिनेमातील कलाकारांना आजकाल बराच भाव मिळतोय. त्यात खूप वाईट असे काही नसले तरी फार ग्रेटही काही नाही.
  • Log in or register to post comments

अप्रतिम..

अनन्न्या
गुरुवार, 12/06/2012 - 20:29 नवीन
प्रत्यक्ष पाहता आल्या असत्या तर आणखी बहार आली असती. सुंदर कलाक्रुती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्द्ल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

किसनराव

लीलाधर
गुरुवार, 12/06/2012 - 20:32 नवीन
प्रत्यक्ष नै पण अप्रत्यक्षरित्या फटूतून रंगावली प्रदर्शन घडवलत धन्यवाद. रांगोळ्या फारच छान आहेत विशेषत: बुद्धाची तर लाजवाब :)
  • Log in or register to post comments

मस्त रे किसना ! धाग्याची वाट

मदनबाण
गुरुवार, 12/06/2012 - 20:48 नवीन
मस्त रे किसना ! :) धाग्याची वाट पाहत होतो.... :) मला सिंधुताई आणि बुद्ध या दोन रांगोळ्या जास्त आवडल्या. :) पुढच्या वेळी या ठिकाणी चक्कर टाकायचा विचार नक्की करीन ! (कला प्रेमी)
  • Log in or register to post comments

सुंदर रांगोळ्या

सानिकास्वप्निल
गुरुवार, 12/06/2012 - 21:47 नवीन
अप्रतिम कलाकृती :) बुद्धाची रांगोळी आणी चिमुकल्या रमाबाई (तेजस्विनी)ची रांगोळी खूप आवडली धन्यवाद
  • Log in or register to post comments

सुंदर , अप्रतिम

निवेदिता-ताई
गुरुवार, 12/06/2012 - 21:57 नवीन
सुंदर , अप्रतिम
  • Log in or register to post comments

सुंदर

खेडूत
गुरुवार, 12/06/2012 - 22:30 नवीन
बहुतेक सगळ्या सुंदर आल्या आहेत. बुद्ध, युवी आणि स्टीव्ह जॉब्स विशेष छान! राजेश खन्ना च्या चित्रातला (भूतकाळ सुचवणारा ) कृष्ण धवल इफेक्ट पण लक्ष्यवेधक.
  • Log in or register to post comments

मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या...

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/06/2012 - 22:38 नवीन
मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या.... :-)
  • Log in or register to post comments

बोट जातात रांगोळी टाकुन. तासन

स्पंदना
Fri, 12/07/2012 - 04:56 नवीन
बोट जातात रांगोळी टाकुन. तासन तास बसुन एकाग्रतेने काढावी लागते रांगोळी. मुख्य म्हणजे चुकेला फार कमी वाव. कारण एक दुरुस्त करायला गेल की दुसर खराब होत. युवीच्या कपाळावरच्या शीरा फार छान उमटल्यात. सार्‍याच रांगोळ्या अप्रतिम.
  • Log in or register to post comments

खूप सुंदर.

प्रचेतस
Fri, 12/07/2012 - 08:57 नवीन
खूप सुंदर.
  • Log in or register to post comments

वल्लाह क्या बात है !

चौकटराजा
Fri, 12/07/2012 - 09:08 नवीन
फारच कसदार ! सर्वांची ओळख व्यवस्थित पटते हे रंगावलीचे यश कारण ते रांगोळीत खास अवघड आहे. किसनदेवा , अशीच किर्पा ठ्वा !
  • Log in or register to post comments

अतिसुंदर

नितिन काळदेवकर
Fri, 12/07/2012 - 09:08 नवीन
रांगोळीचा एक एक ठिपका हा बोलका झाला आहे असे वाटते.स्टिव्ह जॉब्स,गौतम बुध्दांची,सिंधुताई सकपाळांची रांगोळी अप्रतिमच.या सर्व रांगोळीत सर्वात कठीण रांगोळी कोणती असेल तर ती यश चोप्रा यांची. त्यात ज्या छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत त्या काढणे म्हणजे कठीणच.
  • Log in or register to post comments

मस्तच , मला हेवा वाटतो या

ज्ञानराम
Fri, 12/07/2012 - 09:22 नवीन
मस्तच , मला हेवा वाटतो या कलाकारांचा..
  • Log in or register to post comments

मस्तच !!

सूड
Fri, 12/07/2012 - 09:33 नवीन
मस्तच !!
  • Log in or register to post comments

वा!

ऋषिकेश
Fri, 12/07/2012 - 09:36 नवीन
वा!
  • Log in or register to post comments

अप्रतिम बोलायला शब्दच नाहि

सर्वज्ञ
Fri, 12/07/2012 - 09:41 नवीन
अप्रतिम बोलायला शब्दच नाहि खरच!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!!!!!

मितभाषी
Fri, 12/07/2012 - 09:53 नवीन
अप्रतिम!!!!!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम रांगोळ्या! ह्या

दीपा माने
Fri, 12/07/2012 - 10:50 नवीन
अप्रतिम रांगोळ्या! ह्या कलाकारांचे भाग्य कधी फळफळणार? तुमच्यामुळे ठाण्यातल्या रांगोळ्या इथे अमेरीकेत पाहते आहे. आभारी आहे.
  • Log in or register to post comments

??

वपाडाव
Fri, 12/07/2012 - 17:05 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपा माने

??

वपाडाव
Fri, 12/07/2012 - 17:05 नवीन
आपण कुठे राहता इकडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपा माने

अप्रतिम रांगोळ्या!

रोहित पवार
Fri, 12/07/2012 - 11:33 नवीन
अप्रतिम रांगोळ्या! खरच खुपच छान आहेत सर्वे आणि त्या मधे कोणास किती मार्क दयाचे हे तर परिसकाना सुधा आवघड गेले आसेल.......
  • Log in or register to post comments

पॉशच

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/07/2012 - 13:17 नवीन
किसनदेवा धन्यवाद रे. सगळ्या रांगोळ्या अगदी दृष्ट लागण्यासारख्या आहेत.
  • Log in or register to post comments

खरच अप्रतिम रांगोळ्या आहेत

RUPALI POYEKAR
Fri, 12/07/2012 - 13:21 नवीन
खरच अप्रतिम रांगोळ्या आहेत आणि तुमचे आभार त्या आमच्यापर्यत पोहचवण्यासाठि
  • Log in or register to post comments

धन्यवाद

शिद
Fri, 12/07/2012 - 13:42 नवीन
सार्‍याच रांगोळ्या अप्रतिम!!!
  • Log in or register to post comments

बुद्धाच्या चेहर्‍यावरचे

बॅटमॅन
Fri, 12/07/2012 - 14:15 नवीन
बुद्धाच्या चेहर्‍यावरचे शायनिंग, ती केळाच्या पानाखाली आडोसा घेणारी दोन पोरे अन स्टीव्ह जॉब्सच्या दाढीचे खुंट हे केवळ अप्रतिम!
  • Log in or register to post comments

सुंदर

स्मिता.
Fri, 12/07/2012 - 15:37 नवीन
अतिशय सुरेख रांगोळ्या आहेत. बुद्धाची प्रतिमा तर अप्रतिम!!
  • Log in or register to post comments

अप्रतिम रांगोळ्या आहेत सगळ्या

जयवी
Fri, 12/07/2012 - 15:54 नवीन
अप्रतिम रांगोळ्या आहेत सगळ्या.....काय कला असते एकेकाच्या हातात !!
  • Log in or register to post comments

सगळ्याच रांगोळ्या खूपच छान

प्यारे१
Fri, 12/07/2012 - 16:50 नवीन
सगळ्याच रांगोळ्या खूपच छान आहेत.... ! रसिकांच्या कौतुकाचे शब्द कलाकारांपर्यंत पोचायला हवेत खरंतर.
  • Log in or register to post comments

एकदम मस्त . . .

हुकुमीएक्का
Fri, 12/07/2012 - 22:53 नवीन
फोटो खुप छान आलेत. . . युवराज सिंग, स्टीव जॉब्स व मदर तेरेसा यांच्या रांगोळीमधून inspirational संदेश मिळाला . . .
  • Log in or register to post comments

सगळ्या रांगोळ्या अप्रतिम ....

खबो जाप
Sat, 12/08/2012 - 16:20 नवीन
सगळ्या रांगोळ्या अप्रतिम आहेतच ; पण आपल्याला राजेश खन्नाची रांगोळी विशेष आवडली बाबा
  • Log in or register to post comments

डॉल्याचे पारणे फिटले ..

पियुशा
Sun, 12/09/2012 - 15:16 नवीन
डॉल्याचे पारणे फिटले ...अप्रतिम :)
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर रांगोळ्या. परत

कवितानागेश
Sun, 12/09/2012 - 23:24 नवीन
अतिशय सुंदर रांगोळ्या. परत परत बघतेय. :)
  • Log in or register to post comments

मस्तच!

पैसा
Mon, 12/10/2012 - 22:56 नवीन
खूप छान आहेत रांगोळ्या.
  • Log in or register to post comments

सुरेख!

सुधीर
Mon, 12/10/2012 - 23:01 नवीन
काय सुंदर कला आहे!
  • Log in or register to post comments

सुंदर कला !

अल्पेश ठाकूर
Mon, 12/10/2012 - 23:09 नवीन
सुंदर कला !
  • Log in or register to post comments

सुंदर कला !

अल्पेश ठाकूर
Mon, 12/10/2012 - 23:09 नवीन
सुंदर कला !
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Tue, 12/11/2012 - 05:48 नवीन
सुरेख रांगोळ्या. येथे फोटो दिल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

सुंदर

सविता००१
Tue, 12/11/2012 - 09:59 नवीन
झकास :)
  • Log in or register to post comments

शब्दात वर्णन करता येणार नाही

अनिल तापकीर
Sat, 12/15/2012 - 19:28 नवीन
शब्दात वर्णन करता येणार नाही इतक्या सुंदर आहे
  • Log in or register to post comments

राजेश खन्ना खासच .

जेनी...
Sat, 12/15/2012 - 21:39 नवीन
राजेश खन्ना खासच .
  • Log in or register to post comments

खुपच छान

गोरख कालेकर
Sun, 01/06/2013 - 15:11 नवीन
खुपच छान
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर......

kanchanbari
Sun, 01/06/2013 - 15:23 नवीन
अतिशय सुंदर......
  • Log in or register to post comments

अतिशय सुन्दर कौतुक करावे तेवधे थोदे वातते आहे !!

क्श्मा कुल्कर्नि
Wed, 01/09/2013 - 11:30 नवीन
अतिशय सुन्दर कौतुक करावे तेवधे थोदे वातते आहे !!
  • Log in or register to post comments

किसन शिंदे साहेब, मस्त रांगोळ्या आहेत लय भारी

निश
गुरुवार, 01/10/2013 - 14:36 नवीन
किसन शिंदे साहेब, मस्त रांगोळ्या आहेत लय भारी. न्यु गर्ल्स स्कुलच्या मागे न्यु ईंग्लिश स्कुल आहे तिथे दिवाळीच्या काळात किल्ले प्रदर्शन असत. एक से एक बढिया किल्ल्यांचे प्रति़रुप असतात. जरुर या बघायला. माझ्या घरासमोरच ह्या दोनी शाळा असल्यामुळे ज्या ज्या वेळी रंगावली प्रदर्शन असत तेव्हा मी नेहमी जातो.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!

कौशी
Fri, 01/11/2013 - 08:25 नवीन
सर्व रांगोळया अप्रअतिम आहेत.
  • Log in or register to post comments

लाजवाब रांगोळ्या !

श्रिया
Fri, 01/11/2013 - 16:02 नवीन
लाजवाब रांगोळ्या !
  • Log in or register to post comments

आवडल्यात पण

समयांत
Tue, 01/15/2013 - 20:15 नवीन
पैकी न्यु गर्ल्स स्कुल असले तरी रांगोळी प्रदर्शनात रांगोळ्या गर्ल्सकडून अपेक्षित करणे व्यर्थ. ;) उकुदुघेन.
  • Log in or register to post comments

अप्रतिम रांगोळ्या. केळीचे पान

शुचि
Tue, 01/15/2013 - 21:46 नवीन
अप्रतिम रांगोळ्या. केळीचे पान डोईवर घेतलेल्या उनाड मुलांची रांगोळी , मुलांचे स्वच्छंद भाव फार आवडले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा